काळ

Submitted by जयन्ता५२ on 22 August, 2011 - 11:31

असाही कधी संशयी काळ येतो
न केला गुन्हा मी तरी आळ येतो

दिली मी जरी उत्तरे योग्य सारी
पुन्हा परतुनी तोच वेताळ येतो

घसा कोरडा, पाय थकले तशातच
पुढे बोडका, तापला माळ येतो

चुली पेटवाया इथे आग नाही
कुठोनी घरे जाळण्या जाळ येतो?

कधी वाटते की जगावे जरासे
कसा नेमका न्यावया काळ येतो

------------------------- जयन्ता५२

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

असाही कधी संशयी काळ येतो
न केला गुन्हा मी तरी आळ येतो
.
दिली मी जरी उत्तरे योग्य सारी
पुन्हा परतुनी तोच वेताळ येतो

क्या बात है. खूप खूप आवडले. दिलो-जानसे आवडले. Happy

घसा कोरडा, पाय थकले तशातच
पुढे बोडका, तापला माळ येतो>>> हा शेर आधिक आवडला Happy

चुली पेटवाया इथे आग नाही
कुठोनी घरे जाळण्या जाळ येतो?

कधी वाटते की जगावे जरासे
कसा नेमका न्यावया काळ येतो

व्वा,हे दोन्ही शेर छान. गझल आवडलीच. Happy

क्या बात है जयंतराव...सगळी गज़लच आवडली... पण हा शेर विशेष भावला..
दिली मी जरी उत्तरे योग्य सारी
पुन्हा परतुनी तोच वेताळ येतो-----

हो कहां आप ...मुद्दत हुई..ना दुवा ना सलाम :-)...एकदा भेटुयात...