मुलान्च्या आभ्यासातील अडचणी.

Submitted by तोषवी on 31 January, 2011 - 09:59

लहान मुलाना शाळेत किवा घरी आभ्यास करताना येणार्‍या अडचणी विषयी धागा.

माझी मुलगी वय साडे चार वर्षे, पाठान्तर जोरात, ईग्रजी सोपी पुस्तके वाचता येतात ,मराठी ,ईग्रजी शब्दसम्पदा चान्गली.चित्रे चन्गली काढते. पण अडचण ही की काही अल्फाबेट्स / नम्बर्स लिहीताना बरेचदा गोन्धळ करते. (J, S, Z, g, q, )(2,5,9)
1 ते 10 बरोबर लिहीले जाते पण पुढे गोन्धळ होतो , पुढचे (2,5,9) मिरर एमेज येतात . लिहायचा जाम कन्टाळा करते. २ मिनिटा पूर्वी काढून दाखवल असेल तरी लिहीताना मिरर इमेज. खूप प्रयत्न केलाय , पण तिला पुष्कळ्दा समजत नाही.
याच एक कारण हे असेल का की ती दोन्ही हातानी लिहू शकते. तिला आता उजव्या हातानी लिहायची सवय लावली आहे , कारण डाव्या हातानी वरील गोष्टी हमखास उलट्याच येतात.

तिला लिहीण्याची गोडी कशी लावू? कारण ही सवय बदलण्याकरता तिला लिहीण्याची प्रॅक्टीस करायला हवीये ना.

ही कोणती लर्निग डिसोर्डर नाही ना????

Group content visibility: 
Public - accessible to all site users

..

आधी तिच्या शिक्षिकेशी बोला. आणि शाळेतल्या तिला आवडतील किंवा तिला फॅमिलीअर आहेत अशा गोष्टी तुम्ही शोधून तिला त्याबद्दल सांगा त्यामुळे तिला थोडं कंफर्टेबल वाटेल.

मला एका बालरोगतज्ज्ञाने बोलता बोलता एक टीप दिली होती - एखाद्याकडे पहिल्यांदाच बाळाला घेऊन जाशील तेव्हा गेल्या-गेल्या बाळाला त्या घरातल्या भिंतीवरचे घड्याळ दाखव. ओळखीची वस्तू दिसल्यावर, ओळखीचा आवाज/धून कानावर पडल्यावर मुलांना नव्या जागी रुळायला सोपं पडतं. किरकिर करत नाहीत. ( तुमची मुलगी थोडी मोठी आहे, पण हे एक उदाहरण दिले. )

शाळेत स्ट्रेस असल्याने घरी आल्यावर तिला खूप कंफर्ट मिळेल असे बघा. आवड्ते जेवण, खाऊ, मग झोप नाहीतर आवडीचा टीवी शो. मग फ्रेश झाल्यावर स्नॅक आवडीचा व मग आईबरोबर पार्कात जाणे तिथे बसून किंवा घरी आल्यावर इतर होमवर्क बरोबरच तिला काहीतरी स्टोरी वाचायला द्या म्हणजे तिचा आत्मविश्वास रिस्टोअर होइल. मग तिला हळू हळू घरीच काहीतरी चॅलेंजिंग अ‍ॅक्टिविटी द्यायला सुरू करा. बाकी वरील सल्ले बरोबरच आहेत. आल्दबेस्ट.

सायो, सीमा, मृण्मयीशी सहमत! तुमच्या मुलीला जर का भारतीय मुलांचीच सवय असेल तर तीला इथे इतर वंशाच्या मुलांबरोबर अ‍ॅडजस्ट व्हायला थोडा वेळ द्या. तसेच इतर मुलांनाही तिच्याशी अ‍ॅडजस्ट करुन घ्यायला थोडा वेळ लागेल. मात्र 'वेगळे' दिसण्यामुळे चिडवाचिडवी होत असेल तर लगेच टिचरशी बोला. बाकी केजीला फारसा अभ्यास नसतो. तेव्हा हे वर्ष तिला मस्त एंजॉय करु द्या. नंतर अभ्यास आहेच. वरच्या वर्गात एनरिचमेंट प्रोग्रॅम असतात तो अभ्यासक्रम चॅलेंजिंग असतो. सध्या तिच्यासाठी ब्राऊनी गर्ल स्काऊट, एखादा छंद वर्ग वगैरे अ‍ॅक्टिव्हिटी शोधल्यास तिला शाळेबाहेर नवीन मित्र-मैत्रिणी मिळतील.

तुम्हाला हवं तर टीचर आणि काउंन्सेलर यांच्याशी एकत्र भेट घेता येईल. त्यातून जास्त चांगला मार्ग निघू शकतो. कारण अभ्यास असल्यामुळे काऊंन्सेलर चाइल्ड सायकॉलॉजी जास्त चांगलं समजू शकते.>>>अनुमोदन.. कारण टीचर ला न सांगता जाण म्हणजे we are crossing the line.. इथल्या शाळांमध्ये असे खूप प्रोब्लेम असतात (भारतात पण असतीलच) .. टीचर काही तरी बाळबोध कारण देत होती ..माझ्या समोर झालं नाही.. तुमची मुलगी काही पण सांगते (मुलं सहसा या वयात खोटं बोलत नाही) .मग मैत्रिणीने सगळ्यांना एकत्र आणलं.. कौन्सेलर , क्लास टीचर आणि अजून एक सिनियर टीचर .. तिची मुलगी पण खूप इमोशनल होती.. इमोशनल असेल तर कौन्सेलर खूप छान टिप्स देतात.. आधी खूप घाबरायची .. मागे राहायची..पण तिला दुसरी टीचर दिली आणि त्या टीचर ने मात्र तिला पूर्ण पणे बदलवलं.. टीचर छान असेल तर त्या स्वतः शिकवतात कि अशा गोष्टी कशा फेस करायच्या.. ठकास ठक राहायला सांगतात.. आणि त्यांच्या सोबत ठेवतात.. त्यामुळे मुलं एकदम बदलतात.. त्यांना शाळा आवडायला लागते.. ह्या बाबतीत तरी नक्कीच विचार करू नका कि लग्गेच कसं सांगायचं . बेस्ट लक.. पिल्लूला फेज जरा कठीण जाईल .. ते आपण बदलू शकत नाही न त्याची खूप रुख रुख लागते ..

हल्लीच माझ्या असं लक्षात आलं की नवे शब्द बोलताना बहुतेकदा माझ्या मुलीचा (२.५ वर्षे) गोंधळ होतो. उदा. पंगत - पंतग, उपास - उसाप, वाकडी - वाडकी, इ.. आणि बहुतेकदा पहिले अक्षर सोडून पुढच्या अक्षरांत गोंधळ होतो. एकदा शब्द चांगला ओळखीचा झाला की मग काही अडचण येत नाही. पण हे नव्या शब्दांबाबतीत सगळ्याच मुलांचे असे होते का?

गजानन, हे कॉमन आहे. मेन्दूमध्ये प्रोसेसिंगचा स्पीड आणि बोलायचा स्पीड ह्यात गल्लत होते, त्यामुळे अनुस्वारांची गल्लत किंवा शेवटचा शब्द आधी वगैरे होते. अडीचचीच आहे अजून, छोटीच आहे.. लिहितानाही उलटा बी, डी, एल, टी असं होतं, सुधारतंही आपोआप. काळजीचे काहीच कारण नाही.

मला एक सांगा, मन एकाग्र व्हावं ह्यासाठी काही उपाय/ युक्त्या? माझा मुलगा (वय आठ) अजिबात शांत बसत नाही, अभ्यास करतानादेखील हाताचे सतत चाळे सुरू असतात. जी गोष्ट करत आहे, त्यातच संपूर्ण लक्ष असावे ह्यासाठी काय उपाय करता येतील?

गजानन. सेम हियर. माझी मुलगी पण २.५ वर्षांची आहे. ती बाकी सगळे बरोबर म्हणते पण पिशवीला पिवशी म्हणते. आणी हे अनेकदा सांगुनही चुकीचेच बोलते. पण हे या एकाच शब्दाबद्दल . बाकी बरोबर बोलते ती.

तोषवी, तुम्ही स्वतः घाबरून जाऊ नका. धीराने घ्या. पिलूला रूळेपर्यंत जरा वेळ लागेल. माझा मुलगा पण नवीन नवीन असंच म्हणायचा, " मी तिथे कुणाशी बोलू ? ( इथली मुले त्यांच्या मातृभाषेत म्हणजे दिवेहीतच बोलतात. सहसा ह्या वयाच्या मुलांना इंग्लिश येत नाही.) मला कंटाळा येईल."
आता चांगला रूळलाय. टीचरशी चांगलं जमतं त्याचं.
बेस्ट ऑफ लक. Happy
गजानन, शब्दांची असली गडबड आमच्याकडेही चालते. ( ४ वर्षे ११ महिने)
अभंग = अघंब
स्कॉर्पिऑन = स्कायप्रो
फडकं = खबडं
टेररिस्ट = अ‍ॅप्रिकॉट
हे प्रत्येकच वेळी होईल असंही नाही. कधीकधी हे शब्द अगदी व्यवस्थित म्हणतो.
मला वाटतं, ह्यात काळजी करण्यासारखं काही नसावं. Happy

त्यातच संपूर्ण लक्ष असावे ह्यासाठी काय उपाय करता येतील?
>>
तु हे उपाय करुन काही फायदा नाही. लेकाने मनावर घेऊन स्वतः लक्ष दिलं पाहीजे. तु मागे लागतेयस म्हटल्यावर तो जास्तच करुन दाखवेल.

त्यातच संपूर्ण लक्ष असावे ह्यासाठी काय उपाय करता येतील?>>
ADD, ADHD साठी स्क्रीनिन्ग. जंक फूड कमी करणे. मेडीटेशन. अंडरलायिंग इश्यूज जसे इन्सेक्युरिटी.
कसली तरी भीती, इत्यादी चेक करणे. ह्याचा उपयोग होइल. एकटे पणाची भीती वगैरे वाट्ते म्हणून मुले टीवी बघत बसतात. त्याने कॉग्निटिव डेवलपमेंट वर परिणाम होतो.
काहीतरी खेळात गुंतवले म्हणजे रेस्ट्लेस पणा एनर्जी बाहेर पडेल व मग एका जागी चट बसेल. फूट बॉल क्रिकेट स्विमिंग एक तास इत्यादी.

त्यातच संपूर्ण लक्ष असावे ह्यासाठी काय उपाय करता येतील?>>
दोन तासांपेक्षा जास्त टीवी किंवा व्हिडीओ गेम्स द्यायच्या नाहीत...हे अगदी स्ट्रिक्टली !

अमांना अनुमोदन. तासेकभर एखाद्या खेळात घालवला तर फरक पडेल. माझा पुतण्या पण असाच आहे. त्याच्यासाठी आम्ही शोधलेला उपाय म्हणजे त्याला रोज किमान १.५-२ तास ग्राउंडवर पाठव्णे (मल्लखांब, बास्केटबॉल), आणि तबला (तबल्यासाठी तो जरा टाळाटाळ करतो. हल्ली त्यालाक्लासला जायला जास्त आवडत नाही). सात वर्षाचा असल्यापासून त्याचं ग्राउड अगदी नियमीत सुरु आहे.