मेदु वडे

Submitted by अबोल on 18 October, 2011 - 07:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ कप उडिद डाळ, जिरे १-२ चमचे भरड्लेले, खोबरयाचे पातळ काप (आवडत असल्यास ) २ हिरव्या मिरच्या बारिक चिरुन, चवी पुरते मिठ

क्रमवार पाककृती: 

उडिद डाळ ५-६ तास भिजत घालावि.... सकाळी नाश्त्याला करावेसे असल्यास... रात्रि भिजत घालावे..
नंतर पाणी काढुन मिक्सर मध्ये वाटावे. वाटताना पाणी घालु नये...
नंतर हे वाटण वाडग्यात काढुन हाताने चांगल फेटुन घ्यावे.. त्यामुळे.. त्यात हवा जावुन वाटण हलके होते..
नंतर त्यात जिरे १-२ चमचे भरड्लेले, खोबरयाचे पातळ काप (आवडत असल्यास ) २ हिरव्या मिरच्या बारिक चिरुन, चवी पुरते मिठ घालुन मिक्स करावे.
तळण्यासाठि तेल तापत ठेवुन अग्नि मिडियम हाय वर ठेवावे.. व मेदु वडे सोनेरी रंगावरतळावे.

वाढणी/प्रमाण: 
ह्यात ४ प्लेट होवु शकतील .. ते किती जणांना पुरतील .. हे खाण्यारय वर आहे.
अधिक टिपा: 

वडे तेलात टाकताना. एका वाडग्यात पाणी घेवुन..हात ओला करावा.. व पिठ हातात घेवुन मध्ये भोक पाडुन तेलात सोडावे.त्याने पिठ हाताला चिकटनार नाहि
मिश्रण पातळ वाटत असेल.. आणि गोल वडे येत नसतिल...तर एक चमचा तांदुळ पिठ वापरावे.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला. माबो वर लेखन करण्याचा.. आणी मराठी मध्ये लिहिण्याचा सराव नाही त्यामुळे काही चुका असल्यास सांगावे.

दीपा मी ते वाटण फुलण्यासाठी काही तास ठेवते. ना ही तर वडा आतुन गोळा लागतो. पण तु सांगितलेस तसे हाताने फेटुन पिठ हलके होते का? असल्यास सांग म्हणजे पुढच्या वेळि मला कमी वेळात करता येतील.

मी ते वाटण फुलण्यासाठी काही तास ठेवते.>>>> मोनाली, ते पीठ हाताने तर फेटावंच पण फेटल्यावरही फारतर तासभर ठेवावं, त्यापेक्षा जास्त वेळ ठेवलं तर पीठ आंबण्याची क्रीया चालू होते आणि त्यामुळे वडे हलके झाले तरी जास्त तेल पितात.

हो मी जास्ती च जास्त २०-२५ मि. ठेवते.. खुप चांगल बरयाच वेळ फेट्ल.. तर नाहि होत.. हाताने जमत नसेल तर सरळ ब्लेंडर ने कराव.. मेदु वडे ना..पिठ ठेवाव लागत नाहि अस मला आई सांगते.