Submitted by जयन्ता५२ on 22 August, 2011 - 11:31
असाही कधी संशयी काळ येतो
न केला गुन्हा मी तरी आळ येतो
दिली मी जरी उत्तरे योग्य सारी
पुन्हा परतुनी तोच वेताळ येतो
घसा कोरडा, पाय थकले तशातच
पुढे बोडका, तापला माळ येतो
चुली पेटवाया इथे आग नाही
कुठोनी घरे जाळण्या जाळ येतो?
कधी वाटते की जगावे जरासे
कसा नेमका न्यावया काळ येतो
------------------------- जयन्ता५२
गुलमोहर:
शेअर करा
वोव....खूप आवडली
वोव....खूप आवडली
मतला आणि शेवटचा शेर
मतला आणि शेवटचा शेर अप्रतीम..
खुप सुन्दर गझल..
असाही कधी संशयी काळ येतो न
असाही कधी संशयी काळ येतो
न केला गुन्हा मी तरी आळ येतो
.
दिली मी जरी उत्तरे योग्य सारी
पुन्हा परतुनी तोच वेताळ येतो
क्या बात है. खूप खूप आवडले. दिलो-जानसे आवडले.
छान! जाळ आणि काळ अधिक आवडले.
छान! जाळ आणि काळ अधिक आवडले.
घसा कोरडा, पाय थकले
घसा कोरडा, पाय थकले तशातच
पुढे बोडका, तापला माळ येतो>>> हा शेर आधिक आवडला
वा वा!! छान आहे...
वा वा!!
छान आहे...
सर्व प्रतिसादींना धन्यवाद -
सर्व प्रतिसादींना धन्यवाद
- जयन्ता५२
खरचं खुप छान,आणी साधी-सिंपल.
खरचं खुप छान,आणी साधी-सिंपल.:)
चुली पेटवाया इथे आग
चुली पेटवाया इथे आग नाही
कुठोनी घरे जाळण्या जाळ येतो?
कधी वाटते की जगावे जरासे
कसा नेमका न्यावया काळ येतो
व्वा,हे दोन्ही शेर छान. गझल आवडलीच.
क्या बात... किती दिवसांनी
क्या बात...
किती दिवसांनी आलात दादा !
क्या बात है जयंतराव...सगळी
क्या बात है जयंतराव...सगळी गज़लच आवडली... पण हा शेर विशेष भावला..
दिली मी जरी उत्तरे योग्य सारी
पुन्हा परतुनी तोच वेताळ येतो-----
हो कहां आप ...मुद्दत हुई..ना दुवा ना सलाम :-)...एकदा भेटुयात...
हो हो एकदा बसुयात मस्त गझल..
हो हो एकदा बसुयात
मस्त गझल.. आप आये बहार आयी!
सर्वच शेर सुंदर जमलेत. अगदी
सर्वच शेर सुंदर जमलेत.
अगदी सुटसुटीत...
व्वा..व्वा.. सुरेख गझल.
व्वा..व्वा..
सुरेख गझल.
दिली मी जरी उत्तरे योग्य
दिली मी जरी उत्तरे योग्य सारी
पुन्हा परतुनी तोच वेताळ येतो
अफाट, भन्नाट! गझल आवडली.
सर्व प्रतिसादींना पुन्हा
सर्व प्रतिसादींना पुन्हा धन्यवाद!
जयन्ता५२