".....निघू आता?"
कितींदा सांगते, येतो म्हणावं...
"अगं हो... येऊ?"
हम्म...
चल मी येते, फाटकापर्यंत सोबत..
".....तुला करमेल कसं?, ए आणि असा उदास निरोप देणार आहेस? खूप प्रवास करायचाय इथून पुढे मला, हसरे डोळे बघून जाऊ देत.."
हो.. माहितीये! पुढची भेट?
"येतोच, फार- फार तर सात-आठ महिने... बास!"
बास???
थांब जरा... आई मी आलेच गं ह्याला जरा सोडून...
"बरं, अंधार पडण्याआधी ये, त्याला सांग पुढल्या वर्षी वेळेत यायला..."- आई
हो गं, आलेच- मी
"अगं तू कुठे येते आहेस सोबत? तुझ्या घराचं फाटक पडलं मागे...."
येते ना ... वेशीपर्यंत... तेवढीच सोबत मला तुझी...
बघ हे! तू जाण्याची नुसती कुणकुण लागली नाही की, गरमीने ताबा मिळवला इथे... रखरखीतपणा वाढलाच...
हे असं असतं,तू नसलास की फावतं सार्यांचं.... तुला मात्र 'जग' सांभाळायचं ना, सगळीकडे 'तू' हवहवासा... गरजेचा!... तू का कायम राहशील, इथे? माझ्यासाठी, माझ्यासोबत?
"रुसू नकोस गं... येतोच मी झटपट...."
हम्म... तक्रार तरी काय करावी?... तुला सगळ्यांनाच पहावं लागतं - कळतं रे मला सगळं...!!
ए, पण ह्यावर्षीही तुफ्फान बरसलास... मस्त! अगदी मनसोक्त!
मलाही शिकव ना... असं कधी.. रितं व्हायला...
अरे आणि हो, तुला सांगायचंच राहिलं, ऐक ना.. त्यादिवशी काय झालं, ना ____________ _________की______हिरवा________ इंद्रधनू_____ मस्त गरम भजी__________ गप्पा___________पालवी_______ तू बरसलास______ गडगडाट____________ काळे ढग____हसू नकोस ना_________मग्_______तू_____आलास जोरदार_____ चिंब____हसू__
आणि मग एक ना दोन...
त्याच्या -माझ्या गप्पा रंगल्या...
वेशीवरच!
जुने मित्र-मैत्रिणी भेटलो, की घरात बसून जितक्या गप्पा होत नाहीत, तितक्या निरोप देता- घेताना दारातच होतात, तसच हे....
काय बघतो आहेस?
"तुला!! कित्ती भरभरून बोलतेस ते.... "
हम्म.. तू ये आता, उशीर होतोय, अरे हे काय, काळोख दाटून आलाय....?? चल बाबा, मी पण येते, वाट पहात असतील घरी... आता ही गरमी, रखरख अशीच राहिल... उकडतंय पहा आत्तापासूनच! लोकांचे त्रासिक चेहरेच बोलतात, काय खरं ते....जाऊ दे, सुरू झाली माझी बडबड पुन्हा!
वाट पाहीन तुझी, पाहते आहे- आत्तापासूनच.... वेळेत ये बघ तू, मृगालाच ये अगदी! आणि... काळजी घे!
"हिरमुसून निरोप देते आहेस?... अगं नी हे काय?? माझा एक ढग आतच विसरलाय.... तू निघ पाहू घरी, मी तो ढग घेतो आणि लागतो प्रवासाला.... हा नाठाळ माझा डोळा चुकवून कुठे दडलाय ते पाहू देत..... येतो गं"
आणि उडालासही.... वेशीवरून पुन्हा आत...
मीही तुझ्याच विचारात, घराकडे माझ्या... तुझं 'निव्वळ असणं' सुद्धा किती प्रसन्न रे... आत्ताच उदास वाटू लागलंय... तू तुझा मागे राहिलेला ढग उचलून निघून जाशील... दिसशील का, जाता-जाता? मान उंचावून पहात राहिले..... रग लागली पण अंधारात तुझं आता काय दर्शन...?
रिमझिम.....
रिमझिम....
रिमझिम....
१- २- ३--------, ८--१०-१२. तुझेच ठिपके...
अरे... काय हे?
टिपटिप.... टिपटिप...
मृद्गंध!! अहाहा.... श्वास भरून...
धारा....सरी..
भिजतीये..... हलके हलके!
गार हवा...
रखरख क्षणार्धात लुप्त?..
गावात पोहोचले मीही...
पोरं -सोरं.... बाहेर.... हसत- खिदळत!! "अरे पाऊश आला पलत" असा गलका करत!!
त्रासलेल्या चेहर्यांवर गारव्याचं हसू उमललं...
माझ्याही!
पुढ्यात तू अचानक्क!
.... हसले फक्त! हसर्या डोळ्यात खोल पहात उडालास पुन्हा...
एक वीज... एक नजरा-नजर!
एक हसरा निरोप!!
कसा रे जाता- जाता सगळयांना प्रसन्न हसू देऊन जायला जमलं... तुझ्यासारखा तूच!!
छे!!
ढग विसरल्याचा बहाणा होता तर....
आवडलं...
आवडलं...
व्वाह!!!!! मस्त फुलवलं
व्वाह!!!!!
मस्त फुलवलं आहेस...
सुंदरच...
सौमित्रची एक कविता आठवली...
मध्यरात्री दारावर टकटक...
एकच शब्द आहे - सुंदर!!!!
एकच शब्द आहे - सुंदर!!!!
आवडलं.
आवडलं.
व्वाह...!!!!... सुंदर......
व्वाह...!!!!... सुंदर......
छान
छान
मस्त गं ! मस्त फ्रेश वाटलं
मस्त गं ! मस्त फ्रेश वाटलं सकाळी सकाळी
छे!! ढग विसरल्याचा बहाणा होता
छे!!
ढग विसरल्याचा बहाणा होता तर....>>>>>सही,,,,खुप खुप आवडलं बागेश्री! तुझं अन ''त्या''चं नातं अगदी हळूवार सांगितलंस. पुलेशु,अजून येऊदे...:)
प्रचंड सुरेख लिहिलय खूप खूप
प्रचंड सुरेख लिहिलय
खूप खूप आवडल....
(No subject)
खुपच छान... आवडलं.
खुपच छान... आवडलं.
आता जरा सविस्तर प्रतिसाद
आता जरा सविस्तर प्रतिसाद देतो.
पावसाशी असलेलं नातं अत्यंत हळूवारपणे पण तरी थेट आतपर्यंत पोहोचेल असं मांडलंय. जणू माझंच पावसाशी असलेलं नातं कुणीतरी उलगडून दाखवतंय असं वाटलं. वाचून इतकं प्रसन्न वाटलं की काल दिवसभराचा शीण या एका लेखाने नाहीसा केला.
>एक वीज... एक नजरा-नजर!
एक हसरा निरोप!!
कसा रे जाता- जाता सगळयांना प्रसन्न हसू देऊन जायला जमलं... तुझ्यासारखा तूच!!
छे!!
ढग विसरल्याचा बहाणा होता तर....
सहीच!!! अ प्र ती म!!!!
खूप खूप आवडलं.. मस्तंच
खूप खूप आवडलं..
मस्तंच लिहिलय....
छान.. आवडलं..
छान.. आवडलं..
छान, अतिशय तरलपणे मांडल आहेस,
छान, अतिशय तरलपणे मांडल आहेस, मला पावसाशी बोलल्या सारखे वाटले
(No subject)
मस्तच बागे..
मस्तच बागे..
खरंच छान ग बागे... सही
खरंच छान ग बागे... सही एकदम...
कसा रे जाता- जाता सगळयांना प्रसन्न हसू देऊन जायला जमलं... तुझ्यासारखा तूच!!>>>> मस्तच..
तरल.! हळुवार..! आणि नेमके
तरल.! हळुवार..! आणि नेमके शब्द..!
बागेश्री, खूप खूप छान लिहिलय.
बागेश्री, खूप खूप छान लिहिलय.
अमितला १०० मोदक.
अहाहा!!!!!!!
अहाहा!!!!!!!
बागु तुझ्या गद्यात ही काव्य
बागु तुझ्या गद्यात ही काव्य असतं.. हळोवार्,भावस्पर्शी!!! खूप गो>>ड!!!
खूप खूप गोड!
खूप खूप गोड!
अरे वा! बुधवारी संध्याकाळी
अरे वा! बुधवारी संध्याकाळी अचानक पाऊस आला तेव्हा माझंही असंच काहीसं झालं. २ मिनिटांचा मस्त व्हिडिओ शूट करून घेतलाय मी - जास्त काही दिसत नाहिये. पण विजा चमकल्याचा आणि पावसाचा आवाज रेकॉर्ड झालाय. पुढल्या वर्षीपर्यंत ही शिदोरी पुरवून पुरवून वापरणार आहे. तुम्हीही माझ्याच गटातल्या निघालात ह्याचा जाम आनंद झालाय
बागु स्टाईल एकदम ! __/\__
बागु स्टाईल एकदम ! __/\__
बागेश्री, किती ते पावसावर
बागेश्री, किती ते पावसावर प्रेम. पावसाच्या भरभरुन कविता केल्यास तेव्हाच एकदा विचारणार होते कि अजुन एक सुंदरशी पावसाळी हवेतली कथा किंवा एक छानसं ललित कधी टाकणार. ये ल्लो ! कसली मनकवडी आहेस. अतिशय सुंदर लिहिलंयस.
एक वीज... एक नजरा-नजर!
एक हसरा निरोप!! >>> खुप छान !
येते ना ... वेशीपर्यंत... तेवढीच सोबत मला तुझी... >>>> इथेपर्यंत पोचले तोवर वाटलं कि नवरा फॉरिन साइटला गेला आहे असं काही लिहिते आहेस........ आणि ते नेहमीप्रमाणे माझ्या सिचुएशनला मॅच करणारच आहे.
पुढे वाचल्यावर कळलं कि उफ नसीबा, हम दोनोंका प्यार एकही है.
(No subject)
मस्तच गौरी.
मस्तच
गौरी.
(मने तुझा प्रतिसाद पाहून
(मने तुझा प्रतिसाद पाहून हुश्श झालं, कारण तुला माहिती आहे )
उफ नसीबा, हम दोनोंका प्यार एकही है.>> और उसपर और भी बहोत सारे फिदा है
सगळ्या मित्र-मैत्रिणींचे आभार...
पाउस !!! बाग्स, तुझ्यामनातील
पाउस !!!
बाग्स, तुझ्यामनातील पावसाबद्दलच्या भावना वाचुन खरंच खुप छान वाटले.....
थोडक्यात अप्रतिम वर्णन केले आहेस.....
रच्क्याने, आपल्या देशाला निसर्गाने पावसासारखी अनमोल 'देणगी' प्रदान केली हे आपले 'थोर नशीब' आणि याचे 'महत्त्व', ते किती जणांना कळते...समजते???
Pages