चंद्र , ती आणि मी ...

Submitted by विनायक उजळंबे on 4 October, 2011 - 04:24

आता अंधार पडेल
मग चंद्र येईल साथीला ,
मी हरवून जाईन ,
त्याच्याशी गप्पा मारेन
त्याला विचारेन तुझ्याबद्दल ..
तो म्हणेल -आहे बरी..!
मी म्हणेन " सांग न हकीकत खरी .."

तो डिवचेल मला ,
म्हणेल - हातात मोबाइल समोर कंप्यूटर ...
sms पाठव ई-मेल कर .....

"पाठवला असत्ता रे ...
पण अशी मजा सेंड मधे नाही
प्रेमिकेचा क्षेम विचारायला
तुझ्यासारखा friend नाही ..."

मग खुलेले तोही ..
सांगेल,
तू येतेस आजही ..
त्या खिडकीशी ..
त्याला बघायला ..

"बर ,अजुन ?"

सांगेल की,
तुज्या तारकांचा हिशोब जास्त आहे
"कसा ?"
म्हणेल
उशिरा लागतो डोळा तिचा,
जाग ही लवकरच येते तुझ्या पेक्षा

सकाळी उठून सवयीने..
तुला करते पहिला message ...
"पण..पण.. मला नाही येत तिचा message "

तू साला IT वाला .. logical !
तिने स्वत:चा no. save केला आहे तुझ्या नावाने
त्याच नावाला message करुन ...
हसते हळूच तुझा नाव Inbox मधे बघून ..
"बर बर अजुन?"

हसेल गालात ,
अजुन काय ?
बास इतकच...!

आहे बरी .. तुझी परी...!
अन
मग सांगेल हकीकत खरी...!

संसारात रमली आहे .. सुखात आहे..
Inbox मधले message वाचते ..
अन.. delete ही करते..
पोराला झोपवाताना उशीर होतोच ..
नव -यासाठी डब्बा ही लवकर उठून बनवते..

मी निघताना पहाटे शेवटी ...
म्हणेल , एक मात्र खरं सांगू ..?
कधी तरी हरवून माझ्याकडे बघताना ,
नवरा विचारतो ,
चंद्रामधे कोणाला हुडकतेस ?
ती म्हणते ,
"तुलाच ...........................!"

..................................................विनायक

पुर्व प्रकाशित

गुलमोहर: 

सा-यांचे आभार !!
@ सुप्रियाताई
कविता अक्खी आवडली वाचून बरे वाटले .
नाहीतरपहिल्या अभिप्रायानंतर आता लोक शेवटच वाचतील अशी शंका होती !!

@ वर्षाजी
तुमचे विशेष आभार !!
सगळे तुम्हल्च अनुमोदन देत आहेत म्हणून !!!