हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त धागा. Happy अपन हॅरी का एसी कूलर. Proud

जुन्या माबोवर मी पुस्तक वाचल्या वाचल्या त्याचा शेवट लिहिला होता. अ‍ॅडमिनकडे कुणीतरी तक्रार केली. अ‍ॅडमिननी त्या लेखाच्या वर भल्यामोठ्या लाल अक्षरामधे स्पॉयलर वॉर्निंगचा तीन ओळीमधे मेसेज टाकला होता. Happy (तेव्हाचे अ‍ॅडमिन (आत्ताचे वेबमास्तर) जबरदस्त हॅरी फॅन असावेत...

अविकुमार,
हॅपॉ थीम पार्क फ्लोरिडाला आहे. तिथे धाकटी बहिण गेली होती हल्लीच. तिला येताना मला ग्रिफिंडॉरचे जमले तर काहीतरी आण असे सांगीतले होते. Proud
तिथे म्हणे बटरबियर मिळते वगैरे.
तुम्ही जाऊन या..

मला या हॅरी वस्तुंचे फारसे अप्रुप नाहीये पण पुस्तकं ढापणार्‍या लोकांना ती अज्जिबात लाभणार नाहीयेत. Proud
घरी सांगीतलेय की मी मरायच्या आत मला सात चांगल्या हॅरींच्या प्रती हव्यात. लेदरबाऊंडच असे नाही, पण निदान चांगल्या. माझ्या २ प्रती अगदी बंडल आहेत. कागद. Sad

सगळ्या हॅपॉ पुस्तकांची एकेक कथा आहे. ती कशी मिळाली/मिळवली त्याची. Happy

शै- इटस ओके. तिनातले दोन निदान वाचायला तरी मिळालेत. माझा एक रस्त्यावरचा विक्रेता दोस्त आहे. त्याने निदान वाचायला (पैसे देऊन) दिलेत. पण डेथली हॅलोज त्याच्याकडेही नाही. Happy तोपण जबर्‍या फॅन आहे. विकत नाही कधी हॅपॉच्या त्याच्या प्रती. है शाब्बास.

लोकांना वैतागुन हॅपॉचे खंड कपाटात मागे, दिसणार नाही असे ठेऊन दिलेत. परवाच चुकुन बाहेर राहिलं. पाहुण्यातील मुलीने मागीतलेच. सासरचे पाहुणे.
अक्षरशः ती जाईपर्यंत मला काही सुचत नव्हते. धडधड धडधड. आता तिला नवीन घेऊन देईन एकदा.

'माझ्या हॅपॉ पुस्तकांची कृपया चौकशी करु नका' Proud असा टीशर्ट काढला पाहीजे.

नंदे, Happy मला तुझे आठवत नाहीये, पण श्रद्धाने लिहीला होता शेवट ते आठवतय.

मी तर हॅरी पॉटर थीम पार्क्स कुठे आहेत का हे पण गुगललंय. >>>>>>> फ्लोरिडात आहे ना?

तिथं जाऊन एक दिवसतरी त्यांच्या सारखं आयुष्य जगायला मिळालं पाहीजे असं वाटतं.>>>>>>> पण तिथे फक्त बघायला मिळेल.. जगायला नाही... रच्याकने २०१७ मधे किन्ग्स क्रॉस स्टेशनमधे सगळ्या पात्रांना भेटायला मिळणार आहे, असा एवेन्ट फेसबूक्वर येत आहे सारखा... Happy

अविकुमार __/\__ माझी जवळपास ७-८ वेळा झालीत पारायणं

मात्र आता पुन्हा हॅरी पॉटर भेटणार नाही ही हुरहुर फार लागलीय हो मनाला.>>>>>> अगदी.... मला एका फॅनने लिहिलेली जेम्स पॉटर सिरिज मिळाली आहे.. JKR स्टाइल मारायचा प्रयत्न केला आहे पण नाही जमलीय, तरिही मी वाचत आहे Happy

त्या लोकांना मी शाप दिलाय यु नो.>>>>>> रैना कोनता कर्स वापरला? Wink

udayone माहित नाही हो... टॉरन्टवर मिळेल कदाचीत..

अपन हॅरी का एसी कूलर.>>>>>>>> Lol

भल्यामोठ्या लाल अक्षरामधे स्पॉयलर वॉर्निंगचा तीन ओळीमधे मेसेज टाकला होता.>>>>>>>> नशीब howler नाही पाठवला Wink

घरी सांगीतलेय की मी मरायच्या आत मला सात चांगल्या हॅरींच्या प्रती हव्यात. लेदरबाऊंडच असे नाही, पण निदान चांगल्या.>>>>>>>>>> मलापण हव्यात... Happy माझ्याकडे शेवटचं पुस्तक आहे चांगल्यापैकी.. बाकीच्यांबद्दल बोलायलाच नको Happy

सगळ्या हॅपॉ पुस्तकांची एकेक कथा आहे. ती कशी मिळाली/मिळवली त्याची.>>>>> रैना सांगुन टाक..

'माझ्या हॅपॉ पुस्तकांची कृपया चौकशी करु नका'>>>>>>>>>> Rofl

मी पण माझी पुस्तकं लपवुन ठेवते... अगदी कुलुपात...

माझ्या मित्राने शेवटच पुस्तक आलं त्यादिवशी क्रॉसवर्ड मधे जावुन, शेवटचं पान वाचुन लगेच हॅरी मरत नाही हे सांगितलं होतं... त्यावरुन आमचं भांडणही झालेलं...

मी पण पंखा आहे हॅरी पॉटर सीरीज चा . चित्रपट मात्र तितके आवडले नाहीत .

आपण स्नेप चे जबरदस्त फॅन . अगदी तो व्हिलन असल्यापासूनचे. त्याला न्याय देत नाहीत चित्रपट .
डम्बलडोरची कहाणी (Power Corrupts) पण नाही पोचत . अर्थात २-२.५ तासाचा चित्रपट म्हणजे मर्यादा आल्याच , तरीही ...
सातवा भाग पाहिल्यावर मी माझ्या फेसबूक वर टाकलेली ही पोस्ट :

Watching HARRY POTTER movie rather than reading the novel is like watching 20-20 . It's fun . It's entertaining . But whatever it is , it is not CRICKET !

हायला.. मला पण घ्या तुमच्यात... मी पण बिग बिग फॅन.
मी हॅपॉ वर कितीही वेळ बोलु शकते.. अगदी मरुपर्यंत मी मनातल्या मनात हॉगवर्डस च्या अ‍ॅडमिशन लेटरची वाट बघेन बहुतेक! Proud
माझ्याकडे सगळी पुस्तके हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी दोन्ही मध्ये आहेत.. ऑफिसमध्ये फार्फार वैताग झाला की कधीकधी की ३०मि वाचत बसते. Happy
सातव्या भागाचं एक फेक पुस्तक पण आहे.. ते पण बरंच चांगलं आहे पण जेकेची सर नाही.
ज्यांना हवंय त्यांनी सांगा इबुक्स पाठवते. Happy

मी पहिल्यांदा हॅरी बद्दल २००२ मधे ऐकलं.. तोपर्यंत मी एकही इन्ग्लिश पुस्तक वाचलेलं नव्हतं... हॉस्टेलमधे माझी एक मैत्रिण पहिला भाग वाचत होती आणि रोज रात्री झोपताना ती त्यातला एक-एक चॅप्टर सांगायची मला मराठीतुन.. तेव्हाच हॅरी इतका आवडायला लागला की तिचं पुस्तक वाचुन झाल्या झाल्या मी ते वाचुन काढलं.. अक्षरशः कॅन्टीन, मेस, लॅब सगळीकडे वाचत बसायचे मी, रस्त्यावरुन चालतानाही वाचायचे... आणि मग हॉस्टेलमधुन शोधुन शोधुन ६व्या भागापर्यंत वाचले... तिथेच सायबर कॅफेत जावुन आम्ही आधीच रिलीज झालेले हॅपॉचे मूव्हिज बघितले... ४थ्या मूव्ही पासुन थिअटरमधे जावुन बघायला लागलो... मग रस्त्यावरुन १ते४ पुस्तकं विकत घेवुन त्यांची पारायणं झाली... ७व्या पुस्तकाच्या रिलीजच्या वेळी नुकतीच जॉबला लागले होते, वाटलं चला आपल्या पहिल्या सॅलरीतुन पुस्तक घेवु.. सॅलरी व्हायला वेळ होता म्हणुन वडिलांकडुन पैसे घेवुन मैत्रिणीला पुस्तक त्याच दिवशी घेवुन ठेवायला सांगितलं (त्यावेळेस मी पुण्यात नव्हते).. मग दुसर्‍या दिवशी मी पुण्यात येइपर्यंत तिने वाचुन मला दिलं.. Happy घरातही माझ्या हॅपॉ वेडाचं इतकं कौतुक आहे की भाच्याचं नाव ठेवतान वडील गमतीने म्हणाले की हॅरी पॉटर ठेवुया Wink

Watching HARRY POTTER movie rather than reading the novel is like watching 20-20 . It's fun . It's entertaining . But whatever it is , it is not CRICKET !>>>>> सहीच Happy

ऑफिसमध्ये फार्फार वैताग झाला की कधीकधी की ३०मि वाचत बसते. >>>>>>> मी पण असच करायचे.. पण त्या ३० मि चे ३ तास कधी व्हायचे तेच कळायचं नाही.. म्हणुन मग ते बंद केलं Happy

मला हॅरी पॉटर आवडण्याची कारणे -

१) मी नुकतीच हॉस्टेलला गेल्यावर हे पुस्तक वाचायला सुरुवात केल्यामुळे कुठेतरी साम्य आढळलं आणि आवडुन गेलं..
२) फॅन्टसीत आधीपासुन रमायला आवडायचं
३) मॅजिक म्हणजे एकदम मजा आणि सोपं हेच जेकेआर ने खोडुन काढलं.. त्यातही खूप शिकावं लागतं, नियम असतात, शिक्षा असतात, चांगलं-वाईट असतं, इ.इ. जेकेआरने दाखवुन दिल्याने आपल्या जीवनाशी रिलेट करता आलं आणि त्यामुळेच जास्त आवडलं.. मॅजिकमधल्या थिअरिज वगैरे मुळे फॅन्टसी असुन्सुद्धा वास्तवाच्या जवळ जाते गोष्ट...

बाकीच्यांची हॅपॉ आवडण्याची किंवा न आवडन्याची कारणे जाणुन घ्यायला आवडेल Happy

ओऽहो,

क्या बताउं के क्या आलम था (त्या उ वर चंद्र कसा द्यायचा)
एक हॅरी था, एक हम थे,

जिंदगी हॅरीके कारनामों के सायेतले पनप रही थी कुछ ऐसे
के बेमौसम बरसात होती थी

हर किताब का रुख देखतें तो ये सुकुं मिलता
के आँखे नम होती थी

हमारे छोटेसे बौने दिलमें फिराक भरदी आपने
के कुछ जादू के हसीं छीटें, हमपें भी एहसानमंद हो

आपको पढा तो, ताकते रह गये हम आप को आईनेमें,
हाँ, शायद हम भी कभी बेहिजाब थे

(आय नो, आय नो, हा असली फॅनसारखा मॅडपणा आहे. पण मरुदेत.!!!) Proud

केदार- होहोहोहोहो. हॅपॉपटांना सिनेमे म्हणणे म्हणजे फॉलला साडी म्हणण्यासारखे आहे. Happy
ते त्यावर'बेतलेत' एवढेच. (काय उपमा!! कचरा!!!!) Proud
(अजून बकवास करंट्या उपमा सुचायच्या आत मी इथुन कटावे हे उत्तम)

चिमुरी- ते सतत वाचण्याचे वर्णन खतरा आहे.
चिंगे- सेमपिंच.

रैना ______________/\_______________

हॅपॉपटांना सिनेमे म्हणणे म्हणजे फॉलला साडी म्हणण्यासारखे आहे. स्मित
ते त्यावर'बेतलेत' एवढेच. (काय उपमा!! कचरा!!!!) >>>>>>>>>>>>> Rofl

है, है, हम भी हरी पुत्तर के फॅन है! Happy मी सर्व पुस्तके वाचली नाहीत अजून... पाच, सहा व सात क्रमांकाची राहिली आहेत. पण मला लहान हॅरी पॉटर सर्वात जास्त आवडलाय आजपर्यंत. सिनेमे थ्येटरात नाही पाहिले, त्याचे पाहिलेले बहुतेक सर्व चित्रपट टी व्ही वर पाहिलेत. पण अगदी पारायणं झालीत त्या सिनेमांची. मी पुस्तक व पिक्चर यांचा आपापसात संबंध लावत नाही, त्यामुळे दोन्ही एन्जॉय करता येतं.

मला हॅरी पॉटर आवडण्याच सर्वात मोठ कारण म्हणजे त्यातली सुसूत्रता . पहिल्या भागातील कितीतरी गोष्टीच महत्त्व पुढच्या अगदी शेवटच्या भागात कळत . केवळ "Goblet of Fire" सोडला तर प्रत्येक गोष्ट कथेला पुढेही नेते आणी मागेही जोडते .
पुन्हा , दुसर म्हणजे स्नेप च कॅरेक्टर. ९५% कथा संपली तरी तो कसा आहे हे कळत नाही . तेही जादूच्या दुनियेत . अप्रतिम !!!

पहिल्या भागातील कितीतरी गोष्टीच महत्त्व पुढच्या अगदी शेवटच्या भागात कळत .>>>> अगदी....

बॅक रेफर करायला जाम मजा येते...

रोलिंग बाईनी अगदी प्रतिसृष्टी निर्माण केलीय. त्यात देशोदेशीच्या मिथकांतल्या कल्पना वापरल्यात (की सगळीकडे त्याच कल्पना असतात? राक्षस, अमृत,भविष्यवाणी ,इ.इ.)
त्यातल्या मॅजिकपेक्षा कथा , व्यक्तिचित्रणासाठी , फिलॉसॉफीसाठी (मोठा शब्द वापरला का?) पण आहेत काही काही वाक्य ....लहान असतो तर वहीत टिपून ठेवली असती अशी. नेव्हिल लाँगबॉटमबाबत : आपल्या शत्रूंशी सामना करायला लागतं त्यापेक्षा जास्त धैर्य दोस्तांच्या विरोधात उभं ठाकायला लागतं.
आणि डम्बलडोरचं ते यंग अँड ओल्ड बद्दलचं...सावकाशीनी शोधून लिहितो.

मी अलीकडेच वाचले की अख्खी पॉटर स्टोरी रोलिंगबाईंनी आधी फक्त स्नेपचे काम करणार्‍या अभिनेत्याला संगितली होती.
चित्रपट अर्थातच फारसे आवडले नाहीत. क्विडिच/शच्या मॅचेस आणि गॉब्लेट ऑफ फायरमधली ड्रॅगनशी पकडापकडी तर अजिबात नाही.

मी शेवटली दोन इथून घरबसल्या मागवली.
http://www.infibeam.com/Books/search?q=potter%20harry%20english%20paperback
दुकानात कुठली मिळायला? नीट कव्हरं घालून ठेवलीत.
आता इबुकं पण येतील ना?

पहिल्या सहा पुस्तकांत प्रत्येक प्रसंग हॅरीभोवतीच घडतो. पण सातव्या पुस्तकाची सुरुवात मात्र जरा वेगळी आहे : मगल पंतप्रधान आणि मिनिस्टर ऑफ मॅजिकच्या भेटीचा.
पहिल्या भागात बेटावरून हॅरीच्या मावशीचे कुटुंब परत घरी कसे येते आणि डडलीचे शेपूट कसे निघते याचे मला कुतूहल आहे. बाकी कुणी मगल्सनी मॅजिक पाहिलं तर मिनिस्ट्री त्यांची मेमरी रिपेर करते, पण डर्सलेज एक्सेप्शन.

मगल पंतप्रधान आणि मिनिस्टर ऑफ मॅजिकच्या भेटीचा>>>>> हे सहाव्या भागात आहे का? सातव्यात नक्कीच नाहिये.. सातव्याची सुरुवात स्नेपपासुन होते..

पहिल्या भागात बेटावरून हॅरीच्या मावशीचे कुटुंब परत घरी कसे येते आणि डडलीचे शेपूट कसे निघते याचे मला कुतूहल आहे.>>>> कुटुंब घरी परत कसे येते माहित नाही... पण ते लोक दुरच्या एका खाजगी डॉक्टरांकडुन त्याचं शेपुट काढुन टाकतात, सर्जरीने.. याचा उल्लेख आहे कुठेतरी आता नीट आठवत नाहिये कुठे ते

आता इबुकं पण येतील ना?>>>>>>>>>>>> सॉफ्ट कॉपिज आहेत बर्‍याच लोकांकडे..

>>>....अख्खी पॉटर स्टोरी रोलिंगबाईंनी आधी फक्त स्नेपचे काम करणार्‍या अभिनेत्याला संगितली होती.
नाही. तिने पूर्ण स्टोरी नाही सांगितली. इथे वाचा...
http://www.the-leaky-cauldron.org/2011/7/30/alan-rickman-talks-playing-s...

मी पण! मी पण!!

रैना, काव्य मस्तच! चिमुरी वाचण्याचे वर्णन जबरी!
भरत, जे मगल्स नातेवाईक असतात - एका घरात राहणारे, त्यांची मेमरी ठेवतात. उदा हर्मायनीचे आईबाबा.

माझी सगळी पुस्तके भारतात आहेत. Sad इकडून तिकडे सगळी पुस्तके शिप केली तेव्हा गेली. त्यानंतर वजनामुळे परत आणता आली नाहीत. (पण त्यामुळे सुरक्षित आहेत)
इबुके आहेत का कुठे?

होहो चिमुरी म्हणिंग राईट . सर्जरीने काढुन टाकतात ते शेपुट. पहिल्या भागातच आहे. Happy
नेव्हिल लाँगबॉटमबाबत >> डंबलडोर असे म्हणतात ना? Happy

प्रतिसृष्टी- अगदी अगदी भरत आणि केदार- कंटिन्युईटीला सलाम. अनुमोदन.

मला काय आवडते (वर झालेलेच मुद्दे पुन्हा लिहीत नाही) तरीपण प्रतिसृष्टी आणि कंटिन्युईटी हे त्यात अग्रक्रमावर.
तसेच
- विनोदबुद्धी, खासमखास इंग्रज विनोद (स्वच्छ पण मस्तं). आपण तर फिदा आहोत बॉ. काही पानं वाचली तरी अजून तितकेच ताजे हसू येते. उदा - कप्तान वुडसबद्दल मॅच हरल्यानंतर- we think he is trying to drown himself in the bathroom किंवा हॅरी कोकलत असतो तेव्हा- oh, its you harry.. we thought we heard your dulcet tones.
- डिटेलिंग. केवळ अफाट डिटेलिंग पीव्हज आणि डॉबी सकट सगळी बारीकसारिक पात्रे, ती भूतं (सर निकोलस), लुनी लव्हगुड, तिच्या वडलांचे क्विबलर, ती रीटास्कीटर.. हॅरी, हर्मायनी, रॉन, व्हॉल्डमॉर्ट आणि सर्व प्रमुख पात्रांबाबत तर बोलायलायच नको.
अगागागागागगा. मी पाया पडायला तयार आहे राऊलिंग काकुंच्या.
- हॅरी/रॉन/हर्मायनीचे वय. एकेका पुस्तकाबरोबर आपलेही वय वाढत जाते. उफ्फ्फ!! त्या त्या वयातील भावमुद्रा काय पकडल्यात रॉलिंगने.
- भाषा- इंग्रजी भाषेच्या प्रेमात न पडल्यास नवल.साधे स्पेल जरी घेतले तरी त्याचे लॅटिन रुटस, किंवा कुठलेशे संदर्भ. सॉर्टिंग हॅटची बदलत जाणारी गाणी. 'हाऊलर', 'रिमेंब्राल'- या शब्दांनाच दाद. शब्दप्रभु !!!!!!!
ब्युटी. ब्युटी !! _/\_
- आणि मोठ्यांमधील सर्व विरोधाभास प्रकर्षाने जाणवतो तो मुलांना. ते रॉलिंगने खूप सुरेख दाखवले आहे. गुणाअवगुणांसकट हॅरीचे वडील, डंबलडोर, हेग्रीड, सिरीयस, लुपिन बरीचशी मोठी माणसे त्याच्यापर्यंत पोचतात. आपल्या मित्रमैत्रिणींची बलस्थाने आणि वीकनेस दोन्ही त्याला समजत असते, उमजतही असते आणि vice versa.
उदा- Ron who called her an insufferable know-it-all at least once a week.. वगैरे कित्ती बारीक सारिक तपशील आपोआप येतात. माणुस आकाराला येतो. व्यक्तिरेखा जिवंत करणे याला म्हणतात..
- डंबलडोरचे ते मोठे भाषण आहे ना.. forgive me Harry वाले. कितीही वेळा वाचा. डोळ्यात पाणी येते.
- माझ्या डोळ्यासमोर राऊलिंगबाई येते कधीतरी. छोट्या मुलांची आई. कॅफेमध्ये एका कॉफीवर पोटभरत, वेळ काढणारी, लिहु पाहणारी बाई. आजूबाजूचे सर्व लोक असे हैरान झाले असतील, की अरे हा जादुभरा पंछी आपल्या मध्यात होता, दिसला डोळ्यांना.. आपल्या डोळ्यासमोर इतिहास घडला!! असो. लै झाले.

Truly, Thank you Ms Rowling!!! From the bottom of my heart, for sprinkling a bit of magic in our muggle existence, ordinary as it is ! For years, I laughed and cried with Harry, grew inch by inch with him and his friends. Till I met you, thought that fantasies were 'infradig', that I was too old and cynical to truly appreciate you. But read one... and the rest is history!
Never looked back. (Well I did..to be honest..) Glad to have known you maam. Year's later you are still my 'Sunday meal and afternoon rest'. I thought, that love would not last forever, I was wrong (Apologies Auden for taking a bit of liberty with your line. I will return it. Love you too!) If my mind had a mantelpiece Ms Rowling, you would occupy a big frame ! Now, my little one loves you too, and I think 'all is well with the world' !

(When you are younger you appreciate the content,the plot, the magic and once older you appreciate the style, the craft, the magical existence. Please (Atheist)God, don't let me grow out of HP books !) Proud

काय आवडत नाही.
- स्पेल थोडे अजून हवे होते बॉ. काय त्या साध्यासाध्या स्पेलनी हॅरी कधीकधी प्रतिस्पर्ध्यांना हरवतो. expelliramus चा तर कंटाळ आला सातव्याभागापर्यंत. ऐसा क्या रे !.
- थोड्याश्या, अगदी थोड्याश्या ऑबवियस गोष्टी. म्हणजे ग्रिफिंडोरला नेहमी प्रत्येक वर्षी अगदी शेवटी जास्त पॉईंटस मिळणे वगैरे. आणि शेवटची बॅटल. माझ्या डोळ्यासमोर महाभारत होते. आन हिकडे..
असो. मुलांचे वय पाहता शक्यही नव्हते म्हणा. पण epic होताहोता राहिले की हो असे वाटले खरे.
- रॉन flinched, अम्का flinched, तमका flinched वगैरेचाही कंटाळ यायला लागला नंतर. व्हॉल्डमॉर्टमध्येही थोडेसे रंग भरायचे राहुन गेले का काय असे कधीकधी वाटते.

येताय का हॅरीपॉटरपार्कात?? या या! आमच्या फ्लोरिडात या. युनिव्हर्सल स्टुडिओजच्या आयलंडस ऑफ अ‍ॅडव्हेंचर पार्काचा हा एक भाग आहे. (अगदी ४-६ वर्षांच्या बालकांसाठी, पॉटर बघायचा नसेल तर डॉ. सूस अट्रॅक्शनपण आहे.) बटरबियर प्यायची असेल तर मात्र दोनदा विचार करा. कुटुंबातले ३-४ मिळून आधी घोटभर पिऊन बघा. विचित्र गोड चविची बबि पूर्ण पिववत नाही. Proud

तिथलं हॉगवर्ट्स, वाँडशॉप, रॉनने उडवलेली मोटरकार, ड्रॅगन रोलरकोस्टर बघण्यासारखं आहे.

रैना भारी लिहिलं आहेस Happy
कॉफी शॉप मधल्या रोलिंग बद्दलतर अगदी अगदी.
रच्याकने ज्यांना हॅपॉ मधली प्रतिसृष्टी आवडते त्यांच्या साठी अजुन हि एक रेकमेंडेशन सिरिज आहे.
याचीही सात पुस्तके आहेत. पहिले पुस्तक सॉलिड धक्का देते, पर्‍यांबद्दलचे आपले टोटल कन्सेप्ट्स अ‍ॅडजस्ट करताना वेळ लागतो. इथे कुणी आधीच वाचले असेल नंतर याचा वेगळा धागा काढु Wink

सॉरी हा धागा हायजॅक करायचा नाही, फक्त असे लेखन आवडणार्‍यांसाठी एक सजेशन आहे Happy

अरे होकी स्वप्नाली. Artemis Fowl बद्दल ऐकलय. एकदा वाचायला हवयं. थँक्यु. Happy

ए हो मलाही धागा हायजॅक वगैरे करायचा नाहीये. सांगीतले ना लेख लिहीणार होते म्हणून. अगदीच राहावले नाही आज. कोणालाही आक्षेप असेल तर बिनधास्त सांगा. मी उडवते इथुन लगेच. Happy

मृदुला- पॉटरबुक्स घरी ? Happy

मृ- हायला... बटरबियरची चव मस्त नाही? Sad Wink

>>मृदुला- पॉटरबुक्स घरी ?
अगं मी इंग्लंड सोडून भारतात परतले होते ना, तेव्हा पाठवली. २ महिन्यात परत परतले तेव्हा आणता आली नाहीत.

बाकी, अझ्कबान माझे सगळ्यात आवडते आहे.

डेथली हॉलॉज विकत घेतले त्याच रात्री वाचायला सुरुवात केली. हॅरी बथिल्डाच्या घरी जातो तेव्हा करकरीत मध्यरात्र होती. आणि अचानक जोरदार वारा सुटला. भयंकर घूंघूं आवाज! मी घरी एकटीच. जरावेळ न वाचता घाबरून गप्प बसले, तर अचानक खालून लॅच उघडून कोणीतरी घरात घुसल्याचा आवाज!! बापरे. पाचावर धारण वगैरे परिस्थिती. आणि मग खालून माझ्या हाउसमेटने विचारले, 'मृ, अजून जागी आहेस का?' ती नर्स असल्याने अशी रात्री बेरात्री घरी यायची. हुश्श झाले. तरी नक्की सिल्विया आहे की तिच्या आवाजात दुसरे कोणी असा बारीक विचार आलाच! Biggrin

मी सुद्धा फॅन क्लबात..मीच नाही माझी आई सुद्धा...
पण मी सभासदत्व जरा उशीराने घेईन...
मी हॅपॉचे सगळेच्या सगळे भाग फ्रेम टू फ्रेम पाठ होईपर्यंत पाहिले..पण एकदाही पुस्तक वाचले नाही...आणि आत्ता या वाढदिवसाला कलिग्जनी माझे हॅपॉ प्रेम पाहून आख्खाच्या आख्खा सेट दिलाय आणि त्याबरोबर ऑडीयो बुक्स सुद्धा...
धपाधप पुस्तक संपवतो आणि सामिल होतो

>कलिग्जनी माझे हॅपॉ प्रेम पाहून आख्खाच्या आख्खा सेट दिलाय आणि त्याबरोबर ऑडीयो बुक्स सुद्धा...>>> असे कलिग्ज मिळावेत म्हणून कोणता स्पेल वापरायचा म्हणे? Happy मज्जाय!

Pages