राजमाची बाईक ट्रेक - पाऊस, चिखल आणि दे धक्का!!!

Submitted by डेविल on 5 August, 2011 - 10:26

विकेंडला मुश्किलीने मिळालेली शनिवारची सुट्टी कुठे कामाला लावायची ह्या विचारात होतो. २ पर्याय होते. हरिश्चंद्रगड किंवा राजमाची बाईक ट्रेक. ऑगस्ट मधील सुट्ट्या लक्षात घेता हरिश्चंद्रगड तेव्हा करायचा ठरवला आणि राजमाची साठी तयार झालो. शनिवारी सकाळी निघायचे ठरले. बाईकवाले मित्र अंबरनाथला राहत असल्याने सकाळी लवकर उठून तिथे जाणे आले तर रात्रीच संदीपचा फोन आला कि सकाळी त्याला आयकर कार्यालयात जायचे आहे त्यामुळे सकाळी थोडा उशिरा आला तरी चालेल. मला काय ट्रेक नसेल तर सुट्टीच्या दिवशी १२ शिवाय न उठणारा मी , हे ऐकून खुश झालो. Wink असेही बाईक ने जाणार होतो त्यामुळे बराच वेळ वाचणार होता. सकाळी ११-११:३० पर्यंत येतो सांगून झोपलो.

सकाळी जाग आली तीच ८:३० ला. आईला!! आता झाले वांदे. Uhoh मित्र शिव्या घालणार हे नक्की होते. मालाड ते अंबरनाथ कमीत कमी २:३० तास तरी लागणार हे नक्की होते. पटापट आवरून ९ ला निघालो. पावसाचा तडाखा २ दिवसापासून चालू असल्याने ट्रेन चा भरवसा नव्हता. स्टेशन वर जाऊन बघतो तर ट्रेन बर्यापैकी उशिरा चालू होत्या. पश्चिम रेल्वे जिंदाबाद! मधेच प्रशांतचा फोन आला आणी त्याने अंबरनाथ ऐवजी बदलापूरला उतर असे सांगितले, ठीक आहे बोलून फोन ठेवला. माझ्या पाठपिशवीमुळे ट्रेनमध्ये अनेकांनी मला मनातल्या मनात शिव्या दिल्या असतील. Biggrin

बदलापूरला पोहचता पोहचता १२ वाजले. फटाफट बाकीची तयारी करून मी आणि प्रशांत कल्याण - कर्जत रस्त्यावर संदीप आणि खोप्याची वाट बघू लागलो. १० मिनिटामध्ये दोघे आले आणि पुढचा प्रवास चालू झाला. घड्याळात बघितले तर काटा दुपार १ ची वेळ दाखवत होता. मधले मधले टप्पे सोडले तर रस्ता बाईकसाठी तरी चांगला आहे. तास-दीडतासाभरात आम्ही चौक फाट्याला पोहोचलो. दुपारच्या जेवणाऐवजी काही तरी खाउन पुढे जायचे ठरले. लगेच मिसळपाव, वडापाव, भजीप्लेटाची ओर्डर सुटली. भरपेट खाल्ल्यावर बाईक पुढे पळायला लागल्या, ND स्टुडिओ पासून मुंबई-पुणे महामार्ग घेण्याऐवजी खोपोली फाट्याला वळलो. आणि तिथून लोणावळा गाठले.

लोणावळ्यात भुशी-धरणाची ट्राफीक मिळाली. ती पार करून राजमाची फाट्याला आलो. मधेच एक चिकन शॉप दिसले, आमावस्या असल्याने लगेच एका कोंबडीला मोक्ष दिला. रात्रीच्या जेवणाची चांगलीच सोय करून ठेवली.
इथून पुढे जास्त काही सांगण्याऐवजी फोटोंचा आस्वाद घ्या.

_2.jpg_3.jpg

जसे जसे सह्याद्रीच्याच्या रांगेजवळ सरकू लागलो तस-तसे धुके वाढू लागले. फोटो काढत, गप्पा मारत पुढचा प्रवास करत होतो.

_4.jpg_5.jpg

गुडघाभर चिखलामधून बाईक चालवत(कमी) आणि ढकलून(जास्त) बाहेर काढत आमचा प्रवास चालू होता.

_6.jpg_8.jpg_8_1.jpg_10.jpg

मधेच एका ठिकाणी मायबोलीकर आशुचँप भेटला.

_11.jpg_12.jpg_14.jpg_15.jpg_16.jpg_17.jpg_18.jpg_18_0.jpg

गावात पोहोचायला ६:३० झाले. तिथेच उभ्या-उभ्या प्रशांतने आणलेली चटणी-चपाती खाउन गावात भटकायला निघालो(गाव काही मोठे नाही आहे). दुपारपासून बाईकबसून खडबडीत रस्त्यावर प्रवास करून बुड दुखायला लागले होते. Proud

दिवसभर भिजल्यामुळे चांगलेच गारठलो होतो. चुलीजवळ बसून उब घेत घेत काकड्या खात होतो.

_20.jpg_21.jpg

चिकनचा मस्त सुगंध सुटला होता. जेवायला बसल्यावर आडवा हात मारून खायला सुरुवात केली. प्रशांतचा उपवास असल्याने बिचारा शाकाहारी जेवण घेत होता.जेवण करून झोपायला ११ वाजले. अंथरुणावर पडल्या-पडल्या कधी झोप लागली ते कळलेच नाही.

सकाळी सकाळी ६:१५ ला संदीप ने सर्वाना उठवले. आवरून घर मालकिणीच्या परवानगीने खोप्याने चुलीचा ताबा घेतला. मॉगी-खिचडी बनवायला सुरवात केली. खाउन झाल्यावर लगेच गडावर जायचा निघालो.
मनरंजन किंवा श्रीवर्धनला पहिले जायचे यावर चर्चा चालू झाली, आणि दान श्रीवर्धनच्या पदरात पडले.

२०-25 मिनिटात बालेकिल्ल्याच्या पहिल्या दरवाज्यात पोहोचलो. कंबरभर पाण्यामधून गडावर प्रवेश घेतला. वाघबीळ कडे जायचा विचार दाट धुक्यामुळे सोडवा लागला. Sad उंचावरील भगव्याला मुजरा करून गड फिरू लागलो.

_22.jpg_23.jpg

पावसाची उघडीप जराही नव्हती. दाट धुक्यामुळे आणि पावसाच्या वाढत्या जोरामुळे मनरंजनला न जाता परत फिरायचे ठरले. रात्रभराच्या पावसाने मधल्या ओढ्याचे पाणी नक्कीच वाढलेले असणार हे माहिती होते. परत गावात येऊन पोह्यांची ओर्डर देऊन मंदिर बघायला गेलो.

_24.jpg_25.jpg_26.jpg_27.jpg

मंदिरापाशी आणी तलावात थोडे फोटोसेशन करून परत फिरलो. या फोटोंसाठी बिचाऱ्या प्रशांतला आम्ही १०/१२ उड्या मारायला लावल्या आणि २/३ वेळा पाण्यात फेकले.

_28.jpg_30.jpg_31.jpg_32.jpg_33.jpg_34.jpg_35.jpg

गरमागरम पोहे तयार होते. सकाळची खिचडी पोटात कधीच गायब झाली होती. ४ च्या जागी ८ प्लेट पोहे झाले.

१२ च्या आसपास गावातून माघारी फिरलो. परतीच्या रस्तात तर रात्रभराच्या पावसामुळे अजून चिखल वाढला होता आणी आमचा त्रास पण. अपेक्षेप्रमाणे ओढ्याचे पाणी गुडघ्याच्या वर होते. डिस्कवर बाईकला ओढा पार करायला त्रास नव्हता. डोक्याला ताप अवेन्गर पार करताना होणार होता.

कशीबशी अवेन्गर ओढा पार केली. पुढचा रस्ता आदल्यादिवशी अंदाज आल्याने जास्त तापदायक वाटत नव्हता. जिथे पहिल्यांदा काल ढकलगाडी केली होती, तिथे काही ४ चाकी आल्या होत्या आणी चिखलाचे खड्डे अजून रुंद करत वर चढत होत्या.

_36.jpg_37.jpg

आमचा सर्वाचा अवतार बघण्या सारखा होता. माने पासून खाली पाया पर्यंत चिखलाने माखलेलो. ) लोणावळा जवळ करताना १ ओढा लागला तिथे सर्व साफ केले. गर्दी दिसली म्हणून सहज डोकावून बघितले तर वॉटरफॉल रॅपलिंग चालू होते. मनात विचार आला होता कि चला करुया, मागच्या वर्षीचा विहीचा अनुभव होताच. पण घड्याळचा काटा परत फिरायला सांगत होता. तसेही त्यांच्या सभासदांचे झाल्याशिवाय आमचा नंबर लागला नसता.

_41.jpg_40.jpg_39.jpg_43.jpg

परत लोणावळा मध्ये थोडे ट्राफिक लागले, पण लवकरच सुटलो. घाटामध्ये एवढे धुके वाढले कि बाईक खूप हळू उतराव्या लागत होत्या. घाट उतरल्यावर सुसाट सुटलो. अंबरनाथला पोहोचता पोहोचतो ६ वाजले. संदीपकडे जेवण करून परत मालाड रात्री ११ ला गाठले.

................................................................................................................................................

पावसाचा जोर जास्त असल्याने कॅमेरा वाचवत फोटो काढणे त्रासदायक होत होते. किल्ल्यावर तर जास्त फोटो काढायला मिळालेच नाही. जे त्यातल्यातात चांगले होते ते इथे आहेत. बाकीच्या फोटोंवर थोडे काम करावे लागेल. ते नंतर अपलोड करेन.

हा बाईक ट्रेक थोडा वेगळा अनुभव देऊन गेला. भविष्यातील काही कार्याक्रमासांठी हा अनुभव गरजेचा होता. लवकरच गोवा बाईक ट्रेक करायचा आहे.
नॉर्मल ट्रेकपेक्ष्या या बाईक ट्रेकमुळे जास्त हात-पाय दुखत होते. सुट्टी टाकू शकत नाही म्हणून जबरदस्ती सोमवारी कामावर गेलो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

मजा आली वाचताना आणि प्रचि पाहताना. चुलीजवळचा फोटो ऊब देऊन गेला. भिजल्यावर असं चुलीजवळ बसायला मिळणं हा स्वर्गीय आनंदच !!!

शेवटच्या फोटोत धबधब्याच्या इतकं जवळ जायला नको होतं असं वाटून गेलं..

शेवटच्या फोटोत धबधब्याच्या इतकं जवळ जायला नको होतं असं वाटून गेलं..>> किती फुटाचे रॅपलिंग आहे ते बघायला गेलो होतो. Wink

मस्त, मस्त, मस्तच Happy

आम्ही जानेवारीत बाईक घेऊन गेलो होतो, तेंव्हाही त्रास होत होता. चिखलात बाईक नेणे म्हणजे __/\__
आमावस्या असल्याने लगेच एका कोंबडीला मोक्ष दिला.>>>>>:हहगलो:

हा आमचाही अनुभव

सहीच! परवाच एका बायकरचे फोटो बघितले... तो तर एकटाच गेला होता. मलापण जायचय एकदा भारतात परतल्यावर. गाड्यांनी काही त्रास दिला नाही? एका फोटोत तर पाणी पार सायलेंसरपर्यंत आलय. फोटोपण मस्त आलेत.
पण हेलमेट नाही, पायात चपला... एकंदर टिपिकल डेरिंगबाज(?) दिसतायत तुझे मित्र (कि तू?)... सांभाळ रे.

छान लिहिलय.. Happy
राजमाचीला आजकाल बाईक/कार थेट नेता येते का ? पूर्वी फक्त तुंगार्ली लेकपर्यंत नेता येत असे. आम्ही मागे चालत गेलो होतो.. सुंदर परिसर आहे तो.. मधला ओढा दिवाळाच्या सुमारासही बराच भरला होता..पावसाळ्यात तर खूपच पाणी वाढत असेल तिथे !
इतक्या पाण्यात बाईक्स नी त्रास दिला नाही ते बरं.. !

मस्त लिहीलय. फोटोपण मस्त आहेत. तो मानेवर खरच असा टॅटू आहे की ती फोटोशॉपची करामत.
तो पहिला बाइकचा फोटो आहे ना सगळी लाल मातीच दिसतेय तो थोडी काटछाट करून मार्सवरचा म्हणून सहज खपवता येईल इतका तो सगळा भाग तांबडा/केशरी दिसतोय. Proud

खरेच डेअरडेव्हील आहात.
मागे आम्ही पण हा ट्रेक केला होता लोणावळा ते राजमाची, आनि नंतर श्रीवर्धन आणि मनोरंजन गड पाहून कर्जतला उतरलो होतो.
फोटो पाहून पुन्हा जाण्याची इच्छा झालीय.

पण तुम्ही बाईकवर म्हणजे तुम्हाला _/ \_

@जिप्सी >> आपला अनुभवपण मस्तच आहे.
@सॅम >> परत येताना ओढ्याला कमरेच्यावर पाणी होते. सायलेंस पाण्यात बुडालेलेच होते. कसेतरी पार झालो.
@यो>> राजमाची नाईट ट्रेक करायाचा आहे. कधी ते बोल. ;P
@दिनेशदा>> धन्यवाद Happy
@बंडुपंत>> Lol
@पराग >> कार जर 4x4 असेल तर पावसामधेही जाता येते. एका फोटोमधे जीप दिसत आहे. ते ६/७ गाड्या घेउन आले होते.
@रूनी पॉटर >> खरा टॅटू आहे. फोटोशॉपने थोडासा ईफेक्ट टाकला आहे.
@आनंदयात्री, aabasaheb >> धन्यवाद.

@ रोहित ..एक मावळा >> Proud
@ juyee >> धन्यवाद.

साली बाईकांची वाट... >> Biggrin जास्त काही झाले नाही.

धम्माल लिहीले आहेस रे...तुम्हाला त्या तसल्या रस्त्यावरून बाईक नेताना पाहूनच दंडवत घातले होते मनोमन....
आमची चालून चालून इतकी दमणूक झाली होती की गुडूप झोपलो. तुम्हाला भेटायची इच्छा होती पण सकाळी निवांत उठलो त्यामुळे कर्जतला वेळेत पोहचण्यासाठी फार वेळ गावात थांबणे शक्य नव्हते...
मला संपर्कातून तुझा नंबर कळव...
रच्याकाने, इवढ्या पावसात, धुक्यात, चिखलात मी तुला सापडलो आणि तु मला ओळखलेस याचे विशेष कौतुक...:)
त्या ओढ्यातल्या फोटोत आमचा सगळा ग्रुप दिसतोय...मी नेमका मागे राहीलो होतो त्यावेळी बहुदा.

सकाळी लवकर उठायची इच्छा आमचीपण नव्हती, पण मित्राने उठवलेच. Happy
ट्रेकच्या अगोदर तुझाच कोल्हापुरचा लेख वाचला होता. चेहरा लक्शात होता. Wink
ओढ्यातल्या फोटोत तुच आला नाहिस. परत जाताना ओढ्यामधे धमाल आली बाइक पार करताना. संपर्कातून नंबर पाठवलेला आहे.

अरेरे... गाड्यांमुळे रस्ता खराब झाला आहे... चालायलाही नीट रस्ता दिसत नाही... राजमाची पर्यंत रस्ता पोचायला हवा..पण आहे तो रस्ता ही आपण खराब करतो...पावसाळ्यात त्या रस्त्यावरून गाड्या नेल्याने रस्त्याची दुर्दशा होते...नंतरही तो रस्ता तसाच खडबडीत राहतो.. उन्हाळ्यात जर नेल्या तर एव्हढा खराब होणार नाही... त्यामुळे गाड्यावरच राजमाची ला जायचे तर पाऊस सोडून नंतर जावे असे वाटते..

@ आनंद >> आपले म्हणणे बरोबर आहे, पण जे खड्डे झाले आहेत ते मोठ्या ४ चाकीमुळे झाले आहेत. मी आमच्या बाइक ट्रेकचे समर्थन करत नाही आहे. पण खड्डे कशामुळे पडतात ते महत्वाचे आहे, पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला नाही तर रस्ता कमजोर होतो(माझ्या माहीतीप्रमाणे) आणि त्यावेळी वजनदार वाहने त्यावरुन गेली मग खड्डे पडायला सुरवात होते. सुट्टीच्या दिवशी इथे ४ चाकी जास्त येतात.

सही डेवल्या Happy

काळ्या बॉर्डरवाले फोटो कोंणत्या कॅमेर्‍यातून काढले आहेत?

Pages