आमंत्रण लेखनस्पर्धा - "आवताण ... लै वरताण" - कविता नवरे

Submitted by कविन on 7 September, 2011 - 03:46

॥श्री सह्याद्री प्रसन्न ॥
॥श्री हरिश्चंद्रगड प्रसन्न॥
॥श्री कळसुबाई प्रसन्न॥

चि. दगडुशेठ उडीवाले (ट्रेकवाले मावळे ह्यांचे जेष्ठ्य ट्रेकर, मु.पो. भटकंती कट्टा) ह्यांचे "विवाह उडी" प्रित्यर्थ केळवण सोहळा येत्या १० सप्टेंबर रोजी करण्याचे योजिले आहे. तरी समस्त मित्रमंडळींनी "फुकट तिथे फॅमिली सकट" ह्या नियमाचे पालन करुन सहकुटुंब ह्या सोहळ्यास उपस्थित राहून संसार गड सर करण्यास निघालेल्या ह्या मावळ्यास आशिर्वाद द्यावेत ही विनंती.

आमंत्रण पत्रिका मिळताच लवकरात लवकर नाव नोंदणी करावी, त्यानुसार हॉल पर्यंतचे वाहन ठरवण्यास मदत होईल. नाव नोंदणी करणाऱ्या सर्वांना लवकरच गाडी आणि वेळ कळविण्यात येईल.

ठिकाण: हरिश्चंद्र गड नळीच्या मार्गे

जाण्याचा मार्ग आणि केळवणाच्या हॉलचे फोटो सोयीसाठी सोबत जोडत आहोत.
map.gifrajmarg 2.jpgResize of marg 1.jpgHarishchandra5.jpg

(इथे आशिर्वाद घेऊन खानपान सेवेला सुरुवात होईल)

कुमार दगडूशेठ उडीवाले ह्यांनी त्यांच्या लग्नाचे कार्यालय बहुमताने निवडण्याचे ठरविले आहे त्यानुसार खाली दिलेल्या दुव्यामधून एक कार्यालय निवडावे ही आपणास कळकळीची विनंती.

http://www.maayboli.com/node/2213

केळवणा प्रित्यर्थचे प्रीति भोजन झाल्यावर आपले माननिय फोटोग्राफर श्रीयुत जिस्पीसाहेब हे प्रत्येकाचे एक उडी फोटो घेतील आणि कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहिर करतील.

कार्याची शोभा वाढवण्यास अगत्याचे येणे करावे.

आपले नम्र,
ट्रेकर मावळे
(मु.पो. भटकंती कट्टा)

आमच्या दगडू मामाच्या केळवणाला यायचं हं!
(पिंकी, टिंकी, बंटी, मुन्नी, बबली, पगली, झुमरु, डमरु)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमंत्रण पत्रिकेत शेवटी गणेशाने नाच करताना सुर्योदयासमोर उडी मारली आहे असा फोटो हवा.

धम्माल लिहिलंय Lol

आमंत्रण पत्रिकेत शेवटी गणेशाने नाच करताना सुर्योदयासमोर उडी मारली आहे असा फोटो हवा.
>>>> Lol

सगळे शालू व सुट घालून चढतायत उतरतायत असं डोळ्यासमोर आलं Biggrin

Pages