काव्य की गाणे

Submitted by कृष्णक्सकुमारप्रधान on 23 August, 2011 - 00:33

पद्य हवे तुज्,पद्य हवे तुज
पद्यातुनी संसारातील गद्य हवे तुज
मधात घोळून कटु गद्य तुला मी सांगावे
तुपत तळले कडु कारले तुला वाटते ऐकावे.

शब्दाना मुळी गन्ध न उरला
मालमसाला वरी लावता वासही सरला
शब्द बोलके एके काळी,आज ते तसे नसती
काटकुळ्या जणू कोणी महिला नऊवरी नेसती.

नकाच लावू चाल कोणीही मम काव्याला
नकोच संगीत साज तयाला चढवायाला
अर्थशून्य जरी मुळात असेल माझे काव्य
गीत ऐकता म्हण्तील आहे खूपच गेय.
-कृष्णकुमारप्रधान

गुलमोहर: 

प्रधानसर.. संपादनात जाऊन शिर्षक ठीक करा...

शब्द बोलके एके काळी,आज ते तसे नसती
काटकुळ्या जणू कोणी महिला नऊवरी नेसती.... ?????? Uhoh

छान.