शम्मी कपूर

Submitted by ट्युलिप on 14 August, 2011 - 10:31

शम्मी कपूरवर या आधीच का बीबी काढला गेला नाही माहीत नाही. आता तो गेल्यावर काढण्याची बुद्धी व्हाही हे दुर्दैव. पण निदान त्यानिमित्ताने का होईना आपल्याला शम्मीबद्दल सतत बोलत रहाण्याची संधी घेता येऊ शकेल. त्याला श्रद्धांजली म्हणून हा बीबी.
शम्मी कपूर का आवडतो याची कारणे अनलिमिटेड. त्याच्यावर चित्रित झालेलं प्रत्येक गाणं, प्रत्येक सीन केवळ सुंदर! माझ्या दृष्टीने सर्वात रोमॅन्टिक, सर्वात देखणा, व्हर्सटाईल अभिनेता म्हणजे शम्मी कपूर.
शम्मी आपल्यात आता नाही, एक युग समाप्त झालं असं काही होऊच शकत नाही त्याच्या बाबतीत. लिजन्ड्स लाईक हिम आर फॉरेव्हर.

माझं सर्वात आवडतं गाणं -
तुमने मुझे देखा होकर मेहेरबां
दिवाना मुझसा नही
हम और तुम और ये समां
जवानियां ये मस्त मस्त बिन पिये
दिवाना हुवा बादल
दिल तेरा दिवाना है सनम
एहसान तेरा होगा मुझपर
दिल के झरोके में
ओ हसिना
ओ मेरे सोना रे
कही ना कही पे
येह दुनिया उसीकी

हा अन्याय आहे. मला सगळीच गाणी आवडतात.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'कश्मिर की कली ' मधलं ' सुभान अल्ला हसी चेहरा' ह्या गाण्यावर साडी नेसून शम्मी कपूरनी केलेला नाच आहा. आणि साडी नेसून काय छान दिसत होते ते. मला त्याचे सर्वच चित्रपट आणि त्यातील गाणी आवडतात. एकही असा चित्रपट व गाण नाही जे मला आवडत नाही. त्यांचा चित्रपट म्हणजे मला मेजवानी असते. या माणसाच्या अंगात 'हाडं' आहेत की नाही असा संशय यावा अशा सगळ्या अदाकारी. खूप खूप वाईट वाटलं. एकदा तरी त्याना भेटण्याची खूप इच्छा होती. पण ती आता अपूर्णच रहाणार. Sad
'मरावे परी किर्तिरुपे उरावे' हे त्यांच्या बाबातीत खरं आहे. ते सतत त्यांच्या आठवणीने आपल्याबरोबरच रहाणार आहेत.
माझ्या आवडत्या अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली Sad

'सुभान अल्ला हंसी चेहरा'त बुरख्यात आहे ना शम्मी कपूर?

शम्मी कपूरच्या अंगात हाडे नव्हती आणि देव आनंदच्या अंगात स्नायूच नाहीत!

चायना टाउन मधला -"माईक पुलिस की जाल में की कभी नहीं फस सकता" च्या वेळचे expressions - एकंदरीत त्या सिनेमातले आणि पगला कहीं का मधले काम "...उस (तालाब) में कछुएं भी होंगे" च्या वेळचा अभिनय.... some real gems!

शम्मि कपुर बदलला तो "तुमसा नही देखा." त्याच्या आधी "हम सब चोर है" मधे झलक होती. नंतर उजाला, दिल देके देखो, सिंगपोर आणि नंतर जंगली आला....

१. याल्हा याल्हा दिल ले गयी }
२. झुमता मौसम } उजाला
३. अब कहाँ जाए हम }
४. तेरि जुल्फे परेशां- प्रीत ना जाने रीत
५. पेहला पेहला प्यार का इशारा - कॉलेज गर्ल ( अभी तो मैं जवान हूं ह्या TV ASIAच्या कार्यक्रमात पाहिले होते.
६. अख्खा तिसरी मंझील (कुठचे चांगले कुठचे वाईट ठरवता येत नाही)
७. सलाम आपकी मिठी नजर को सलाम- बॉय फ्रेण्ड
८. सोचा था प्यार हम (मुकेश)}
९. ऐ दिल कहीं अब ना जा (rare combination हेमंत कुमार)} Bluff Master
१०. हुस्न चला कुछ ऐसी चाल}

आणि अशी अनेक..............

माझ्या मुलाला (वय सहा वर्षे) ऋत्विक रोशन खूप आवडतो. तो विचारत होता की हा "फॉरेनर " आहे ? मी नाही म्हटल्यावर विचारलं की असा हिरो पहिल्यांदाच आलाय ना स्क्रीनवर ?

त्याला तिसरी मंजिलचं ओ हसीना जुल्फोवाली आणि शम्मीची आणखी काही गाणी दाखवली. तेव्हां त्याने पुन्हा विचारलं की हा फॉरेनर आहे का ? याचे डोळे निळे आहेत का ?

शम्मी कपूर जर हॉलिवुडात असता तरी टॉपला असता यात शंका नाही.

त्या काश्मिरी बेढब चादरीत गाणं म्हणताना पण कसला देखणा दिसायचा(चे)
त्या पिरीयड मधला सर्वात गुडलुकिंग हिरो असेल.

शम्मी कपूर वगैरे सारख्यांना श्रद्धांजली वाहणे ही कल्पना सुद्धा सहन होत नाही. आपल्यासाठी त्यांचं एक युग, ती इमेज हे सर्व मनात कैद झालेलं असतं. त्या अभिनेत्या/त्री च वय होतं, त्यांचं ते खरं आयुष्य वगैरे आपण मनाच्या दुस-या कप्प्यात टाकून देतो.

जंगली मधला याहू करणारा शम्मी कपूर आपल्यासाठी अजरामर/ चिरतरूण असतो.

Pages