'गावाकडची छायाचित्रं' - प्रकाशचित्र स्पर्धा - १

Submitted by माध्यम_प्रायोजक on 12 October, 2011 - 02:17

'माझे गाव' हे शब्द शहरातल्या जीवनाच्या लढाईत अडकलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यांपुढे एका क्षणात काही रम्य दृश्यं उभी करतात.. गावातली पहाट, पाखरांचे आवाज, चुलीतून निघालेला धूर, क्वचित रहाटाचे / पंपाचे आवाज, शेतावर, कामावर निघताना एकमेकांना दिलेल्या हाळ्या, गावची शाळा, मास्तर, गावचा पार, चावडी, जत्रा आणि देऊळ! तसंच, गावाचे नमुनेही- काही निरागस, काही बेरकी, तर बरेचसे उद्याच्या चिंतेने ग्रासलेले.

स्मृती जपायला आता मनाबरोबरच कॅमेर्‍याची भक्कम आणि उत्तम साथ आपल्याला मिळालेली आहे. तुमच्या मनात आणि अर्थातच कॅमेर्‍यात बंदिस्त असतील गावतल्या अनेक रम्य आठवणी.. तर अशीच गावाकडची खास निवडक छायाचित्रं इथे सगळ्यांबरोबर पाहूया.. इथे पोस्ट करा, तुम्ही काढलेली गावाच्या आयुष्याची छायाचित्रं.. सगळे मिळून त्या विश्वात काही क्षण डोकावून पाहूया..

स्पर्धेचे नियम -

१. एक आयडी जास्तीत जास्त तीन प्रवेशिका पाठवू शकेल.
२. तुमच्या प्रवेशिका तुम्ही याच बाफवर पोस्ट करायच्या आहेत.
३. मान्यवर परीक्षकांचा निकाल १ नोव्हेंबर, २०११ला जाहीर केला जाईल.

स्पर्धेच्या विजेत्यांना मिळतील आकर्षक बक्षिसं!!!

पहिलं बक्षीस - 'देऊळ' चित्रपटाच्या प्रीमियर शोची दोन तिकिटं आणि 'देऊळ'ची ऑडिओ सीडी
दुसरं बक्षीस - 'देऊळ' चित्रपटाच्या प्रीमियर शोची दोन तिकिटं.
तिसरं बक्षीस - 'देऊळ'ची ऑडिओ सीडी.

तर मग सरसवा आपले कॅमेरे, आणि जिवंत करा गावाकडचे क्षण!!!

विषय: 
Groups audience: 

हिंमत करुन हे एक प्रचि टाकते आहे. जिप्सी हसु नकोस रे.

काठेवाडी बैल आणि जुनागढ मधलं एक छोटंस शेतकर्‍याचं घर. The village.JPG

सर्व प्रचि मस्तच!!!!! Happy

मायबोलीकरांनो या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद द्या Happy
स्पर्धा नाहीतर खेळ समजुनच Happy (मायबोली गणेशोत्सव झब्बू सारखा).
निदान त्या निमित्ताने गावाकडचे विविध रंग पाहता येतील. Happy

वा! छानच आहेत फोटो सगळे.
जिप्सी : स्पर्धा नाहीतर खेळ समजुनच (मायबोली गणेशोत्सव झब्बू सारखा).>>>>> मग हरकत नाही खेळायला Happy

सारीच प्रकाशचित्रे "एक लंबरी" आली आहेत. मन झटदिशी गावाच्या त्या त्या जागी भटकून आले, इतकी जातिवंत उतरली आहेत ही सर्वच चित्रे.

जिप्सी म्हणतात "त्या निमित्ताने गावाकडचे विविध रंग पाहता येतील." ~ याच्याशी १००% सहमत. स्पर्धा असो वा नसो, चित्रातून 'माझे गाव' पाहायला मिळो. कंटाळा आला आहे शहरातील कॉन्क्रीटची बेदरकारीने वाढत चाललेली जंगले पाहून.

तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी...गुंजवणे गावाबाहेरील शेतातील घरं!
एकदम बेस्ट फोटो!:)

योगेश, कोकणदर्शनाबद्दल धन्यवाद. फोटो मस्तच.
सर्वांची प्रचि. सुंदर.
वैभव, सतिश, मंजूडी, साजिरा, आर्या, मनिमाऊ, माधव, शोमू >>>>खूप छान आहेत फोटो.
माधव, हा कोणत्या गावचा फोटो आहे? Happy

हाय दोस्तहो!

बर्‍याच दिवसानी आलो. फोटोच्या धाग्यावर वेळात् वेळ काधुन मी नजर ठेवत होतो.
इतक्या मोठ्या कालावधीत काढलेले फोटोच कौतुक कोणाकडुन ऐकणार जर अपलोड करायला वेळच नाही मिळाला तर. असो ह्या खेळात देण्यासाठी फारसे फोटु नाहिएत माझ्याकडे. वर दिलेले सर्व फोटु मस्त आहेत.
साजिरा अप्रतिम फोटो आहे तो. अख्खं गाव कस दिसत ते पाहण्यासाठी हा माझा फोटु.
कधी काळी रणरणत्या उन्हात खोडदचा मायबोलीकर श्रावण आणि त्याच्या काही दोस्तांसोबत पुरंदरला गेलो होतो तेव्हा काढलेला. झूम वापरल्याने आणि कडक उन्हाळा सुरु असल्याने फारसा नजरेला सुखावह नाहिये पण क्या करे कन्टोल नहि होता है. Happy

आणि हा फोटो रत्नागिरिहुन चुकलेल्या रस्त्याने गणपती पुळ्याला जाताना दिसलेलं एक खास कोकणी गाव. ह्याच नाव शिरगाव होतं.

>>>> मायबोलीकरांनो या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद द्या >>>>
तिनच फोटु टाकायची परवानगी हे, त्याला काय "भरघोस" म्हणायच होय? Sad
>>>तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी...गुंजवणे गावाबाहेरील शेतातील घरं! <<<<
ओऽऽ, तोरण्याच्या पायथ्याशी नैये गुंजवणे, ते तर राजगडच्या पायथ्याशी आहे. तोरण्याच्या पायथ्याशी वेल्हे आहे. चेक(मेट) प्लिज Proud
झकोबा, मला तु टाकलेले फोटु दिसत नैयेत

(परत एकदा) मस्त.
झकास, त्या पहिल्या फोटोत, गाव छोटंच आहे, पण देवळाचा कळस केवढा उंच! Happy क्लासिक फोटो!

मस्त फोटो, आत्ता मी काढलेले गावाचे काही फोटो सापडतच नाहीयेत. २२-२३ तारखेपर्यंत स्पर्धेची मुदत असेल तर गावी गेल्यावर नविन फोटो काढून टाकेन. Happy

Pages