डमरु महोत्सव- २०११

Submitted by प्रिति १ on 17 October, 2011 - 14:43

डमरू महोत्सव २०११!!!

"महाराष्ट्र टाइम्स" आणि "बैंक ऑफ़ महाराष्ट्र " प्रस्तुत "डमरू" हा तालवाद्य महोत्सव १६ सप्टेम्बर २०११ ते १८ सप्टेम्बर २०११ रोजी "महालक्ष्मी लॉन्सवर" वर संपन्न झाला. तो आम्ही खुपच एन्जॉय केला.त्याचे काही फोटो टाकत आहे.

३ दिवस झालेल्या या महोत्सवात अनेक बुजुर्ग आणि प्रसिद्ध तालवादक सहभागी झाले होते. पंडित विजय घाटे हे मुख्य संयोजक होते.आणि ग्लॅड पीपल ही पण संस्था संयोजनामधे सामिल होती. तबला हे आजचे प्रसिद्ध वाद्य असले तरी त्यानेही प्रसिद्धीसाठी खुप काळ वाट पाहिली आहे. त्याच्या लोकप्रियतेचं सारं श्रेय बुजुर्ग उस्ताद आणि पंडितजीना जाते. एखादी व्यक्ति नावारुपाला येण्यासाठी प्रयात्नासोबत जशी नाशिबाचिही साथ लागते, तोच नियम वाद्यांबाबतही लागू आहे. उदाहरण घ्यायच झाल तर वीणा या वाद्याचे घेता येइल. पूर्वी हे वाद्य प्रचंड लोकप्रिय होते आणि आज त्याची गणना दुर्मिळ वाद्यात होते . तबला हे स्वतंत्र वाद्य म्हणून नावारुपाला येण्यासाठी अनेक कलाकारानी प्रचंड कष्ट घेतले. त्यामुळेच त्याने आज संगीत प्रेमींच्या हृदयात स्थान पटकावले आहे.

या सर्व गोष्टी लोकांसमोर याव्यात,तसेच इतरही तालवाद्यांची ओळख व्हावी हा या महोत्सवाचा मुख्य हेतु होता.आणि तो अतिशय प्रभावीपणे साध्य झाला आहे असे मला वाटते.या ३ दिवसात भारतातील जेष्ठ आणि प्रसिद्ध कलाकारांचा तालाविष्कार पुणेकराना अनुभवता आला.

या महोत्सवात "कोंग" "खंजिरी" "खोल" यासारख्या भारतीय पारंपरिक वाद्यासोबत पाश्चात्य वाद्यांचे ही सुन्दर सादरीकरण झाले. याचे अजुन १ वैशिष्ट्य म्हणजे इथे तबला, ढोलक, मृदंग, पखावज , जेम्बे, ड्रम्स याच्या एकल वदना बरोबरच जुगलबंदिही खुपच मस्त रंगली.

पंडित कुमार बोस, पंडित सुरेश तलवलकर, पंडित अनिंदो चटर्जी आणि विद्वान् विखु विनायक यांच्या उपस्थितीत याचे शुक्रवारी उदघाटन झाले.

1.JPG

शुभंकर बॅनर्जी आणि गोपाल बर्मन यांच्या श्रीखोल - तबला जुगलबंदीने महोत्सवाची झोकात सुरवात झाली. तब्बल १ तास रंगलेल्या या मैफलीत रसिक खुपच रंगून गेले होते.

Shubhankar Banerjee.JPG
यानंतर प्रसिद्ध तबला वादक अनिंदो चैटर्जी आणि त्यांचे शिष्य रूपक भट्टाचार्य यांचा सत्रानेही महोत्सव रंगतदार केला. स्टार ड्रमर रंजित बारोट यांच्या ड्रम्सने या दिवसाची सांगता झाली.

2.JPG3.JPG

१७ तारखेला शनिवारी सत्राची सुरवात प्रख्यात पर्काशानिस्ट तौफिक कुरैशी यांनी जेम्बे हे वाद्य वाजवून केली. पावसाची थोड़ी थोड़ी भुरभुर होती आणि तौफिक कुरेशिंच्या ज़ेम्बेतुन निघणारा प्रत्येक ताल आणि ठेका रसिकांच्या मनाचा ठाव घेत होता. तशातच ते म्हणाले, " हर साँस में लय होनी चाहिए और हर लय में साँस.. कुछ ऐसे ही पेश करनेकी कोशिश करता हूँ. मग डोळे मिटून माइकसमोर ते केवळ श्वासोच्छवासातून ताल पेश करू लागले. एरवी त्यंच्या बोटातून उमटणारी तालाची जादू श्वासातही पुरेपुर उतरू लागली. पुढच्या मिनट भरात त्यांनी फक्त श्वासाच्या आधारे जबरदस्त रीदम निर्माण केला आणि रसिकांना आनंदाच्या अत्त्युच्य शिखरावर नेले.
4.JPG

यानंतर रंगमंच गाजवला तो प्रसिद्ध तरुण तबलावादक बिक्रम घोष आणि घटम वादक व्ही सुरेश यांनी. त्यांच्या वादनाची सुरवात झाली ती अनोख्या जुगलबंदीने. उत्तर भारतीय शैलीच्या तबला वादनाला दक्षिण भारतीय शैलीचे घटम वादनाची साथ देण्यात आली होती. तसेच ही जुगलबंदी बरोबर उलट शैलीतही ऐकायला मिळाली.

6.JPG

दि. १७ च्या शेवटच्या सत्रात पंडित सुरेश तळवलकर यांनी तबलावादनात बहार आणली. त्यांत त्यांची कन्या व अन्य साथीदारांनी सुरेख साथ दिली.

दी. १८ ची रविवार ची प्रसन्न सकाळ. आकाशात मेघ दाटलेले. ... आणि थंड वारा. या वतावरणात आणखी उत्साह भरण्यासाठी पखावज , तबला, घटम, खंजीरा आणि ड्रम्स सेट च्या तालाची बहारदार सगत.... वाह क्या बात है!
अगदी याच प्रतिसादात डमरूच्या शेवटच्या दिवसाचे पाहिले सत्र रंगले. पंडित भवानी शंकर, विजय घाटे, व्ही सेल्वा गणेश, विद्वान विकू निनायक राम, व्ही. महेश , आणि जीनो बैक्स आणि विनायक पोळ या रथी महारथींनी तालमय मैफिल ही सकाळच्या वेळेत ही रंगु शकते हे आपल्या वादनातुंन सिद्ध केले.
20.JPG22.JPG8.JPG9.JPG

सुरवातीला विजय घाटे आणि पंडित भवानी शंकर यांच्या तबला पखावज जुगलबंदीने रसिकांना दुर्मीळ तालांची अनुभूति दिली.

या दोन्ही वाद्यांचे ताल रसिकांच्या अंगात अक्षरक्षः भिनत होते. "वाद्य बजानेमे भी रोमान्स चाहिए " असे म्हणत पंडित भवानी शंकर यांनी पखावज मधून अद्भुत तालांची अनुभूती दिली. जोडीला विजय घाटेंच्या तबल्याच्या जुगलबंदीने मैफिलीला उंचीवर नेले.

10.JPG

त्यानंतर विक्कू विनायक राम ( घटम ) आणि त्यांचे २ सुपुत्र व्ही महेश ( वोकल ) आणि व्ही. सेल्वा गणेश "खंजीरा" या दिग्गज कलाकारानी खुपच मजा आणली. वयाची साठी उलटून ही विकू विनायक रामाची घटम वरील पक्कड़ एखाद्या तरुणाला ही लाजवणारी होती. शिव तांडव आणि गणपति तालातुन त्यानी सुरवात करुन पारंपारिक वातावरण तयार केले. त्यात व्ही. महेश यांच्या वोकलने अधिक रंग भरले. या मैफिलीला अत्यत अद्भुत प्रतिसाद मिळाला. सर्वानी उभे राहून या दिग्गजांना अभिवादन केले.

11.JPG12.JPG13.JPG14.JPG15.JPG

रविवारी संध्याकाळी पहिल्या सत्रात फज़ल कुरैशी ( झाकिरजींचे धाकटे बंधू ) तबला, श्रीधर पार्थसारथी , मृदंगावर आणि दिल्शाद्खान सारंगी यांची जुगलबंदी झाली.

16.JPG17.JPG18.JPG

त्यानंतर शेवटचे सत्र गाजवले ते आजच्या तरुणांचा लाडका अवली "शिव मणि " यांनी. अनेक प्रकारची वाद्ये एकाच वेळी अत्यंत सुरेल वाजवून त्यांनी एकदम जल्लोष केला. त्यात त्याच्या सुपुत्राने सुंदर साथ दिली. वादन साठी सुटकेसचा पण खुपच खुबीने त्यांनी वापर केला. तसेच फक्त उभे राहून २ काठ्यांचा उपयोग करून मस्त ठेका निर्माण केला.
Shivamani.JPG28.JPG

त्यानंतर परत शिव मणीनी एकेकाला बोलावून आपापल्या वाद्यांवर ठेका धरला. ही जुगलबंदी पण सर्वांना खुपच भावली.
29.JPG

या संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध चित्रपट अभिनेते राहूल सोलापुरकर यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत केले.
Rahul Solapurkar.JPG

अशा रितीने कधीही न विसरता येण्यासारखी या मैफिल ची सांगता झाली. आणि भारतातल्या पहिल्या डमरू महोत्सवाची मी साक्षीदार होते याचा मनापासून आंनंद झाला.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

बरेचशे फोटो दिसत नाहेत. पिकासावर अप करून त्याची लिंक इथे दिल्यास सगळे फोटो दिसतील.

प्रिती छान लिहिलयस ग ! फोटो पण छान आहेत. मी सुद्धा हा सर्व कार्यक्रम पाहिला असल्याने सर्व अगदि जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहिले . Happy

छान माहिती. आयबीएम लोकमत वर ह्या कार्यक्रमाचे काही तुकडे दाखवले होते. खुप एन्जॉय केले. युट्युब वर शोधत होते पण काही विशेष व्हिडीओ सापडले नाहीत. तुम्ही खुपच नशिबवान जो हा कार्यक्रम प्रत्यक्श अनुभवू शकलात Happy

खुप खुप धन्स प्रज्ञा.. कारण तुझ्यामुळेच हा सुन्दर कार्यक्रम समोरुन बघायला मिळाला. :- ) आणि आपण सगळ्यांनी तो एकत्र बसुन पाहिल्यामुळे अजुनच मजा आली. Happy आणि हो, हा लेख व फोटो टाकण्यात तर तुझा सिंहाचा वाटा आहे..
हे छान छान फोटो माझ्या लेकीने , कु. पायल ने काढले आहेत. म्हणुन तिला पण खुप खुप धन्स...:) आणि तुम्हा
दोघींना माझ्याकडुन स्पेशल ट्रीट.:)
स्मितहास्य आणि दिनेशदा -- आता फोटो दिसत आहेत.
Vrusha :- काही audio clips पण आहेत. पण त्या कशा टाकायच्या हे माहीत नाही. कोणी मार्गदर्शन केले तर त्या टाकायचा प्रयत्न करीन.

छान. वृत्तांत आवडला.
तुमच्याकडचं ध्वनीमुद्रण डिव्हशेयर किंवा इस्निप्स अशा संकेतस्थळावर चढवा आणि त्याचा दुवा इथे द्या..म्हणजे आम्हाला ते ऐकता येईल.

छान