"वन बीएचके फ्लॅट भाड्याने देणे आहे"

Submitted by अवल on 31 August, 2011 - 03:03

सध्या माझी बाग छान फुलतेय.
सोनटक्याचा एक सीझन येऊन गेला, दुसरा उंबरठ्यावर उभा आहे.
IMG_0807.jpg

मधुमालती मस्त फुलून गेली.
IMG_0697.jpg

लिली बहरून गेली.
IMG_0705.jpg

अन रातराणीही सुवासून गेली.
IMG_9976.jpg

सध्या बहरलीय ती मुकी जास्वंद !
IMG_8881.jpgIMG_1236 copy.jpg

लाल गुलाब ४-४, ५-५ फुलांनी लगडलाय.
IMG_1226 copy.jpg

अन कळ्यांनी वाकलाय कुंद.
IMG_8879.jpg

रंगबिरंगी पानंही सजलीत.
IMG_1230 copy.jpgIMG_1232 copy.jpg

परवा इंद्रधनुष्यानेही कमान केली माझ्या बागेवर.
IMG_1123.jpg

अन मग येऊ लागले काही नवखे लोक. फुलपाखरं, छोट्या मधमाशा, किडे, चिमण्या, बुलबुल अन चक्क सनबर्डही Happy
IMG_9940.jpgIMG_8780.jpg

काल दोन-तीनदा एक बुलबुलाचे दांपत्य अन एक सनबर्डचे दांपत्य पाहणी करून गेले.
मग मला कंबर कसायलाच लागली. सकाळी सगळे आवरले अन मग लागले कामाला. अन त्यातून तयार झाला हा वन बीएचके फ्लॅट Happy
IMG_1247 copy.jpg

इस्त्रीचे एक खोके, जुम्या वह्यांची कव्हरं, काही चिकटपट्या अन वायरीचे तुकडे, अन थोडे कष्ट अन थोड्या आयडिया. बस झाले.
IMG_1248 copy.jpgIMG_1237 copy.jpgIMG_1244 copy.jpg

बघा कोण कोण इंट्रेस्टेड आहेत? आताच दोघे बुलबुल प्राथमिक पाहणी करून गेले. कॅमेरा रेडी नव्हता, नाही तर सप्रमाण सिद्ध केलं असतं Wink आता नवे जोडपे राहायला आले तर टाकेनच त्यांचे फोटो Happy

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अवले...तुझी 'बाग' बघितलीच होती. मस्त फुलली आहे गं!! Happy
ती जास्वंदीची 'मुकी' कळी काय सुंदर दिस्तेय!

मस्त ! बिल्डर बाई अजून बांधा फ्लॅट्स. एवढ्या सुंदर फ्लॅट्सना खूप मागणी येईल आणि तुझ्या बाल्कनीचे गोकूळ होईल Happy

मस्त Happy

मस्तच बाग फुलवली आहेस,

एक शंका - पुट्ठ्याच्या खोक्याचा वापर पक्षी करतात का ?? कारण ते पावसाने भिजले तर फाटेल, निवारा शोधताना पक्षी नेहमी मजबुतीची काळजी घेतात असे पाहिले आहे.

धन्स सगळ्यांना Happy
ससा, माझ्या टेरेसला ओनिंग आहे त्यामुळे ते भिजणार नाही, फाटणार नाही, शिवाय वायरींनी ते पक्के बांधलेय, अन खाली कठड्याचा आधारही आहे. बघूयात येतात का भाडेकरू Happy

अवल, तुझी बाग मस्त, त्यातली फुलं मस्त, फोटो मस्त आणि तुझी आयडिया आणि kindness तर मस्तच मस्त ! काश मी मनिमाऊच्या ऐवजी चिऊताई असते. लगेच बळकावला असता तो गार्डन फ्लॅट. Happy

अवल, ____/\____ तुझ्या पक्षीप्रेमाला. छानच झालय ग घर. आता नक्की लवकरच भाडेकरू येणार. आणि त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांचे फोटो पण आम्हाला पहायला मिळणार.
अग, गेल्या आठवड्यात आमच्या पण गॅलरीत एक जोडप आल होतं. मी वाट पहात बसले. त्यानी घर बांधण्याची. पण ते मनकवडे निघाले. त्याना बहुतेक माझा विचार कळला.(फोटो काढण्याचा) परत आलेच नाहीत.:अओ:

Pages