शम्मी कपूर

Submitted by ट्युलिप on 14 August, 2011 - 10:31

शम्मी कपूरवर या आधीच का बीबी काढला गेला नाही माहीत नाही. आता तो गेल्यावर काढण्याची बुद्धी व्हाही हे दुर्दैव. पण निदान त्यानिमित्ताने का होईना आपल्याला शम्मीबद्दल सतत बोलत रहाण्याची संधी घेता येऊ शकेल. त्याला श्रद्धांजली म्हणून हा बीबी.
शम्मी कपूर का आवडतो याची कारणे अनलिमिटेड. त्याच्यावर चित्रित झालेलं प्रत्येक गाणं, प्रत्येक सीन केवळ सुंदर! माझ्या दृष्टीने सर्वात रोमॅन्टिक, सर्वात देखणा, व्हर्सटाईल अभिनेता म्हणजे शम्मी कपूर.
शम्मी आपल्यात आता नाही, एक युग समाप्त झालं असं काही होऊच शकत नाही त्याच्या बाबतीत. लिजन्ड्स लाईक हिम आर फॉरेव्हर.

माझं सर्वात आवडतं गाणं -
तुमने मुझे देखा होकर मेहेरबां
दिवाना मुझसा नही
हम और तुम और ये समां
जवानियां ये मस्त मस्त बिन पिये
दिवाना हुवा बादल
दिल तेरा दिवाना है सनम
एहसान तेरा होगा मुझपर
दिल के झरोके में
ओ हसिना
ओ मेरे सोना रे
कही ना कही पे
येह दुनिया उसीकी

हा अन्याय आहे. मला सगळीच गाणी आवडतात.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एहसान तेरा होगा मुझपर

( माझ्या एका मित्राला शम्मी कपूर खूप आवडतो. शम्मीच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये डायलिसिस्साठी सारखे कॅशलेस सॅन्क्शन करायला लागायचे, ते काम बर्‍याचदा नेमके त्यालाच यायचे.)

शम्मी यार , गये तो हो लेकिन याद बहोत आओगे....

हमारे बाद महेफिल मे अफसाने बयां होंगे
बहारें हमें ढूंढेंगी न जाने हम कहां होंगे....

याSSSहू नाही का?
मला आवडलेले म्हणजे - देखिये, साहिबो, वो कोई और थी, और ये नागिनी, मैं उनपे मरता हूं!
अर्थात फक्त सिनेमात पाहिले नि ते सुद्धा सिनेमा पहिल्यापासून पाहिला, तरच या गाण्याची मजा, नाहीतर नाही.

आंतरजालाचं तंत्रज्ञान आत्मसात करण्यात अग्रक्रमी असणार्‍यांपैकि तो एक होता. खुप गाणी आवडती आहेत; त्यातलंच एकः

आज कल तेर मेरे प्यार के चर्चे हर जबान पर...

http://www.youtube.com/watch?v=IhkVnMIByAA&ob=av3e

आणि ही??

ऐ गुलबदन
बार बार देखो
बडे है दिल के काले
किसी ना किसी से
बोलो बोलो कुछ तो बोलो
देखो कसम से
दिल देके देखो दिल देके देखो
हम से ना पुछो हम कहां चले
मै चली मै चली
मासूम चेहरा
मुझे कितना प्यार है तुमसे
नजर कर चले गये वो
राही मिल गये राहों मे
सुभान अल्ला हसीं चेहरा
तेरी दुनिया में जिने से
तुम से अच्छा कौअ है
यार चुलबुला है
ये चांद सा रोशन चेहरा

ही आणि अशी कित्येक..
अरे हो.. आणखी एक राहीलच..

रात के हम सफर..

या प्रत्येक गाण्यातली प्रत्येक फ्रेम शम्मीमूळे देखणी झाली आणि रफीने अफलातून श्रवणीय केली. त्यामूळे ही सगळी गाणी ऐकण्यात सूख आहेच पण बघताना जो आनंद मिळतो तो निव्वळ अवर्णनिय.

सांगायचं म्हणजे.. ही सगळी गाणी माझ्याकडे Video स्वरूपात आहेत. कधीही पहावीत (ऐकावीत) आणि fresh व्हावं.

आजची बातमी ऐकली आणि तेव्हाचा शम्मी डोळ्यासमोर तरळत राहीला. Sad

माझ्या साबांचा जीव की प्राण, आज त्यांना म्हटलं की तुमच्या दु:खात मी सहभागी आहे.:(
मध्ये एक राजेश खन्नावर चित्रित झालेलं गाणं पाहिलं होतं आणि बोल आता आठवत नाहीत पण shammi kapoor was written all over that song. राजेश खन्नाला ते चाळे करताना पहून संताप अनावर झाला होता.

अगदी अगदी ट्यु,
हम और तुम और ये समां.. तुफान रोमँटोक झालय. रफीचा जेव्हढा हळूवार आवाज तेवढाच हळूवार शम्मी..
आणि इशारो इशारों पे दिल लेने वाले राहीलच गं.

राजकुमार हिट..

आजा आई बहार

तुमने किसि की जान को जाते हुए देखा है,
वो देखो मुझसे रुठकर मेरी जान जा रही है

इस रंग बदलती दुनिया मे
इन्सान की नियत ठी नही,
निकला ना करो तुम सजधजकर
ईमान की नियत ठीक नही

तुमने पुकारा और हम चले आये
जान हथेली पर ले आये रे

रफी, सुमन कल्याणपूर.. राजकुमार

तीसरी मंझिलमध्ये शम्मीला खुनी कोण ते कळतं, तेंव्हा त्याचा डोळे विस्फारलेला क्लोज अप आणि बॅक ग्राउंडला आर डी चे म्युजिक अप्रतिम

शम्मी गेला .... कायमचा निरोप घेऊन .... Sad Sad
त्याच्या ’उजाला’ सिनेमातलं त्याचं गाणं ..... श्रद्धांजली म्हणून

"दिलका मालिक इक मतवाला
इस जहाँ में सब से निराला
प्यार का सूरज दिल का उजाला
याल्ला याल्ला दिल ले गया"

जंगली मधला डायलॉग >> गलतफहमी में ना रहना.. इन्सान मै अबभी नही हूं! Happy

प्रोफेसरही मस्त होता. ऐ गुलबदन मधे काय गुलछबू रोमॅन्टिक दिसतो Proud
कश्मिर की कली तर बेहेतरीन. दिन सारा गुजारा तेरे अंगना..

इतकं इतकं वाईट वाटतय. एकदा तरी भेटायला हवं होतं त्याला प्रत्यक्ष.

शम्मी कपूर खरंतर माझ्या आधीच्या पिढीतला. पण घरच्या मोठ्यांमुळे त्याच्या गाण्यांचं, सिनेमांचं वेड लागलं ते कायमचंच. खूप वाईट वाटतंय आज...

पराग, तू दिलेल्या सगळ्या लिंका पाहिल्या. गीता बाली किंवा स्वतःच्या आई-वडिलांबद्दल शम्मी इतका भावुक होऊन बोलत होता की त्याला सांगावंसं वाटलं - बाबा रे, तेवढी जरा गाडी कडेला लाव आणि मग बोल, उगीच एक म्हणता एक व्हायचं.

बाकी, रणबीरकपूरपेक्षा आमिरखानच शम्मीबद्दल जास्त मनापासून आणि भरभरून बोलत असल्यासारखा वाटला. रणबीरकपूरनं शम्मीचा नात्यासकट उल्लेख (शम्मीदादा) फक्त एकदाच केला.

हम और तुम और ये समां.. तुफान रोमँटोक झालय >>> अरे, हे कुठलं गाणं? अजिबात आठवेना झालंय... मेंदूला गंज चढला माझ्या :भ्यां:

Pages