सुश्राव्य संगीत - सकल कलांचा उद्गाता - केदार पावनगडकर

Submitted by संयोजक on 1 September, 2011 - 13:43


सकल कलांचा उद्गाता
गुणेश गजानन भाग्यविधाता ||धृ||
प्रथम पूज्य हा शिवगौरीसुत
गणनायक शुभदायक दैवत
या विश्वाचा त्राता विनायक या विश्वाचा त्राता ||१||
आदिदेव ओंकार शुभंकर
मी नतमस्तक या चरणांवर
तू विद्येचा दाता गजमुखा तू विद्येचा दाता ||२||


कवयित्री : क्रांति साडेकर
संगीत : प्रमोद देव
गायन : श्री केदार पावनगडकर
हार्मोनिअम : श्री केदार पावनगडकर
तबलासाथ : श्री सुहास कबरे
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या बात है !! सहज सुंदर शब्द......चाल सुद्धा अप्रतिम !! आवाज तर फारच सुरेख !!! मस्तच जमलंय !!!!! प्रसन्न वाटतंय ऐकल्यावर !!!!!!!!

फ़ारच सुंदर झालेय.
गीत, संगीत आणि गायनही सुंदर. Happy

गीतकार आणि संगीतकार आपल्यापैकी कोणीतरी आहे म्हटल्यावर आवडण्यामध्ये जिव्हाळ्याची भर पडते.
आणि मग ते वर्णन करणे शब्दापलीकडे होऊन जाते, तसेच झालेय हे गीत ऐकताना.

सर्वांचे अभिनंदन!!! Happy

गीतकार आणि संगीतकार आपल्यापैकी कोणीतरी आहे म्हटल्यावर आवडण्यामध्ये जिव्हाळ्याची भर पडते.आणि मग ते वर्णन करणे शब्दापलीकडे होऊन जाते, तसेच झालेय हे गीत ऐकताना.>>>>अगदी अगदी Happy

सुंदर भावपूर्ण शब्द, संगीताच्या साजाने सजले की,
’सोने पे सुहागा’ असं वाटतं.

क्रांति, केदार पवनगडकर, सुहास कबरे आणि प्रमोद देव ...... अभिनंदन

मस्तच! हे ऐकून कुणाचा विश्वासच बसणार नाही की ही सगळी कलाकार मंडळी एकाच ठीकाणी नसून वेगवेगळ्या शहरांत आहेत आणि तरीही इतकं सुंदर काँम्पोझिशन. उपल्ब्ध तंत्रज्ञानाचा अतिशय उत्तम आणि प्रभावी वापर केलेला आहे. गणपती बाप्पा मोरया!!

शांतीसुधा..अगं, तसं नाहीये. माझ्याच घरी एकत्रपणे बसून हे ध्वनीमुद्रण केलंय. माझ्या आयुष्यातला तो एक वेगळाच आणि आनंददायक अनुभव होता! Happy
प्रतिसाद देणार्‍या समस्तांचे मन:पूर्वक आभार! आपल्याला आम्ही केलेले काम आवडले ह्यापेक्षा अजून काय हवंय!
अगदी भरून पावलो.

वाह ! वाह ! काय तृप्त वाटलं गाणं ऐकुन. सुंदर गायन, शब्द आणि संगित. तुम्हा सर्वांचे आभार आणि अभिनंदन.

Pages