रविवार ब्रेकफास्ट गटग...

Submitted by नीधप on 17 August, 2011 - 08:05
ठिकाण/पत्ता: 
हॉटेल गंधर्व, पुणे. बालगंधर्व रंगमंदिराच्या पुलासमोर.

गटगचे म्हणलं तर निमित्त आहे म्हणलं तर नाही.
फारेण्ड, केदार आणि मनीष हे 'परतोनि' आलेले आहेत त्यांचे स्वागत करायचे राह्यलेलेच आहे बहुतेक.
शैलजा आणि स्वाती मोठ्ठा ट्रेक करून परत आल्यात त्या बद्दल त्यांच्याकडून ऐकायचंय. फोटोही बघायचेत जमल्यास.
आणि मी पण पुण्यात आलेली आहे.. Proud

तर रविवारी ब्रेकफास्ट किंवा सकाळची न्याहरी हादडायला गंधर्व हॉटेलात भेटूया. सकाळी ८:३० वाजता. १०:३० पर्यंत तरी असू तिथे. म्हणजे १०:३० ला कटलेच पाहिजे असे नाही.

भेटू तर मग.

माहितीचा स्रोत: 
पुपुकर :)
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, August 20, 2011 - 23:00 to रविवार, August 21, 2011 - 00:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

A reminder email will be sent 1 day before the कार्यक्रम. हे महान आहे. आडमिनराव काही तरी करा. Wink

झिपलॉक नाही आणल्या. पण पुढच्या महिन्यात आणू शकेल. तेंव्हा काही सामान नसेल. (असे वाटत आहे. Happy )

सन्मे : म्हणून सोमवार ते शुक्रवार हापिसात काम करावं, म्हणजे मग रविवारी यायला लागत नाही हापिसात ............... Lol

नी, शैलजा या रविवारी आहे. रिलिज आहे एक मोठा.. Sad
अरूण, Lol मी उलटं करते अधूनमधून. मग लोक म्हणतात कसली कष्टाळू आहे. वीकेंडला पण काम करते.

>>>>मी उलटं करते अधूनमधून. मग लोक म्हणतात कसली कष्टाळू आहे.
लोकांचं राहू देत सन्मे. कंपनीला वाटायला हवं तसं. त्यावर अप्रेझल अवलंबून असतं. Proud
आणि एक.. रिलिज आज नाही उद्या केला. हाकानाका.
GTG ला आमच्यासारखी माणसं पुन्हा पुन्हा नाही भेटणार. Proud

केदारनी झिपलॉक आणल्या असतील तर अजून काही लोक वाढतील
हे लै भारी...

नी, गटग करायचे घाऊक कंत्राट घेतलेय्स की काय Happy Light 1

शैलजा, आत्ताच ललीशी फोन झाला तेव्हा तिने बजावलंच आहे, पण सोमणांच्या किर्तीनुसार अगदी त्यादिवशी ८ वाजता पण कॅन्सल होऊ शकतं माझं येणं त्यामुळे नावनोंदणी करून ठेवत नाहीये, इतकंच! Happy

मयूरेश Lol मी ललीबरोबर यायचं म्हणतेय त्यामुळे पहिली मेजर धडक तिलाच बसेल.

ललीवरच धडकणारेस ना? मग ठीके तिला लहानपणापासून सवय असेलच.. Happy

साधने, अगं मला भेटण्यात कुणालाच स्वारस्य नसतं पण मला मात्र सगळ्यांना भेटायचं असतं.. मग काय करणार... Happy

>>>>किरू : आता तुझं खरच काही खरं नाही .............
Lol

अरूण, मी परिस्थिती बघून मंजिरी सोमण यांचा सोमणांच्या किर्तीप्रमाणेचा मार्ग आयत्या वेळेस अवलंबू शकतो. Proud

Pages