(माझे लेख दान केले)

Submitted by निनाद on 9 September, 2011 - 19:55

गंगाधर मुटे यांची अस्तित्त्व दान केले ही सुंदर गझल पाहिली आणि आमच्या अस्तित्त्वाची आठवण झाली.
मुटे साहेबांची क्षमा मागून...

असणेच आज माझे, नसण्यासमान केले
माझ्याच बायकोने माझे लेख दान केले

मागेच विसरलेल्या एकाच आयडीने
अकाऊंट आज माझे, डुआयमान केले

हळवा नकोस होऊ, मित्र मला म्हणाले
संतप्त बायकोनी, जरी उपटून कान नेले

चंचूप्रवेश होता घरी हळुवार पावलांनी
तो वास येता, बायकोनी त्रस्त आज केले

वाचाळ बायकोला वैतागलो पुरेसा
सेक्रेटरीसह जाणारै, बुक विमान केले

ठेचल्या शरिराला मी चाचपतो अजूनी
सासर्‍याने हाडांना माझ्या चूर्णासमान केले

भेटले ते लॉबीमध्ये, मी मूढ उभा रे!
यंदा चतुर सेक्रेटरीने मानलेला भाऊ केले

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

>>यंदा चतुर सेक्रेटरीने मानलेला भाऊ केले
चतुर सेक्रेटरीने (मज) भावासमान केले
हे कसे वाटते ?

शेवटचे कडवे मलाही टोचते आहे. पण ऐनवेळी टाकण्याची घाई झाली. Happy
महेश,
चतुर सेक्रेटरीने (मज) भावासमान केले
अगदी चपखल सुचवणी आहे.
धन्यवाद!