ऑल्ट.बाफ.नेम्स

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

कंटाळा आला की करायचा अजुन एक प्रकार (आधिचा एक प्रकार: http://www.maayboli.com/node/26641):

लोकांच्या बाफांची नावे बदलायची.

उदा.:

दहशतवाद : मी क्राय करणं अपेक्षित आहे?
स्वगत एका मध्यमवर्गीय गर्दीचे
पालकभेट - पॉपआयच्या नजरेतून
ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कलंके
मुक्ता, छंद म्हणजे काय ?
....

पण या सर्वांवर कवीता मात्र नाही करायच्या हं
(आशा आहे की येथील थोड्यातरी लोकांना ऑल्ट. प्रकार आठवत असेल - वेब ब्राउजर आधी त्याला पर्याय नव्हता).

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

एक दुजे के लिए - एक भजे के लिए
कोठेही जा अवती भोवती निसर्ग एकच आहे - कोठेही जा अवती भोवती विसर्ग एकच आहे
हर्‍याकाका- हाड्याकाका
श्वास झाला मोकळा कि, कोंडल्यागत वाटते - पोट झाला मोकळा कि, (तरीही) कोंडल्यागत वाटते.
माझा बंधु आणि.. किश्या - माझ्या बंडु आणि किश्या
बाजीराव सिंगम कि चुलबुल पांडे - दाजीराव च्युईंगम कि चुळचुळ सांडगे?
मल्टीपर्पज मसाला - मल्टीपर्पज साला Wink

कावीळ असल्यास काय काय खायला देता येइल?
----> कवळी असल्यास काय काय खायला देता येइल?

***************

माठ होतो हीच माझ्या फोडण्याची कारणे... >>>>> Biggrin

जागेचा मालक >>>>> बागेचा मालक
लातुर >>>> आतुर
संथ चालती ह्या मालिका >>>>>> संथ चालती ह्या बालिका
नसतोस घरी तू जेव्हा >>>> हसतेस बरी तू जेव्हा

भारी आहे हे आश्चिग!

काही माझ्याकडूनः

आयआयटी स्वप्न-वास्तवः आय आई आणि ती- विस्तव!
मला खात्री आहे: मी खतरी आहे
जगात सुंदर काय आहे? : घरात ऊंदीर का आहेत?
रतनगड प्रवरेच्या साथीने: हगवण प्रवरेच्या पाण्याने
माझ्या (आ) रोळ्या: माझ्या (का) चोळ्या
लाँग ड्राइव्ह करता गाणी/अ‍ॅलबम्सः लाँग ड्राइव्ह करता आणि आंबतात "बम्स" Happy
चाचणीची जागा: चुकण्याची जागा

"आमचा छकुला" -- एक संवाद : "आमचा अबोला" -- एक संवाद
भारत वि. इंग्लंड - २०११ : भारत वि. इंग्लंड - २०१२ (तेच ते १% लोक ज्यातून वाचतील ते जगबुडीचे साल. :फिदी:)

कुपी कुपीतून भरलेले ह.बा
रसग्रहण स्पर्धा - कुपी कुपीतून भरलेले
मला खात्री आहे- अंतिम -साडेसाती-
सौभाग्याचे वाण - मोहरा Wink

गजानन, ऑल्ट. हा usenet चा भाग होता/आहे. त्याबद्दल अजुन माहिती येथे मिळेलः http://en.wikipedia.org/wiki/Usenet

थोडक्यात म्हणजे ९ प्रकारचे newsgroups होते. त्यातील alt. हा अनेक प्रकारे आगळा होता, रंगीत होता.
विकिपेडीयावरील या चित्रावरुन किंचीत लक्षात यावे:

altdot.png

अवधी पध्दतीने मूग डाळ -> अघोरी पध्दतीने मूग गीळ

स्वारस्याची अभिव्यक्ती -> सारथ्याची अभिव्यक्ती (अर्थात गीतासार)

पार्ल्यातल्या गप्पा -> पार्ल्यातल्या अक्का
आठवणीतली बडबडगीतं -> आठवणीतली बडबड स्वगतं
तुझा दोष नाही !!!(तरही) -> तुझाच दोष आहे तरीही

एक रानफुल >> एक रा(व)न गुल! Proud

गप्पागोष्टी >> अप्पाकोष्टी

तिने नेसली आज साडी पुन्हा ती..... >> तिने टाकली आज काडी पुन्हा ती..

Pages