शीघ्रकाव्य - चारोळ्यांच्या आरोळ्या : विषय ५ - "खाऊच्या आरोळ्या"

Submitted by संयोजक on 3 September, 2011 - 09:13

आधीच्या चारोळीत आपण आपल्या नावडत्या विषयावर आरोळ्या ठोकल्यात ना?

मग आता इथे संधी आहे ती आपल्या आवडत्या विषयावर आरोळ्या ठोकायला. जेवण हा विषय आपल्या सगळ्यांच्या आवडीचा. पण त्यातल्या त्यातही काही जास्त आवडणारे पदार्थ असतात. कोणाला पावभाजी आवडते, कोणाला श्रीखंड, तर कोणाला मॅगी!!!

कुरकुरीत काकड्या, लालभडक टोमॅटो
ताजे, लुसलुशीत ब्रेडचे स्लाईस
बटर अन चटणी चव वाढवाया
माझं व्हेज सँडविच व्हेरी नाईस!

काही का आवडेना, आपल्या आवडत्या पदार्थांची आठवण काढून आरोळ्या ठोकणार ना???

श्रीबालाजीचीसासू दिसताच
हसू येई चेहर्‍यावर
चारोळीला विषय तोंपासु
तर ताबा राहील का तोंडावर?

चला तर मंडळी, करा सुरूवात भोजनाला ......

******************************************

सर्वसाधारण नियम:

१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन चारोळ्या देऊ शकत नाही.

******************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मा>>>>मी.................. तुझ्या काव्यशक्तीला अगदी बहार आल्येय :))))))))))))

भाजले कणीस मक्याचे खरपूस
त्यावर तिखट-मीठ-मिरपुडीची आरास
चुळ्ळं लिंबू रस पिळियला
भुट्टा खाऊन जीव तृप्त जाहला

बासमती तांदूळ, चमचमीत मटण
एकत्र करून बंद केलं झाकण
दरवळ सुटताच, पंगत जमली
अन बघताबघता 'बिर्याणी' ची 'चटणी' झाली .....

मामी Proud

आंबेमोहोर तांदळाचा गरमागरम भात
त्यावर वाढलं पिवळधम्म वरण
तुपाची धरली धार, मीठाचं बोट, लिंबाचा रस
डोळे मिटून नमस्कार करून सुरू करावे उदरभरण! Proud

सुंदर ते ध्यान, बसे कोचावरी
नजर टिव्हीवरी, ठेवोनिया
निरंतर पॉपकॉर्न, हातामधे कोला
रीमोटचा लळा, लागियेला

बटाटे, टमाटे, फणस आणि केळी
प्रत्येक चिप्सची चव आगळी
नुसत्याच खा, बकाणा भरा
रवंथ कुरमुरीत आनंद साजरा!

केळ्याच्या फोडीवर

दूध-साखरेची पखरण

झाले तयार सुंदर

केळीचे शिकरण

आल्याच्या किसात लिंबाचा रस
शेंदेलोण, पादेलोण घालून मिसळा जरासं
तयार होईल मस्त चविष्ट पाचक
गणेशोत्सवाच्या खादाडीनंतर फार फार आवश्यक!! Wink

Pages