शम्मी कपूर

Submitted by ट्युलिप on 14 August, 2011 - 10:31

शम्मी कपूरवर या आधीच का बीबी काढला गेला नाही माहीत नाही. आता तो गेल्यावर काढण्याची बुद्धी व्हाही हे दुर्दैव. पण निदान त्यानिमित्ताने का होईना आपल्याला शम्मीबद्दल सतत बोलत रहाण्याची संधी घेता येऊ शकेल. त्याला श्रद्धांजली म्हणून हा बीबी.
शम्मी कपूर का आवडतो याची कारणे अनलिमिटेड. त्याच्यावर चित्रित झालेलं प्रत्येक गाणं, प्रत्येक सीन केवळ सुंदर! माझ्या दृष्टीने सर्वात रोमॅन्टिक, सर्वात देखणा, व्हर्सटाईल अभिनेता म्हणजे शम्मी कपूर.
शम्मी आपल्यात आता नाही, एक युग समाप्त झालं असं काही होऊच शकत नाही त्याच्या बाबतीत. लिजन्ड्स लाईक हिम आर फॉरेव्हर.

माझं सर्वात आवडतं गाणं -
तुमने मुझे देखा होकर मेहेरबां
दिवाना मुझसा नही
हम और तुम और ये समां
जवानियां ये मस्त मस्त बिन पिये
दिवाना हुवा बादल
दिल तेरा दिवाना है सनम
एहसान तेरा होगा मुझपर
दिल के झरोके में
ओ हसिना
ओ मेरे सोना रे
कही ना कही पे
येह दुनिया उसीकी

हा अन्याय आहे. मला सगळीच गाणी आवडतात.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शम्मीची ओळख आधीच्या पिढीने जरी करून दिली तरी नंतर तो आवडीचा अभिनेता झाला. शशी, शम्मी आणि राज हे तिघेही देखणे भाऊ. पृथ्वीराज सारखा शशीकपूर दिसतो तर त्याच्या देहयष्टीच्या जवळ शम्मी जातो. अर्थात निळे डोळे आणि धसमुसळेपणा यामुळे ते वेगळेच रसायन होते हे नक्की !

गुलाबजामुन हिरोंची इमेज टरकावूनच शम्मी नायक झाला.

शम्मी म्हणजे आपल्या नाचावर गाण्यांना थिरकावणारा मुक्त गंधर्वच..
त्याच्या अदा, त्याचे लूक्स, स्टाईल, आणि आरपार काळजाचा वेध घेणारे ते डोळे..
स्वतः आयुष्य पडद्यावर बेफाम जगला आणि त्याच्यासोबत एक अख्खि पिढी बेफाम झाली.
शम्मी हा एक फेनोमेनन होता/आहे/राहील... !

गेले सात-आठ वर्ष प्रत्येक आठवड्यात शम्मीजी डायलिसिसचा वेदनादायी उपचार करुन घेत होते. तरीही ज्या उत्साहाने, आनंदाने ते आयुष्य जगत होते ते थक्क करुन टाकण्यासारखंच. आज टाईम्सनाऊ चॅनेलवर फार सुंदर फिल्म दाखवली त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीची. त्यांची ट्विट्स वाचणं हा आनंददायी अनुभव असायचा.

मला अंदाज या त्यांच्या हिरो म्हणून शेवटच्या फिल्ममधली मॅच्युअर्ड अ‍ॅक्टिंगही खूप आवडली होती.

ट्यु, मला बातमी कळल्या कळल्या तुझीच आठवण झाली. मला वाटलंच तू नक्की माबो वर येशील म्हणून. किती गप्पा मारल्या त्याच्याविषयी इथे आणि त्याची किती गाणी आठवून आठवून लिहीली होती अंताक्षरीवर Sad श्या Sad यू आर राईट.. लेजेंड्स लाईक हिम लिव फॉरेव्हर.

अजुन काही (माझी आवडती)
१. छूपने वाले सामने आ, छूप छूप के मेरा जी न जला (तुमसा नही देखा)
२. देखो कसम से कसमे से कहते है तुमसे (तुमसा नही देखा)
३. दिल तेरा दिवाना है सनम (दिल तेरा दिवाना)
४. जवानिया ये मस्त मस्त
५. यु तो हमने लाख हंसी देखे है (तुमसा नही देखा)
६. मुझे कितना प्यार है तुमसे (दिल तेरा दिवाना)
७. रात के हमसफर थक के घर को चले (An evening in Paris)
८. झूमता मौसम मस्त महिना (उजाला)
९. दुनिया वालो से दूर (उजाला)
१०. बार बार देखो हजार बार देखो

काश्मिर कि कली, तिसरी मंझिल आणि प्रोफेसरमधील सगळीच गाणी. Happy

पडद्यावर कोणीही नायिका असली तरी नायकाकडेच लक्ष रहावं असा अभिनेता.
आशा पारेख, हेलन यांच्यासारख्या नृत्यनिपुण अभिनेत्रींसमोर त्याच ताकदीने उभा राहिला.

अनेक अभिनेत्रींनी हिंदी चित्रपटांतले आपले पदार्पण शम्मी कपूरच्या सोबतीने केले : आशा पारेख (दिल देके देखो) , शर्मिला टागोर (कश्मीर की कली), सायरा बानो (जंगली), अमीता (तुमसा नही देखा).

गीता बाली ही देवीच्या आजाराने मरण पावलेली शेवटची रुग्ण.

शम्मी कपूरला भारतातील इंटरनेट युझर्सचा पायोनीयर म्हणायला हरकत नाही.
http://www.junglee.org.in/sk.html . स्वतःची वेबसाइट सुरू करणार्‍यांपैकी सुरुवातीच्या लोकांमधला एक.
Internet Users Community of India (IUCI) चा संस्थापक आणि प्रथम अध्यक्ष.
एथिकल हॅकर्स असोसिएशन स्थापन करण्यात पुढाकार.
याहू इंडियाच्या इंडियन ऑफिसच्या उद्घाटनाला त्याला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवण्यात आलं होतं.

शम्मीच्या तोंडी सुरेल गाणी आली म्हणूनच नाही तर त्याची बिनधास्त, मोकळी व स्वतःची अशी खास अभिनय शैलीं यामुळेच तो कायमचाच लक्षात रहाणं अपरिहार्य आहे. बर्‍याच 'हास्यास्पद' विनोदी नटांपेक्षां त्याची ही रांगडी, सहजसुंदर व 'ओरिजीनल' शैली लोकाना त्यावेळीं म्हणूनच भावली.
शम्मीला मनःपूर्वक श्रद्धांजली !

शम्मी कपूर हा एकमेव होता..ज्याने न्रृत्य करताना दिग्दर्शकाची मदत घेतली नाही..फक्त गाणे समजावून घ्यायचा आणि स्वताः ला हवे तसे न्रृत्य करायचा..

बाळू जोशी, माझ्या (एकेकाळच्या) आवडत्या गाण्याची लिंक दिल्याबद्द धन्यवाद. जेंव्हा चित्रपट प्रथमच प्रकाशित झाला, तेंव्हा पाहिला, नि फार गंमत वाटली. का कुणास ठाऊक, पण या वयात त्याची काही फारशी गंमत वाटत नाही! असो.

आणखी एक आठवण!
१९६४ साली आमच्या कॉलेजच्या सहलीबरोबर सिमल्याला गेलो होतो. तिथे एका दुकानात एकाएकी एका स्पोर्ट्स कार मधून एक अत्यंत हॅन्डसम दिसणारा एक तरुण उतरला. आमच्या पासून तीन फुटावर उभा! त्याने एक दोन स्वेटर्स बघितले नि त्यातलाच एक, दोनशे रुपयाचा स्वेटर घेऊन दोन मिनिटात पुनः बाहेर गेला. दुकानदाराने सांगितले तो शम्मी कपूर होता!! आम्ही खल्लास! पाच मिनिटे सगळे गप! क्या इश्टाईल.

(सिमल्यापासून सोलन नावाची गावी दारूची फॅक्टरी होती नि केमिकल इंजिनियर असल्याने ती 'पहाणे' हा अभ्यासाचाच भाग होता. म्हणून गेलो होतो, मजा करायला नाही!)

वॉव झक्की काय सही आठवण सांगीतलीत.

सखिप्रिया.. अंताक्षरीवर धमालच यायची शम्मीची गाणी लिहिताना. मलाही जाम आठवतात ते दिवस. किरु तुही असायचास ना अंताक्षतीवर. आणि बहुतेक सिंहगडरोड बीबीवर पडीक गप्पा असायच्या त्या शम्मीच्या आणि सोमणकाकांच्या. श्रद्धाही होती. कसली मजा यायची.

मी पहिल्यांदा शम्मीचा सिनेमा (किमान मला आठवत असलेला) पाहिला, दूरदर्शनवर, खूप खूप वर्षांपूर्वी, तो शमा परवाना. त्यातलं सुरैयाचं काम आवडलं, तिची गाणीही आवडली, आणि शम्मीही लक्षात राहिला. त्याचे बरेचसे पिक्चर दूरदर्शनवरच पाहिले. तिसरी मंजिल, कश्मीर की कली आणि अ‍ॅन इव्हिनिंग इन पॅरिस सारखे चित्रपट चांगलेच लक्षात राहिले. त्याची नाचायची/ थिरकायची अदा, निळे डोळे, गोरा-गुलाबी वर्ण आणि त्याच्यावर चित्रित झालेल्या गाण्यांमुळे तो जास्त लक्षात राहिला. त्या गाण्यांनी अनेक पिकनिक्स हिट्ट केले, अंताक्षरी सजल्या, रात्रीच्या गप्पा रंगल्या, मूड्स बदलले....

शम्मी कपूरला श्रध्दांजली.

शम्मी कपूर.. नावासरशीच डोळ्यासमोर मूर्तिमंत उत्साह उभा राहतो.. तत्कालीन "हिरो" या पठडीत कुठेही बसत नस्ताना (सतत फ्लॉप पिक्चर देत असताना) त्याने स्वतःची एक इमेज बनवली. हिरॉइनशी खोटं बोलून, तिला चिडवून रडवून, धसमुसळेपणाने तिला पटवणारा नायक या आधी हिंदी सिनेमाने कधी बघितला नव्हता. Happy राज कपूर म्हणजे सच्चाई की मिसाल. दिलीप म्हणजे ट्रॅजेडी वाला. देव म्हणजे हिरॉइन स्वतःच त्याच्यावर निछावर.

मग शम्मीने काय करावं? त्याने मस्ती करावी, मस्त अंग मोडून डान्स करावा. रफीचा एक एक शब्द चेहर्‍यावर दाखवावा. आणि हिरॉइनकडून वाट्टेल त्या शिव्या खाव्यात Proud जंगली, बदतमीझ, जानवर असलीच नावं याच्या पिक्चरची.

जंगलीमधे शम्मी रात्री उठून अधाश्यासारखा डबा खातो तो सीन आणि सायर त्याला जंगली कहि का म्हणते तो सीन, काश्मिर की कली मधे शर्मिलाची तारीफ करत करत पाण्यात पडतो तो सीन, तीसरी मंझिल मधे तुमने मुखे देखा या गाण्याच्या आधी आशा येते तो सीन, असे सीन जिवंत करावेत ते शम्मीनेच.

त्याचे निळे डोळे, गुल्लाबी रंग आणि जेल् लावलेले केस. नाचणार्‍याची शरीर यष्टी नसताना पण उत्स्फुर्तपणे केलेला डान्स. डान्स असो वा नसो शम्मी कपूरचे गाणे म्हणजे गायक जसं म्हणेल त्याच पद्धतीने केलेलं लिप सिंकिंग. उगाच रफी तिथे तान लावतोय आणि शम्मी इकडे नुस्ते ओठ हलवत नाचतोय असे कधी दिसणार नाही.

आणि शम्मीची आवडती गाणी???? कमॉन.. नावडती गाणी शोधावी लागतील इतकी आवडती गाणी आहेत. तरीपण वरच्या लिस्टमधे नसलेली आणि असलेली पण माझी विशेष अशी काही गाणी.

१. मेरे भैस कोडंडा क्यु मारा.
२. पगला कहीका
३. मै जागू तुम सो जाओ.
४. ओ मेरे सोना रे सोना रे (या गाण्यात शम्मी कपूर त्या बॅगेसोबत जे काय करतो ते दुसर्‍या कुणाला सुचणार पण नाही. आशाइतकीच ती बॅग पण गाण्याची हिरॉइन आहे. Happy )
५.याहू.... (माझ्या काही मैत्रीणीची अशी जेनुइन समजूत होती की याहू ही शम्मी कपूरचीच कंपनी आहे. दुसरे कोण आपल्या कंपनीचे नाव याहू ठेवेल?)

अजून आठवली की लिहेनच.

तीसरी मंझिल मधे तुमने मुखे देखा या गाण्याच्या आधी आशा येते तो सीन, असे सीन जिवंत करावेत ते शम्मीनेच.

शम्मी कपूरचे गाणे म्हणजे गायक जसं म्हणेल त्याच पद्धतीने केलेलं लिप सिंकिंग. उगाच रफी तिथे तान लावतोय आणि शम्मी इकडे नुस्ते ओठ हलवत नाचतोय असे कधी दिसणार नाही.>>>>>>अगदी अगदी Happy

शम्मींविषयी काय बोलावं!!!!

मला त्यांचा एक माहीत असलेला पैलू म्हणजे,ते अतिशय उदार मनाचे व दान्शूर होते. ते प्रचंड नेट सॅव्ही होते व बराच वेळ आंतरजालावर वावरायचे,

काही वर्षांपूर्वी ''जयबाला आशर'' नावाच्या एका तरुणीला एका चरसी तरुणाने हल्ला करुन ट्रेन मधून खाली ढकलून दिले होते व तिला तिचे दोन्ही पाय गमवावे लागले होते. शम्मीसाहेबांनी त्या तरुणीस बर्‍याचदा भेट देवून तिचं दु:ख हलकं केलं व ती डिसचार्ज होवून घरी गेल्यावर तिला एक नवा कोरा संगणक भेट म्हणून दिला होता.

त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

नंदिनी अगदी अगदी.

शम्मीच्या दिसण्याचीच किती वैशिष्ट्य! माझ्या दृष्टीने रोमॅन्टिक दिसणं श पासुन सुरु होतं आणि संपतं म्मी पर्यंत. त्याचे डोळे, केसांच्या स्टाईल्स, हातवारे, अगदी गालाची खास ठेवणही सेक्सी. पहिला सिनेमा पाहीला होता काश्मिर की कली त्यात सुरुवातीलाच कही ना कही पे गाण्यात व्हीलवरचं डोकं तो खास त्याचाच असा झटका देत वर उचलतो आणि त्याच्या गर्द निळ्या डोळ्यांनी बघतो.. खल्लास! मी तोपर्यंत असे निळे, मोरपिशी डोळे कुणाचे पाहीलेच नव्हते. नंतर असे रंग बरेच पाहीले. पण त्यात ती खास शम्मीची एक्सेप्रेशन्स नसल्याने काय अर्थ नव्हता ते नुसतेच रंग Proud
मग पाहीला प्रोफेसर. त्यातल मै चली मै चली गाण्यातला त्याचा निळ्या हिरव्या चेक्सचा शर्ट..इतक्यांदा ते गाणं बघून तो इतका मनात ठसला होता की एकदा फ्रॅन्कफ्र्टला मी सेम तसाच शर्ट घातलेलं कोणी तरी समोरुन चालत होतं तर मधल्या सगळ्यांना जवळ जवळ ढकलत मी पुढे जाऊन त्याचा चेहरा पाहीलेला Proud
प्रोफेसरमधेच ऐ गुलबदन गाण्यात ती केशरी एम्ब्रॉयडर्ड टोपी, तसाच शर्ट जॅकेटच्या आत घालून एका फ्रेममधे डोक्याच्या बाजूला केशरी फुलं डोकावत असतात त्यात इतका इतका कमाल देखणा दिसलाय तो. त्याची केशरी लिपस्टिकही खुपत नाही Proud
प्रोफेसर काल रात्री पहात होते तेव्हा म्हातार्‍याची अ‍ॅक्टिंग करणारा शम्मी ते हाय हम पर भी थी जवानी... कोई करता था हमसे प्यार, हमारा भी जमाना था गातो ते इतकं खरं वाटून गेलं. .. खरंच तो जमाना निर्विवादपणे त्याचा. स्विन्गिन्ग सिक्स्टीज हे त्या दशकाचं नाव फक्त त्याच्या एकट्यामुळे.

शम्मी कपूरचे गाणे म्हणजे गायक जसं म्हणेल त्याच पद्धतीने केलेलं लिप सिंकिंग. उगाच रफी तिथे तान लावतोय आणि शम्मी इकडे नुस्ते ओठ हलवत नाचतोय असे कधी दिसणार नाही>>>>>>>>>> अगदी. हे त्याचं अभ्यासपूर्वक आत्मसात केलेलं स्कील होतं. तो त्याच्या प्रत्येक गाण्याच्या रेकॉर्डींग ला हजर राहात असे. तारीफ करु क्या उसकी या गाण्याच्या रेकॉर्डींग च्या वेळेला त्यानी रफी साहेबांना सांगीतलं की '' तुम्ही दर कडव्याच्या शेवटी तारीफ करु क्या उसकी जेवढं वेगवेगळं म्हणाल तेवढ्या वेगवेगळ्या अ‍ॅक्शन मी करुन दाखवेन. रफी साहेब खुलून गायले आणि शम्मीनी पण खुलून अभिनय केला.
हा किस्सा खुद्द शम्मी कपूर नी कणेकरांना एका मुलाखतीत सांगितला. ( वाचा : ' ना खंत ना खेद ' -- वेचक शिरीष कणेकर, या पुस्तकात )

मी तोपर्यंत असे निळे, मोरपिशी डोळे कुणाचे पाहीलेच नव्हते. >> हाय! 'एहसान तेरा होगा मुझपर' या गाण्यात त्याची इन्टेन्स नजर आठवून अजून अंगावर शहारे येतात. क्रश म्हणजे काय हे कळायच्या आधीपासूनचा माझा सेलीब्रेटी क्रश म्हणजे शम्मी Happy सहा-सात वर्षांची असल्यापासून रविवारी सकाळी सकाळी 'रंगोली' मध्ये त्याची गाणी पाहून जे त्याचं वेड लागलं ते वयाबरोबर वाढतच गेलं. काय ते देखणं रूप, काय ती इन्टेन्स नजर.. जितका धांगडधिंगा करायचा तितकाच हळुवार, रोमँटिकही क्षणात व्हायचा... *एक प्रदीर्घ उसासा* Happy

आमच्या घरी टीवी फारसा लावला जायचा नाही, आणि लावल्यावर त्याचा आवाज अगदी कमी असायचा. पण शम्मीचं गाणं लागल्यावर पाहिजे तेवढा व्हॉल्युम वाढवायची मला स्पेशल मुभा होती Happy मला भक्तीभावाने जोरजोरात त्याची गाणी ऐकताना आणि सोबत गाताना पाहून 'काय चक्रम आहे' असे pretentious कटाक्ष मिळायचे तरी घरात सगळेच त्याचे पंखे असल्याने फारसं ऑब्जेक्शन कुणी कधी घेतलं नाही Happy इथे मायबोलीवरही अंताक्षरीवर शम्म्मीची गाणी आख्खी आख्खी लिहायचो कडव्यांसहित! काय मजा यायची. आय मिस दोज शम्मी डेज Sad

काल शम्मीचा तिसरी मंजील पाहिला ...

शम्मी बद्दल बोलताना माझ्या पार्ट्नरच मत होत कि चित्रपटात सहसा कॅमेरा नायीके बरोबर रोमान्स करतो. पण शम्मीचि गाणि बघताना जाणवत रहात की नायिकेच्या ऐवजी कॅमेरा शम्मीशी रोमान्स करतो. जस हे हे गाण बघताना सतत जाणवत रहात.

'एहसान तेरा' खूप दिवसांनी पाहिलं परत,!
बाप रे ..जितका शम्मी लाइव्ह दिसतो(पण त्याला ती केशरी लिपस्टिक ..का..का ???) तितकी ती बानो कसली दगडी दिसते..

बानोच्या कानातलं मस्त आहे पण. नीट पाहीलस तर शम्मीची नजर त्यावरच असते बराच वेळ Proud

पेशवा हो. ओ हसिना गाण्यात हेलनला स्टेप बाय स्टेप काय मस्त मॅच करतो तो एका कडव्यात.

बानोच्या कानातलं मस्त आहे पण. नीट पाहीलस तर शम्मीची नजर त्यावरच असते बराच वेळ

<<<<
भानु अथैय्या रॉक्स ??
कि दुसरी कोण आहे डिझायनर ?

केशरी लिपस्टीक नाही गं. ते लॅबमधलं प्रोसेसिंग आहे. फिल्मचे रंग तसे असायचे.
इस्टमनकलर. ५० मधले बरेचसे रंग तसेच गं.

९४-९५ मध्ये विजयमुखीचा इन्टरनेट प्रोग्रमिंग कोर्स पुर्ण केला तेंव्हा त्यांनी VMCI मेम्बर्स साठी पार्टी ठेवली होती त्या पार्टीला शम्मी कपुर यांना प्रत्यक्ष भेटता आले. त्यावेळी त्यांनी आम्हा पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरात येउन हवे तेंव्हा इन्टरनेट अ‍ॅक्सेस करायची परवानगी दिली होती.
अत्यंत दुरदर्शी आणि दयाळु माणुस.

Pages