'देवळाशिवाय गाव' ही कल्पना कुणाला सहन होणार नाही, इतकं महाराष्ट्रातलं ग्रामीण भावजीवन देवळाभोवती गुंफलं गेलं आहे. रोज नवीन फार काही घडत नसलेल्या कुठच्याही खेड्यात 'देऊळ', त्याभोवतीचा 'पार' ही सर्वात महत्वाची गोष्ट. लग्नकार्य असो, सुखदु:ख असो, सणसमारंभ असोत, वायफळ गप्पा असोत की गावातले महत्वाचे निर्णय असोत- श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या डोलार्यावर उभ्या राहिलेल्या या विश्वाचे किती रंग, किती ढंग!
तुमच्या कॅमेर्यातलं देऊळ काय दाखवतंय?
उत्कृष्ठ स्थापत्यशास्त्राचा नमुना? माणसाच्या श्रद्धेचं मोहवून टाकणारं रूप? अंधश्रद्धेच्या बळावर देवाला घातलेला वेढा? अनास्थेमुळे देवळाची झालेली दुरवस्था? पिंपळा-वडाच्या सावलीतला, देवाच्या पुढ्यातला समृद्ध पार? कुठेही न लिहून ठेवलेल्या, पिढ्यान् पिढ्या देवाभोवती फिरणार्या परंपरा-रीती-भाती? 'देऊळ' हा सर्वात मोठा विसावा असलेले, देवधर्म नित्यनेमाने आणि प्राणपणाने पाळणारे गावकरी?
खेळू या हा मस्त खेळ. 'देऊळ' या विषयाशी संबंधित तुमच्या कॅमेर्यानं टिपलेलं, तुमच्या मनात कायमचं घर करून गेलेलं कुठचंही छायाचित्र इथे टाका.
स्पर्धेचे नियम -
१. एक आयडी जास्तीत जास्त तीन प्रवेशिका पाठवू शकेल.
२. तुमच्या प्रवेशिका तुम्ही याच बाफवर पोस्ट करायच्या आहेत.
३. मान्यवर परीक्षकांचा निकाल १ नोव्हेंबर, २०११ला जाहीर केला जाईल.
स्पर्धेच्या विजेत्यांना मिळतील आकर्षक बक्षिसं!!!
पहिलं बक्षीस - 'देऊळ' चित्रपटाच्या प्रीमियर शोची दोन तिकिटं आणि 'देऊळ'ची ऑडिओ सीडी
दुसरं बक्षीस - 'देऊळ' चित्रपटाच्या प्रीमियर शोची दोन तिकिटं.
तिसरं बक्षीस - 'देऊळ'ची ऑडिओ सीडी.
जिप्सी,चिंटु,माधव,अमोल९ -
जिप्सी,चिंटु,माधव,अमोल९ - फारच सुरेख!!
लिंबु व स्निग्धा - अगदी गोड!!!
पहिल्या पानावरचा झाडातला उंच गुलाबी कळस पण सुंदर.
अजय जवादे ह्यांचे १ला व ३रा आवडले.
बाकी सर्व फोटो पण आवडले
आज निकाल जाहिर होणार आहे ना?
आज निकाल जाहिर होणार आहे ना?
अरे वा सर्व देवळे खरच मस्त
अरे वा सर्व देवळे खरच मस्त आहेत.
सह्हीच फोटो आहेत सगळ्यांचे.
सह्हीच फोटो आहेत सगळ्यांचे.
जिप्सी फारच छान फोटो.
अजय जवादे यांचेही फोटो खूप आवडले.
Pages