ती, तिचं बाळ आणि मी.

Submitted by मनस्वी राजन on 14 October, 2011 - 23:29

पुण्यामधे माझी एक पक्की जागा आहे.
माझा एक कट्टा म्हटलं तरी चालेल.
माझ्या मित्र-मैत्रिणींचा जमायचा अड्डाच आहे तो.
’डेक्कन’ वरुन कोणी जाणार असेल तर जाता-जाता ’तुलसी’कडे बघुन जातोच.
आमच्यापैकी कोणीतरी तिथे भेटायची शक्यता जास्त असते.
’तुलसी’ म्हणजे डेक्कन वरच फेमस चहाच होटेल. इथल्या ’चहा’ पासुन ते तुलसीच्या मालकापर्यंत प्रत्येक गोष्टच वेगळी.
म्हणजे सगळच वेगळं,’तुलसीच्या चहाची चव’,’तुलसीचा मालक, तुलसीचे कामगार आणि तिथे बसणा-यापर्यंत सगळच वेगळ.
माझा एक मित्र नेहमी म्हणतो,"तुलसीचा चहा गरम असतो तो पर्यंत मसालेदार, पण जर का तो थंड झाला तर त्याच चहाची ’रम’ बनते. असो...

रस्ते खंदणा-या कामगारांपासुन ते रोज CCD,Barista मधे बसणारा Crowd इथे बसलेला दिसतो.
हो! पण एवढ्या गि-हाईंकांमधे आता आम्हाला थोडी वेगळी treatment मिळते.
3 रुपयाच्या चहा घेऊन दोन-दोन तास बसणा-या काही ठराविक लोकांमधे आमचा समावेश झाला आहे. पलीकडचा टपरीवाला सुध्दा प्रत्येकाच्या सिगरेटचा ब्रँड अगदी ओळखतो.

ह्या तुलसीवर मी Sat-Sun असतोच असतो.
तुलसीच्या समोरच्या फुटपाथवर एक जोडपं काही वस्तु विकत असतं.
’तो’ म्हणजे तिचा नवरा, रोडवर बसुन मोबाईलचे कव्हर विकत असतो.
आणि ’ती’ त्याच्या शेजारी बसुन पोस्टर, वाँल पेपर विकत असते.
त्या पोस्टर्सवर ’Never, Never Give Up','In My Room’ या सारखे Bachelor मुला-मुलींसाठी जबरदस्तीच्या philosophical गोष्टी लिहिलेल्या असतात.
लोकांच्या घरांमधे कसं वागायचं, कसं बसायचं, कसं उठायचं, त्यांची तत्व, शिष्टाचार हे सगळ ’ती’ बाई रस्त्यावर बसुन विकते हा सुध्दा मोठा विरोधाभास आहे.
त्या दिवशी दुपारी 11 च्या सुमारास मी माझ्या ग्रुप बरोबर बसलो होतो.
ग्रुपच्या भाषेमधे "फुल्ल संडेगिरी" चालु होती.
ते जोडपं सुध्दा आपले दुकान थाटुन बसलं होतं.
त्यांच्या दुकानाच्या मागे तुलसीच्या शेजारच्या दुकानाचा मोठा कट्टा आहे.
त्याच कट्ट्यावर एक अंदाजे महीन्याचं लहान बाळ झोपलं होतं.
त्याच्यावर एका मोठ्या होर्डिंगची सावली होती.
त्या लहान बाळाला एक मोठी बहीण होती. दोन-तीन वर्षाची असेल ती. ती सुध्दा तिथेच फुटपाथ वर खेळत होती.
का? कुणास ठाऊक? माझं त्या झोपलेल्या बाळावर सारखं लक्ष जायचं.
त्याला असं एकटं झोपलेलं पाहुन माझ्या मन कुठेतरी अस्वस्थ होत होते.
हळू-हळू त्या बोर्डाची सावली सरकत होती आणि बाळाचा पाय उन्हामधे आला होता.
त्यामुळे बाळाची झोप सुध्दा उडत होती.
मी माझ्या एका मैत्रिणीला सांगितलं,"जर का त्या बाळाच्या आईने 15 मिनिटामधे बाळाकडे नाही बघितलं, तर मी तिच्यावर ओरडणार".

हळु-हळु ते बाळ पूर्ण उन्हामधे आलं.
त्याला त्या उन्हामधे डोळे सुध्दा उघडता येत नव्हते.
बाळ झोपल्या जागेवरच रडायला लागल.
हाता-पायाची जोर-जोरात हालचाल करायला लागल होत.
आई पासुन बाळाच 15 फुटांच अंतर होतं. पण डेक्कनच्या रहदारीमुळे तीला त्याच्या रडण्याचा आवाजही जात नव्हता.

मी अचानक जोरात ओरडलो आणि तिला आवाज दिला.
तरी सुध्दा तीच काहीच लक्ष नव्हतं.
माझ्या ग्रुप मधले मला म्हणाले,"कशाला ओरडतोस, सगळे लोक तुझ्याकडे बघतायत."
मग मीच शांत झालो.
बाळ त्याच उन्हात शांत झोपायच प्रयत्न करत होत.
पण उन्हामुळे त्याची जोराची तडफड चालुच होती.

मला वाटले आपण स्वत: जाऊन त्याला सावलीत ठेवावं.
पण माझ ’ती’च्यावर जबरदस्त डोकं फिरल होत.
मग मी अचानक ग्रुप मधुन उठलॊ आणि ’ती’च्याकडे गेलो. तीला जबरदस्त सुनवल.

माझ्या अशा ओरडण्याने दोघे नवरा-बायको उभे राहिले..
’ती’ लगेच पळत-पळत बाळाकडे गेली.
आणि त्याला स्वत:च्या मांडीवर घेऊन पदराआड घेतलं आणि त्याची भूक भागवली आणि त्याच रडणं सुध्दा थांबवण्याचा प्रयत्न केला.
’ती’ त्यावेळेस बाळाला पदराआड घेऊन माझ्याकडे पहात होती..
’ती’च्या नजरेतुन तिची मजबुरी आणि होत असणारे दुर्लक्ष ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला तिचीच किव येऊ लागली.
अंगावरची ’ती’ची साडी आणि साडीसारखीच ’ती’ची झालेली फाटकी अवस्था मला जास्तच विचलीत करत होती.

नंतर पुन्हा मी ग्रुपमधे जाऊन बसलो.
’तुलसी’वरुन निघताना मुद्दामच मी त्या बाळाकडे गेलो.
ते शांत झोपले होते.
पण त्याची झोपसुध्दा माझ्या मनामधे फारच हाल-चाल करुन गेली.
’ती’ माझ्याकडे तेंव्हा बघत होती.
माझ ’ती’च्या कडे लक्ष गेलं.
काय झाल माहित नाही; पण ती थोडी घाबरली.
आणि मोठ्या मुलीला कुशीत घेऊन स्वत:समोर पसरवलेल्या दुकानावर फडकं मारायला लागली.

मी तिथून निघालो.
पण त्या बाळाची आणि ’ती’ची त्या बाळाला पदराआड घेतल्यावर माझ्याकडे टाकलेली त्या लहनग्यापेक्षा केविलवाणी नजर माझं मन आणि डोकं सुन्न करत होती.
काही केले तरीही ती घटना माझ्या मनातून आणि डोक्यातून बाहेर जायला तयारच नव्हती..

परत पुढच्या वीक-एंडला ’तुलसी’वरची माझी मैफल संध्याकाळी जमली होती.
नेहमीप्रमाणे 3 रुपयाच्या चहात बराच वेळ ’संडेगिरी’ चालु होती.
यावेळेस ते जोडपं दिसत होत. पण त्यांची दोन्ही मुले दिसत नव्हती.
शेवटी आम्ही निघालो.
तुलसीवरुन जात असताना कोप-यावर ’ती’ची मोठी मुलगी बाळाला मांडीवर घेऊन होती.
या मुलीच्या हातात बर्फाचा लालबुंद गोळा होता.
तो गोळा ती लहानगी खात होती.
आणि खात असताना जाणुन-बुजुन त्या बाळाच्या ओठांवर, तोंडावर त्या गोळ्याचे थेंब पाडत होती.
बाळ त्या थंड थेंबामुळे स्वत:ची मान अगदी सरसर इकडुन तिकडे फीरवत होत.

हे माझ्या लक्षात आल्यावर..
मी त्या लहान मुलीवर रागाने खेकसलो..
तेवढ्यात ’ती’ पळत आली..
मुलीच्या मांडीवरुन बाळाला पटकन ऊचललं..
त्याच फाटक्या पदराने त्याच ओल झालेल तोंड पुसलं..
’ती’ने मला ऒळखलं होतं..
तेंव्हासुध्दा ’ती’ घाबरलेली होती..
मी तिच्याकडे फक्त बघितले..
आणि ’ती’ लगेच बाळाला घेऊन निघुन गेली..

’ती’चा नवरा माझ्याकडे आला आणि म्हणाला,
"साहेब..! पोरांसाठी हा धंदा लावलाय.. आम्ही दोघं इथ काम करतोय..
पण अस होतय की ज्याच्यासाठी कमवायच त्यांच्याकडॆ बघता येत नाय..
त्यांच्याकडे बघत बसल तर कमवता येत नाय.. मग खायला काय घालनार.
तुम्हीच सांगा काय करता येईल ते.."

मला त्याला काहीच उत्तर देता आला नाही..
तो खुपच अवघड बोलुन गेला होता..
ज्यांची भुक भागवायची त्यांची काळजी घेता येत नाही..
आणि त्यांची काळजी घेत बसल तर मग त्यांची भुक भागवता येत नाही..
एकंदरित ही परिस्थीतीच माझ्या कल्पनेच्या पलीकडची होती..

मी त्याच्या समोरुन निघुन आलो.
त्याचा प्रश्न मात्र मलाच कोड्यात टाकुन गेला..

पुढे चालता-चालता ’ती’च्या कडे बघीतलं..
बाळाला काहीतरी झालं होतं..
जोरजोरात बाळ रडत होतं..
’ती’ त्याला मांडीवर घेऊन शांत करायचा प्रयत्न करत होती..
मी तिथे जाऊन ऊभा राहीलो..
’ती’ बाळाला शांत करत असताना त्याच्याकडे एकटक पहात होती..
’ती’ची अवस्था सुध्दा बाळा सारखीच झाली होती..
’ती’त्याच्या रडण्यासमोर अक्षरश: हरली होती..
जोरजोरात मांडी हलवत बाळाला शांत करायचा असफल प्रयत्न करत होती..
एकंदरीत ’ती’च्या कडे बघुन अस वाटत होतं ती सुध्दा बाळाकडे एकटक पाहत असताना जोरात रडायला सुरुवात करेल..
आणि ’ती’ सुध्दा रडायचा प्रयत्न करत होती..
पण ’ती’ला रडता सुध्दा येत नव्हत..
डोळेतर ’ती’चे पानवलेले होते..
पूर्णपणे हरल्यासारखे ’ती’ त्या बाळाकडे बघत होती..
बाळ आता खुप मोठ-मोठ्याणे रडायला लागल होतं..
त्याला अचानक काय झाल होत ते काहीच कळत नव्हतं..

बाळाच्या त्या मोठ्या आवाजात रडण्याने काहीतरी वेगळच घडलय अस वाटायला लागल होत..
’ती’तशीच एकटक त्याच्याकडे पहात होती..
त्याला धोपटत त्याला शांत करत होती..
पण बाळ काही शांत होत नव्हत..
’ती’च्या चेह-यावर नक्की काय रंग होता; तोच कळत नव्हता..
अस वाटायच की ’ती’ रडेल, नाहीतर बाळावर राग काढेल, काहीतरी मोठ्याने बोलेल..
पण काहीच नाही.. फक्त शांत होती ’ती’..

’ती’चा नवरा तीथे आला..
’तो’ बाळाकडे पहात होता..
’ती’ने त्याच्याकडे पाहीले..
अचानक बाळाला जोरात स्वत:च्या अंगावर गच्च आवळुण धरले..
आणि अक्षरश: मोठ्याने तिने सुध्दा त्या बाळाबरोबर हंबरडा फोडला..
’ती’ जोरजोरात रडायला लागली..
नंतर ’ती’ रडत होती.. पण ’ती’च्या रडण्याचा आवाज सुध्दा फुटत नव्हता..
’ती’ खुप वेळ बहुतेक याच वेळेची वाट बघत होती..
’ती’ची मोठी मुलगी ते पाहुन पळतच आली..
तिला सुध्दा ’ती’ने जोरात स्वत:च्या अंगावर ओढुन घेतल..
आणि पुन्हा जोरात रडायला लागली..

मला तिथे थांबणे योग्य वाटले नाही..
मी लगेच निघलो.. पुढे जाऊन थांबलो..
’ती’तिथेच दोन्ही मुलांना घेऊन बसली होती..
’ती’च बाळ तीच्या गच्च मीठीतच झोपुन गेल..
’ती’ची मुलगी ’ती’च्या पदराशी खेळत बसली..
’ती’ बराच वेळ आहे त्या स्थितीमधे बसली होती..
ब-याच वेळाने तिने बाळाला एका दुकानाच्या आडोश्याला झोपवल..
तिथेच ’ती’ची मुलगी सुध्दा बसली..
लगेच ’ती’ लगबगीने तिच्या दुकानाकडे गेली..
तिचा नवरा तिथेच दुकानावर होता..
आणि पुन्हा त्यांच्या कामाला सुरुवात केली..

मी सुध्दा तिथुन निघालो..
त्या बाळाचा आणि ’ती’च्या रडण्याचा आवाज कानामधे थैमान घालत होता..
अजुन सुध्दा मला ’ती’ आणि तिच्या बाळाचा आवाज ऐकु येतो..
मी काही करु शकलो नाही.. किंवा मी काही करुही शकत नाही..
अजुन सुध्दा या कुटुंबाने मला पाहील की ’ती’लगेच बाळाकडे पहात असते..
आणि मला त्या दिवसाची परत-परत आठवन करुन देते..

मागच्या महीण्यापासुन आता फक्त दोघेच दिसतात..
"मुले कुठे आहेत ?" असा प्रश्न विचारायची माझी हिम्मतच होत नाही..
ते जे काही करतात मुलांसाठी हेच खुप मोठं आणि अवघड आहे..
पण नक्कीच ’ती’च बाळ व्यवस्थित असेल..
’ती’च तीच्या बाळावरच प्रेम मला त्या दिवशीच बाळाला घेतलेल्या त्या गच्च मिठ्ठीत आणि त्या हंबरड्यामधे दिसलं होतं..
पण अजुनही तो प्रसंग मला कधी-कधी एकदम अस्वस्थ करतो..

(समाप्त)

____मनस्वी राजन,

(टीप : सत्य प्रसंग/अनुभव/घटनावर आधारीत.)

गुलमोहर: 

ज्याच्यासाठी कमवायच त्यांच्याकडॆ बघता येत नाय
ही अवस्था अगदी श्रीमंत घरातही असते. फक्त त्यांच्याकडे खायला घालायचा प्रश्न नसतो. मुलांना १२ तास रोज पाळणाघरात ठेवणारेही आहेत. नाईलाज असतो.

आजकालच्या 'working women' ची अवस्था वेगळी नाहीये...ज्यांची भुक भागवायची त्यांची काळजी घेता येत नाही.. आणि त्यांची काळजी घेत बसल तर मग त्यांची भुक भागवता येत नाही.. Sad

एकत्र कुटुंब असेल तर ठीक आहे.. .....नाही तर आहेच 'पाळणाघर...! '

असो... लेखन आवडले...

Sad शब्द नाहीत माझ्याकडे. काही प्रसंग मनाला चटका लावून जातात.
तुम्ही प्रत्यक्ष पाहिला आम्ही फक्त वाचला.