मोदींचे उपोषण - डॉ. विनायक सेन आणि पेड न्युज

Submitted by नितीनचंद्र on 18 September, 2011 - 01:29

आजचे रविवारचे वर्तमान पत्र गाजतय ते काल शनिवार दि. १७ सप्टेंबर रोजी अहमदाबाद येथे सुरु झालेले गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या तीन दिवसीय आत्मशुध्दी उपोषणाच्या बातमीने तसेच त्यांच्यावर पुण्यात टिका करणारे डॉ. विनायक सेन यांच्या बातमीने.

मोदींचे विकास घडवण्याचे कर्तुत्व हा राजकारणातला वस्तुपाठ झाला आहे. अनेक राज्यातले लोक, अनेक पक्षातले लोक अभ्यास दौरे आयोजीत करुन या विकास प्रक्रियेचे मर्म समजाऊन घेत आहेत.

काल सुरु झालेल्या उपोषणाच्या सुरवातीच्या कार्येक्रमाला भाजपाचे नेते उपस्थित होते याशिवाय पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, तसेच शिवसेना, तामिळनाडुतील सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षाचे मंत्री उपस्थीत होते.

या राजकीय परिस्थीचे वास्तव लक्षात येऊन विरोधी पक्षांना ते झोंबले तर नवल नाही. एके काळी भाजपाचे खासदार व गुजराथचे पक्षाध्यक्ष असलेले शंकरसिंग वाघेलांनी पण साबरमतीला महात्मा गांधींच्या आश्रमाबाहेर प्रती-उपोषण प्रारंभ करुन या मोदींच्या उपोषणाची टिका करण्याच्या प्रयत्न केला तर तो समजण्यासारखा आहे.

दै. मटा ने बातमी देताना १९९० हे दशक हे गुजराथ मध्ये धार्मिक दंगलींचे होते याची आठवण दिली आहे. जन्माला आलेला मुलगा आधी कर्फ़्य़ु हा शब्द शिकायचा आणि मग बाराखडी इतके धार्मीक संबंध विकोपाला गेलेले होते. दै. मटा मधे आलेली वस्तुस्थिती मी मागल्या वर्षी अहमदाबाद मध्ये गेले ३० वर्षे स्थायीक असलेल्या प्राध्यापक आणि डॉक्टरेट पदवीधर असलेल्या माझ्या नातेवाईक जोडप्याकडुन समजाऊन घेतली होती. आजच्या दै. मटा मध्ये लिहल्याप्रमाणे तिथे पतंग, सायकलच्या धक्का लागला यासारखे कोणतेही कारण दंगलीला पुरेसे होते.

प्राध्यापक आणि डॉक्टरेट पदवीधर असलेल्या माझ्या नातेवाईक जोडप्याकडुन याही पेक्शा धक्कादायक व विश्वासनीय बातमी मिळाली ती अशी होती की गुजराथ मधील भाजप सरकारने यासाठी रिबेरो या निवृत्त पोलीस अधिकायाची नियुक्ती किमान तीन वर्ष गुजराथ दंगली पुर्वी केलेली होती. दुर्दैवाने तेही निष्प्रभ ठरले होते. या पार्श्वभुमीवर गुजराथमधल्या विचारी आणि कोणत्याही धार्मिक टोकाचा विचार न करणार्‍या लोकांनी दंगलीतली मोदींनी घेतलेली भुमीका उशिराने का होईना पटलेली असल्याचे दिसते.

मुसलमान समाजाच्या धार्मिक नेते मतांची जुळवाजुळव करण्यासाठी जी प्रक्षोभक भाषणे करतात याचा परिणाम पुढे धार्मिक तेढ निर्माण करण्याकडे होतो हा इतिहास आहे. आज जर भगवा दशहतवाद असा शब्द प्रचलीत होत असेल तर तो प्रतिक्रियात्मक Reactive आहे असे माझे मत आहे. यावर मायबोलीवर प्रतिक्रिया येणे अपेक्षीतच आहे.

भारताबरोबरच ब्रम्हदेशपण स्वतंत्र झाला आणि तिथेही बुध्दाच्या मुर्तीच्या वाजत गाजत मिरवणुका निघु लागल्या. तिथेही या मिरवणुकांवर मशिदीतुन दगड येऊ लागले. तिथल्या सरकारने याबाबत आवाहन करुनही हे जेव्हा थांबले नाही तेव्हा पोलीसांनी मशिदिच्या आत घुसुन अशा समाजकंटकांना चोप दिला. पुढे अनेक काळ येतील मुस्लिम नागरिकांचे मतदानाचे अधिकारही निलंबीत होते हा इतिहास आहे.

रिबेरोंसारखा मातब्बर पोलीस अधिकारी जेव्हा हतप्रभ होतो तेव्हा राज्यकर्त्यांनी काय हातावर हात देऊन बसायचे होते ? अश्या परिस्थीतीत मोदींनी जर पध्द्तशीर दंगलींची केंद्रे उध्वस्त करण्याचे ठरवुन दंगलीला दिशा ( समजा ) दिली असेल तर कितीही वेदनादायक झाली असली तरी ही राजकिय शस्त्रक्रिया मानायला हवी. मानव अधिकार वाल्यांच्या _ _चे काय जाते गळे काढायला? जबाबदारी शुन्य तथाकथित मानव अधिकार नेते कश्मिरात हिंदुची गळचेपी झालेली आहे त्याबाबत मुग गिळुन का बसले आहेत ?

आपल्या कर्तुत्वावर गुजराथ मधे मागल्या निवडणुकीत २/३ बहुमताने निवडुन आलेल्या आणि सातत्याने प्रगतीपथावर नेणाया नेत्यावर छिंद्रान्वेशी थाटाने पुन्हा पुन्हा हीच टिका करण्याने काय साधणार आहे ? टिका करण्याच्या पध्दतीत काही प्रमुख आक्षेप असे.

१) नरेंद्र मोदी आत्मस्तुती करतात.
२) दंगलीकडे दुर्लक्श केले.
३) त्याचे शासन सुध्दा भ्रष्टाचारी आहे
४) सध्याचे उपोषण " हाय प्रोफ़ईल " आहे.

यावर मला असे वाटते.

१) जे कोणी प्रभावी नेते जांच्या स्वत:चा प्रभाव जेथे जास्त असतो तिथे स्वत:ची भुमीका विषद करताना हा प्रभाव दिसणे अपेक्षीतच आहे. मी स्वत: अहमदाबाद मध्ये फ़िरलो. मला क्वचीत कुठेतरी मोदींचा बॅनर दिसला तोही कोणत्यातरी महत्वाच्या उदघाटन प्रसंगी लावलेला. अन्यथा वाढदिवस किंवा राजकीय स्वागत यासाठी नरेंद्र मोदींचा बॅनर दिसत नाही. सु.श्री. मायवतींच्या कर्तुत्व व पुतळा पार्क यांची तुलना करताना हा मुद्दा केवळ मोदींवर टिका करण्यासाठी पेड न्युज सारखा वाटतो.

२) दंगलीकडे मोदींनी दुर्लक्ष केले हा आरोप अद्याप कोणत्याही न्यायालयात सिध्द झालेला नाही आणि झालाच तर त्याची शिक्षा भोगायला मोदींनी तयार असावे. भारतात ही काय एकमेव दंगल झालेली नाही. कै. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उद्भवलेल्या दंगलीचे सुत्रधार जेव्हा पुन्हा लोकसभेच्या तिकिटासाठी मागणी करतात तेव्हा तथाकथित धर्मनिरपेक्श कॊंग्रेसने त्यांना तिकीटे दिली होती व टिकेनंतर मागे घेतली यावर हे प्रकरण कोणी लाऊन धरल्याचे दिसत नाही असे का ?

३) भ्रष्टाचाराचे मुल्यमापन करण्याची पध्दत असल्यास जाणकारांनी मुल्यमापन करावे. माझ्या मते गुजराथ मधला शासकीय भ्रष्टाचार न्युनतम पातळीवरचा असावा. माझा अनुभव असा की गुजराथ वीज मंडळाचा एक अधिकारी मी ज्या कंपनीत आधी होतो तिथे बडॊद्याला आधी वीज जोडणीचे काम पुर्ण करुन नंतर फ़ाईलमधल्या अपुर्ण कागदपत्रांची पुर्तता करण्यास आला होता. बडोद्याच्या ऑफ़िसमधल्या माझ्या सहकार्‍याने वीज अधिकायाने एक पैसाही लाच मागितली नाही असे सांगीतले. अन्य राज्यात हे शक्य आहे का ?

४) महात्मा गांधी सोडल्यास त्यांचे शिष्य यांच्या कोटावर काश्मीरी गुलाब आणि कोटाची धुलाई पॅरीसमधे असा थाट आधीच्या पिढीने पाहीला आहे. जास्त कशाला परवाच मायवतींच्या बुटासाठी काय काय घडले हेही छापुन आले. वातानुकुल इमारतीत रहाणे जिथे सामान्य माणसाला आवडते तिथे अत्यंत व्यस्त आणि लोकांनी घेरलेल्या नेत्याने असे स्थळ उपोषणासाठी निवडणे काय गैर आहे ?

डॉ. विनायक सेन यांना पुण्यातच नेमका याच दिवशी दौरा काढायचे कसे सुचले याचा विचार नक्की करावा लागेल. डॉ. विनायक सेनांवर नक्शलवाद्यांशी असलेल्या संबंधाचा आरोप आहे. पुण्यातही नक्षलवादाची लागवड झालेली आहे अश्यावेळी पुण्याचा दौरा करुन पुण्यातल्या धरपकडीने निराश झालेल्या नक्षलवादी चळवळीचे मनोधैर्य वाढवायचे आणि भाजप सरकारने घडवलेल्या तुरुंगवासाचा बदला म्हणुन मोदींवर टिका करायची असा दुहेरी डाव डॊ. विनायक सेन यांनी साधला म्हणायला पुरेसा वाव आहे.

जेव्हा सारा भारत मोदींच्या आत्मशुध्दी उपोषणाकडे एका वेगळ्या प्रयोगाच्या दृष्टीने पहात असताना हिंसेची कास धरलेल्या नक्षलवादी विचारांच्या नेत्याने गुजराथ मध्ये गेल्या अनेक वर्षात एकही दंगल घडली नाही याकडे सपशेल दुर्लक्ष करावे आणि यामुळे "दंगलीचा इतिहास " बदलणार नाहीत अशी टिका डॉ.विनायक सेनांनी करावी हे जरा उलटा चोर कोतवाल को डाटे या न्यायाचे वाटले. हा जाहीर आरोप करायला पुण्याची भुमी का सोयीची वाटली असा विचार करताना पुल देशपांडे यांनी पुणेरी जाज्वल्य वृतीचा खास उल्लेख केल्याप्रमाणे पुण्याचे लोक ह्या असल्या फ़ालतु विचाराचे समर्थन करतील असा विश्वास त्यांना वाटला असावा.

महात्मा गांधींनीही फ़ाळणी घडणार नाही असे सांगीतल्यामुळे पाकिस्थानातला हिंदु फ़ाळणी पुर्वी गाफ़िल राहिला. महात्मा गांधींनी याची जबाबदारी स्विकारुन उपवास केल्याचे ऐकीवात नाही याउलट राजकीय हेतुंनी अडवलेली ५५ कोटींची रक्कम पाकिस्थानला देण्यासाठी उपवास केल्याचा इतिहास आहे. त्या महात्मा गांधींच्या वंशजानेही तारे तोडावेत ? यात महात्मा गांधींचा वंशही आता पेड टीकेच्या कार्येक्रमला विकला गेला की काय असा संशय येतो.

राजकीय नेत्याने बदल घडवणे अपेक्षित असते. त्याची जबाबदारी स्विकारणे हे ही अपेक्षीत असते. घडलेल्या चुकांची माफ़ी मागणे अपेक्षीत असते. आणी बाणी लादली म्हणुन एकदा कै. इंदीरा गांधींनी सत्तेवर आल्यावर दिलगीरी व्यक्त केली आणि त्यावरची टीका संपली. ३५०० शिखांच्या नरसंहाराचे कारण झालेल्या पक्षाच्या पंतप्रधानाने लोकसभेत माफ़ी मागीतली हे सुध्दा जनतेला मानवले पण नरेंद्र मोदींनी आत्मशुध्दी करणे हे तथाकथीत मानव अधिकार किंवा तत्सम पुळका आलेल्या पेड लोकांना मानवु नये याचा अर्थ ते सामाजीक कार्यकर्ते नसुन पेड न्युज पसवरणारे पोटार्थी आहेत हे विचार करणाया व्यक्तीला समजल्याशिवाय रहाणार नाही.

Group content visibility: 
Private - accessible only to group members

आज जर भगवा दशहतवाद असा शब्द प्रचलीत होत असेल तर तो प्रतिक्रियात्मक Reactive आहे असे माझे मत आहे. >>>>> १००% अनुमोदन.

अश्या परिस्थीतीत मोदींनी जर पध्द्तशीर दंगलींची केंद्रे उध्वस्त करण्याचे ठरवुन दंगलीला दिशा ( समजा ) दिली असेल तर कितीही वेदनादायक झाली असली तरी ही राजकिय शस्त्रक्रिया मानायला हवी. >>>>>>> एकदम मान्य.

महात्मा गांधी सोडल्यास त्यांचे शिष्य यांच्या कोटावर काश्मीरी गुलाब आणि कोटाची धुलाई पॅरीसमधे असा थाट आधीच्या पिढीने पाहीला आहे.>>>>>>>> अगदी बरोबर. त्यांचे पिण्याचे पाणीही काश्मीर मधील दाल सरोवर मधून यायचे.

नितीनजी,
तुमचे विचार अगदी अभ्यासपुर्ण, पुराव्यासहित !!
अनुमोदन !
मोदी तर ग्रेट नेता आहेच पण माणुस देखील ...

इब्लिस..

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना मिळणारा अभूतपूर्व पाठींबा बघून तुमचा प्रचंड जळफळाट होत आहे हे आम्ही समजू शकतो.बाकी कुमार केतकर,तिस्ता सेटलवाड सारखी चाटू लोकं मोदीं विरोधात विखारी प्रचार करून दमली..पण त्यांच्या केसाला ही धक्का लावू शकली नाही.

@ईब्लिस
"तुम्हाला किती मिळाले तुमच्या या पेड न्यूज साठी?"
असे लिहून तुमची मानसिकता काय आहे सगळ्यांना समजले असेलच. (१-२ फोटो दाखवून फरक पडत नाही हे तुम्हाला समजणे जरूर आहे).

आज गुजराथ च्या (मोदींच्या नेतृत्वा खाली) झालेल्या प्रगती कडे लोकांचे लक्ष जावू नये म्हणून त्यांचे चरित्रहनन करण्याचा हा प्रयत्न आहे हे कुणाही समतोल विचार करणा~याच्या ध्यानात येते.

माझा बीजेपी शी कसलाही संबंध नसला तरी, श्री मोदींनी गुजराथ चा केलेला विकास कौतुकास्पदच आहे हे मला जाणवते.
निखळ कौतूक करणे हे मराठी माणसाला कधी जमणार?

सुनिर

माझा बीजेपी शी कसलाही संबंध नसला तरी, श्री मोदींनी गुजराथ चा केलेला विकास कौतुकास्पदच आहे हे मला जाणवते.
निखळ कौतूक करणे हे मराठी माणसाला कधी जमणार?>>>>>>>>>>>
सुनिर तुम्हाला १००% अनुमोदन.

वाहवा नितिन भले शाब्बास, मोदी आणि गुजरात बद्दल चांगला लेख आहे.
मी तर वैतागाने म्हणत असे की एकवेळ लाच भ्रष्टाचार असला तरी चालेल पण वेळच्या वेळी प्रगतीची कामे निट करा. गुजरातच्या भ्रष्टाचार रहित (किंवा न्युनतम) विकासाने आशेचा किरण दाखविला आहे.

आपल्या विरोधी विचार मांडणार्‍या सार्‍यांना सरसकट पेड न्यूज च्या कॅटेगरीत ढकललेले बघून
"आपला तो बाळ्या दुसर्‍याचा कार्टा" या धर्तीवर नवी म्हण सुचली "आपला तो राष्ट्रवाद, दुसर्‍याची ती पेड न्यूज." Happy

येस कोणी काहीही म्हणा, राष्ट्रवाद म्हणा, पेड न्युज म्हणा किंवा म्हणू नका पण गुजरात सारखा विकास आणि भ्रष्टाचार व अतिरेकी कारवायांना आळा घालुन दाखवा बाकीच्या राज्यांमधे.

<<या पार्श्वभुमीवर गुजराथमधल्या विचारी आणि कोणत्याही धार्मिक टोकाचा विचार न करणार्‍या लोकांनी दंगलीतली मोदींनी घेतलेली भुमीका उशिराने का होईना पटलेली असल्याचे दिसते.>> : मोदींनी दंगलीच्या काळात नक्की काय भूमिका घेतली होती ते स्पष्ट शब्दांत लिहाल का? तुम्ही सुचविलेली भूमिका घेतल्याचे मोदी मान्य करतील का? अटलबिहारी राजधर्म म्हणाले होते तो काय होता?

<< अश्या परिस्थीतीत मोदींनी जर पध्द्तशीर दंगलींची केंद्रे उध्वस्त करण्याचे ठरवुन दंगलीला दिशा ( समजा ) दिली असेल तर कितीही वेदनादायक झाली असली तरी ही राजकिय शस्त्रक्रिया मानायला हवी.>> hear hear. अशा राजकीय शस्त्रक्रिया भारतभर व्हायला हव्यात असं तुम्हीच याआधी मायबोलीवर लिहिलेले आहे. मोदी आणि भाजप अशी उघड भूमिका का नाही घेत?

मोदींने उर्दू वृत्तपत्रांत आपला उपवास हा रोजा असल्याच्या जाहिराती दिल्यात. रोजा हा फक्त सच्चा मुसलमानच करू शकतो ना?उपासाला उर्दूत फाका म्हणतात (इति आजचा इंडियन एक्स्प्रेस)

मोदींने उर्दू वृत्तपत्रांत आपला उपवास हा रोजा असल्याच्या जाहिराती दिल्यात. रोजा हा फक्त सच्चा मुसलमानच करू शकतो ना?उपासाला उर्दूत फाका म्हणतात (इति आजचा इंडियन एक्स्प्रेस) निव्वळ शब्दछल आणखी काय ?

>>> येस कोणी काहीही म्हणा, राष्ट्रवाद म्हणा, पेड न्युज म्हणा किंवा म्हणू नका पण गुजरात सारखा विकास आणि भ्रष्टाचार व अतिरेकी कारवायांना आळा घालुन दाखवा बाकीच्या राज्यांमधे.

अनुमोदन

नितीनचंद्र,

तुमचं ब्रह्मदेशातल्या रोहिंग्या मुस्लीमांबद्दलचं निरीक्षण एकदम समर्पक आहे. हाच साचा (पॅटर्न) भारतात लागू केला पाहिजे.

गोध्रा स्थानकात २००० मुस्लिम शस्त्रसज्ज अवस्थेत कोणी दाखल केले? त्यांना करसेवकांचा नेमका डबा कसा सापडला? कोणी याची चौकशी केलीये?

आ.न.,
-गा.पै.

आपल्याकडे मुसलमानांची चाटायची सवयच लागलीये.पार अगदी" देशातल्या साधनांवर त्यांचा पहिला हक्क आहे" इतके कबुल करायचीसुद्धा मजल गेली. मोदींसारख्या नेत्यांची आजच्या देशाला फार गरज आहे.

निष्पाप हिंदु मेले तर मरुदे पण मुसलमानाला जरा धक्का लागला की मानवतावाद्यांची बोंबाबोंब सुरु!!

संपुर्ण लेखास अनुमोदन Happy
(>>>> "तुम्हाला किती मिळाले तुमच्या या पेड न्यूज साठी?" <<<<
@ इब्लिस, हे अनुमोदन द्यायलादेखिल मला काहीही मिळालेले नाही प्लिजच नोटच! Proud
बाकी तुम्ही काय? सावरकरादिक धिन्ग्रा/भगतसिन्हादिक क्रान्तिकारकान्नाही तेव्हा "किती मिळाले होते" याची शोधपत्रकारिता करु शकाल. येवढच काय, सैन्यदलातील शिपायान्ना देखिल "पगार" मिळतो म्हणून "ते लढुन मरण्यास" तयार होतात असे अक्कलेल्चे तारे इथे मायबोलीवरच मागे कुणीतरी, व बाह्य जगात अनेकान्नी तोडलेले मी पाहिलेच आहे, अन म्हणूनच, मी इथे काही एक लिहीतो त्याबद्दल मला काही मिळत नाही/कुणी देत नाहीये असे स्पष्टीकरण देणे आवश्यक वाटले.. आता यावर पुन्हा निरर्गल कुत्सितपणे काय रे लिम्ब्या तू काय सावरकरादी क्रान्तिकारकान्बरोबर स्वतःची तुलना करतोस का म्हणून विचारु नका! Proud खर तर न विचारतातच तुम्हाला उत्तर आधीच मिळते आहे, फक्त जाहिर वदवुन घ्यायची नस्ती उठाठेवीचे कष्टही करु नका, काय?
बाकि वरल्या यादीत मी नथुरामचे नाव घालायचे विसरलो होतो ते घालुन घेतलेत तरी चालेल, बर का! Wink )

अहो ह्या पेड न्यूज तर काहीच नाहीत. सर्वात भारी पेड न्यूज म्हणजे लोकांच्या नकळत गोष्टी लोकांच्या डोक्यात घुसवणे. सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे राहुल गांधी. काँग्रेसने मिडियाला हाताशी धरून गेल्या कित्येक वर्षात राहुलला चढवत चढवत आता पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आणले आहे. सुरूवातीला 'युवराज, युवराज' करत, मग 'युथ आयकॉन', मग त्याचे कुठकुठले शेतकर्‍यांना भेटण्याचे नाटकी दौरे ह्यांची विनाकारण प्रसिद्धी करत, कुठकुठले फडतूस पोल आणि त्यात राहुलची लोकप्रियता वगैरे सांगत, कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ह्या माणसाला आता भावी पंतप्रधान म्हणविण्यापर्यंत मजल मारली आहे.

मोदींना खरंच पंतप्रधानपदाची संधी मिळाली तर ते काही सकारात्मक बदल घडवून का ही उत्सुकता असेल. सध्याचं सरकार म्हणजे अत्यंत भंपक आहे. सर्व बाबतीत मिळमिळीत आणि लेचेपेचे धोरण. मग ते दहशतवाद असो, नक्षलवाद असो, भयंकर देशद्रोही गुन्हे केलेल्यांना शिक्षा असो, चीनची घुसखोरी असो किंवा अण्णा हजारेंचं उपोषण असो. सगळीकडे एकच धोरण - काहीही न करणे.

लोकांची मानसिकता जोपर्यंत सुधारत नाही किंवा कोणी जोरदार हुकुमशहा येत नाही तोवर काही अपेक्षा करण्यात अर्थ नाही. मला खात्री आहे की कितीही डोके फोडले तरी तो गांधी घराण्याचा वारस कसा का असेना तरी सहज पंतप्रधान होईल. कारण बाकीची कॉन्ग्रेसमधली मंडळी आहेत त्यांना कोणाच्यातरी आडून त्यांची भलीबुरी कृत्ये चालू ठेवायची असतात. असो सद्ध्या तरी तुका म्हणे उगी रहावे जे जे होईल ते पहावे.

इब्लिस | 18 September, 2011 - 02:27
नितिनचंद्र,
तुम्हाला किती मिळाले तुमच्या या पेड न्यूज साठी?

मा. इब्लीस,

या लेखाचा उद्देश मोदींची तळी उचलणे नव्हता तर ज्या काही अपप्रव्रुत्ती दिसत आहेत त्याचा समाचार घेणे होता.

ज्या अर्थी डॉ. विनायक सेन यांची बाजु तात्विकपणे उचलणारा एकही प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही त्यावरुन तरी लेख लिहीण्याचा उद्देश सफल झाला असावा. तुमच्या सारख्यांचा शालजोडीतुन आहेर मिळाला आणि बाकीच्यांनी माझ्या विचारांचे समर्थ्नन केले इतकेच मिळणे अपेक्षित होते.

हो, मी एकेकाळी भाजपाचा समर्थक होतो. पण आता माझी मत बदलली आहेत. जर गुरु अफजल आणि कसाब हे सत्ताधारी झाल्यास मोदींपेक्षा उत्कृष्ट काम करु शकणार असतील तर मी त्यांना समर्थन देईन.
हा देश पुन्हा वैभवाला जावा इतकच स्वप्न पहाणारे अनेक सामान्य या देशात आहेत त्या पैकी मी एक.

शेख अब्दुल रझाक बियाबानी आणि जैतुनुबी महाराज या सारख्या मुसलमानांच्या पायी नतमस्तक होणारा पण एके काळी रामजन्मभुमी साठी स्वतःला विसरुन आंदोलनात स्वतःला झोकुन देणारा मी आहे.

मायबोली हे व्यासपीठ विचारांचे आदान प्रदान करणारे असावे. आपणही या विचारांशी सहमत व्हावे.

मयेकर तुमचा (आणि कुळकर्णींचां) पण त्रागा नेमका काय आहे? ते कधीच कळाले नाही.

१. गुजराथ मध्ये सामाजिक बांधीलकी महाराष्टापेक्षा जास्त आहे की कमी? इलेकश्न मधील व्होटींग पण मुसलमान मते मोदींना मिळालेली दाखवते ते चुक आहे असे तुमचे म्हणने आहे का?

२.सर्वात प्रगत राज्य कोणते? काय उत्तर मिळते. गेल्या दोन महिन्यात दोन मोठ्या अ‍ॅटो कंपन्या गुजराथला गेल्या. (हे नॅनो बद्दल बोलत नाही) तर फोर्ड, सुझूकी अशा कंपन्यांबद्दल बोलत आहे.

३.तुम्हाला काय मान्य नाही. मोदी आणि भाजपा? की गुजराथ मध्ये प्रगतीच नाही आणि जिवनस्तर महाराष्टापेक्षा (किंबहूना देशात सर्वात चांगला) हे मान्य नाही?

४. गुजराथ मध्ये किती करप्शन आहे? महाराष्ट, उत्तरप्रदेश (रादर पूर्ण देश) पेक्षा जास्त की अगदीच निग्लीजिबल?

जरा सविस्तर एकदा काय ते मत मांडता का? म्हणजे नेमके काय चुकते (मोदींचे) आहे ते कळेल. जरा विचार करून लिहा म्हणजे मलाही नेमके माझे काय चुकते आहे का? ते मला कळेल. (गुजरातला प्रगत राज्य माणन्यात).

नसेल तर गुजराथ ९० च्या दशकातला आणि २०१० च्या दशकातला ह्यातील फरक दाखवून मोदींना (जर श्रेय असेलच) तर श्रेय देणार का?

आणि हो ह्यात भाजपा मध्ये न आणता मोदी आणि त्यांचे राज्य (प्रगती किंवा तुम्ही म्हणत असाल तर अधोगती) असे लिहा, म्हणजे पक्षिय राजकारणापरे जाऊ पाहणार्‍या मला नेमके गुजराथ कुठे चुकत आहे ते कळेल. ते कसे बरोबर आहेत हे मी इतरांनी इतर ५० बाफवर लिहिले पण दरवेळी त्याला भगवा रंग इतरांनी लावला, तुम्ही रंग न लावता सांगा आम्ही वाचू.

मोदींचे उपोषण सद्भावनेसाठी होते. त्यामुळे भ्रष्टाचार, प्रगती इ. मुद्दे या उपोषणाच्या संदर्भात गैरलागू आहेत.
मी वर विचारलेल्या
<<या पार्श्वभुमीवर गुजराथमधल्या विचारी आणि कोणत्याही धार्मिक टोकाचा विचार न करणार्‍या लोकांनी दंगलीतली मोदींनी घेतलेली भुमीका उशिराने का होईना पटलेली असल्याचे दिसते.>> : मोदींनी दंगलीच्या काळात नक्की काय भूमिका घेतली होती ते स्पष्ट शब्दांत लिहाल का? तुम्ही सुचविलेली भूमिका घेतल्याचे मोदी मान्य करतील का? अटलबिहारी राजधर्म म्हणाले होते तो काय होता?

<< अश्या परिस्थीतीत मोदींनी जर पध्द्तशीर दंगलींची केंद्रे उध्वस्त करण्याचे ठरवुन दंगलीला दिशा ( समजा ) दिली असेल तर कितीही वेदनादायक झाली असली तरी ही राजकिय शस्त्रक्रिया मानायला हवी.>> hear hear. अशा राजकीय शस्त्रक्रिया भारतभर व्हायला हव्यात असं तुम्हीच याआधी मायबोलीवर लिहिलेले आहे. मोदी आणि भाजप अशी उघड भूमिका का नाही घेत?

या प्रश्नांची उत्तरे दिली तर मला वेगळे काही लिहायची गरज नाही.
२००२ च्या दंगलीत प्रशासन, पोलिस आणि नंतरच्या काळात न्याययंत्रणा यांनी घेतलेली भूमिका पक्षपाती होती. याचे उत्तरदायित्व कोण स्वीकारणार?
भाजपचा मित्रपक्ष असलेल्या जनता दलाने (नीतिश कुमार) मोदींच्या उपवासाबद्दल काय म्हटलंय?
२००२च्या दंगापीडितांना उपवासादरम्यान अटकाव करण्यात आला होता, तर या दंग्यातले अरोपी मात्र उपवासस्थळी का होते?

>>>
नितीनचंद्र | 19 September, 2011 - 19:13 नवीन

इब्लिस | 18 September, 2011 - 02:27
नितिनचंद्र,
तुम्हाला किती मिळाले तुमच्या या पेड न्यूज साठी?

मा. इब्लीस,

या लेखाचा उद्देश मोदींची तळी उचलणे नव्हता तर ज्या काही अपप्रव्रुत्ती दिसत आहेत त्याचा समाचार घेणे होता.

ज्या अर्थी डॉ. विनायक सेन यांची बाजु तात्विकपणे उचलणारा एकही प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही त्यावरुन तरी लेख लिहीण्याचा उद्देश सफल झाला असावा. तुमच्या सारख्यांचा शालजोडीतुन आहेर मिळाला आणि बाकीच्यांनी माझ्या विचारांचे समर्थ्नन केले इतकेच मिळणे अपेक्षित होते.

हो, मी एकेकाळी भाजपाचा समर्थक होतो. पण आता माझी मत बदलली आहेत. जर गुरु अफजल आणि कसाब हे सत्ताधारी झाल्यास मोदींपेक्षा उत्कृष्ट काम करु शकणार असतील तर मी त्यांना समर्थन देईन.
हा देश पुन्हा वैभवाला जावा इतकच स्वप्न पहाणारे अनेक सामान्य या देशात आहेत त्या पैकी मी एक.

शेख अब्दुल रझाक बियाबानी आणि जैतुनुबी महाराज या सारख्या मुसलमानांच्या पायी नतमस्तक होणारा पण एके काळी रामजन्मभुमी साठी स्वतःला विसरुन आंदोलनात स्वतःला झोकुन देणारा मी आहे.

मायबोली हे व्यासपीठ विचारांचे आदान प्रदान करणारे असावे. आपणही या विचारांशी सहमत व्हावे.
>>>
शेवटची ओळ १००% सहमत.
बाकी गोष्टी सवडीने बोलेन. जर मोदींची तळी उचलणे उद्देश नव्हता, तर बहुधा मला माझा चष्मा बदलून घ्यायला झालाय बहुतेक.

मोदींचे उपोषण - डॉ. विनायक सेन आणि पेड न्युज
नितीनचंद्र | 18 September, 2011 - 10:59
राजकीय नेत्याने बदल घडवणे अपेक्षित असते. त्याची जबाबदारी स्विकारणे हे ही अपेक्षीत असते. घडलेल्या चुकांची माफ़ी मागणे अपेक्षीत असते. आणी बाणी लादली म्हणुन एकदा कै. इंदीरा गांधींनी सत्तेवर आल्यावर दिलगीरी व्यक्त केली आणि त्यावरची टीका संपली. ३५०० शिखांच्या नरसंहाराचे कारण झालेल्या पक्षाच्या पंतप्रधानाने लोकसभेत माफ़ी मागीतली हे सुध्दा जनतेला मानवले पण नरेंद्र मोदींनी आत्मशुध्दी करणे हे तथाकथीत मानव अधिकार किंवा तत्सम पुळका आलेल्या पेड लोकांना मानवु नये याचा अर्थ ते सामाजीक कार्यकर्ते नसुन पेड न्युज पसवरणारे पोटार्थी आहेत हे विचार करणाया व्यक्तीला समजल्याशिवाय रहाणार नाही.

महोदय,
मा. मोदी यांनी कुठे अन कधी म्हटले, की हे उपोषण त्या दंगलीची दिलगिरी म्हणून आहे?

>>> २००२ च्या दंगलीत प्रशासन, पोलिस आणि नंतरच्या काळात न्याययंत्रणा यांनी घेतलेली भूमिका पक्षपाती होती. याचे उत्तरदायित्व कोण स्वीकारणार?

२००२ च्या दंगलीत काँग्रेस व मित्रपक्ष, तद्दन खोटा अहवाल देणारे बॅनर्जी आयोगाचे न्यायाधीश बॅनर्जी, प्रसारमाध्यमे व मानवी हक्कांचे ढोंग करणारे तथाकथित मानवतावादी निधर्मांध यांची भूमिका सुध्दा पक्षपातीच होती. त्याचे उत्तरदायित्व कोण स्वीकारणार?

इब्लीसजी,

एकाच प्रश्नाचे उत्तर द्या ?

३५०० शिखांच्या हत्याकांडासाठी "तुमचा राजधर्म कोठे होता" हा प्रश्न कोणी राजीव गांधींना का विचारला नाही ?

१) ४०० खासदारांच्या संमतीने पंतप्रधान झाले म्हणुन ?
२) ते काँग्रेसचे पंतप्रधान होते म्हणुन ?
३) शिखांची हत्या ही किरकोळ बाब होती म्हणुन ?

ह्या एका कृतीमुळे पुढे शिख दशहतवाद अनेक वर्षे खदखदत राहिला.

हे संपावे असे आपल्या पैकी प्रत्येकाला वाटले असेलच ना ? या प्रकरणामुळे सातत्याने टार्गेट झालेल्या मोदींना कधीतरी आपल्या सारख्यांनी माफ करावे असे वाटले असेल ना ?

मला कधी कधी आश्चर्य वाटते की मोदींचे राजकीय विरोधक सोडता गुजराथ मधला एकही लेखक, सामाजीक कार्यकर्ता किंवा अन्य या बाबत का बोलत नाही ?

बोलतात ते सर्व गुजराथच्या बाहेरचे, ज्यांनी तत्कालीन परिस्थीतीची झळ सोसली नाही असे लोक. डॉ. विनायक सेन काय संत आहेत ? कोणतरी नक्षलवादीच. त्यांना तुरुंगवास काय झाला की लागले गल्लोगल्ली फिरुन भाषण द्यायला.

आजही पुण्यात कम्युनिस्ट विचारांचे १ हजार कार्येकर्ते सापडतील. सगळे च्या सगळे झाडुन त्या सभेला आले म्हणजे हा काही जनतेचा विचार होत नाही.

मी अजुनही म्हणतो की मोदींवर होणारी टीका तत्सम आरोप असलेल्या कितीतरी राजकीय नेत्यांच्या मानाने खुपच जास्त आहे. ती स्थानीक स्तरावर न होता देशभर होते म्हणुन ती पेड न्युज असण्याची शक्यता जास्त वाटते.

मोदींसारख्या राजकीय नेत्याने पंतप्रधान पदाचे दावेदार होण्यात काय गैर आहे ? यावर आजच्या मटाने अग्रलेखाने टिका करण्यासारखे काय आहे ? अजुन त्यांची उमेदवारी डिक्लयर व्हायला वेळ आहे तोवर त्यांना नालायक ठरवावे याला पेड न्युज नाही तर काय म्हणावे ?

महोदय,
मा. मोदी यांनी कुठे अन कधी म्हटले, की हे उपोषण त्या दंगलीची दिलगिरी म्हणून आहे?
पण सद्भावना निर्माण व्हावी या उद्देशाने केले आहे हे ही आजच्या पेपरात छापुन आले आहे.

राहुल गांधींनी एक घमेल उचलल की बातमी ( युवा नेता ) आणि मोदींनी उपोषण केल की तो राजकीय स्टंट हा न्याय नाही.

>>अजुन त्यांची उमेदवारी डिक्लयर व्हायला वेळ आहे तोवर त्यांना नालायक ठरवावे याला पेड न्युज नाही तर काय म्हणावे ?
अहो बरोबर आहे मोदीसारखा माणुस जर पंतप्रधान झाला तर देश सुधारेल, सुराज्य येईल आणि सद्ध्या जे सत्तेवर आहेत त्यांना फार मनमानी करता येणार नाही तसेच भविष्यात फार कोणी विचारणार नाही. त्यामुळे वेळीच मिडिया बिडियाला हाताशी धरून चांगल्या लोकांना उमेदवारी पर्यंत पोहोचूच दिले नाही की झाले.
मोदी आणि दंगल या संदर्भात माझे म्हणणे असे आहे की, अरे झाली एक दंगल, नसेल आणली आटोक्यात, दिले असेल समर्थन, पण बाकीचे राजकारणी काय संत महात्मे आहेत की त्यांनी त्यांच्या मतदारसंघात गुजरात सारखे सुराज्य आणले आहे ? (यात मी पक्षाचा उल्लेख करत नाहीये) तसे म्हणाल तर जगात कोणीच सर्वगुणसंपन्न नसतो, अगदी देव देखील नाही.

महोदय,
आपण राजीव/राहूल गांधी बिनडोक आहेत, या बद्दल चर्चा करित आहोत की मा. मोदी महान आहेत या बद्दल?
मी एक साधा प्रश्न विचारला, तुमच्या, (endorsed by people that its "अभ्यासपुर्ण") लेखाच्या आधाराने,
की मा. मोदी यांनी असे कुठे अन कधी म्हटले?
हे बघा,
out of context, कोणाचीही कोणतीही क्रीया घाण अथवा उदत्त सिद्ध करता येते.
उदा. >>
बोलतात ते सर्व गुजराथच्या बाहेरचे, ज्यांनी तत्कालीन परिस्थीतीची झळ सोसली नाही असे लोक.
महोदय,
कॉन्टेक्स्ट सह विचारतो,
आपण गुजरातच्या कोणत्या भागात त्या दंगलींदरम्यान रहात होतात? आपण परिस्थीतीची कोणती झळ सोसली?
महोदय,

आपणही गुजराथे बाहेर राहता!!!

आपण गुजरातेत राहून तथाकथित दंगल "सोसली" असेल, तर मी मूर्ख आहे.

पण स्वतःस विचारा? आपण राहता कुठे? गुजराथ कुठे? या गुजराथे ने तुमच्या महाराष्ट्राच्या विकासास काय खीळ कशी घातली? सरदार सरोवराचे बॅकवॉटर तुमच्या महाराष्ट्राची मोठ्ठी नैसर्गिक जंगल संपदा डुबवून चुकली, किति वीज मिळाली तुम्हाला? तुमच्या राज्यातून किती धंदे अन जॉब्ज चोरले गुजरातने? नॅनो चा प्रकल्प तिथे का गेला? कुणी अन कोण महाराष्ट्राची वीजनिर्मिती 'समुद्रात' बुडवली अन मग मागल्या दाराने परत एन्रॉन ची वीज तिप्प्ट दराने विकत घेतली?महाराष्ट्राच्या नद्यांचे पाणी दक्षिण भारतास जाण्या पासून रो़ख्ण्यासाठी कुणी काय केले? कोणत्या खोरे प्रक्ल्पाचे रोखे सरकारने विकले तेव्हा सत्तेत कोण होते? अहो, नवे सोडा, त्यासाठी चश्मा लाऊन इतिहास वाचावा लागतो. मुंबइ च्या गुजराथ्यांचे वागणे कसे? मोरारजींनी संयुक्त महाराष्ट्राचे काय केले? मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र याचा अर्थ काय? आणंद अन मालेगाव चे मुंबै पासूनचे अंतर किती? आईशपथ, या सर्व प्रश्नांची उत्तरे जर मनापासून शोधली ना? तर स्वतः ची लाज वाटते.

तेही सोडा!
कुणा मानवी स्त्री वर// अमानवी जनावर स्त्रीवर. लहान मुलावर - शस्त्र उगारतांना, मग ती हिंदू असो वा मुसलमान, की केवळ जनावर असो, द्वेषा पोटी जीव घेणे. कोंबडी कापून पहा कधी. कसे वाटेल? विचार करा मनात. माणूस असल्याची लाज नाही वाटत?
डब्बा जाळणारे जितके राक्षस, तितके च नंतरचे ही. अहो! माणूस असणे विसरू नका. कसला हिंदू मुसलमान रंग देताहात?

i have an axiom in life: "everybody is correct in his/her own point of view"
तुम्ही तुमच्या दॄष्टिने बरोबर आहत. मी तुमच्या दॄष्टीकोनावर टीका नाही केली.
मी फक्त जळता ड्ब्बा, एक लहान मूल. अन एक माथेफिरुंची चित्रं जी कुणा बिन्डोकाला गूगल केल्यास सापडतील ती पोस्ट केली.
मायबोलीच्या अ‍ॅडमिन ने ती डिलीट केलीत. त्यांची इच्छा येथे सार्वभौम आहे. त्यांनी योग्य च केले. again my axiom.

या बीबी वर येणार्‍यास दुसरी बाजू ही समजावी, या करता पोस्ट टाकली. तुम्हास/त्यांस "मायबोली हे व्यासपीठ विचारांचे आदान प्रदान करणारे असावे. आपणही या विचारांशी सहमत व्हावे." हे मान्य नसेल, तर तसे असो.
मी कोण?
इंटरनेट वापरणारा १३० कोटी भारतियांपैकी मी एक... पण ते झब्बू होते ना? ते २-३ फोटो नक्कीच त्रासदायक होते.
कुणी कितीही म्हटले,
-->
"सुनिर | 18 September, 2011 - 13:28

@ईब्लिस
"तुम्हाला किती मिळाले तुमच्या या पेड न्यूज साठी?"
असे लिहून तुमची मानसिकता काय आहे सगळ्यांना समजले असेलच. (१-२ फोटो दाखवून फरक पडत नाही हे तुम्हाला समजणे जरूर आहे)."
काय फरक पडला फोटो दाखवून तो समजला डिलीट झाले तेंव्हांच!

कोणी "मोदी - eye opener" नामक पिडिएफ फाईल वाचली आहे का ? माणिक मुंढे नावाच्या व्यक्तीने लिहिलेला लेख आहे. इकडे फाईल कशी अपलोड करता येईल ?

Pages