नावात काय आहे?

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 8 August, 2011 - 02:31

आपला भारत देश खुप मोठा आहे, देशाचा ईतिहासही खुप मोठा आहे. देशात अनेक संस्था,

शाळा, रस्ते आहेत. अशा रस्त्यांना कुठल्याही महान व्यक्तींची नावे देण्याची सर्वच देशांची परंपरा आहे.

आपला देशात मात्र ह्या गोष्टीकडे बारकाईने पाहीले तर. महान व्यक्ती, पेक्षा राजकारणी लोकांची नावे

देण्यात जास्त प्राधान्य दिल्याचे लक्षात येईल.

परंतु येथे तर प्रत्येक गोष्टीमागे राजकारण येते आहे. कधी अमक्याचे नांव दिले नाही तर

तमके नाराज झालेच म्हणुन समजा. पण यात सत्ताधारी सऱळ यात वरचढ ठरतात. ते ईतर काही विचार

करित नाही. एकाच शहरात एकाच व्यक्तिचे नांव अनेक गल्लीला दिले तरी यांचे समाधान होत नाही.

देशातील कित्येक संस्था विमानतळे यांना नाव देण्यावरुन बर्‍याचदा वांद निर्मान झाले

आहेत. जवळपास ९० च्या दशका नंतर देशात एकही नवा महापुरूष किंवा थोर राजकारणी निर्माण

झालाच नाही का? की असुन तो साध्या गल्लीलाही नांव देण्या लायक नाही काय?

राजकारणी लोक म्हणतील त्याचेच नांव कुठल्याही संस्थेला देण्याची जणु आपल्या देशात

प्रथाच पडली. मग ती व्यक्ती कशी होती ईकडे जराही लक्ष दिले जात नाही. देशातील किमात १०० रस्त्या,

शाळा, विमानतळे, विविध संस्थाना राजीव गांधीचे नांव दिल्याचे सापडेल. कधी कधी तर त्या व्यक्तीचा

त्याच्याशी काहीही संबंध नसतो, पण त्याचे नांव त्याला दिलं जाते.

फारच कमी प्रमाणात देशासाठी हौतात्म पत्कारलेल्या जवानांची नावे कुठल्या संस्थेला

नाहीच. पण एखाद्या गल्लीला दिली जातात. राजकारणी लोकांनी राजकारणात राहून भरपुर पैसा

कमाविला आहे. तेव्हा त्याच्याच कोणाचाचे तरी नाव त्याचे संस्थेला देणे हे ओघाने आलेच. पण त्यांनी तर

अख्या देशातील कोण्त्या संस्थेला कोणाचे नांव द्यावे यातच राजकारण चालविले आहे. साध्या द्वार

कमानीसाठी हमरी-तुमरी होते आहे.

माणुस जन्माला आल्यावर त्याचे नामकरण होतेच. पण ते तरी एकदा पण येथे तर

नामकरण झाले तरी दुसर्‍या नामकरणासाठी मोर्चे निघतात. नामांतर झालेच पाहीजे! नामांतर झालेच

पाहीजे!

गेली कित्येक वर्षा पासुन जुन्याच लोंकांची नावे दिली जात आहे. नव्याने एकही असा पराक्रमी पुरूष

सापडत नाही हे ही या देशाचे दुर्दैव की, ओढाऊन घेतलेले भोग देव जाणे.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

.

लोकांना काहि कळतच नाही रे. महान पुरुषांच्या जन्मतिथीला दारु पिऊन नाचतात तर बाकिची गोष्टच काढायची बात नाही

महान पुरुषांच्या जन्मतिथीला दारु पिऊन नाचतात >> हे खरय, त्यांना नाचून धिंगाणा घालायला मिळतो म्हणून जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजर्‍या होतात आजकाल. गर्दीत नाचणार्‍या एकाही महाभागाला या महान व्यक्तिबद्दल एक साधा प्रश्न विचारा.. पण उत्तर मिळेल याची आशा बाळगू नका..

मुकू अरेरे किती हे विचार करतोस तु.....कित्ती टेंशन घेतोस? सोड ते... नावात काय आहे?

महान पुरुषांच्या जन्मतिथीला दारु >> हाहाहा.... नवरात्रौ उत्सव, गणेशचतुर्थि सुध्दा काही लोकांसाठी थर्टी फर्स्ट असते.... तर या महात्म्त्यांच्या तिथी चे काय?

आताच्या राजकारण्यांचे नांव कोणत्याही संस्था, शाळा, रस्ता यांना देणे म्हणजे लाळघोटे पणा आहे,
बाकी पुन्हा दारुचे आगमण झालेच. दारुचे काही खरे नाही.

नवरात्रौ उत्सव, गणेशचतुर्थि सुध्दा काही लोकांसाठी थर्टी फर्स्ट असते.... तर या महात्म्त्यांच्या तिथी चे काय?>>>
अनुमोदन
कारण मी माझ्या समोर पाहीले आहे कि पुण्यात एका गणपती मंडळाचा पदाधीकारी
दारुची बाटली खीश्यात ठेऊन वेळ मीळाली की घोट घोट मारत होता..
आणि ते ही गनपतीच्या स्टेज च्या पाठीमागे...

किश्या सही बोलला, राजकारणी असो, कि त्यांचे चेले चपाटे यांना काही तारतम्यच राहीले नाही.

<<जवळपास ९० च्या दशका नंतर देशात एकही नवा महापुरूष किंवा थोर राजकारणी निर्माण झालाच नाही का>>

नव्वदच्या दशकातला आणि नंतरचा म्हणजे एकविसाव्या शतकातला मोठा राजकारणी. जिवंत व्यक्तीचे नाव द्यायची प्रथा नाही.
असे दोनच राजकारणी आठवतायत : प्रमोद महाजन आणि कांशीराम.

बाकी मुंबईत पलुस्कर मार्ग, शंकर जयकिशन चौक, स्वामी विवेकानंद मार्ग हेही आहेत. पारशी लोकांची नावे अनेक रस्त्यांना आहेत, आणि यातले कोणीही राजकारणी नाहीत.

बाकी मुंबईत पलुस्कर मार्ग, शंकर जयकिशन चौक, स्वामी विवेकानंद मार्ग हेही आहेत. पारशी लोकांची नावे अनेक रस्त्यांना आहेत, आणि यातले कोणीही राजकारणी नाहीत. >>> मला हे फार अपवादात्मक आहेत. आणि या पुरुषांचा कालखंडही बराच जुना आहे. मुंबईत पुर्वी पारशी पोर्तुगीज लोक फार असल्यामुळे ती नावे त्यांनी दिली आहेत.

"म,गांधी रस्ता", "लो.टिळक रस्ता", "शहीद भगतसिंग चौक", "स्वा.सावरकर मार्ग", "नेताजी सुभाष रोड", "पं.नेहरु पथ", "राजेन्द्रबाबू मार्ग" आदी नावे ज्यावेळी आपण वाचतो वा अशा मार्गाने आपण कधी गेलोच तर ही नावे आपणास ते लोक 'राजकारणी' होते म्हणून त्या त्या मार्गाला दिली गेली आहेत असे बिलकुल वाटत नाही. कारण कोणत्याही व्याख्येच्या पलिकडे गेलेल्या या व्यक्ती असतात.

आमच्या कोल्हापुरात तर कलाकारांची, शिक्षणतज्ज्ञांची, क्रिडापटूंची नावे देण्याचा प्रघात आहे. आजही इथे 'मा.विनायक बंगला' नावाचा रस्ताच नव्हे तर चक्क बस स्टॉप आहे. २०११ मध्ये इ. ५ वी मध्ये शिकणारी छोकरी जर बसने जात असेल तर ती वाहकाला 'एक विनायक बंगला' असे सांगते. मी कित्येक विद्यार्थी असे पाहिले आहेत की जे 'कोण हे मा.विनायक ?" अशी पृच्छा करीत असत. प्रिन्सिपल आपटे पथ आहे इथे...तसेच गानमहर्षी अल्लादिया खाँसाहेबांच्या नावाने चौक असून तो मध्यवस्तीत त्यांच्या पुतळ्यानिशी आहे. कै.गुरुवर्य बाबुराव पेंटर यांच्या पुतळ्यासमवेत त्यानी चित्रीकरणासाठी वापरलेला पहिला कॅमेर्‍याची प्रतिकृती एका चौकात आहे.

इतकेच काय 'राज कपूर रस्ता' असून तिथे त्यांचा एक मोठा ब्रॉन्झचा पुतळा लोकवर्गणीतून उभा करण्यात आला. त्याच्या अनावरणासाठी तर चक्क राजपत्नी कृष्णा, शशी कपूर, रणधीर व ऋषि कपूर आणि नीतू सिंग कोल्हापुरात आले होते. त्यानी तो पुतळा उभा करण्यासाठी विशेष धडपड करणार्‍या एका अत्यंत सामान्य व्यक्तीच्या घरी जाऊन इतरांसमवेत जेवणाचा आनंदही घेतला.

राजकारणी म्हटल्या जाणार्‍या स्थानिक नेत्यानीही या रस्त्याला 'राज कपूर रस्ता' नाव देण्यात पुढाकार घेतला होता.

पुणे-मुंबई इथेही असे 'हट के' रस्ते, चौक असतीलच.

<<मला हे फार अपवादात्मक आहेत. आणि या पुरुषांचा कालखंडही बराच जुना आहे. मुंबईत पुर्वी पारशी पोर्तुगीज लोक फार असल्यामुळे ती नावे त्यांनी दिली आहेत.>>

अपवादात्मक ? अजिबात नाही. एकदा मदक्षिण मुंबईत पायी फिरून बघा.
पारशी लोक मुंबईत कधीच फार नव्हते. त्यांचा मुंबईच्या उभारणीत मोठा वाटा आहे, म्हणून त्यांची नावे, पुतळे, त्यांच्या नावांच्या संस्था दिसतात.

नवीन लोक म्हणजे तुम्हाला कार्तिकी गायकवाड, वीरधवल खाडे, अश्विन चितळे यांची नावे रस्त्याला दिलेली पहायचीत की काय? Wink
अशा निमित्ताने का होईना पण जुन्या काळातल्या कर्तृत्ववान लोकांची स्मृती जागी राहते यात काय वावगे आहे?

पारशी लोक मुंबईत कधीच फार नव्हते. त्यांचा मुंबईच्या उभारणीत मोठा वाटा आहे, म्हणून त्यांची नावे, पुतळे, त्यांच्या नावांच्या संस्था दिसतात. >>> हो मान्य आहे ते लोक ईतर देशातुन स्वातंत्रोत्तर काळात व्यापाराच्या दॄष्टीने मूबई हे एक बंदर असल्याने आले, स्थायिक झाले. ते लोक तसेही धनाठ्य असल्याने त्यांनी येथे त्यांचे नावाने संस्था काढल्यात, व त्यांचीच नावे दिली यात वावगे नाही. परंतु आताच्या परिस्थीचा विचार केलातर कुठल नाव का सापडत नाही.

नवीन लोक म्हणजे तुम्हाला कार्तिकी गायकवाड, वीरधवल खाडे, अश्विन चितळे यांची नावे रस्त्याला दिलेली पहायचीत की काय? >>> अजिबात नाही परमविर चक्र, किर्ती चक्र, शहीद जवान, नगरात थोर व्यक्तीही चालेल. फार दुर दिल्लीतल्या माणसाचे कशाला हवे.

अशा निमित्ताने का होईना पण जुन्या काळातल्या कर्तृत्ववान लोकांची स्मृती जागी राहते यात काय वावगे आहे? मान्य आहे. परंतू एकाच नगरात एकाच व्यक्तीची येवढ्या नावाची गरज आहे काय येवढेच म्हणायचे आहे.

@ अशोक
"म,गांधी रस्ता", "लो.टिळक रस्ता", "शहीद भगतसिंग चौक", "स्वा.सावरकर मार्ग", "नेताजी सुभाष रोड", "पं.नेहरु पथ", "राजेन्द्रबाबू मार्ग" आदी नावे ज्यावेळी आपण वाचतो वा अशा मार्गाने आपण कधी गेलोच तर ही नावे आपणास ते लोक 'राजकारणी' होते म्हणून त्या त्या मार्गाला दिली गेली आहेत असे बिलकुल वाटत नाही. कारण कोणत्याही व्याख्येच्या पलिकडे गेलेल्या या व्यक्ती असतात.>> मान्य आहे माझा या नांवाला आक्षेप नाहीच वारंवार एकाच नगरात अनेकविध संस्था रस्ते यानां एकाच व्यक्ती बाबत आहे.

<<हो मान्य आहे ते लोक ईतर देशातुन स्वातंत्रोत्तर काळात व्यापाराच्या दॄष्टीने मूबई हे एक बंदर असल्याने आले>>
पारशी लोक इराणमधुन भारताच्या पश्चिम किनार्‍यावर ख्रिस्तोत्तर दहाव्या शतकात निर्वासित म्हणून आले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर व्यापारासाठी नव्हे.

शहीद जवानांची नावे दिल्याच्या बातम्या वाचल्याचे आठवते.

माझ्या घराजवळच्या एका रस्त्याला कल्पना चावलाचे नाव दिलेले आहे.