बहर गुलमोहराचा

Submitted by टवणे सर on 10 November, 2008 - 12:40

गडावरील अजरामर कवींनी आज केलेल्या कविता पाहोनी आमचे डोळे तृप्त जाहले. पण त्यातील काही कविता आधीच वाहून गेल्या असे समजले. तरी उरलेल्या कविता वाहून जाउ नयेत म्हणुन हा प्रयास. तिथल्या कविता मी इथे छापतो आहे. मूळ कवींनी आपापली कविता मग इथेच खाली पेस्ट करावी. नंतर ही पोस्ट एडिट करेन म्हणजे मालकीहक्क कायद्याचा भंग होणार नाही. वाहून गेलेल्या कवितांच्या मालकांना जर त्या लक्षात असतील तर त्या इथे पोस्टून आमचे देखील प्रबोधन करावे..

तर आजच्या सर्वोत्कृष्ट कवितेने सुरुवात करुया:

*********************
अरभाटः
मागल्या दिवसाचा संताप अन दु:ख
अवहेलना, निराशा व नकार
यांचा बघत असता
जमिनीवर पसरलेला निचरा
आगामी विदग्धतेची चाहूल लागते
जेव्हा आसमंतात घुमते आवाहनात्मक हाक.......
"बाईsss, कचराsss"

*********************

मीनु:
दादा देतो दणका
दुखुन येतो मणका
दोघं मिळून खातो आम्ही
भाकरीबरोबर झुणका
दादा जातो कालेजात
पुस्तकं मात्र घरात
म्हणतो नको दिसायला
खोट मुळी तोर्‍यात
दादा चालवतो बाइक
वर म्हणतो माझं आइक
आपल्याला काय
लाच दिली की आपण त्याचे पाइक.

*********************

माता:

दीपिका पडुकोणच्या बहिणीने लिहिलेली कविता.

ताई माझी रुपवान,
जशी लावण्याची खाण.
उंची केवढी हो तिची,
पाहता दुखते मान.
ताई घालते ड्रेस,
फॅशनेबल अति अति.
कपाट तिचे उघडिता,
अबब! ड्रेस किती?
ताई घालते पायांत
बूट उंच टाचांचे.
तिला फारच शोभती
बूट नाजूक काचांचे.
ताई करते कॅटवॉक,
एक हात कमरेवर.
सर्व लोक गं म्हणती,
जशी परी धरेवर.
ताई गेली सिनेमात,
तिथे भेटे रणबीर.
ताईच्या नखाचीही,
त्याला मुळी नाही सर.

*********************

गजानन देसाई:

सोमवारचा शाप

लांबुडका गोल
एक डोंगर

छिद्र त्यास
एका सोंडेस

त्यातून गोवली
बलदंड शृंखला

खडखड .... .... (मंदशी)
जीव दडपून जाय

रवीच्या ढळत्या निशी
दिली पायात जोखडून

*********************

पुन्हःश्च मीनु:

ती पोळेवाली बी
माझ्या गुलाबाच्या
झाडाची पानं
खुशाल तोडून नेते
ती पोळेवाली बी
तीला एक छोटी सोंड
सोंड कसली कात्रीच ती
नीट लायनीत कापते.
ती पोळेवाली बी
मग कधी तरी
खाते फटका
जुन्या वर्तमानपत्राचा

*********************

वरील कवितेवर एकापाठोपाठ एक खालील दोन प्रतिक्रिया आल्या:

@मीनु...

छान कविता होती...:ड
**************

@मीनु...

छान कविता आहे...:-प
*********************

आणि मीनु यांना अजुन एक कविता स्फुरली:

एकदा भुतकाळ
एकदा वर्तमानकाळ
जीडीच्या कवितांना नाही चाल

एकदा ड
एकदा प
अंगावर पडते प्रतिक्रियेची पाल

एकदा बरं
एकदा वा!!
दिपीकाच्या गालाला रणबीरचा गाल

*********************

पुन्हा एकदा मीनु:

कवितेचं नाव आहे 'ओळखा पाहू'

काका माझा होतो भुवन
काका कधी असतो मंगल
काकाच्या बोलांनी
का होते मोठी दंगल?
काका आपल्याच नादात मग्न
काकाची होतात दोन्दोन लग्न
काका कापतो केस बारीक
काका खातो रोज खारीक
काका बोलतो विचार करुन
काका अस्सा माझा छान
काका कोण? मी कोण?

*********************

हीच कवितेची बाधा आजुबाजुच्या बाफंना होउन, मृण्मयी ह्यांनी पाडलेली कविता:

इथे कुणालाही दुखवायचा हेतु नाही
आणि मनं जोडणारा कवितेसारखा सेतु नाही

काव्य स्फुरायला मदतीची अपेक्षा नाही
पण माझं गद्य वाचण्याखेरीज दुसरी कठोर शिक्षा नाही.

*********************

आणि सरते शेवटी, फूल ना फुलाची पाकळी म्हणुनः

जळे तयांची काया
ज्यांनी कविता केल्या
सृजनाच्या अमूर्ताला
शब्दांचा साज दिला

का जळजळते तुम्हाला
की वाचण्यास दाम मोजला?
आम्ही लिहितो, आम्ही वाचतो
कौतुक का बघवेना तुम्हाला

मनाच्या क्षतांतून
'मंद'सा तरंग पसरला
चक्षूच्या सीमा ओलांडून
रवीचा चंद्र झाला

असेल विषय तोच पुन्हा
पण रोज नवा साज दिला
कागद फुकट मिळाला
म्हणुन दिसामाजी रतीब घातला

*************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिनु, आशू, चिनु... Rofl

इतके गहीवरुन आले ना वाचून>>> बी का गहीवरुन आले ते सांग ना...

ट्ण्याने रचिला पाय, मिनु केलासी कळस... Happy

अल्टीमा ने प्रोफेसरांना ही कविता अर्पण केली

Ultima | 6 मार्च, 2009 - 16:27
आईग... नाही सहन होतेय ...

प्रो. च्या खरडण्याला आलं उधाण
डोक्यात भरलीये नुसतीच घाण,
डोके त्यांचे चिमुकले, कधीकधीच चालते,
नसते चालले तर बरं, वाचणार्‍याला वाटते.

अथक आणि निरर्थक हेच लिहू जाणे
शिक्षा मात्र आम्हाला, असं का म्हणे
यांच्या अंगात बहुतेक शिरलाय शक्तिमान
प्लिज आम्हाला सोडा, सॉरी शक्तिमान .... Rofl

(प्रो. च्या चरणी अर्पण)
_____________________________

-----------------------------------------
सह्हीच !

६ मार्च - सकाळी ९:२१ EST

मायबोली नवीन लेखन - पहिल्या पानाचा थोडक्यात आढावा:-

आजच्या नारीच्या पोळीभाजीच्या जमाडीजमतीपासून सावधान.
माझ्या वर्‍हाडातल्या छान पोरीला देवाने असं बनवलं त्यात माझं काय चुकलं?
जपानमधील खादाडी करून संस्कृती कशी जगेल?
पैल्या सहलीला मला अशी दिसली भारतमाता.

सौ. शोनू ह्यांचं जागतिक महिला दिनानिमित्त, आजच्या स्त्रीचं नेमकं रूप दाखवणारं, डोळ्यात वास्तवतेचं जळजळीत अंजन घालणारं एकमेव खरंखुरं काव्य, त्यांच्या परवानगीशिवाय............

तूच सासू, तूच सासुरवाशीण
तूच केकताची हिरवीण

तूच पोळीभाजी डबावाली
तूच धुणं भांडं इस्त्रीवाली

तूच सांभाळ शाळा अभ्यास
तुलाच वाढदिवस अन मुंजींचा हव्यास

तूच शीक नव्या रीती भाती
तूच विसर जुनी नाती गोती

कधी तूच आदर्श भारतीय नारी
करीयर मागेही तूच आजकी नारी

तूच शिकव रामरक्षा नीट
तूच मिळव हॅना मॉन्टाना चं तिकीट

कधी नवार कधी नव्या ट्रेंडस
तुलाच जमायला हवा इस्ट वेस्टचा ब्लेंड

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा सगळ्यांना

मृण झकास गं
चला आजच्या कवितेसाठी तयार व्हा येतीच्चे पुढच्या पोस्टमधे

~~~~~~~~~

तळपायाच्या फोडाला
मलम कसे मी लावू
मलम लावून मैलोनमैल
चालत कसे जावू
पाय टेकता पुसू जाई
मलम कसे मी लावू

विठूराया तुझी पंढरी दूर किती
वारी पायी मला आता जमणार कशी
तळपायाच्या फोडाला
मलम कसे मी लावू
पाय टेकता पुसू जाई
टिकवून कसे मी ठेवू

जनाबाई माझे आई
जाते कसे ओढू
पाय लावता जात्याला
फोड लागे वाढू
तळपायाच्या फोडाला
मलम कसे मी लावू
पाय टेकता पुसू जाई
टिकवून कसे मी ठेवू
~~~~~~~~~
हा बेसिक मॉडेल आहे .. प्रत्येकाने आपापल्या जागेप्रमाणे (फोडाच्या) कस्ट्माइज करुन घ्यावे. कृपया कस्टमाइज्ड वर्जन पोस्ट करताना जागेचा विचार जरुर करावा.

काहीही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही.. फक्त...
Rofl
Rofl
Rofl
Rofl
Rofl
Rofl
Rofl
=========================
रस्त्याने जाताना वाटेत नाचत मासे पाहत थांबू नये...

मुंडाळी गुंडाळी हा येडा रें पोरगा...

मुंडाळी गुंडाळी हा येडा रें पोरगा
नजर चोर्तोय येडा रे पोरगा
अंगात दम नाही आणि करतोया लग्न
अन पोरगी भागी जीव खाऊन भागी

उसाचं गुर्हाळ तसा हा पोरगा
मन नारंगी त्याचं पण अंगानं काडकी
आवाज ह्याचा हो फुटक्या काचंवाणी
अन पोरगी भागी जीव खाऊन भागी

रुप याचं हो आहे बेरंगी
उश्ट्या हातानंच माश्या हो मारी
हातात जोर याच्या माशीचा हो भारी
अन पोरगी भागी जीव खाऊन भागी

गुंडाळी करितो बातांची गुंडाळी
पळून जाती होत शाण्या सार्या मुली
आहेच मुळी तो गिळ्गीळीत भेंडी
अन पोरगी भागी जीव खाऊन भागी

(वरील कविता कवयित्रीने पुरे होशोहवास्मे लिहीली असून कृपया अर्थ विचारण्याचे धाडस करु नये. रसग्रहण अवश्य करावे. रसाला पाहून माश्या आकश्रित झाल्यास कवयित्रि जबाबदार नाही.

आज्ञेवरुन..

कवितेचे सर्व हक्क सुरक्षित. IPR 420-YR2009 - MT-3 अन्वये.)
~~~~~~~~~

अन पोरगी भागी जीव खाऊन भागी >>> Rofl

मीनू Rofl

कवितेचे सर्व हक्क सुरक्षित - अशक्य आहेस

आज स्लार्टीला झालेल्या काही कविता -

अरारा ! जनीला कॉलेजात पाठवलं तर हे धंदे केले. नारळाचं पाणी ओठांवर ठेवून मला नारळ दिला. या यातणांणी मला तर कविताच झाली -
नारळाचं पाणी ठेऊन डाळिंबी व्हटांत
टवळीनं दिला नारळ माझ्या हातात
(व्हट, टवळी असे शब्द वापरुन एक वेगळाच बाज देण्याचा प्रेत्न केला आहे.)
.
असतोच की हो फरक पतीपत्नीच्या मतांत
शिंचीनं दिलनीत नारळ माझ्या हातात
(दिलनीत असा शब्द वापरून... आहे.)
.
गार्ड ते प्रिन्सिपल सारेच तिह्या गोटात
पोरीनं दिला नारळ माह्या हातात
(तिह्या, माह्या... डिट्टो*)
.
नखरेल अवदसा, अर्काटपणा लै रांxxxxx
लावला तिज्याxxxxx xxxxx माझ्या xxxxxxx
(xxxxx डिट्टो*)
.
भिंतींना मॉव्हिश हिरवा घाम आला, भिंतव्याकूळ मीही रडलो
झाडावर लटकत तेव्हा नारळ एकटा होता
(सगळंच डिट्टो*)
.
दिला नारळ जरी | घेतला ठेऊन |
खोवून खावा | स्लार्टी म्हणे |
(डिट्टोच डिट्टो*)
.
* डिट्टो याला तत्रैव असा मराठी शब्द आहे, पण मला वेळ नाही.

भारी एकदम Lol
डीट्टो Rofl
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

अवीकुमारांना काव्यबीज : 'हेंदाडी फेंदाडी टेक्सन काउगर्ल' ही पहीली ओळ घेऊन काही काव्य स्फुरतंय का बघा!

अविकुमार :
मृ, हे काही बरोबर नाहि. पहिल्याच परिक्षेला असा अवघड पेपर नाही टाकायचा!

प्रोफेसरांईतकी ऊच्च काव्यप्रतिभा नाही हो आमच्यात. आता काऊगर्लला कुठलं यमक शोधू हो मी? तेही प्रोफेसरांच्या तोडीचं. भर रणभूमीवर गांडिव गाळून बसलेल्या अर्जूनासारखी अवस्था झालीय हो माझी. वाचवा हो वाचवा.. अंगाला अगदी दरदरून घाम फुटलाय माझ्या. 'काऊगर्ल' यमकाला पळवाट शोधायला पाहीजे आता.

'हेंदाडी फेंदाडी टेक्सन काउगर्ल'
हलेना नी डूलेना, तुंबलिय जाम,
प्रोफेसरांच्या उपमांना साजेशीच अशी, (आशी नव्हे!)
पाह्यल्या पाह्यला सुटलाय घाम.....

पहा बरं आता, काही 'ग्रेस' आहे का वरच्या ओळींमध्ये!!!

काव्यबीज घेऊन बैजवार कविता लिहिताना,
जेव्हा एखादा 'बिजवर', प्रोफेसरांकडुन स्फुर्ती घेतो,
तेव्हा आमच्या तोंडी एकच वाक्य येते,
"अरेरे.. कविता पुन्हा विधवा झाली"......

काव्यबीजातून प्रोफेसरांच्या प्रतिभेचा अंकूर
जेव्हा तर्र होऊन झिंगतच बाहेर येतो,
तेव्हा आमच्या तोंडी पुढचे वाक्य येते...
"हेंदाडी फेंदाडी गाढविणीच्या नावासमोर
आता चि. सौ. कां लावायला हरकत नाही"

अवि म्हणे, उन्मुक्त प्रतिभेला लगाम कसा घालावा,
गालि आणी गालीब मधला फरक असा जाणावा...

तर मंडळी, दिवसेंदिवस माझ्या काव्यप्रतिभेतली 'ग्रेस' वाढतच चालल्याचे आपण नोट केले असेलच! इती 'प्रों'ची कृपा!!!

मृ, Rofl

सिंडे, ते अविकुमारांचं काव्य आहे!

कोण ते ? कुठे भेटतील ?

Mrinmayee | 12 मार्च, 2009 - 23:20 नवीन पार्ले बीबी

गुलमोहराचा पार
त्यावर वेडे जमले चार
पहील्याच्या कवितेवर
दुसरा बेजार

एकाचा शाब्दिक मार
खाऊन असतो खार
कुणाचा लपून वार
वेडे जमले चार

तिसर्‍याच्या गाली हसु
म्हणतोय 'कोणा पुसु,
मी आणून ठेवलाय हार'
वेडे जमले चार

चवथा रोमात राहून
डोकावतो मौसम पाहून
म्हणे 'कश्याला मेंदूस भार'
वेडे जमले चार

एकूण थोडक्यात काय
पारावरच वेळ जाय
साहित्यात रस फार
वेडे जमले चार!!!

अरे अरे काय चाललय? मायबोलीच्या इतिहासात एवढी धमाल कधी उडाली नव्हती.इतके दिवस गुलमोहरात कैच्या कै चालतं म्हणून 'अन्नुलेखानं' मारलं .इथे एवढा भारी प्रकार चालू असेल याची कल्पना नव्हती.
--- इतिहासाचार्य खाजवाडे

------------------------------------------------------------------------------
deepurza | 6 मार्च, 2009 - 16:31

अल्टीमा ने प्रोफेसरांना ही कविता अर्पण केली

Ultima | 6 मार्च, 2009 - 16:27
आईग... नाही सहन होतेय ...

प्रो. च्या खरडण्याला आलं उधाण
डोक्यात भरलीये नुसतीच घाण,
डोके त्यांचे चिमुकले, कधीकधीच चालते,
------------------------------------------------------------------------------
व्यक्तीस्वातंत्र्य मान्य करुनही, वरील वाक्ये सुसंस्कृत आहेत असं वाटत नाही. उपहास आणि उपमर्द यातला फरक सर्वांना कळतोच असं समजूया का ?

मला हा बीबी आवडतो, बहुतांशी वेळा इथला विनोद हा एखादया कलाकृतीवर असतो, व्यक्तीवर असू शकतो, फक्त आपण त्या व्यक्तीचा अपमान करत नाही ना याची काळजी आपण सर्वांनीच घेतली पाहिजे असं मला वाटतं.

पुपुवर साजिराने टाकलेले भन्नाट पोस्ट.
.
shonoo | 20 मार्च, 2009 - 18:08
नावा काय, चेंडू काय, लाल शब्द काय, अभिनंदन काय, कशाचाच ताळमेळ नाही:-)
सं स्प द्या कोणीतरी झडकरी !
आज हे वाचून संगम मधलं गाणं का बरं आठवतंय...
.
kuldeep1312 | 20 मार्च, 2009 - 20:09
नावा काय, चेंडू काय, लाल शब्द काय, अभिनंदन काय, कशाचाच ताळमेळ >> ताळमेळ लागायला ती काय जमाखर्चाची नोंदवही आहे? (Balancesheet)
.
SAJIRA | 21 मार्च, 2009 - 13:36
बरोब्बर बोल्लास कुल्दीप्या. रोज जगताना ताळमेळ जूळवावाच लागतो, ते पुरे नाही का?
--
ताळमेळ अन संगम मध्ये काय फरक असावा बरं?
--
संगम (पिक्चर) बघायला जायच्या आधी माझं पाकिट चोरीला गेलं होतं. त्यामूळे मित्राच्या पैशानं तो बघावा लागला. गोपालनं गोळी मारून घेतली, तेव्हा बघ, बघ मित्र काय काय करतात ते- असं माझं तिकीट भरावं लागलेला मित्र मला म्हणाला. पिक्चरच्या बदल्यात आता हा मला आत्महत्या करायला लावतो की काय, या टेन्शनमूळे पुढचा पिक्चर बघताना मन लागलं नाही. राज कपूरचे निळे डोळे त्यावेळी मला रामूच्या भुताटकीपिक्चरमधल्या लहान मुलाचे वाटले.
त्यामूळे संगम आता पुन्हा बघावा लागणार.
--
असाच संगम ब्रिज आठवला. सीओईपीच्या मित्रांसोबत बसलो असताना एकाने अचानक उठून चालायला सुरूवात केली. (त्या दिवशी महाशिवरात्री होती असं नंतर आठवलं.) त्याबरोबर कर्तव्य म्हणून इतरांनीही चालायला सुरूवात केली. वाकडेवाडीला सिगरेटचं पाकिट घेतलं, अन चला आता परत म्हणून तसाच खडकीच्या दिशेला चालत राहिलो. खडकी आल्यावर 'गंडलो' हे कुणाच्या तरी लक्षात आलं, पण इतरांनी त्याच्याकडे अजिब्बात लक्ष दिलं नाही. तसेच पूढं चालायचं चुपचाप असं उलट धमकावलं. मग तो बिचारा कर्तव्य म्हणून चालत राहिला. नाशिक फाटा आल्यावर कुणला तरी उजव्या हाताला वळायचं सुचलं. त्या रस्त्याने बरेच लांब गेल्यावर आळंदी रस्ता अन नाशिक रस्ता यांचा संगम दिसल्यावर अचानक सर्वांना संगम ब्रिज आठवला. तो शोधायला लागल्यावर पुन्हा गंडल्याच लक्षात आलं. आता पुन्हा सिगरेटची पाकिटं घेतल्याशिवाय पर्याय नव्हता. सकाळ झाल्याचं अन सगळ्यांचे पैसे सिगरेटींत संपल्याचं एकाच वेळी लक्षात आलं, तेव्हा बिनतिकीट पी॑एमटीत चढलो, अन संगम ब्रिज आल्यावर मान खाली घालून उतरलो.
तर, असाच संगम ब्रिज आठवला.
--
त्यावरून कराडचा कृष्णा-कोयनेचा संगम आठवला. माझ्याकडे त्याचे फोटोही आहेत. या संगमाचं केवढं महात्म्य. पण ते आमच्या कराडच्या मित्रांपेक्षा इतर गावच्या लोकांनाच जास्त वाटते, हेही नंतर लक्षात आलं. शिवाय ते फार तंबाखू खायचे (म्हणजे नंतर थुंकायचे, गिळायचे नाही.); अन सारखे 'च्या' कारांती शिव्या द्यायचे, अन शिवाय या शिव्या नाहीत रे **च्या, असंही वरनं म्हणायचे, त्यामूळे आम्ही त्यांना गंडलेले म्हणायचो.
आता काल, परवा कराड अर्बन बँकेत खातं उघडायला लागलं, तेव्हा तो कराडचा संगम असाच, सहज आठवला.
--
आमचा संगम नावाचा एक बावळट मित्र होता. आमचे कराडचे इतर मित्र त्याला त्याच्या नावानं हाक न मारता ***च्या म्हणायचे. मेसवर आजच्या स्वयंपाकाचा उध्दार करायला आम्ही घेतला, की आज जेवण फार छान आहे असं पालूपद लावणं हे काम तो जिवितकार्य असल्यासारखं पार पाडायचा. त्यामूळे त्याच्यावर आम्ही खुप चिडायचो. शेवटी एक दिवस रूममध्ये कोंडून सर्वांनी त्याच्यासमोर भकाभका सिग्रेटी फुंकल्या. तेव्हापासनं त्याने कानाला खडा लावून ती मेसच सोडून दिली.
आता तो आयएएस ऑफिसर अस्ल्याचं मला परवाच कळलं.
असले झांपट ऑफिसर म्हणजे देशाचा संगम झाला म्हणायचा. विळ्याभोपळ्याचा.
--
बाकी त्यानंतर पण अनंत संगम झाले आमच्या आयूष्यात. पण आता नको. आता संगम सिनेमा पाहणे अर्जंट आहे.
-----------------------------------

    ***
    तुका म्हणे नाही | आमुची मिरासी | असावेसी एसी | दुर्बळेची ||

    पार्ले बाफ...

    asami | 24 मार्च, 2009 - 12:17
    माझ्या "नवीन लेखन" मधे ही शीर्षके अशा order मधे दिसताहेत ..... "पुस्तके शोधा"

    रात और दिन..दिया जले..
    तुझी असली तर्‍हा !
    रंग उधळति फुले....- १
    प्रिये....तू आई होणार..!
    पैन्जण पिसारा
    हे झुंझार बळा
    आई झाले..!
    आबा...! खरचं माह्य लइ चूकलं....
    पुस्तक शोधा

    runi | 24 मार्च, 2009 - 12:23
    असामी
    तुझे 'नवीन लेखन' जसेच्या तसे टाकले नवकविता म्हणुन तरी लोक प्रतिसाद देतील वा छान असा

    Panna | 24 मार्च, 2009 - 12:30
    आसामी

    मी काढलेला अर्थ :

    रात और दिन..दिया जले..>>> रात्र अन भर दिवसा
    तुझी असली तर्‍हा !>> ह्या असल्या तर्‍हा
    रंग उधळति फुले....- १>>>> अन नसते रंग उधळ्ल्यावर
    प्रिये....तू आई होणार..!

    SAJIRA | 26 मार्च, 2009 - 10:35
    हिम्या बघितली ती लिंक. इतका राडा होऊनही लोक मागे हटत नाहीत. काय लढाऊ वृत्ती आहे.
    देवा (किंवा कोणती तरी माता), कोणती साधना केली म्हणजे मलाही अशी दैवी सहनशक्ती लाभेल?
    आ.सु.- कवितांनो, ललितांनो, आता बस! एक या दो, बस्स बस्स!!
    (जेष्ठ साहित्यिक प्रा. शतपूत्रे यांच्या 'कुटूंबनियोजन, मराठी साहित्य, वाचकांची नस आणि दारूबंदी' या विषयावरील जाहीर व्याख्यानातील जाहीर आवाहन. लोककल्याणास्तव पुनर्मुद्रित.)

    aashu_D | 26 मार्च, 2009 - 11:08
    कोणती साधना केली म्हणजे मलाही अशी दैवी सहनशक्ती लाभेल?
    साजिर्‍या, पेशल आवताण देऊन इथे बोलावलंस ते काय असल्या कविता ललितांची तोंडं पाहायला???
    लोक इतक्या वेळा सावध करतात, देवाचा धावा करतात की मुली अशा का? आणि अखेरीस हतबल होतात (पण तरीही फोकस पॉईंट काही हलत नाही) तरी देखील तुला अजून कविता, ललिता, साधना आठवतात? कहर आहे!
    शिव शिव! सहनशक्ती वाढवण्यासाठी तुला मी आता सुक्या औतावर ओतलेला आशुंडरस देते तो प्यायलास की दारूबंदी काय आणि ... काय काय कशाचा म्हणून फरक पडणार नाही.. फक्त तो प्यायल्यावर पेकाटात लाथ घालायला एक मांजर आणून ठेव. म्हणजे आता तुझे सहनशक्ती वाढवण्याचे व्रत असे असेल :
    मायबोलीवर येणे -- इकडे तिकडे डोकावून झालं की गुल होणे -- कुठे काही सनसनाटी लिंक सापडली की तिचा लगेच फडशा पाडणे -- मग पुन्हा त्याचे पडसाद जिथे तिथे देणे -- दुसर्‍यांना तोच छळ भोगायला लावल्याच्या असुरी आनंदात त्या लिंक वर जाज्वल्य जळजळीत प्रतिक्रिया देणे- सहनशक्तीचा अंत झाला-- लिहीणार्‍यांचे हात थोपवू शकत नाही आणि लिंकच्या औत्सुक्याने वाचन टाळता येत नाही असं अवघड मायबोलीचं दुखणं झालं की सुक्या औतावर ओतलेला आशुंडरस प्यावा ---- त्याची किक बसली की लगेच पाळलेल्या मांजराच्या पेकाटात जीव खाऊन लाथ घालावी-- (ते मांजर म्हणजे आपल्या सहनशक्तीचा अंतकर्ता आहे असे समजून-- म्हणजे अजून जोरात बसेल)--एक दीर्घश्वास घ्यावा-- त्या बिचार्‍या मांजराला बशीभर दूध द्यावे (जेणेकरुन पुढची लाथ खाण्याची त्यास शक्ती प्राप्त होईल.)-- हे व्रत अखंडमायबोलीसभासदत्वकालावधी मनोभावे करत राहावे. मन डोकं आनंदाने ओसंडून वाहील सहनशक्तीमध्ये अतोनात भरभराट.. उतू नाही मातू नाही घेतला वसा टाकू नाही. ही व्रात्य उत्तरांची कहाणी टारगट उत्तरी सुफळ संपूर्ण!

    bhagya | 26 मार्च, 2009 - 11:09
    माते, पाळलेल्या बिचार्‍या मांजराऐवजी एखाद्या निर्जीव गोष्टीला लाथ मारल्यास चालेल का? नाही, म्हणजे माबोवर वाचलेल्या कविता ललितांचा त्याला का त्रास म्हणते मी.

    aashu_D | 26 मार्च, 2009 - 11:14
    नाही. मांजरच का? त्याचा इतिहास तुला बहरात जाऊन शोधावा लागेल. सर्वप्राणिमात्रकल्याणकारी असं व्रत आहे हे.. यामुळे दुहेरी फायदा होतो.. व्रत करणार्‍याची सहनशक्ती तर वाढतेच शिवाय मांजराचीही.. त्यामुळे मांजर पळून जाण्याचा, पुन्हा दुसरे शोधून आणताना होणारा सहनशक्तीचा र्‍हास होण्याचा धोका टळतो.
    तात्पर्य : देवीने सांगितलेल्या व्रताचे जसेच्या तसे पालन करावे, पळवाटा काढू नयेत.

    SAJIRA | 26 मार्च, 2009 - 11:19 नवीन
    धन्यवाद देवीमाते.
    पण आशूंडरस, कवितेचा (रसग्रहणातला) रस, अन ललितेचा फिक्शनरस यांचे कॉकटेल होऊन त्रास झाल्यास काय करावे???
    सानुग्रह खुलासा करावा. कृपया. प्रणाम.

    aashu_D | 26 मार्च, 2009 - 11:32 नवीन
    त्रास झाल्यास काय करावे???>> सहनशक्ती वाढवण्यासाठी करतोयस ना व्रत? (भक्ताच्या requirements are not clear. Appraisal note added. )
    वत्सा, ते सारे या व्रतात समाविष्ट आहे. नीट वाच. हे व्रत अखंडमायबोलीसभासदत्वकालावधी मनोभावे करत राहावे.
    त्रास होणारच. त्रास न झाला तर ते व्रत कैसे?? त्यावर उतारा म्हणून पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी. तरच सहनशक्ती वाढेल.

    --
    कवितांनो, ललितांनो, आता बस! एक या दो, बस्स बस्स!!

    आज पुपुवर स्लार्टी आजोबांच्या गतायुष्यातील काही महत्त्वाच्या टप्प्यांमधले फोटोंचे दर्शन घेऊन नागरीक धन्य झाले! त्यावर झालेली ही चर्चा!
    (आधीची पोस्ट्स वाहून गेली. कुणाकडे असेल तर द्यावे. कृपया.)

    slarti | 3 एप्रिल, 2009 - 13:45
    धन्य !!! माझे त्यातल्या त्यात बरे फोटो टाकल्याबद्दल आशु आणि चिन्मय यांचे आभार. साजिरा, माझी आक्षेपार्ह प्रकाशचित्रे इथे टाकू नकोस. कृपया.
    तरी काही प्रकाशचित्रे टाकत आहे -
    मी किशोरावस्थेत असताना खूप फॅशन करायचो -
    aarfy | 3 एप्रिल, 2009 - 14:05
    स्लार्टी, तू नेमका किती वर्षांचा आहेस?
    म्हणजे सध्याच्या फोटो मधे जरा उत्क्रांत वाटत आहेस..!
    माझी शंका ही, की इतका जुना आहेस का तू, की होमो-इरेक्टस ते होमो-सेपियन हा प्रवास याची जन्मी याची देही अनुभवतोयस? अशा उत्क्रांतीच्या पाऊलखुणा अंगाखांद्यावर बाळगून असलेले जीव विरळाच! Proud
    slarti | 3 एप्रिल, 2009 - 14:09
    दीपू, माझी त्वचा उत्क्रांत झाली Proud आर्फी, मी अक्षरशः उत्क्रांतीच्या खुणा अंगाखांद्यावर बाळगून आहे बघ Happy
    SAJIRA | 3 एप्रिल, 2009 - 14:11
    किशोरावस्थेत छानच दिसायचास की. आता आताच विपन्नवस्था आलीये वाटतं तूला.
    पण तिसर्‍या फोटोत तू स्वतःच्याच पोटात ते स्वनिर्मित चाकूसदृष हत्यार का खुपसून घेत आहेस? दुसर्‍या पोटोतल्या आदिबालेचा त्यात बराचसा संबंध असावासे वाटते आहे. मघाशी तूला सापडलेली नावबाला ती हीच, की तिची खापरपणत? तीच असेल, तर तिच्या सोबतच्या त्या आदिमभालाधारींचे तू काय केलेस? तू आत्महत्येचे केवळ नाटक करून दुसरा अवतार धारण करून वरील व्हिलनांचा काटा काढला असावास.

    शिवाय तुझ्या गतायूष्याबद्दल बरेच प्रश्न उपस्थित झाले आहेत. आदिकाळात पण पार्लरे होती का? कारण हेअरस्टाईल तसेच रंग, कातडी यांत बरीच उत्क्रांती होत गेलेली दिसते आहे.

    deepurza | 3 एप्रिल, 2009 - 14:13
    ते रंगाच तेवढ सांगितलं असतस तर मला अन साजिर्‍याला उपयोग झाला असता थोडा Proud Wink
    slarti | 3 एप्रिल, 2009 - 14:19
    Lol अरे ती रंगासकट उत्क्रांत झाली आदिकाळात पार्लरे नव्हती, पण पार्ले होता. तिथल्या काकवांचे सल्ले आचरणात आणल्यामुळे बराच फरक पडला Proud

    aashu_D | 3 एप्रिल, 2009 - 14:25
    साजिरा तर आता 'गॉन केस' झालाय.. उमेदवारीतून रे!!!
    ज्यांनी साजिर्‍याला पाहिले असेल प्रत्यक्ष/ फोटोतून त्यांना यातला श्लेष समजेल. Lol
    limbutimbu | 3 एप्रिल, 2009 - 14:28
    >>>>> आता 'गॉन केस' झालाय..
    येवढुस्सा नाही तर माझ्याशी काम्पीटीशन कर्तोय! Proud
    SAJIRA | 3 एप्रिल, 2009 - 14:42
    त्या गॉनलेल्या केसांमूळेच स्लार्टीच्या आदिम गुढप्रद केसांचे मला कुतूहलमिश्रआदरमिश्रकौतूकमिश्रभीती वाटत आले आहेत. (आता स्लार्टी 'गॉन' असला तरी केस मात्र अजून 'इन' आहेत- हे वेगळे)

    नाही नाही लिंबूदादा, तसला प्रमाद आमच्याकडनं होणार नाही. तू आदिमगॉनकेस आहेस बाबा. Proud

    limbutimbu | 3 एप्रिल, 2009 - 15:13
    >>> तू आदिमगॉनकेस आहेस बाबा??????
    आदिम??? लोक तर म्हणतात अकालीगॉनकेस आहे म्हणून! Proud
    slarti | 3 एप्रिल, 2009 - 15:18
    >>> (आता स्लार्टी 'गॉन' असला तरी केस मात्र अजून 'इन' आहेत- हे वेगळे) Lol
    साजिरा, कुतूहलाल-बिन-आदरखान-बिन-कौतुकुद्दीन अल् भीती या नावाने ओळखला जाणारा दहशतवादी तूच का ? Proud

    --- Happy

    उजव्या बाजूला दिसणार्‍या जाहिरातीमधे -

    पुणे येथे एन ए जमीन हवी आहे आणि उभ्या उभ्या विनोद अशा दोन जाहिराती आहे. हेडींग वाचता या दोन्ही मधे काहीतरी संबंध असावा असा माझा विश्वास आहे. Happy

    स्लार्टी महाराज आपण धन्य आहात...
    ~~~~~~~~~

    हे बारा बाफवरून

    zakki | 3 एप्रिल, 2009 - 09:44
    नमस्कार मंडळी.

    झाले. पूर्णपणे वैतागलो!

    काय या कविता!! वाट्टेल त्या विषयावर. आधी स्त्री, व्यथा, वेदना अश्या समानार्थी शब्दांवर तीन वेगळ्या कविता, मग 'शब्द' या विषयावरच.

    मग ती वेदना म्हणे 'माजलेली' होते? कशी काय माहित नाही! वळू माजतो, स्त्री माजते, वेदना कशी माजते? पण त्यावरहि कविता!

    हळव्या भावनांवर कविता. मला वाटते भावना नेहेमी हळव्याच असतात कवींच्या दृष्टीने. पण तेच कवी कधी 'हळव्या स्वयंवराला' म्हणून स्वयंवरच हळवे करतात, तर कधी प्रीतीचा रंग हि हळवा म्हणून रंगहि हळवा करून टाकतात. म्हणजे उद्या एखादा 'हळवा दगड' पण निघेल कुठेतरी. मग त्याच्यावर कविता.

    आता लाल या रंगावर कविता आहे, उद्या बेज, नि मॉव्ह नि चटणी कलर वर पण कविता. आहे क्काय नि नाहीक्काय! मग ते माजतील, म्हणून त्याच्यावर कविता. पुनः त्या सगळ्यांना एकएकदा हळवे करून टाकायचे की आणखी कविता.

    एकच पाउस, पण तो कधी बारा वाटांनी जातो, कधी तुझा माझा असतो, तर कधी कमाल म्हणजे ओली सर होऊन येतो. आता पावसाची सर ओलीच असणार, त्यात कविता काय करायची. कधी कोरडीच सर आली तर कविता करावी, काहीतरी वाचण्याजोगे मिळेल.

    अगदी गांधीजी, आत्मा या सारखे गंभीर शब्द सुद्धा सोडले नाहीत यांनी.

    प्रेम हा विषय तर काढूच नका!! जमले, नाही जमले, जमून मोडले, चालू असले, माझे, तुझे, तिचे, त्याचे कुणाचेहि माजलेले, हळवे प्रेम म्हणजे अगदी दोनएकशे कवितांना तोटा नाही!!

    मायबोलीचे एकूण चार संगणक आहेत. त्यापैकी तीन फक्त कवितांना नि एक बाकी सगळ्याला, अशी अफवा आहे. ख. खो दे. जा!!!

    nana_nene | 3 एप्रिल, 2009 - 09:45
    शुभ प्रभात, सुजन हो!

    -----------------------------------
    जय जय रघुवीर समर्थ |

    mandarnk | 3 एप्रिल, 2009 - 09:47
    सुप्रभात!

    >>>एकच पाउस, पण तो कधी बारा वाटांनी जातो, कधी तुझा माझा असतो, तर कधी कमाल म्हणजे ओली सर होऊन येतो. आता पावसाची सर ओलीच असणार, त्यात कविता काय करायची. कधी कोरडीच सर आली तर कविता करावी, काहीतरी वाचण्याजोगे मिळेल.

    झक्कीकाका, हीच वाक्यं फोडं करुन प्रत्येक वाक्य नवीन ओळीत याप्रमाणे लिहीलंत तर तुमचीही कविता होउन जाईल... नवीन इस्टाईल प्रमाणे!

    पहा:

    एकच पाउस,
    पण तो कधी बारा वाटांनी जातो,
    कधी तुझा माझा असतो,
    तर कधी कमाल म्हणजे ओली सर होऊन येतो.
    आता पावसाची सर ओलीच असणार, त्यात कविता काय करायची.
    कधी कोरडीच सर आली तर कविता करावी,
    काहीतरी वाचण्याजोगे मिळेल.

    naynishv | 3 एप्रिल, 2009 - 09:54
    राम राम मंडळी,

    कोणाची सुरत बगायला मोताज झालास बे <<<<< आता तुमचीच.>>>> सुभान अल्ला होय! हसीं चेहरा होय! सुभान अल्ला , हसीं चेहरा, ये मस्ताना अदाएं... खुदा मेहफुज रख्खे हर बला से, हर बला से....

    आज बाराकर किती पोस्टी पाडणार मग ? <<< ते तुमच्यावर अवलंबून आहे....>>>>> हो ना मी ही आजकाल काळजीत पडलोय, पोष्टी मोहताजी पायी बारा चा पार शिट्टी बाफं झालाय

    झक्की.. अहो सकाळी सकाळी कुठे कवितांवर उखडताय.... त्या पेक्षा सवितांवर उखडा...
    पण सध्या तरी या वाक्या "वळू माजतो, स्त्री माजते"" मुळे सविताच तुमच्यवर उखडतील ...

    zakki | 3 एप्रिल, 2009 - 10:05
    मंदारा, नको रे छळू इतका! पहा आता तू मला कविता लिहायला लावलस.

    कोरड्या सरी ओल्या झाल्या, पाउस आला!
    जणू ढगांचे माजलेले घन अक्ष सैल झाले!!
    आज अचानक बारा वाटांनी फुटले.
    काही तुझे झाले, काही माझे
    तर काही गांधीजींच्या हळव्या आत्म्याचे!

    आता यात स्त्री, प्रेम, असे शब्द कसे आणावेत? कुठे आहेत स्वाती आंबोळे?? काही मदत करा, एकदम एप्रिल महिन्यातली उत्तम कविता म्हणून एक मर्सिडिज गाडी बक्षीस मिळेल मला!

    मंदार, तुला हिंडवून आणीन त्यातून.

    काही तुझे झाले, काही माझे
    तर काही गांधीजींच्या हळव्या आत्म्याचे!.:D

    Pages