छाया-गीत झब्बू - 'दे ट्टाळी' - विषय ५ : "अकेला हुं मै"

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 09:35

"दे ट्टाळी"

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू... पण यंदा येत आहे एका नव्या स्वरूपात!!

मायबोलीकरांची प्रकाशचित्र आणि संगीत ह्याची खास आवड विचारात घेऊन यंदा आपण खेळणार आहोत प्रकाशचित्र-संगीत झब्बू अर्थात "छाया - गीत".

दर एक दिवसाआड एक नवा विषय दिला जाईल. त्या विषयावर आपल्याला प्रकाशचित्र टाकायची आहेत. पण अट अशी आहे की प्रकाशचित्र टाकताना त्याच विषयावर आधारीत एक गीत देखिल लिहायचे आहे.

चला तर मग द्या ट्टाळी आणि खेळा नवा खेळ..... "छाया - गीत".

************************************************************************

सर्वसाधारण नियमः

१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. दिलेल्या विषयावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र आणि एकच गाणे टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे. त्याचबरोबर त्या विषयाशी सुसंगत एखादे गाणे/कडवे/गाण्याच्या काही ओळी लिहावे.
७. गाणी ही दूरदर्शन मालिकांचे शीर्षक गीते, चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग, कविता, चारोळी इ कुठलीही चालतील.
८. गाणे माहित नसल्यास विषयाशी सुसंगत शीर्षक लिहावे.
९. शीर्षक शक्यतो चित्रपटाचे/नाटकाचे/दूरदर्शन मालिकेचे नांव असावे.
१०.गाणे/शीर्षक हे मराठी किंवा हिंदी असावे.
११. गाणे/शीर्षक आठवणे सुकर जावे म्हणून संयोजक प्रत्येक विषयासोबत काही कळीचे शब्द आपल्याला सुचवतील.
१२. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

टीपः

गाणे/शीर्षक हे विषयाशी सुसंगत असावे. प्रचि ला समर्पक असणे आवश्यक नाही.

आपण काढलेले प्रचि कुठे घेतले आहे ती जागा, त्याबद्दल शक्य असल्यास थोडक्यात माहिती किंवा प्रचिशी निगडीत एखादी आठवण लिहु शकता.

************************************************************************


"छाया-गीत" : विषय ५: "अकेला हुं मै..."

hatake_0.jpgप्रकाशचित्रः इथे अपेक्षित आहे ऑड वन आऊट...सगळ्यांपेक्षा वेगळा.. जरा हटके...एकटा...निराळा...उठुन दिसणारा...

उदा. तिखट पदार्थांनी सजलेल्या ताटामधली एकमेव गोडाची वाटी, बर्‍याच मोटरबाईक्सच्या मधे पार्क केलेली एकटी सायकल, सगळ्यांपासुन दूर जाऊन बसलेला एकटा/एकटी, माळरानावर उगवलेले एकटे रोपटे, बैठ्या घरांच्या रांगेत एकच दुमजली घर, मेंढ्यांच्या कळपामधे एकटाच कुत्रा, गृपमधे टोपी घातलेला एकच मित्र, जीन्स घातलेल्या मैत्रिणींच्या घोळक्यात एकच पंजाबी ड्रेस घातलेली मैत्रिण, आकाशात दिसणारा एकमेव ढगं...इ इ अशी प्रकाशचित्रे.

गाणे - कळीचे शब्द: वेगळा, निराळा, हटेला, अलग, जुदा, अकेला, एकटा इ इ उदा. "...हा माझा मार्ग एकला..."

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झुळूक आणखी एक
आणखी एक फूल फुलले..

हिरव्यागार पानांच्या झुबक्यातलं एकुलतं एक पांढरं फूल...
लिबर्टी स्टेट पार्क च्या बस स्टॉपजवळ काढलेलं प्रचि.

हेहे सापडला जागूस्पेशल फोटो Lol

पाण्यात पाहती का माझे मलाच डोळे
प्रतिबिंब हे कुणाचे लावण्य हे निराळे.

अनेकांच्या गर्दीत हा एकटा, वेगळा पण.. सर्वशक्तिशाली !
(कचनर(?) सिटी, जबलपुर चा भव्य टोलेजंग महादेव)

shankar.jpg
तुझ्या पायरीशी कुणी सानथोर नाही
साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई..

सशल मस्त मस्त .. फार सुंदर!!!
जागुले.. तुझा..म्हंजे तू टाकलेला फोटू महातोंपासु Proud

दीपांजली.. जबलपूर ला कुठेशी आहे ही मूर्ती??

लोकहो आणि संयोजक मंडळी, मी दिलेले बहुतांश फोटो माझ्या नवर्‍याने काढलेले आहेत .. (म्हणजे माझं ते त्याचं आणि त्याचं ते माझं ह्या नात्याने फोटो दोघांचेही) .. पण हे नियमांत बसणारं नसेल तर माझे सर्व फोटो बाद! Happy

ह्या चुकीबद्दल क्षमस्व!

सशल,
अल्हाद पण आहे ना मायबोलीकर, मग चालून जाईल.
वर्षु,
हे प्रायव्हेट मंदिर आहे एका उच्चभ्रु कॉलनीचं, (क्च्नर सिटी बहुदा कॉलनीचं नाव आहे)अ‍ॅड्रेस नाही सांगु शकणार , मला काहीच माहित नाही तिथलं.
आमच्या हॉटेल च्या रेसिपेशनिस्ट नी सजेस्ट केलं म्हणून गेलो..अति सुंदर आहे.

माझ्या MAC कलर्ड कॉस्मॅटिक कलेक्शन मधे विराजमान एक अकेला ऑड वन आउट Gucci परफ्युम

maku.jpg
मुझे रंग दे ,मुझे रंग दे मुझे रंग दे ,रंग दे ,मुझे रंग दे
रंग दे हां रंग दे मुझे अपने प्रीत विच रंग दे..

एकला नयनाला विषय तो झाला
सकलहि स्थानी अवघा भरला, न बघत इतरा डोळा
अवयव सगळे नयनी जमले, यदुवर दिसता मजला

Pages