खास मध्यप्रदेशातील नवरात्र उत्सव

Submitted by वर्षू. on 14 October, 2011 - 03:26

नवर्‍याने या वर्षी दसर्‍याला खास मध्यप्रदेशात जायचे निश्चित केले. (हे त्याचे गेल्या ३० वर्षांपासून चं स्वप्न होतं)त्याच्या या 'जिंदगी ना मिले दोबारा' स्टाईल च्या मुद्दाम घेतलेल्या सुट्टीमुळे ,तिथल्या विविध शहरातून पसरलेल्या त्याच्या बालपणीच्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला.
तिथे अजून ही चौका चौकांतून दुर्गेच्या भव्य मूर्ती बसवल्या जातात. त्यांच्या आसपास आरास म्हणून विभिन्न पौराणिक प्रसंगांचे देखावे उभारले जातात. नऊ दिवस उत्सव चालतो. इथे गरबा हा प्रकार होत नसला तरी लाऊड स्पीकरवरून भजनं ,फिल्मी गाणी वाजत राहतात. संध्याकाळी ठिकठिकाणच्या मूर्ती,आरास पाहायला तुफान गर्दी लोटते.
उत्सवाची सांगता दसर्‍याच्या दिवशी एखाद्या मोठ्या मैदानावर रावण दहनाने होते. १०,१५ फूट उंचीचे रावण उभे केले जातात. त्यांच्या पाठीत पोकळ जागेत निरनिराळे फटाके ठेवण्यात येतात. रावण दहन होत असता ,संपूर्ण आसमंत फटाक्यांच्या दणक्यांनी भरून जातो.

जबलपूर

बिलासपूर

रायपूर- रावण दहन

गुलमोहर: 

.

जबलपुर हे माझे सासर. पण अजुन पर्यन्त कधी नवरात्र उत्सव पहाण्याचा योग आला नाही ते दर्शन घड्ले. धन्यवाद.

व्वा!:)

मस्त Happy देव्या तर आवडल्याच पण तो शेवटचा रावण अगदी मनापासून बनवलेला दिसतोय. हिरवा एकमुखी रावण गोड दिसतोय आणि तो मधला 'मुफ्ती'? त्याची बाकीची डोकी किती पिटुकली आहेत पाकळ्यांसारखी !

वर्षु, मस्तच! छान सफर करुन आणलीस MP च्या दसर्‍याची. देवीचे फोटोज खुप सुंदर आले आहेत. खरंच गं, रावण कसले गोडु आहेत सगळे. Happy

हे मस्ताय गं वर्षु!! देव्या कसल्या सुंदर, नाजुक दिस्तायेत!! आणि शर्ट पँटी घातलेले 'रावण' पण मस्त!! Lol

आर्या Lol
अगं हे तर काहीच नाही.. एम पी मधे होळीच्या दिवसात होलिका बसवतात. त्यांचं दहन करतात होळीच्या दिवशी. या होलिकांना चक्क मिनी ड्रेस काय्,त्यांच्या हातात कोक ची बाटली ,स्ट्रॉ सकट काय.. शिवाय काही जागी तर स्कूटरवर स्वार झालेली होलिका सुद्धा असे..

<<या होलिकांना चक्क मिनी ड्रेस काय्,त्यांच्या हातात कोक ची बाटली ,स्ट्रॉ सकट काय.. शिवाय काही जागी तर स्कूटरवर स्वार झालेली होलिका सुद्धा असे..<<
हैला...स्कूटरवर स्वार झालेली होलिका!! Rofl

हम्म...पण हे प्रतिकात्मक असेल ना? Sad

मस्त.
परवा मुलीला हिंदीचे समास अडले होते तेव्हा तुझी आठवण आली होती. पण मग परीक्षाच कॅन्सल झाली. Happy

सर्व फोटो छान तर आहेच आणि माझ्या आठवणींना उजाळा देणारे आहेत,
दसर्‍याला रामलीलेची साघता रावण दहनाने करण्याची प्रथा फार पूर्वीपासून मध्यप्रांतात आहे.
जबलपूर जवळच्या कटनी (आता वेगळा जिल्हा झाला आहे) ला अति भव्य साजरा होत असे.
मोठ्ठ्या मैदानात बाहेरून आलेली रामलीला "मंडली" एकमेकांशी सामंजस्य राखून रामायणातील वेधक प्रसंग - मैदानाच्या पूर्व निश्चित भागात , आणि, आधि ठरवल्यानुसार पेट्रोमॅक्सच्या उजेडात सादर करीत.
काही दृष्य मशालींच्या उजेडात मुद्दाम दाखवीत.
विशेष म्हणजे प्रेक्षक ते बघण्यासाठी एकेका मंचासमोर बसण्बयासाठी बस्तान हलवीत असत.
प्रत्येक "मंडली" दर वर्षी ठराविक प्रसंगच करायचे- आपले कौशल्य पणाला लाऊन.
संगतिला गायक-वादक मंडळी असायची आणि काही प्रसंग तर अप्रतिम दृष्य-देखाव्या सकट सादर व्हायचे.
धार्मिक स्वरूप जतन करण्याचा अट्टाहास असायचा.
रामायणातील चौपाईं गायल्या जायच्या, सिनेमातली गाणी नाहीच.
असो. गेले ते दिन गेले !

मस्त फोटो. छान. युथ हॉस्टेलच्या हेरीटेज म.प्र. प्रोग्रॅममध्ये जायची संधी थोडक्यात हुकली. माझे सगळे दोस्त आत्ता इंदूरच्या सराफ्यात हादडत असतील. श्याsssss!

दैत्य | 14 October, 2011 - 12:49 नवीन
पहिल्या फोटोत राक्षसांना सुद्धा 'सिक्स पॅक्स' दाखवल्या आहेत!!!
>>
दैत्या दात काय काढतोस. राक्षसांना दाखवल्यात दैत्यांना नाही.

निलिमा,
'शेवटी भावना महत्वाची' असं म्हणतात नं! राक्षस जरी असले तरी चांगले खाते-पिते होते आणि देवीसाठी 'काबिल दुश्मन' होते असं दाखवायचं असेल !!

हेम्,दैत्य,निलिमा Biggrin
धन्स सर्वांना Happy
मनाच्या खोल कप्प्यात एम पी च्या अजून काही आठवणी दडलेल्या आहेत्..अगदी निराळ्या.. तिथे राखी,नागपंचमी च्या निमित्ताने मेळे भरायचे.. एकदम युनिक वस्तूंनी भरलेले. खैर वो कहानी फिर सही!!!

वर्षूदी, मस्तच सफर आणि फोटो Happy

एम पी मधे होळीच्या दिवसात होलिका बसवतात. त्यांचं दहन करतात होळीच्या दिवशी. या होलिकांना चक्क मिनी ड्रेस काय्,त्यांच्या हातात कोक ची बाटली ,स्ट्रॉ सकट काय.. शिवाय काही जागी तर स्कूटरवर स्वार झालेली होलिका सुद्धा असे..>>>>>:फिदी:

Pages