मुव्हींग ट्रक /वॅन मध्ये लहान मुलाना पुढल्या सीट वर बसवता येते का? (अर्थात कार सीट मध्येच)

Submitted by तोषवी on 21 September, 2011 - 13:43

आम्हाला एका स्टेट मधून दुसर्या स्टेट मध्ये मूव्हिंग करायच आहे.खर्च आम्हालाच करायचा असल्,आणि,आणि प्रवास ७ तासाचा असल्याने आम्ही स्वतःच वॅन /ट्रक रेन्ट करून मूव्हींग करायच्या पर्यायाचा विचार करत होतो.अशा मूव्हींग ट्रक/टेम्पो मधे लहान मुलाला पुढल्या सीट वर बसवता येते का कार सीट मध्ये.?

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या माहितीत तरी नाही बसवता येत. एका तमिळ कुटुंबावर केस झाल्याचे ऐकिवात आहे लहान बाळास असे नेल्याबद्दल.

नियम माहित नाही, पण सुरक्षेच्या दृष्टीने ते धोक्याचे आहे. सीटबेल्ट लहान मुलांनुरूप बनवलेले नसतात, शिवाय गाडीत एअरबॅग असेल तर आणि अघटीत काही घडलं तर एअरबॅगचा प्रेशर लहान मुलं सहन करु शकत नाहीत. अर्थात हे सगळं भारतीय कार/व्हॅन बद्दल, परदेशात वेगळं असेल तर कल्पना नाही.

अजिबात नाही. एखादवेळ ६० पाउंडावरील (हे स्टेटवाईज बदलेल कदाचित.)मुलास बसवले तर चालेल ते पण सिटीतल्या सिटीत. पण फ्री वे वर तर अजिबातच नाही.

खरच रिस्क घेउ नका. फ्रिवेवर पोलिस पकडण्याचे चान्सेस खुप आहेत.
दुसरा काहीतरी पर्याय पाहा.
१. मूव्हर्स. (जे अर्थातच तुम्ही पाहिले असतील)
२. स्वतःची गाडी(कार) असेल तर तूम्ही व लहान मूल यात बसुन ट्रक/टेम्पो च्या पाठीमागे जाउ शकता.
३. पर्याय २ साठी कोण्या मित्राची मदत मिळाली तर उत्तम.

थोडा त्रास आणी खर्च झाला तरी टिल्लूने लिहिलेले पर्यायच छान आहेत. मूल लहान असेल तर मूविंग व्हॅन मध्ये नकोच. इतर सामानाबरोबर आपली कारही नव्या राज्यात न्यावी लागेलच.

फ्रिवेवर पोलिस पकडण्याचे चान्सेस खुप आहेत >>>>> सॉरी, लहान मुलाचा जीव जास्त महत्वाचा आहे तिकिट मिळणे न मिळण्यापेक्षा.

नाहीच. साध्या गाडीत पण लिहिलेलं असतं ना एर बेग मुळे लहान मुलं फ्रंट सीट वर नाही बसू शकत नाहीत असं.

नका बसवू. जोरात ब्रेक दाबावा लागला तर? तुम्ही बाळाबरोबर फ्लाइट ने पुढे जाऊन सामान रिसीव करायला नव्या घरी असू शकाल का? ते सेफ वाट्ते. बेस्ट लक