माझी ललाटरेषा

Submitted by अभय आर्वीकर on 13 August, 2011 - 08:06

माझी ललाटरेषा

धुंदीत वैभवाच्या, मस्तीत चूर झाली
माझी ललाटरेषा, मजला फितूर झाली

तब्बेत माणसाची, आहे जटील कोडे
जी काल भ्याड होती, ती आज शूर झाली

ते वीर स्वाभिमानी, जे झुंजले रणाला
औलाद आज त्यांची, का "जी हुजूर" झाली?

घे घट्ट आवळूनी, करपाश रेशमाचे
भासे असे जसे की, दमछाक दूर झाली

घे हा 'अभय' पुरावा, त्यांच्या परिश्रमाचा
ती माणसेच होती, जी कोहिनूर झाली

                                 गंगाधर मुटे
---------------------------------------------

गुलमोहर: 

फार दिवसांनी आपली गझल आली मुटेजी, पण माफ करा,या गझलेने माझ्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत.:(

अजून एक खास मुटेस्टाईल गझल येवू द्या.:)

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. Happy

डॉक्टर साहेब. Happy
(मतल्याचा अर्थ शोधताना ललाटरेषेचा उपमात्मक किंवा रुपकात्मक अर्थ न घेता, शब्दशः अर्थ घेतला तर अधिक आणि खरीखुरी मजा येईल.)

तब्बेत माणसाची, आहे जटील कोडे
जी काल भ्याड होती, ती आज शूर झाली

घे घट्ट आवळूनी, करपाश रेशमाचे
भासे असे जसे की, दमछाक दूर झाली

>>>>

वा वा!

घे घट्ट आवळूनी, करपाश रेशमाचे
भासे असे जसे की, दमछाक दूर झाली-------- क्या बात है ... भाऊ - तुम्ही"ही" ?

छान.