गर्भसन्स्कार

Submitted by मी मानसी on 23 October, 2011 - 12:24

मी सहा महिन्याची प्रेग्ननन्ट आहे .पण बेड रेस्ट वर आहे. ह्या परिस्थितीत किन्वा सामान्य वेळी आपण कोणत्या विशेश गोश्टी करु शकतो येणार्या बाळासाथी?
मी चान्गले music , मन्त्र वगैरे एइकते पण अजुन काय करता येईल का?

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली पुस्तक वाचा(महान व्यक्तींची चरित्रे वै.), मन प्रसन्न ठेवा. रोज ओमकारा चा जप करा मनातल्या मनात नाही तर मोठ्याने (हे तुम्ही तुमच्या मिस्टरांना करायला सांगु शकता. माझ्यावेळी माझा नवरा म्हणायचा माझ्या समोर बसुन. काही दिवसांनी पोटातलं बाळही रियाक्ट करायला लागत ह्या आवाजाला even जन्मल्या नंतरही त्याला हे आठवतं व ते रियाक्ट करतं. हे सगळ मी स्वानुभवावरुन सांगते आहे.).बाळाशी छान गप्पा मारा.सगळ नीट होइल हा पक्का विश्वास मनात बाळगा.

घरातील वातावरण नेहमीच खेळींमेळीचे आणि प्रसन्न ठेवा. पोटात ल्या बाळाशी छान छा गप्पा मारा, गोश्ती

सांगा. खुपच मस्त परिणाम होतो.. माझी वहिनी खुप बोलायची. Happy

मानसी, जर तू जप वैगरे करत असशील तर ॐ येणारे बिजमंत्र शक्यतो टाळावेत, याने उष्णता निर्माण होते, नाम जप चालेल जसे श्री राम जय राम जय जय राम, श्री स्वामी समर्थ, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला......
पंचामृत केसर घालून घेणे बाळाच्या बुद्धीसाठी चांगले आहे, संध्याकाळी रामरक्षा आवर्जून म्हणणे, यामुळे अनावश्यक गोष्टींची भिती कमी होते.. जेवताना पहीला घास तूप भात मीठ असा खावा, तो बाळासाठी असतो.. मनाला आनंद देणारे कुठेलेही संगीत ऐक.. शक्यतो लाऊड नकोच.. समजतील सोपी अशी पुस्तके वाचावीत.. यादिवसात कधी कधी थोडासा मलावरोधाचा त्रास जाणवतो, तेव्हा २ चमचे तूप गरम पाण्यासोबत रात्री झोपताना घ्यावे.. हलका व्यायाम डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा पण पुर्ण आराम असेल तर शक्यतो टाळलेला बरा...
अजून काही करण्याजोग्या गोष्टी असतील तर मलाही सांगणे.. Happy

मानसि, मी पण ९ महीने पुर्ण बेड रेस्ट वर होते. तूल विणकाम येत असेल तर छान वेळ जातो. शिकता येइल.
योगा बहुतेक नाहि करता येणार, Ask your doctor first.

I would suggest start exercise after delivery. If your doctor doesn't suggest it, consult some one else. I was completely bed ridden and I had TWINS pregnancy. My kids are two years old now, but still I am suffering from severe backache. My doctor didn't suggest me anything.
मी तुला घाबरवत नाहीये, पण पूढच्यास ठेच माग्चा शहाणा. Happy

पंचांमॄत कोण्त्या महिन्यापासून घ्यावे? नुसते दुध केशर घालून प्याले तर चालते का?

पंचांमॄत कधीहि उत्तम. दुध केशर / शतावरी उश्ण आहे. पहिले ४ महिने घेउ नये किन्वा doctor च्या सल्ल्याने घ्या.

Thank you all .
माझी पहिली मुलगी पोटात असताना मी खूप मन्त्र ,श्लोक म्हणणे ,धार्मिक पुस्तके वाचणे इ केले . ती चार वर्शान्चि आहे . शान्त , हुशार पण भित्री आहे. जरा brave मूल होण्यासाथी थोडी वेगळी stategy पण घालावी आता अस वाटत आहे .काय ते कळत नाही. वाचायला ही गोश्ट फनी वाटेल पण मला खरच परत मवाळ स्वभाव नसलेलाच बर पडेल .

अहो धार्मिक गोष्टी वाचल्याने कोणी भित्रे होत नाही. गरोदरपणात या सगळ्या गोष्टी गर्भारणीचे मन शांत ठेवण्यासाठी सुचवल्या जातात. त्याचा थेट गर्भावर प्रभाव पडत असेल असे मला तरी वाटत नाही.

मुल भित्रे असेल तर एकतर त्याचा मुळ स्वभावच तसा असेल किंवा पालक अकारण अवास्तव काळजी घेत असतील. तुम्ही बिन्दास मन रमेल ते करा. मुल जन्माला आल्यानंतर त्याला ब्रेव बनवायच्या मागे लागा Happy

रिझल्ट लागल्यावर आम्हाला इ-पेढे पाठवायला मात्र विसरु नका. Happy ऑल द बेस्ट.

धार्मिक पुस्तक वाचून मुल भित्री होतात असं नाही वाटत मला. काही मुल शांत असतात काही वाभ्री. मोठेपणी स्वभाव बदलतात सुद्धा. माझा मुलगा लहानपणी संत वाटायचा आणि आता एकदम उलट ( वय वर्ष २ ) .

एक गोष्ट मला वाटते की मोठ्या माणसांनी लहान मुलांना भीती घालू नये. 'बुवाजी येईल, राक्षस येईल ' आमच्या लहानपणी आम्हाला आमचे दादा लोक भीती घालायचे, त्या झाडावर ब्रह्म राक्षस राहतो, या झाडावर भूत आहे ते येईल ( कोकणातल्या गोष्टी ). पण ती भीती मनात रुजून राहायची. काही वेळा शाळेत किंवा आजूबाजूची मोठी मुल पण लहान मुलांना घाबरवतात. माझ्या ३ वर्षाच्या भाचीला शाळेतला एक मोठा मुलगा घाबरवायचा, ती शाळेत जायलाच तयार व्हायची नाही. तिला सांगायचा Ghost येइल Happy
मुलाचा स्वभाव भित्रा आहे की असं काहि कारण आहे , हे पालकांनी बघायला हव, अस वाटत.

सखूबाई. साधना अनुमोदन.

गर्भसंस्कारामुळे सर्वात महत्त्वाचा फायदा आईचे मन शांत आनंदी ठेवण्याकरता होतो. मनशक्तीच्या गर्भसंस्काराची पुस्तके मिळतात. ती छान आहेत वाचण्यासाठी. मी भरपूर गाणी ऐकायचे. नाहीतर टीव्हीवर सिनेमे बघत बसायचे. Happy

शिवाजी महाराज, झाशीची राणी अशा शूर व्यक्तिंची चरित्र वाचू शकता. अपाय तर काहीच नाही आणि झालच तर होईल की बाळ शूर. Happy