का गझल होत नाही फसवून ओळ जाते ?

Submitted by मयुरेश साने on 6 September, 2011 - 11:43

लाऊन आस वेडी सुचवून ओळ जाते
शब्दास अर्थ काही देऊन ओळ जाते

दु:खातही सुखाच्या लिहितोय चार ओळी
मजलाच रोज माझी हसवून ओळ जाते

मुर्दाड काळजाला सुचते कधी अचानक
चटका मनामनाला लाऊन ओळ जाते

लपवू नकोस अश्रू सांगून टाक सारे
तो हुंदका कुणाचा गाऊन ओळ जाते

उपरोध सांगणार्‍या हसर्‍या हुशार ओळी
हलकेच पापणीला भिजवून ओळ जाते

वाचून बातम्यांना पदरात काय पडते
घडणार जे उद्या ते घडवून ओळ जाते

सुचती रदीफ आणी सुचतात काफियेही
का गझल होत नाही फसवून ओळ जाते

मयुरेश साने..दि..६ औगस्ट ११

गुलमोहर: 

फारशी आवडली नाही. 'केव्हातरी पहाटे' 'सारख्या' जमीनीतील प्रचंड गझला झाल्यामुळे असावे. (रदीफ स्त्रीलिंगी शब्द आहे असे मत वाचले आहे. 'सुचते रदीफ मजला' असे! Happy )

दु:खातही सुखाच्या लिहितोय चार ओळी
मजलाच रोज माझी हसवून ओळ जाते>>> हा शेर आवडला.

(अधिक उणे बोललो असल्यास माफ करावेत. ) Happy

-'बेफिकीर'!

गझल ठीक वाटली. मात्र मयुरेशला यापेक्षा चांगले लिहिता येईल असेही वाटले.
'मुडदाड' असा शब्द मराठीत नाही. 'मुर्दाड' असा आहे. इतर कुणाहीपेक्षा गझलकाराची शब्दांशी जास्त जवळीक असायला हवी, असे मला वाटते.

पुढील लिखाणास शुभेच्छा.

सुप्रिया जाधव.
बेफ़िकीर
ज्ञानेश
सगळ्यांचे आभार..

अतीशय परखड मतेच माझ्या सुधारणेला मदत करतील बेफिकीर साहेब .. कृपया कसलाही मुलाहीजा नठेवता माझ्या रचने वर बोला..

ज्ञानेश जी 'मुर्दाड' असा बदल केला आहे... मला याहून ही चंगले लिहीता येईल हे आपले मत वाचून आनंद झाला..व जबाबदारीही वाढली