हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यांना वोल्डमॉर्टच परत येनं गुपचुप करायचं होतं >> तेही करता आलच असत ना .>>>>>>>>>>>>>> एकदा हॅरी गायब झाला असता तर ड्म्बलडोरने लगेच ओळखलं असतं की हे वोल्डेमॉर्टशीच संबंधीत आहे म्हणुन...
>> हॅरीला मारायचच ठरल होत ना ? मग प्लॅन सक्सेस झाला असता तरी डंबलडोर ला तरी कळणार होतच

जाऊ दे Happy
I like "Harry Potter " 1000 times more than I hate Goblet of Fire.

ट्रायविझार्ड मुळे चार्ली विझलेचे कॅरॅक्टर एस्टॅब्लिश होते. तसेच फ्लेअर डेलाकोर, व्हिक्टर क्रम आणि वाँडमेकर शेवटच्या भागात पुन्हा येतात.
डार्क लॉर्ड परत आला आहे हे फक्त हॅरीलाच माहीत असण्यावरच पुढचा ऑर्डर ऑफ फिनिक्स आधारित आहे.

मेघना, आपल्या मताबद्दल आदर आहेच... पण हॅरी मेला असता तर मला नसतं आवडलं.. आणि असही नाहिये की जेकेआर ने ओढुन ताणुन बळेच हॅरीला जिवंत ठेवुन वोल्डीला मारलं आहे.. जर तसं झालं असतं तर मात्र मलाही शेवट आवडला नसता.. पण everything just fits together so easily though not that simply.... असं मला वाटतं...

शेवटच्या वर्षी हॅरीनं व्होल्डरमॉटवर मात केल्यावर त्याचं गिनीशी लग्न व्हावं, त्याला तीन मुलं व्हावीत (दोन मुलगे आणि एक मुलगी!) आणि त्यातल्या एकाचं नाव 'अल्बस सिव्हेरस' असावं हा तर गलिच्छपणाचा कळस होता.>>>> मला नाही असं वाटलं....

मेघना छान लिहिलय . हॅरी मरेल अस मलाही वाटत होत . पण या अँगलने विचारही केला नव्हता . पण मे बी पुस्तकाचा मुख्य वाचकवर्ग लहान मुले असल्यामुळे त्याना वाईट वाटू नये म्हणून म्हणा किंवा त्याना चांगली शिकवण मिळावी म्हणून म्हणा असा शेवट केला असेल ,

हॅरीला मारायचच ठरल होत ना ? मग प्लॅन सक्सेस झाला असता तरी डंबलडोर ला तरी कळणार होतच >>>>> ह्म्म्म... बरोबर आहे तुमचं... आत्ता कळलं मला तुम्हाला काय म्हणायचं आहे ते... पण जर हॅरी मधेच गायब होवुन मेला असता तरी वोल्डीला डम्बलडोरची भिती होतीच की... त्याला डम्बीची सगळ्यात जास्त भिती होती, हॅरीची नाही... त्यामुळे मला असं वाटतं की जर टुर्नामेंटमधुन तो गायब झाला असता तर कदाचीत त्यांना वोल्डीचं परत येणं गुप्त ठेवता आलं असतं.. कारण तेव्हा डम्बलडोरक्डे काहीच पुरावे नसते...

I like "Harry Potter " 1000 times more than I hate Goblet of Fire.>>>>>>>>>>>>>>>>> Happy

मेघना,
तू म्हणतेस त्याला पूर्ण अनुमोदन. हॅरीवरील आक्षेपांमध्ये हा आक्षेप यायलाच हवा.
मी राऊलिंगबाईला जस्टिफाय नाही करत आहे पण मी तिच्याजागी असते तर कदाचीत मीही तेच केले असते. Knowingly कदाचित.

Realism/ Existentialism meets fantasy हे crossbreed genre झेपण्यातले नाही. तुम्हाला शेवटी लेखक म्हणून ठरवावे लागते. Its her call dear..and it may have been taken by commerical instincts too.
माझं हॅरीप्रेम आंधळं नाही, कधीच नव्हतं.. पण knowing that.. त्यातली गंमत गेली नाही माझ्यासाठी तरी.
अजूनही काही गंभीर आक्षेप आहेत, मला वैताग आणणारे. ते लिहीनच एकदा. पण ते एक असो. या सगळ्यांना पुरुन उरणारी 'गंमत' हॅरीमध्ये सापडते मलातरी. Happy
मला तर अशी शंका आहे की हॅरी मुळात ११-१७ मधील मुलांना कदाचित आवडणार नाहीच. तो आवडतो तो त्याहुन लहान, किंवा विशीच्या वरच्या सर्वांना. तो जो एक प्रकारचा निरागस, निर्मळ आनंद आहे ना, तो काहीकाळ मध्ये गायब झाल्यावरच जास्त भावतो. आणि हा तू म्हणतेस तो काहीसा भंपकपणा, अगदी पार एनिडब्लिटन पासून सर्व बालसाहित्यात आढळुन येतो. तरीही त्याच्यासकट तो हवाय. कदाचित ती आपली गरज आहे. कदाचित ती एक अनामिक भीती आहे, जी आई झाल्यापासून मला वाटते.
एकीकडे तुम्हाला शास्त्रीय सत्य सांगायची असतात, पण सोनु.. त्यातली 'गंमत' मी तुला कशी सांगू? एकीकडे 'इराऽ अगं ते खरं नसतं, पण ते खरं असतं असं वाटणं हे मात्र खरं असतं हाँ' यातली गंमत मुलांना मोठेपणीच सांगावी लागते, होपफुली ती त्यांना न सांगता समजते ....

माझ्यामुलीला शाळा आवडत नाही म्हणून मी शाणपणा करुन तिला (देवाशप्पथ कधी नव्हे ते) म्हणले की
'इरा, हॅरीला बघ कित्ती शाळा आवडते. शाळेत जायला मिळत नाही म्हणून तो फ्लाईंग कारने जातो वगैरे',
तर ती म्हणली की लग्गेच
की 'आई, मलाही हॅरीची शाळा आवडते'
अगं पण ती खरी नाहीये .. हे वाक्य मी अक्षरश: गिळले, आणि इतके तात्पर्यप्रधान (चीप) विधान करायचा मलाच का मोह झाला यावर विचार केला.
is this making any sense?

माझं हॅरीप्रेम आंधळं नाही, कधीच नव्हतं.>>>>>> Happy

रैनाला अनुमोदन....

अजूनही काही गंभीर आक्षेप आहेत, मला वैताग आणणारे. ते लिहीनच एकदा.>>>> लिहीच गं आता.... खरच...

या सगळ्यांना पुरुन उरणारी 'गंमत' हॅरीमध्ये सापडते मलातरी.>>>>> मलाही

रैना, मला कळतंय तू काय म्हणते आहेस ते. मान्य आहे मला.
हे पोस्ट ताजं नाही. शेवटचा भाग वाचून झाल्या झाल्या खरडलेलं आहे ते. त्यामुळे त्यात वैताग अधिक तीव्र आहे, जितकं द्यायला हवं तितकं श्रेय - त्यानं दिलेल्या आनंदाबद्दल कृतज्ञता - आलेली नाही कदाचित.
अजूनही मी हॅरी कौतुकानं पुन्हा पुन्हा वाचते. त्यात गुंतून रडते, हसते, त्यातल्या बाSरीक तपशिलांना मन:पूर्वक दाद देते; पण तरी 'असा शेवट नसता तर'चा किडा मला चावत असतोच. तसा शेवट नसता तर (कसा असता ते विचारू नका, इतकं कळत असतं तर... असो!) कदाचित ते पुस्तक 'अ‍ॅलिस'ची किंवा 'लॉर्ड ऑफ दी रिंग्ज'ची उंची गाठू शकलं असतं, म्हणून माझंच फसलेलं महत्त्वाकांक्षी पुस्तक असल्यासारखी मी खंतावते. आणि तरीही भल्याभल्यांना हॅरीची शिफारस करतेच.
संदीप खरेच्या कविता ऐकताना मला असं होतं. (मला माहितेय, एक तर हे अवांतर आहे, आणि कदाचित यातून नवीन वाद उभा राहू शकेल. पण मुद्दा स्पष्ट व्हायला त्यानं कदाचित मदत होईल.) त्याच्या कवितांनी केलेलं काम (कवितांची लोकप्रियता, लोकाभिमुखता, तरुणाभिमुखता इत्यादी) वादातीत आहे. एका विशिष्ट वयात त्या कवितांनी हलून जाणंही स्वाभाविक आहे, पण त्याची कविता तिथेच अडकून राहिलीय अशी एक खंत आणि थोडा प्रेमापोटी येणारा राग...
तसंच काहीसं हॅरी पॉटरबद्दल होतं. बाकीचं सगळंच मान्यच...

एका विशिष्ट वयात त्या कवितांनी हलून जाणंही स्वाभाविक आहे, पण त्याची कविता तिथेच अडकून राहिलीय अशी एक खंत आणि थोडा प्रेमापोटी येणारा राग...
तसंच काहीसं हॅरी पॉटरबद्दल होतं. बाकीचं सगळंच मान्यच...>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> नक्की काय म्हणायचं आहे ते अगदी नीट कळलं... Happy कदाचीत उदाहरणामुळे असेल...

अ‍ॅलिस'ची किंवा 'लॉर्ड ऑफ दी रिंग्ज' वाचलच नसल्याने तुमची खंत आधी नीट कळली नसावी... आता ही पुस्तके पण वाचायला हवीत Happy

मेघना Happy पटेश.
अ‍ॅलिस च्या तुलनेत Happy अ‍ॅलिसमध्ये मी कधी आतड्याने गुंतु नाही शकले. ती आवडायची एवढेच. भाषा आवडते, नॉन्सेसिकल गोष्टी आवडतात आणखी बरेच काही. अ‍ॅलिस अजूनही आवडते. माझा ऊर भरून बिरून येत नाही अ‍ॅलिससाठी. अ‍ॅलिस नावाची मुलगी त्यात कितपत दिसते? ती carollच्या खाजगी भन्नाट जोक्सची प्रवक्ता वाटत राहते.तरीही हो 'अ‍ॅलिस' वाचलेच पाहिजे. चुकवण्यासारखे नाहीच ते. Happy
हॅपॉच्या बाबतीत मुळात कुठल्याही गोष्टीचे sequel लिहीले की जे काय व्हायचे ते होतेच. असो.
LOTR मात्र वाचले नाही.
संदीपखरे- Proud तंतोतंत.

मेघना,
सॉरी, पटले नाही. Happy

लेखकाला कथा लिहीताना genreची चौकट तोडून फारसे बाहेर जाता येत नाही. एकतर यात व्यावसायिक अडचणी येतात. तुमच्या विशिष्ट genreचे फ्यान लोक ठरलेले असतात, तुम्ही एकदम वेगळे काही करायला गेलात तर त्यांची फसवणूक झाल्यासारखे त्यांना वाटते. म्हणूनच असे लेखन करायचे असेल तर लेखक वेगळ्या टोपणनावाने लिहीतात.

हॅरी पॉटर किंवा LOTR यांच्यामध्ये रिअलिझ्म आणले तर (रैनाने म्हटले आहे त्याप्रमाणे) cross-genre ची अडचण येते. म्हणूनच LOTR मध्येही शेवटी सगळे आलबेलच होते, सौरॉन आणि सारूमान मरतात आणि चांगल्या शक्तींचा विजय होतो. इथे रिअलिझ्मची अपेक्षा करणे म्हणजे शोलेमध्ये ऐन क्लायम्याक्सला ठाकूर-वीरू-जय-गब्बर यांनी एकत्र बसून सामोपचाराने तोडगा काढावा अशी अपेक्षा करण्यासारखे आहे. Happy शेवटी काही झाले तरी हॅरीचा प्रमुख वाचकवर्ग बच्चे कंपनी आहे हे विसरून चालणार नाही. मोठ्यांनाही ती आवडली हा बोनस.

हॅरी पॉटरमध्ये शेवट वेगळा केला असता तर त्यामुळे त्या साहित्याचे मूल्य बदलले असते का? मला नाही वाटत. हॅरी मरतो आणि व्होल्डेमार्टचे राज्य परत येते असा शेवट केला असता तर हॅरीचा सगळा फॅन क्लब पिसाळून उठला असता. बरेचदा व्यक्तीरेखा लार्जर-दॅन-लाइफ झाली तर असे होते. कॉनन डॉयलने होम्सला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा हेच झाले. शेवट आनंदी न केल्याने कथेची पातळी उंचावते का? कधी-कधी. शेक्सपिअरच्या बहुतेक सगळ्या नाटकांना जी खोली आहे तिच्यामध्ये त्यातील दु:खद शेवटांचे महत्व आहेच. पण ते तिथे शोभून दिसते. याउलट सिटाडेलमध्ये क्रोनिनने नायकाला त्याच्या पापांची शिक्षा द्यायची म्हणून शेवट काही पाने उरली असताना नायिकेला गाडीखाली आणले (जवळजवळ ढकलूनच दिले Proud )तेव्हा तो शेवट दु:खद असूनही ओढून ताणून आणल्यासारखा वाटला.

रिअलिझ्म हवे असेल तर बुकर मिळालेली पुस्तके योग्य. वास्तववाद/निरर्थक आयुष्य वगैरे हवे असेल तर काफ्का, कमू वगैरे बरेच लेखक आहेत. अर्थात सलग दोन-तीन तशी पुस्तके वाचली तर उलटे 'आयुष्य इतकेही भकास-उदास नाहीयेरे बाबांनो' असे म्हणावेसे वाटते. Proud

मला कधीकधी जितकी कथा अगम्य तितकी ती उच्च या समजावर आधारित असलेल्या कथा डोक्यात जातात. अब्जर्डीटीचे साहित्यामध्ये एक स्थान आहे पण म्हणून आयुष्यातील प्रत्येक गोष्टच निरर्थक, भकास, निराशावादी, अनप्रेडिक्टेबल असली पाहिजे असे कुठे आहे? वुडी अ‍ॅलन बेकेटबद्दल म्हणाला ते मला जास्त पटते, "I’ve seen Beckett, along with many lesser avant-gardists, and many contemporary plays, and I can say yes, that’s clever and deep but I don’t really care. But when I watch Chekhov or O’Neill—where it’s men and women in human, classic crises—that I like."

साच्याबद्दल सहमत आहे पण तेही अपरिहार्य आहे असे वाटते. होम्स, अगाथा ख्रिस्ती, वुडहाउस सगळ्यांचे साचे ठरलेले आहेत. अगाथा ख्रिस्तीच्या एक खून-१०/१२ संशयित-शेवटी संगीत खुर्ची-खुनी सापडला या साच्याचा कंटाळा आला म्हणून ती पुस्तके वाचणे थांबवले. Happy

रैना, २:१७ ची पोस्ट लै खास! Really! अगदी मनातलं लिहीलस पण मी लिहीलं असतं त्यापेक्षा कितीतरी पटीनी छान लिहीलस. Happy

राजकाशाना,
एकदम सहमत. मला उच्च साहित्य वगैरे कितीही मनापासून आवडत असलं तरी हॅपॉ चा शेवट याच्याशिवाय वेगळा पटलाच नसता. Happy

राजकाशाना, सही लिहीलं हो तुम्ही सुद्धा. ज्या वयाच्या वाचकांकरता हॅरी पॉटर आहे त्यांना इतक्या लगेच तरी "Life is not fair" चे धडे देणे बरोबर नाही वाटत. तरी जे के आर नी डडलीज कडचे त्याची वास्तव्य आणि मुख्य म्हणजे सिरियस ब्लॅक, डंबलडोअर ह्या व्यक्तीरेखांमधून बरेच धडे दिलेत!
पण खुद्द हॅरीच गेला तर त्या वाचकवर्गाला ते झेपणं शक्य नाही. त्या वाचकवर्गालाच काय आपल्या सारख्यांना सुद्धा झेपत नाही लवकर. Harry's triumph over evil is absolutely necessary to build a positive viewpoint for its readers that leads to the desire to live life.
लहान असतानाची "सगळं काही शक्य आहे" ही विचारसरणी पुढे धकाधकाची जीवनात कोलमडून न पडता कुठेतरी मनाच्या एका कोपर्‍यात तग धरुन राहिली तर मग जरा जगण्यात मदत होते.

मेघनालाही +१ आणि राजकाशानांनाही +१. (हो, असं शक्य असतं.) Happy

राज- मस्त पोस्ट.
जसा सरधोपटपणाचा मोह टाळायला हवा तसाच अटिपिकल आणि म्हणुनच केवळ थोर याचाही. ओढुन ताणुन अटिपीकल म्हणुन ठिगळं लावलेली लगेच कळतात, अगदी वाचकालाही. Easier said.. भल्याभल्यांना जमलेले नाही ते. Happy
तरीही, मेघनाचाही मुद्दा मला पटतो.

Existentialism meets fantasy हे crossbreed genre झेपण्यातले नाही, हे सकाळी लिहीलं खरं, पण दिवसभर आठवत होते ते 'मेटॅमॉरफोसिस'- मेघना.

लहान असतानाची "सगळं काही शक्य आहे" ही विचारसरणी पुढे धकाधकाची जीवनात कोलमडून न पडता कुठेतरी मनाच्या एका कोपर्‍यात तग धरुन राहिली तर मग जरा जगण्यात मदत होते. >>
वैद्यबुवा- Happy वाटते की नाही असे? एवढा एक मोह सुटला तर फार बरे होईल बघा.

हे मेघना आणि चिमुरीसाठी.
अजून काही आक्षेप
- एवढे करुन त्या हर्मायनीला नंतर शेवटी चांगले करियर का नाही दिले. हा घाव जरा थोऽडा वर्मी बसलाय. भ्याँऽऽ.
- व्हेअर इज डायव्हरसिटी ? पाटील जुळी यांची पात्रे घालून फक्त.. शो. ना. हो. त्यातही पार्वतीला काय आवडते तर 'डिव्हायनेशन'.... श्या! कुठल्या इंग्लंडात राहता तुम्ही रॉलिंगकाकु? (ओके, ओके, मला मान्य आहे की बाजरीवरील किडी पासून,ग्लोबल वॉर्मिंग, पेट्रोडॉलर्सचे राजकारणा पर्यंतची प्रतिसृष्टी इथपात्तुर अपेक्षा ठेवणे हेही स्टुपिड आहे पण...)
- 'सोळाव्या वरिसातील धोक्यांना' रॉलिंगने चांगलीच बगल दिली आहे आणि प्रमुख पात्रांच्या snogging वर निभावले आहे. (आता हे लिहु की नको लिहु हे मलाच नीट कळत नाहीये, पण मरुदेत). मी काही 'Juno' ची अपेक्षा ठेवली नव्हती पण थोडा फेरविचार व्हायला हवा होता. म्हणजे हॅरीच्या मनातही फक्त गोऽड रोमँटिक गोष्टी याव्या? काहीही आहे ते. फारच सर्जिकली कात्री लावून ठेवली आहे. सोळा वर्षाच्या हॅरीला थोडीशी तरी ढील द्यायला हवी होती. या ठिकाणी तरी रॉलिंगकाकु दबावाला शरण गेल्या असे वाटते. (सोपे नाहीच, बरेच लोकं गेले असते. प्लीज नोट) आणि म्हणुनही माझा असा कयास आहे की नेमक्या त्या वयोगटातील मुलांना हे कितपत॑ आवडते ?

आणि वरदा हे तुझ्यासाठी
- पहिले तर विनंती की तुला माहित असलेले मिथकांचे पॉटरसंदर्भ किंवा पॉटरचे मिथकसंदर्भ प्लीज लिही ना. ते भारीच होईल.
- दुसरे म्हणजे कॅम्पबेलच्या heroes journey चा हॅरीखंडांवर कितपत परिणाम दिसतो? मला तरी रॉलिंगबाईंवर कॅम्पबेलचा आणि क्लासिक्सचा प्रभाव वाटतो. एकंदरित बाजच 'क्लासिकल' आहे. (आणि मेघना म्हणुनच तुला कदाचित ते काहीसे स्टीरीयोटिपीकल वाटत असणार)

आणि लोक्स हे वाचलेत ना? (जस्ट इन केस)
http://news.harvard.edu/gazette/story/2008/06/text-of-j-k-rowling-speech/

आणि हो,
- मिरर ऑफ इरिझेडला माझा शिरसाष्टांग नमस्कार आहे
- 'टाईम टर्नर' केवळ भन्नाट आहे. आणि हर्मायनी शेवटी ते सोडुन देते तेही. त्यानंतरच्या कुठल्यातरी पुस्तकात मिनीस्ट्रीने सर्व टाईमटर्नस बॅन केलीत का काहीतरी संदर्भ आहे. की हॅरी आणि पब्लिक ने ते सर्व प्रॉफेसीज सोबत स्मॅश केले हेही. (कोणाला आठवतय का नक्की?)
- NEWT चा फुलफॉर्म व्हॅकी आहे, म्हणुन एकीकडे आवडतो..
- Horcrux ची संकल्पनाही अफाट आहे. जबरी.
- डम्बलडोर इज ऑलवेज राईट हाही मोह रॉलिंगने टाळलाय. पाचव्या/सहाव्या भागात तर विशेषच. तसेच ड्म्बलडोरचे हॅरीवर प्रेम असते तेही खास ब्रिटीश पद्धतीने व्यक्त केलेय एकंदरित पुस्तकातच. डंबलडोअरची खास मौक्तिकेही शक्यतो इतर पात्रांद्वारे व्यक्त होतात.
म्हणजे फ्रेड (की जॉर्ज) एकदा पर्सीबद्दल म्हणतो की.. D says it is easier to forgive others for being wrong, than being right..
(चु. भू). हे अ फा ट होते..
आणि ड म्हणतात की.. ' in the end, it did not matter that you could not close your mind Harry. It was your heart that saved you' टाळीखाऊ असले तरी .. वाजवा की हो टाळ्या. चालतय कधी कधी. Proud

स्स्स्सही! मी पण, मी पण

राजकाशाना +१, मेघना +१

वरदा>> मला फारच आवडलं असतं हॅपॉ चा संदर्भ देउन कोणी शिकवलं असतं तर Happy

माझ्याकडे सध्या पुस्तकं माहीत, मॄदुला सारखी घरी भारतात आहेत.
सॉफ्टकॉपी द्या ना कोणीतरी प्लीज

राजकाशानाला अनुमोदन... छान शब्दात मांडलय Happy

पण खुद्द हॅरीच गेला तर त्या वाचकवर्गाला ते झेपणं शक्य नाही. त्या वाचकवर्गालाच काय आपल्या सारख्यांना सुद्धा झेपत नाही लवकर. >>>> Happy सहीच बुवा....

लहान असतानाची "सगळं काही शक्य आहे" ही विचारसरणी पुढे धकाधकाची जीवनात कोलमडून न पडता कुठेतरी मनाच्या एका कोपर्‍यात तग धरुन राहिली तर मग जरा जगण्यात मदत होते.>>>>>>>>>>> अगदी अगदी Happy

एवढे करुन त्या हर्मायनीला नंतर शेवटी चांगले करियर का नाही दिले. >>>> काय करीयर दिलय? मला आठवत नाहिये...

फारच सर्जिकली कात्री लावून ठेवली आहे. सोळा वर्षाच्या हॅरीला थोडीशी तरी ढील द्यायला हवी होती. या ठिकाणी तरी रॉलिंगकाकु दबावाला शरण गेल्या असे वाटते.>>>>>>>>>>> मला वाटतं त्यांनी लहान मुलांसाठी लिहायचं म्हणुन कदाचीत कात्री लावली असेल.. इंग्लन्ड मधे जरी हे सर्रास चालत असलं तरी जेकेआर जुन्या पठडीतली वाटते.. कदाचीत तिने स्वतःच्या मुलांचा विचार करुनदेखील कितपत ढील द्यायची असेल ते ठरवले असेल.. तिच्या मनात असलेलं फ्रीडम (पण रिअ‍ॅलिटीमधे हातात नसलेलं) तेव्हडंच तिने दिलं असेल... Happy हे सगळे माझे अंदाज....

पहिले तर विनंती की तुला माहित असलेले मिथकांचे पॉटरसंदर्भ किंवा पॉटरचे मिथकसंदर्भ प्लीज लिही ना.>>>>>>>>>>>>>>> खरच.... एखादा मस्त लेकही होइल वरदा याच्यावर.. Happy

त्यानंतरच्या कुठल्यातरी पुस्तकात मिनीस्ट्रीने सर्व टाईमटर्नस बॅन केलीत का काहीतरी संदर्भ आहे. की हॅरी आणि पब्लिक ने ते सर्व प्रॉफेसीज सोबत स्मॅश केले हेही. (कोणाला आठवतय का नक्की?)>>>>>>>>>>>हॅरी आणि गॅग जेव्हा मिनिस्ट्रीत जातात सिरिअसला वाचवायला आणि ज्यावेळेस प्रॉफेसी फुटते, त्यावेळेसच कदाचीत याच गँगकडुन टाइम टर्नरचा रॅक तुटतो आणि त्यात बरेचशे डॅमेज होतात... जेव्हा ६व्या भागात हॅग्रिड शिकवायला लागतो त्यावेळे यांच्यापैकी कोणीच त्याच्या क्लास ला नसतं... तेव्हा तो विचारतो की जर वेळ नव्हता तर तुम्ही लोकांनी टाईम टर्नर वापरुन माझ्या क्लासला येवु शकला असता.. त्यावेळेस हर्मी सांगते की खूप सारे ब्रेक झाल्याने मिनिस्ट्रीने आता खूप रेस्ट्रिक्शन्स घातले आहेत त्याच्या वापरावर...

अपर्णा तुला संपर्कातुन मेल करते... मला रिप्लाय कर..

वाचतेय.. फारच भारी वाटतंय सगळ्यांची मतं वाचुन.. इतके दिवस मला आपलं वाटायचं की लहान मुलांच्या या पुस्तकाला इतकं सिरीयली घेणारी मीच एकटी आहे वाटतं!
मेघना +१.०१ आणि राज +१ Happy

रैना, तु अगदी माझ्या मनातलंच सगळं लिहीते आहेस फक्त मला ते इतकं भारी जमलं नसतंच. आपण जेव्हा कधी भेटु तेव्हा या विषयावर बोलण्यासाठी स्पेशल वेळ काढुयात हां! Happy

वर बरीच कारणे आहेच हॅपॉ आवडण्याची. अजुन एक म्हणजे विविध लेव्हल/प्रकारच्या मॅजिकल स्पेसीज मधलं इण्टरअ‍ॅक्शन भारीच लिहीलंय.. विझार्ड्स, ग्रॅनोट्स, मॉन्स्टर्स, सेन्टॉर्स, इल्व्फ्स (ती बार्टी क्राउचची हाउसइल्फ, नाव विसरले) त्यांची प्रत्येकाची वैशिष्ठे, विचार करण्याची पद्धत सगळंच संगतवार मांडलंय.

लहानपणी पर्‍यांचा देश, राक्षस, गुलबकावलीचे फुलं, जादुचे झाड, पाणी, शापित राजकन्या अशी सगळी पुस्तके वाचली असुनही मी हॅपॉ वाचुन झपाटुन गेलेच. हे असुही शकतं हे वाटायला लावणं हे माझ्या मते तिच्या लिखाणाचं निखळ यश आहे..सिंपली ग्रेट! रस्त्याच्या कोपर्‍यात पडलेली एक तुटकी चप्पल बघुन ही पोर्ट्की असली तर काय धमाल हा विचार मनात येतोच! Happy

फारच आवडली आहे हे सगळं किती-किती आणि काय लिहीणार.. जौदे!

लोकहो, हॅरी मरावा असं नव्हतं हो मला वाटत! (असं का वाटलंय तुम्हांला सगळ्यांना???!!!)
लाइफ इज नॉट फेअर वगैरे धडेही नको होते. फक्त - फक्त तो शेवटचा टुकार स्टेशनवरचा पीस नसता लिहिला तरी चाललं असतं. त्यानं बराच वैताग कमी झाला असता. मला तर तो गोष्टीचा भाग न वाटता, हॅरीच्या गोष्टीच्या अ‍ॅडल्ट आवृत्त्या कुणाला काढताच येऊ नयेत म्हणून केलेली व्यावसायिक क्लृप्ती वाटते.
रैना - बाकी सगळ्या आक्षेपांना जोSरदार अनुमोदन.
बायदीवे, डम्बलडोर गे असल्याचं रोलिंगनी जाहीर केलंय... ही एक इंट्रेष्टिंग माहिती मला काही दिवसांपूर्वीच मिळाली. तिनी तेवढं तरी धाडस दाखवल्याबद्दल मला बरं वाटलं.
वरदा - प्लीज संदर्भ लिही. वाचायला बेहद्द मजा येईल.
राजकशाना - साच्याबद्दल मला मान्य आहे. आणि इतका काही रिअलिस्टिक शेवट नको होता मला. फक्त तो शेवटचा भाग तेवढा... Sad

<<फक्त - फक्त तो शेवटचा टुकार स्टेशनवरचा पीस नसता लिहिला तरी चाललं असतं.>>
अनुमोदन. त्याच्याशिवाय काही अडत नव्हतं. मॉल्फॉय आणि हॅरी एकमेकांकडे न चिडता बघु शकण्याच्या स्थितीला पोचले एवढेच त्यात कळते.

मला तर तो गोष्टीचा भाग न वाटता, हॅरीच्या गोष्टीच्या अ‍ॅडल्ट आवृत्त्या कुणाला काढताच येऊ नयेत म्हणून केलेली व्यावसायिक क्लृप्ती वाटते.>>>>> त्याक्रताच टाकलाय तो पार्ट... हे मी कुठेतरी ऐकलही आहे...

रस्त्याच्या कोपर्‍यात पडलेली एक तुटकी चप्पल बघुन ही पोर्ट्की असली तर काय धमाल हा विचार मनात येतोच!>>>>>>> Happy

त्याच्याशिवाय काही अडत नव्हतं. >>>>>>>>>>>> का कोण जाने पण मला तो शेवटही आवडला... Happy आता सगळं आवडुन घ्यायचं म्हटलं की आवडतच ना सगळं Wink

मेघना,
माझी पोस्ट तुझ्या पहिल्या पोस्टला प्रतिसाद होती.

>>>>>>>>असले शेवट असणारी पुस्तकं लिमिट डोक्यात जातात. काहीतरी उंचावरून खाली फेकून द्यावं, काहीतरी तोडून-मोडून-जाळून टाकावं, कुणाच्यातरी उगाचच कानफटात हाणावी, अश्या अनेक अनावर हिंसक इच्छा असल्या पुस्तकांचं शेवटचं पान संपवल्यावर जाग्या होतात. सगळं जग बेतशीर सुबकपणे आपल्या दीडवितीच्या शब्दकोड्यात चपखल बसवणार्‍या लेखकाची आणि वाचणार्‍या आपली दया-दया येते.>>>>>>>>>

हे वाचल्यावर माझा शेन वॉर्नसमोर खेळणारा ग्रॅहॅम गूच झाला, साफ इकेट गेली म्हना ना. Happy
माझे इतकेच म्हणणे आहे की रोलींगकडून ही अपेक्षा ठेवणे बरोबर नाही.

तसे आक्षेप म्हटले तर ढिगानी आहेत. पहील्याच भागात पापाचे (पार्वती पाटील) नाव ऐकून जो भेलकांडलो, बाकीचे पुस्तक निजल्या निजल्याच वाचले. Proud त्यात पिच्चरमधे सगळे साहेब लोक त्याचा उच्चार पटिल, पटिल असा करत्यात (च्या मारी, चांगल त्वांड उगढूनश्यान पाटील म्हनायला काय व्हतं, लेको!) क्लायम्याक्सबद्दल सहमत आहे. तो वाचण्यापेक्षा बघताना त्रास अधिक झाला. हॅरी आणि ग्यांग कोणत्याही कोणातूण म्हातारे वाटत नव्हते. तो शूट करण्याचे काम करण जोहरकडे औटसौर्स करायला हवे होते. Proud

वरदा,
सहमत. +१

वैद्यबुवा,
मला अशा सकारात्मक शेवट असलेल्या गोष्टी आवडतात. कदाचित म्हणूनच लहान मुलंचे साहित्यही आवडते. Happy

रैना
त्या भाषणाचा व्हिडोही बघण्यासारखा आहे.
http://www.youtube.com/watch?v=nkREt4ZB-ck

अपर्णा, स्वाती, चिमुरी, चिंगी
धन्यु. Happy

मला हॅरी आवडण्याची बरीच कारणे आहेत आणि ती कारणे न आक्षेपांपेक्षा संख्येने बरीच जास्त आहेत. मगल्सच्या विरूद्ध अशी प्रतिसृष्टी निर्माण करणे अवघड काम आहे. त्यातील लोक, त्यांचे आचार-विचार, चालीरीती, भाषा सगळे शून्यापासून तयार करावे लागते. ग्रिशॅम किंवा जॉन ल कारला हे करावे लागत नाही, त्यांची वातावरण निर्मिती तयार असते. या कामाची तुलना टोलकिनशी होऊ शकते. त्यातील कोणती कलाकृती श्रेष्ठ हे काळच ठरवील. पण हॅरी लिहायला घेताना रोलिंगसमोरचे आव्हान केवढे जबरदस्त होते हे लक्षात घेतले तर तिच्या प्रतिभेला सा.न. घालावासा वाटतो.

रच्याकने, तो स्टेशनवरचा हॅरी पिक्चरमधे बघताना मला ह्यु जॅकमॅनची स्टाईल मारतोय असे वाटले Proud

पहिल्या पार्टमधे हॅरी जेव्हा हॉगवर्ट्समधे पोचतो त्याच रात्री त्याला एक स्वप्न पडते. सातही भाग पुन्हा वाचल्यावर त्या स्वप्नाचा संदर्भ समजतो Happy

कुणीदेखील फ्रेड आणि जॉर्जचा उल्लेख केला नाहिये का? आपल्यापैकी प्रत्येकाच्या शाळेमधे अशी एक तरी महान व्यक्ती असतेच असते. Proud वूड त्या दोघाचा उल्लेख a pair of human bludgers असा पहिल्याच भागात करतो. शेवटपर्यंत त्याचं व्यक्तिमत्व तसंच राहतं. अगदी स्नेपच्या कर्सने जॉर्जचा कान गेला तरीदेखील (i m holey) प्रत्येक प्रसंगामधे त्याच्या हजरजबाबीपणाला, वात्रटपणाला भरपूर वाव दिलाय. शालेय शिक्षणच यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग नाही हा पाठदेखील या दोघाकडूनच मिळतो की!!!

शाळेमधे "बावळट असणं" म्हणजे आयुष्यभर तसंच नसणं हा धडा नेविलकडून मिळतो. आईबाप असून नसून सारखेच, एक म्हातारी आज्जी, स्मार्टनेस नाही असा नेविल् जेव्हा पहिल्यान्दा आपल्याला भेटतो तेव्हा अगदीच "म्याड" कॅटेगरीतला वाटतो. मात्र, जसंजसं सातवं पुस्तक येतं. (खासकरून ऑर्डर नंतर) नेविल प्रगल्भ होत जातो. इतका की सातव्यामधे हॅरी नसताना हॉगवर्ट्समधे चक्क लीडर बनतो. शेवटच्या युद्धामधे एक हॉरक्रक्सदेखील नष्ट करतो. जेकेने जी काही खास सुंदर कॅरेक्टर्स रंगवली आहेत त्यामधे नेविल माझ्या आवडीचा. हॉस्पीटलमधे हॅरी नेविलच्या आईवडलांना बघतो तो सीन तर अफाट जमलाय.

बरं मला कोणी जरा व्यवस्थित हॅरी आणि डंबीच्या त्या स्टेशनवरच्या सीनमधे ते काय रक्ताळलेले लहान (की म्हातारे) मूल दिसते त्याचा संदर्भ काय आहे ते जरा समजावेल का?

हॅरी आणि डंबीच्या त्या स्टेशनवरच्या सीनमधे ते काय रक्ताळलेले लहान (की म्हातारे) मूल दिसते त्याचा संदर्भ काय आहे ते जरा समजावेल का?>>>> त्याचा नेमका संदर्भ कुठेही दिलेला नाहिये... पण मला वाटतं तो वोल्डमॉर्टचा हॅरीच्या शरीरात असलेला आत्म्याचा तुकडा असावा...

Pages