नैवेद्यम् समर्पयामि

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 10:24

nevaidya_0.jpg

गणपती घरी आले की त्यांच्या कोडकौतुकात घर कसं रमून जातं. आपल्या घरी आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार योग्य रितीने झाला पाहिजे याकडे सगळे लक्ष ठेऊन असतात, हो की नाही? बाप्पांकरता हरतर्‍हेचा नैवेद्य केला जातो, छानपैकी ताट सजवून बाप्पाला जेवू घातलं जातं. गणपतीचे लाडके मोदक तर असतातच पण शिवाय घरोघरच्या वैशिष्ट्यपूर्ण पाककृतींनी गणेशाला तृप्त केलं जातं.

तुमच्या घरी यंदा कायकाय नैवेद्य बनवलात? बाप्पाकरता कोणता प्रसाद वाटला? आम्हालाही कळवा. तुमच्या पाककृती वाचून, त्यांची प्रकाशचित्रे पाहून बाप्पासारखेच आम्हीही तृप्त होऊ.

नैवेद्याच्या संकल्पाची सिद्धी !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आर्च, नी, पूर्वा, मिनी, प्रज्ञा९, आश, हेम, भरत मयेकर - सगळ्यांचे मोदक खूप छान!
बस्के, तुझं प्रसादाचं ताट पण मस्त.
नंदिनीचा केळीच्या पानावरचा प्रसाद पाहून तोंपासू. केळीच्या पानावरच्या जेवणाची मजाच काही और!!
दिनेशदा, खीर पण टेंप्टींग. बाप्पाच्या हातात काय आहे?

हा आमच्या बाप्पाचा प्रसाद.

DSC00612.JPG

केळीच्या पानावरचा प्रसाद मस्तच.
मो, चपातीची घडी छान दिसते आहे.
दिनेश, गणपती छान आहे, पोटावर रुद्राक्ष आहे का?

नंदीनीकडची भजी पडवळाची का ? आमच्याघरी पडवळ, गवार, लाल भोपळा, अरवी,
तोंडली, मक्याचे दाणे या भाज्या खास बाप्पाच्या मानल्या जातात.

भंडार?
म्हणजे काय असतं? मोदकात वाती पेटवायच्या? कधी ऐकलं नाही. थोडं वर्णन करून सांगणार का?

गणपतीच्या पहिल्या दिवशी आमच्याकडे असे मोदकाचे भंडार बनवून त्याने गणपतीची आरती करण्यची पद्धत आहे.

मोदक करतेवेळीच हे असे ५ भंडार बनवून घेतो आम्ही..

त्यात तुपाची फुलवात घालून त्याने आरती करतो. ही आरती फक्त पुरुषच करतात आणि नंतर हे भंडार पुरुषांनीच खायचे असतात. ही पद्धत मी अजूनतरी फक्त आमच्यात (दैवज्ञ) बघीतली आहे.

हे असं का, कसं, त्यामागचं शास्त्र/हेतू काय, असले प्रश्ण पडण्याच्या वयात येईपर्यंत सांगणारं कुणी उरलं नाही मागे... Sad

मिनी,
है शाब्बास. पहिले तळणीचे मोदक इथले. खूप आठवण येते आहे या गणपतीत तळणीच्या मोदकांची. एखादी मैत्रिण जवळ असती तर तिच्या घरी जाऊन तरी केले असते. असो.

दिनेश,
खीर छान दिसते आहे.

मनी, पहिल्यान्दाच पाहिले हे असे आरतीवाले मोदक. आमच्याकडे पुरणाची आरती बर्‍याचसा करतात...

सर्वाचेच नैवेद्य बघून मस्त वाटतेय.
दिनेशदा, आमच्यामधे (कर्नाटकी वैष्णव) पडवळाची भजी/काकडीची कोशिंबीर्/खीर आणि पुरण या गोश्टी नसतील तर कुठलाही नैवेद्य व्हॉइड ठरतो. Happy त्यातही मला स्वत:ला पडवळाची भजी आवडते. लहानपणी टायरची भजी म्हणत म्हणत मी सर्वच भज्या गट्टम करायचे म्हणे!!!!

कुणाकडे केले असतील तर गौरीचे नैवेद्य पण दाखवा ना. Happy

सर्वच नैवद्य मस्त!
मिनी, भंडार मस्तच! पहिल्यांदाच पाहिलेत.
हा आमचा नैवद्य बाप्पासाठी

ladu_0.jpgDSCN1463.jpg

आमच्याकडे पण नैवेद्य केळीच्या पानावरच असत.
प्रत्येक दिवशिचा बेत परंपरेनुसार जो ठरलेला आहे तोच असतो.
तर खाली आहे गणपतीच्या नैवेद्य साठीच पहील्या दिवशीच ताट, २१ मोदक आणी आम्ही बनवलेले चंद्र - सुर्य - तारे इ
DSCN0461_0.jpg
बेत आहे वरण भात, मोदक, तांदळाची खीर, अंबाड्याच तिखटतल रायत, कोबिची भाजी, पुरी, वालिची भाजी, कारल्याची भाजी, अळुची भाजी, आंबट, टॉम्याटोची वाटप लाउनची कोशींबिर, दही, लिंबु, लोणच
आणी हा दुसर्‍या दिवशीचा नैवेद्य
DSCN0535.jpg
बेत आहे वरण भात, तांदळाची खीर, काळ्या वाटण्याची आमटी, वडे, बटाट्याची भाजी, फरसबिची भाजी, रुषीची भाजी, टोम्याटो गाजरची दह्यातली कोशींबिर, अंबाड्याच दह्यातल रायत, दही, लिंबु, लोणच

है शाब्बास. पहिले तळणीचे मोदक इथले. खूप आठवण येते आहे या गणपतीत तळणीच्या मोदकांची. एखादी मैत्रिण जवळ असती तर तिच्या घरी जाऊन तरी केले असते. >>> धन्यवाद रैना! ये कि इकडे मग कधीही. I'll be more than happy to make modak for you. Happy
मो, नैवेद्याचं ताट मस्त आहे एकदम. बाकी सगळ्यांचे नैवेद्यपण खासच.

मला एक विचारायचे होते. रिमाचा नैवेद्य सोडला तर बाकी कुणाच्याच नैवेद्यावर तुळशीचे पान नाही. बाप्पाच्या नैवेद्यावर नसते ठेवायचे का ते ? का फक्त सत्यनारायणाच्याच नैवेद्यावर ठेवायचे असते.
याबाबतीत कुठेतरी नक्की वाचले होते पण आता आठवत नाही.

मला एक विचारायचे होते. रिमाचा नैवेद्य सोडला तर बाकी कुणाच्याच नैवेद्यावर तुळशीचे पान नाही.>
तो फोटो गणपतीला नैवेद्य दाखवल्या नंतरचा आहे.

Pages