रविवार ब्रेकफास्ट गटग...

Submitted by नीधप on 17 August, 2011 - 08:05
ठिकाण/पत्ता: 
हॉटेल गंधर्व, पुणे. बालगंधर्व रंगमंदिराच्या पुलासमोर.

गटगचे म्हणलं तर निमित्त आहे म्हणलं तर नाही.
फारेण्ड, केदार आणि मनीष हे 'परतोनि' आलेले आहेत त्यांचे स्वागत करायचे राह्यलेलेच आहे बहुतेक.
शैलजा आणि स्वाती मोठ्ठा ट्रेक करून परत आल्यात त्या बद्दल त्यांच्याकडून ऐकायचंय. फोटोही बघायचेत जमल्यास.
आणि मी पण पुण्यात आलेली आहे.. Proud

तर रविवारी ब्रेकफास्ट किंवा सकाळची न्याहरी हादडायला गंधर्व हॉटेलात भेटूया. सकाळी ८:३० वाजता. १०:३० पर्यंत तरी असू तिथे. म्हणजे १०:३० ला कटलेच पाहिजे असे नाही.

भेटू तर मग.

माहितीचा स्रोत: 
पुपुकर :)
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, August 20, 2011 - 23:00 to रविवार, August 21, 2011 - 00:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या वेळेला नवा आयडी अविकुमार होता त्यामुळे त्याच्यावर वृत्तांत लिहिण्याची जबाबदारी देण्यात येत आहे. अविकुमार हाजिर हो!

sanyojakaanaa dhanyawaad, Happy
baryach maaybolikaranaa ekatra bhetataa aala he don divas.
malaapan photo, mee hote tithe

Sad Sad Sad

सोमणांची किर्ती नको तिथे आलीच आडवी......... नवरा झाला साफ आडवा एका रात्रीत, 'शब्द झाले मायबाप' ला तर तब्बेतीत होता...... अचानक घरी गेल्यावर हे असं काय घडलं....... मला सकाळी ब्रे.ग. ला यायला न जमण्याचा कटच जणू रचला गेला की!...... उद्या सकाळी मस्त आवरून तयार होऊन मी आणि लली ब्रे.ग. ला जाणार असं स्वप्नरंजन करत झोपले आणि हाय रे दैवा! सकाळी नवर्‍याला काढाच करून दे रे, क्रोसिनच आणून दे रे, आल्याचा चहाच कर रे, मऊ भात करून दे रे, काय नी काय! Sad

पुण्यात होणार्‍या एकाही गटग ला ठरवून सुद्धा उपस्थित न राहण्याची परंपरा खंडित झाली नाही ती नाहीच शेवटी. असो. काय ना आता! तरी आदल्या दिवशी बर्‍याच माबोकरांना एका छताखाली ३ तास पाहण्याचा योग आला हेच खूप आहे.

हा माझा न गेलेल्या गटग चा वृत्तांत Proud
नीरजा, तुला भेटायचा योग कधी ग लिहून ठेवला आहे?
या माझ्या न येण्याच्या अपरिहार्यतेमुळे मला त्वरित फोटो पाठवणेचे करावे.

बाबु, त्याबाबतीत नवरा मला फसवू शकत नाही कारण आजारी पडला की तो नेहमीपेक्षा दुप्पट बोलतो Proud

आलेल्या लोकांची यादी
फारएण्ड, केदार, मनीष, शैलजा, स्वाती + देव, नीधप, मयुरेश, रूमा, श्यामली, कांदापोहे, हिम्सकूल, किरू, आनंदसुजु, आनंदमैत्री, बागुलबुवा, नीलवेद, इंद्रा, अविकुमार, विवेक देसाई, देवा, ललिता-प्रिती, कौतुक शिरोडकर, अनिलभाई,

टांगारूंची यादी
साजिरा, valsangikar, मीन्वा, दीपाली, अरूण, मंजात्या

टांगारूंची यादी >>>>>> या पापाचं परिमार्जन कसं करायचं आहे म्हणे ??????????? Happy

अस्मादिकांचे रविवारी सकाळी १० वाजता डोळे उघडले गेले, त्यामुळे त्यानंतर गटग ला उपस्थित राहणे शक्य झाले नाही................. Happy

वृत्तांत 'म्या पामरानं' लिवाय्चा म्हंता? Happy

तशी लिहायला काहिच अडचण नाही, पण सर्वांना प्रथमच भेटत असल्याने बर्‍याचदा दर्शकाच्या भूमीकेतच होतो. कधी माझ्या डावीकडच्या गप्पा ऐकून समजावून घे तर कधी उजवीकडच्या, अशी गत झाली होती. त्यामूळे काही गोष्टी आणी काही उपस्थितही वृत्तांतातून राहून जातील अशी एक भीती आहे हो मनात. असो.

'माझ्या नजरेतून गटग वृत्तांत' असं लिहिलं तर चालेल काय? असं असेल तर मग नक्कीच खरडीन काही तरी. Happy जरा येळ लागंल....पर नक्की लिव्हल!

पुर्वी केलेल्या टेक्सास गटगच्या आठवणी नक्कीच जाग्या झाल्यात.
टेक्सास गटाग - http://www.maayboli.com/node/7575

'माझ्या नजरेतून गटग वृत्तांत' असं लिहिलं तर चालेल काय? ...>>>चालेल फक्त तो नजरेत ठेवुन आम्हाला तुझ्या नजरेत वाचायला लावु नकोस म्हणजे झालं :फिदी:.

लय झ्याक!!! आता व्हई पेन घिवून ल्हिवतोच जनू...त्येचं काय हाय ना मंडळी येक्दम हिथंच येका दमात काय बी खरडण्यासाठी हितल्याच काई 'परतिबावान' मंडळींसारखा म्या कायबी हुब्या हुब्या नाय की वो लीवू शकत. जरा वाईच येळ लागंल, तवर म्या पामराला सांबाळूण घ्या बरं का? Happy

Pages