.

Submitted by .. on 2 August, 2011 - 10:10

. इथला मजकूर काढून टाकला आहे. क्षमस्व. .. .. .. ..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोघेही न विसरता IDP आणा. बाकी माहिती बे एरियाकर देतीलच Happy

किचनसाठीचे काय काय सामान आणावे - कुकर, पोळ्यांचा तवा, पोळपाट-लाटणे, डोसा वगैरेंचा सपाट तवा, भांडी, डिनर सेट (हा तिथेच घ्यावा का?), क्रोकरी, स्वैपाकाची भांडी, कढया, सामानाचे डबे, कटलरी >>>> जे टिपिकल देसी सामान आहे उदा: इडली स्टँड + त्याचा स्टीमर, पोलपाट लाटणे, तवे, प्रेशर कुकर असे आणावे. तसेच आल्या आल्या लागणारे- चहाचे भांडे, गाळणी, सोलकाडी, मुलींचे काही खास दूध प्यायचे ग्लास, ताटं वगैरे. बाकी इथे आल्यावर घेता येइल.

अर्थात शिपिंग कंपनी देणार असेल तर तुम्ही त्याप्रमाणे ठरवू शकाल.

गुड लक Happy

इलेक्ट्रिकचे कुठलेच सामान नेऊ नकोस. कारण तिकडे सगळं ११० व्होल्ट्स वर चालतं. आपल्याकडे ते २२०-२४० व्होल्ट्स असं आहे.

IDP म्हणजे काय ?
सिंडी, चिमण, थँक्स. Happy
ओके सिंडे, महत्त्वाचं सांगितलंस सामानाचं, थोडक्यात बरंचसं किचन आणायला हवंय. हो, शिपिंग कंपनी देणार आहे, त्यामुळे बरेच सामान आणू शकू.
चिमण, अ‍ॅडाप्टर वगैरे इथून आणलं तर, नाही उपयोग होणार का ?
(आता हा सगळा संसार कुठे ठेवायचा हा प्रश्न आहे, परत तिकडे त्यात पैसे घालवायला लागतील.)

माझ्या मैत्रिणीने किचनमधल्या सामानतच मिक्सरही आणला होता. अ‍ॅडॉप्टरसहित. कारण इडली पीठ, बारीक चटण्या वाटणं वगैरे इकडच्या मिक्सीत होत नाही म्हणून. आणि इथे तिला देसी मिक्सर मिळाला नाही म्हणून एका भारतवारीत तिने हे मॅनेज केलं.
मिळत असेल तर तो नाही आणला तरी चालेल, फक्त मग एकदा कन्फर्म करायला हवं.

IDP म्हणजे इंटरनॅशनल ड्रायव्हिंग पर्मिट, हे आपल्या आर्टीओ मधे एक फॉर्म भरून मिळतं. ते असलं की बर्‍याच देशात गाडी चालवता येते.

नुसत्या अ‍ॅडाप्टरचा उपयोग नाही कारण ११० व्होल्ट स्टेप-अप ट्रान्सफॉर्मरने २२०-२४० मधे न्यायला पाहीजे. थोडक्यात प्रत्येक उपकरणासाठी एक स्टेप-अप ट्रान्सफॉर्मर हवा ज्याचं इनपुट व्होल्टेज ११० आहे आणि आउटपुट २२०-२४० च्या मधे.

>> आता हा सगळा संसार कुठे ठेवायचा हा प्रश्न आहे
भारतातलं घर तुझं स्वतःच असेल तर आत ठेवून दे. नाहीतर काही साईट्स आहेत त्यावर विकता येईल.

ओके चिमण. Happy
स्वतःचं घर बंगलोर मधे तर नाहीये. बघूया आता. कार, बाईक पासून बर्‍याच गोष्टी आहेत. टीव्ही अगदीच नवा आहे, फ्रेंड सर्कल मधेच जातोय का बघावे लागेल. सगळे पुण्याला नेणे पण अवघड आहे. साईट्स वर योग्य किंमतीला विकल्या जातात का वस्तू ? माझ्या मैत्रिणीने तर सरळ जस्ट्-डायल ला फोन करुन सेकंडहँड डीलर ला बोलावले होते, २-३ तासात काम झाले म्हणे. पण पैसे खूपच कमी मिळाले.
चिमण कुठल्या साईट्स ते सांगणार का प्लीज ?
प्रज्ञा, मी इंटरनेट वर पण वाचले मिक्सर नेतात लोक असे. अजून कोणाला अनुभव आहे का ? माझ्याकडे मिक्सर नाहीये, महाराजा व्हाईटलाईन चा फूड प्रोसेसर आहे.

मवा सुमीत( अजून आहे का ती कंपनी?) ,प्रिया अशा कंपनीजचे खास अमेरिकेत चालतील असे मिक्सर मिळतात. कन्व्हर्टर वगैरे लागत नाही. माझ्याकडे सुमीतचा आहे. जनरली दुकानात हे मिक्सर नसतात. ऑर्डर दिली की दुकानदार आणून देतो. चार ठिकाणी चौकशी कर (वेळ असेल तर) कारण अमेरिकेत नेणार म्हटलं की अव्वाच्या सव्वा किंमत सांगतात कधी कधी दुकानदार. हा अर्थात माझा ६ वर्षांपूर्वीचा अनुभव आहे.

मवा काही कंपन्या फूड प्रोसेसर, मिक्सर ११० व्होल्ट चा बनवुन देतात. तु जिथुन घेतला आहेस तिथे करुन देत असतिल तर विचार. इथे तिकडून आणलेलाच जास्ती चांगला. आपल्या गोष्टी इकडच्या मिक्सर वर व्यवस्थित होत नाहीत.
मी पण आता भारतवारीत घेउन येणार आहे.

प्रज्ञा, सुमीतचा मिक्सर मिळायचा बंद झाला होता मी शोधलं तेव्हा. अगदी अलिकडे बंद झाला असावा.

सगळ्यांना धन्यवाद माहीतीसाठी. Happy
अगदीच बेसिक वाटणारा एक प्रश्न आहे, प्रायवेट अन पब्लिक स्कूल्स मध्ये फी सोडून काय फरक असतो ? शाळा ठरवायला काय क्रायटेरीया असतात ?

नुसत्या अ‍ॅडाप्टरचा उपयोग नाही कारण ११० व्होल्ट स्टेप-अप ट्रान्सफॉर्मरने २२०-२४० मधे न्यायला पाहीजे. थोडक्यात प्रत्येक उपकरणासाठी एक स्टेप-अप ट्रान्सफॉर्मर हवा ज्याचं इनपुट व्होल्टेज ११० आहे आणि आउटपुट २२०-२४० च्या मधे.>> तुमची उपकरणे बघा काही उपकरणे dual voltage असतात तसे असेल तर तुम्हाला आणता येतील. चिमण्या, स्टेप अप का लागेल तिथले इथे वापरायला ? स्टेप डाऊन हवा.

बरं बाकीचे बरेच सांगितले आहे.

तुम्हाला २ मुली आहेत ना? तर २ बेडरूमचे घर रेंट करावे लागेल तसा बर्‍याच शहरांमधला नियम आहे इथे बे एरियामधे. क्युपर्टिनो भागात २ बेडरूम अपार्टमेंट्सची भाडी साधारण १८००+ डॉ. असतील. इथे शाळा तुमच्या अपार्टमेंटला जी ठरवली असेल तीच घ्यावी लागेल जर पब्लिक स्कूलला जाणार असाल तर (पब्लिक शाळा फ्री असतात). पण त्या शाळेत जर जागा शिल्लक नसेल ते दुसर्‍या शाळेत घालतात. ती शाळा पण जवळपास असू शकते. काही शाळांना स्कूलबसची सोय असते. पण असेलच याची खात्री नाही.

सनिवेल-क्युपर्टीनो भागात देसी दुकानांची रेलचेल आहे. घरचे मसाले, पापड, कुरडया वगैरे सोडले तर सोबत काहीही आणायची गरज नाही. पण तुम्हाला पहिले काही दिवस पुरेल इतके पीठ, तांदूळ, डाळी, पोहे, साखर, चहा वगैरे वाणासामान थोडे आणा असा सल्ला देईन. कारण तुमच्याकडे गाडी नसेल तर कोणाला तरी सामान आणायला मदत करायला सांगावी लागेल. तोवर तरी थोडेकाही सोबत असेल तर बरे.

चमचे, ताटे, वाट्या, पेले, कप, छोटा खलबत्ता, उलातणे, झारे, इडली पात्र, अप्पे पात्र, पोळपाट-लाटणे, कुकर अशा गोष्टी नक्की आणा. तुम्ही पहिल्याच दिवशी जाऊन डिनरसेट आणणार नाही हे लक्षात ठेवून पहिले १-२ महिने जे लागेल ते आणा. सगळ्यांना लागणारी औषधे वगैरे नक्की आणा.

इथे घराचे लीज साईन करताना डिपॉझिट द्यावे लागते. इथे आल्यावर ड्रायविंगचे क्लासेस घ्यावे लागतील त्यासाठी पैसे लागतील Happy हे सगळे येवढ्यासाठी लिहिते आहे कारण तशी सोय करून यावी लागेल.

अजुन कोणी मित्र इथे आहेत का? ते तुम्हाला काही मदत करू शकणार आहेत का? ते देखील विचारून ठेवा.

अजुन एक अ‍ॅनॉयन्स - इथे कलिग्स मदत करतील अशा अपेक्षेने येउ नका. एकदा ऑफिसमधून बाहेर पडलात की तुम्ही तुमचे आम्ही आमचे अशी परिस्थिती असते. Sad काही भारतीय लोक नक्की मदत करतील पण काही आपण या गावचेच नाही हेही दाखवतील ...

सप्टेंबरपासून थोडा गारवा सुरु होईल. नोव्हेंबर डिसेंबरपासून पाऊस पडायला लागेल, थंडी वाजेल. त्यामुळे पुरेसे स्वेटर्स आणा. मोजे, बुट नक्की आणा. घरी असेलच तर छत्री पण आणा Happy

आजुबाजुला शेजार देसी असण्याचे चान्सेस बरेच आहेत ... Happy

त्या भागातील काही अपर्टमेंट्स -
व्हॅली ग्रीन
विला सेरा,
ग्लेनब्रुक,
कॅस्केड
मॅक्लेलन टेरेस
अजुन काही माहिती असेल तर विचारा ...

वर भरपूर गोष्टी सांगितल्या आहेत.

सध्या आमच्याकडे असलेल्या या वस्तूंपैकी कुठल्या न्याव्या - (शिपिंग आहे)
सोफा, मास्टर बेड, बंक बेड, LED Tv, म्युझिक सिस्टीम, फूड प्रोसेसर, शूज रॅक, डायनिंग टेबल, कंप्युटर-कम-स्टडी टेबल, सीडी प्लेअर. >>>>

सोफा, मास्टर बेड, बंक बेड,(जर जोडणीचा/सुटा करून ठेवता येणारा असेल), शूज रॅक, डायनिंग टेबल, कंप्युटर-कम-स्टडी टेबल(जोडणीचा) घेऊन या. खुप बचत होईल. पण अपार्टमेंट साईझ व फर्निचर डायमेंशन जमायला हवे. अपार्टमेंटच्या वेब्साईट वरून साईझ समजेल.

डिनर सेट (हा तिथेच घ्यावा का?)>>>> घेऊन आलात तर उत्तम.

बे-एरीया चे साधारण हवामान कसे असते ?>>> सध्या गर्मी आहे. पण आत हिवाळा येईल दोन महिन्यात. खुप थंडी असेल, तेंव्हा थंडीचे कपडे जरुर घ्या. तसेही इकडे आल्यावर विकत घेता येतील इथल्या फॅशन प्रमाणे.

आता सणावळीला (गणपती, जन्माष्टमी, दसरा, दिवाळी) सुरूवात होईल, जर इथेच साजरे करणार असाल तर पुजेचे साहित्य (इथे खुप महाग आहे) आणा.

यूज्ड कार विकत घेणे, चालवायला शिकणे, दोघांचे लायसन्स मिळवणे या गोष्टींसाठी किती वेळ लागतो ? लायसन्स साठी काय काय लागते ? >>>

लायसन्स साठी प्रथम DMV (डिपार्ट्मेंट ऑफ मोटर वेहिकल) मधे जाऊन लेखी परिक्षा द्यावी लागते. ज्यात इथल्या वाहतुकीचे सर्व नियम समजलेले आहेत का हे तपासले जाते.
ती परिक्षा पास झाल्या नंतर एक तात्पूरता (शिकाऊ) वाहन चालक परवाना मिळतो. तो परवाना मिळाल्या नंतर दोन महिन्यांच्या आत प्रात्यक्षिक परिक्षा देउन कायम* स्वरुपी परवाना मिळेल.
जर खुप तत्परता दाखवली तर या सर्व गोष्टींना जवळ-जवळ १-२ महिने लागतील.

>>तिथल्या नियमांप्रमाणे मुली कुठल्या ग्रेड मध्ये जातील ? शाळाप्रवेशांसाठी मुलाखत असते का ?

मोठी १ लीत असेल इथल्या नियमांनुसार. तिला पब्लिक स्कूलला घालता येईल, जी फ्री असते. कूपरटिनो मधील शाळा छान आहेत. तसेच फ्रिमाँटच्या शाळा पण छान आहेत. दोन्हीकडे खूपचखूप देसी पब्लिक आहे त्यामुळे मुलींना अ‍ॅडजस्ट व्हायला पण सोपे जाईल.
छोटीला प्रायव्हेट प्रिस्कूल हाच पर्याय आहे.
मोठीच्या शाळेच्या प्रवेश अर्जावर घरी बोलली जाणारी भाषा काय आहे असा प्रश्ण असेल. त्यावर आपण इंग्रजी व्यतिरिक्त कुठलीही भाषा लिहीली की "English Language Fluency" test मुलांना द्यावी लागते. त्यात त्यांना थोडं लिहीणे, वाचणे, बोललेले समजणे अशा गोष्टींवर test करतात. शेवटी १ ते ५ रँकींग देतात. १ - सर्वात कमी, ५ सर्वात जास्त. कुठलंही रँकींग मिळालं तरी प्रवेश मिळतोच. फक्त शाळेतच अठवड्यातून एकदा १/२ तास इंग्रजीचे क्लासेस घ्यायला लावतात. माझ्या मुलींना पण घ्यायला लागले होते हे क्लासेस, फायदाच होतो त्याचा.
हे सोडता वेगळी मुलाखत अशी नसते. पण मिनोती म्हणली तसं ईथे शाळेत जागा नसेल तर दुसर्‍या शाळेत पाठवतात. त्या शाळाही तशा चांगल्याच असतात (स्वानुभव).

वा वा घेतला का निर्णय Happy

प्रायव्हेट वि. पब्लिकः
१. प्रा - कोणत्याही शाळेत घालू शकता. पण अ‍ॅडमिशन सहज मिळेल असे नाही (फेब्रु-मार्चच्या सुमारास घ्यावी लागते). पः जेथे राहता तेथील जवळची शाळा "स्कूल डिस्ट्रिक्ट" ठरवतो.
२. फी - $१२००-$१४०० महिन्याला (चॅलेंजर, स्ट्रॅटफोर्ड ई), फुल टाईम. आठवड्यातून तीन दिवस किंवा हाफ डे शाळेला त्यापेक्षा कमी. पः नो फी. शाळेचे इतर किरकोळ खर्च या कॅल्क्युलेशनमधे येण्याएवढे मोठे नसतात.
३. सुट्ट्या: प्रायव्हेटला काही बंधन नाही. फक्त खूप शाळा बुडाली तर पुढच्या ग्रेड (ईयत्ता) ला जाता येणार नाही वगैरे कधी कधी सांगितले जाते. आमच्या ओळखीच्या एकांना सांगितले होते. पण प्रत्यक्षात केले नाही. पः दोन आठवड्यांपेक्षा जास्त शाळा सलग बुडाली तर नाव काढून टाकतात. मग पुन्हा अ‍ॅडमिशन घ्यावी लागते - त्यात खर्च काही नसतो, पण डिस्ट्रिक्ट तेथेच पुन्हा देइल असे नाही. त्यामुळे रूटीन बिघडू शकते.
४. दर्जा - कुपर्टिनो, फ्रीमॉण्ट चा काही भाग - येथे फार फरक नाही. प्रायव्हेटला अनावश्यक प्रेशर आहे हे माझे मत. अभ्यास (होमवर्क) प्रायव्हेटला जास्त असतो. पब्लिकला खूप कमी, पण तरीही चांगल्या शाळांत शिकवणे खूप छान असते.
५. केजी च्या आधीपर्यंत फक्त प्रायव्हेटच असते. केजी पासून पब्लिक पर्याय आहे.
६. कोणत्या ग्रेड ला प्रवेश मिळेल हे जन्मतारखेवर असते भारतासारखेच पण कट-ऑफ तारखा वेगळ्या आहेत. यात "ग्रेड" म्हणजे ईयत्ता. दर्जा नव्हे. हे एक लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.

स्कूल डिस्ट्रिक्ट ची वेबसाईट पाहून त्यांना येथून फोन कर. व्यवस्थित माहिती मिळते.

मिनोती, एकच दुरूस्ती - कुपर्टिनो मधल्या "जवळ चांगल्या शाळा, चांगली अपार्टमेंट्स" या कॉम्बिनेशनला दोन बेड दोन बाथ ची रेण्ट्स निदान एप्रिल-मे पर्यंत तरी $२२००-$२४०० होती.

आता शाळेच्या व ऑफिसेस च्या दृष्टीने बे एरियातील टाउन्स बद्द्ल थोडे:
एकदा तेथे रूळलात, कार्स वगैरे सगळे रूटीन चालू झाले की कोठे राहायचे हे तुम्ही तुमच्या चॉईसने ठरवू शकता, पण सुरूवातीला ऑफिस, ग्रोसरी व इतर दुकाने, देशी दुकाने आणि शाळा यांच्या जवळ असणे सोयीचे.

साउथ बे: सॅन होजे, सॅण्टा क्लारा, सनीवेल, कुपर्टिनो, कॅम्पबेल, माउंटन व्ह्यू हे भाग. यात कुपर्टिनो, सनीवेल येथे भारतीय व इतर "एशियन" लोक भरपूर. बे एरियातील बरीचशी ऑफिसेस साउथ बे मधून जवळ पडतात. पण इन्फोसिस, कॉग्निझंट वगैरे सर्व्हिस कंपन्यांत असाल तर "ऑफिस" हे सहसा क्लायंट्चे असते, ते कोठे असेल सांगता येत नाही, व काही दिवसांनंतर वेगळे असते.
गूगल, सिस्को, याहू, सिमॅण्टेक, इंटेल, एएमडी, अ‍ॅपल, एचपी ई, ओरॅकल ची सन व हायपीरियन ची ऑफिसेस येथून जवळ आहेत. हायवे १०१ किंवा ८५ किंवा २८० च्या जवळ ऑफिस असेल तर हा एरिया सोयीचा.
ईस्ट बे: फ्रीमॉण्ट, प्लेझंटन, सॅन रमोन. मिलपीटस साधारण मधेच आहे पण सध्या येथे धरू. फ्रीमॉण्ट मधे काही शाळा चांगल्या आहेत. सॅन रमोनमधेही चांगल्या आहेत असे ऐकले आहे. पूर्ण माहीत नाही.
येथून कोणतेही ऑफिस फार जवळ नाही हे जनरली बरोबर असावे. काही अपवाद असतील. फक्त पूर्वीचे पीपलसॉफ्टचे ऑफिस (आता ओरॅकल) प्लेझंटन ला आहे. मिलपीटस ला असाल तर सिस्को जवळ आहे.
मात्र खुद्द सॅन फ्रान्सिस्को शहरात जर जायचे असेल तर येथून ट्रेन आहे (साउथ बे च्या काही भागातूनही आहे)
पेनिन्सुला: पॉलो ऑल्टो, रेडवुड सिटी, फॉस्टर सिटी ई. पॉलो ऑल्टो मधे काही शाळा चांगल्या आहेत, पण बाकी ठिकाणची मला फारशी माहिती नाही.
येथूनही गूगल, फेसबुक, ओरॅकल, सेल्सफोर्स.कॉम, एचपी (पॉलो ऑल्टो ऑफिसेस) ई जवळ आहे. मात्र बॉयोटेक्नॉलॉजी मधे असाल तर त्या कंपन्या येथेच जास्त आहेत.

खुद्द सॅन फ्रान्सिस्को मधे भारतीय फार राहात नाहीत. इतर ठिकाणी राहून ट्रेनने जातात.

बेकर्सः काही चुकले असेल माहिती दुरूस्त करा, व आणखी द्या Happy

अमोल, रेंटबद्दल बरोबर आहे Happy मी नंतर रेंट.कॉम वर शोधत होते तेव्हा कळले पण मग दुरुस्त करायला वेळ झाला नाही.
मवा, मला कधीही इमेल करा. शाळांव्यतीरिक्त बाकीची मदत नक्की करू शकेन. शाळांबद्दलपण माहिती आहे पण इतकी डिटेलमधे नाही.

मवा मला घरचे सामान हवे होते कारण मला जाने-फेब मध्ये माझा मुंबईचा फ्लॅट फर्निश करायचा आहे. कुठे डील जमले नाही तर सांगा. सर्व नवीन घेण्यापेक्षा मला स्वस्तात पडेल. तुमचे कुठे गेले नाही तर मला सांगा.
खूप उपयुक्त माहिती. आणि बेस्ट ऑफ लक.

व्यवस्थित माहीती दिल्याबद्दल सगळ्यांचे शतशः आभार. Happy

असामी, dual voltage चेक करते, चांगली माहीती.

मिनोती, खूपच चांगले सांगितलेयस तू (मला पण तू च म्हण. :)) कोणते सामान आणायला लागेल ते.
मित्रांबाबत - नवर्‍याचे मित्र भरपूर आहेत, १०-१२ वर्षांपासून तिकडे असलेले, पण त्यांना सध्या तरी काही विचारत नाही आहोत. मागच्या २ वेळेंना आमचे जायचे चालले होते तेव्हा त्यांच्याशी बोललो होतो, पण नंतर आम्ही जाणे काही पर्सनल कारणांनी कॅन्सल केले, त्यामुळे संकोचाने (खरे तर तसे काही कारण नाही इतके ते जवळचे होते पूर्वी, पण उगाचच) यावेळी त्यांना नाही संपर्क करत आहोत. शक्यतो तिकडे गेल्यावर पण मदत मागायला नको असेच ठरवून तयारी करायची आहे, आता बघू.

टिल्लू, उपयुक्त माहीती. मास्टर बेड, बंक बेड सगळे डीसमँटल होणारे आहे, त्यामुळे इथून आणू शकू. पण तिकडे ते जोडायला कोणी मिळते का, की आपण आपले करायचे ? कारण बंक बेड खूपच अवजड आहे जोडायला, इथे पण ३ जण आले होते जोडायला. कंप्युटर टेबल पण तसेच सुटे होण्याजोगे आहे.
पण अपार्टमेंट साईझ व फर्निचर डायमेंशन जमायला हवे. अपार्टमेंटच्या वेब्साईट वरून साईझ समजेल.>>> पण म्हणजे अपार्टमेंट इथूनच ठरवून यावे लागेल का ? शाळा बघून मग त्या भागात अपार्टमेंट पहावे लागेल ना ?

राखी, इथल्या नियमांप्रमाणे ती जून २०११ मध्ये ६ पूर्ण नसल्याने सीनीयर केजी मध्ये आहे. ती सप्टेंबर एंड ला ६ पूर्ण होईल. मग सिनीयर केजी पूर्ण करावे लागेल का आधी तिथे यावर्षी ? शाळांना आज इमेल करुन विचारेन.
लँग्वेज चं महत्त्वाचं सांगितलंस.

फारएण्ड, थँक्स, कंपनी सनीवेल मध्ये आहे, नक्की पत्ता व कंपनीचे नाव तुला इमेल मधून कळवते मग तुला सांगता येईल. आत्ता तू सांगितलेले सगळे एरीया हायवे वगैरे माझ्या डोक्यावरुन गेले. Happy

प्रॅडी, चांगला धागा दिलास गं, मला नव्हता हा माहीत.

अमा, नक्की सांगेन. इथे आमचे घर असते तर सामान घरातच ठेवले असते २ वर्ष. आता ठरले की तुम्हाला सांगते.

>३. सध्या आमच्याकडे असलेल्या या वस्तूंपैकी कुठल्या न्याव्या - (शिपिंग आहे)
सोफा, मास्टर बेड, बंक बेड, LED Tv, म्युझिक सिस्टीम, फूड प्रोसेसर, शूज रॅक, डायनिंग टेबल, कंप्युटर-कम-स्टडी टेबल, सीडी प्लेअर.

माझ्या मते जरी शिपिंग फ्री असेल तरी यातल्या बहुतेक गोष्टी (१-२ सोडून) भारतातून आणणे योग्य ठरणार नाही. कारण इथे असणार्‍या वस्तू Standardize असल्याने इतर सगळ्याच गोष्टी घेणे सोपे होते. उदा. Queen Bed असेल तर त्याला योग्य चादरी, कव्हर, गाद्या सगळे त्याच आकारात मिळू शकते. भारतातला आकार अगदी तसाच असेल असे नाही. इथे राहिल्यावर थोड्या इथल्या फॅशन, नवीन गोष्टि वापराव्या असे वाटणे नैसर्गिक आहे तेंव्हा तुम्ही इथे कष्टाने आणलेल्या गोष्टी जुनाट वाटू लागतील. मुलांना तर नक्कीच वाटतील. अशा वस्तू टाकून देणे नेहमीच सोपे असते असे नाही. बे एरियात माहीती नाहि पण उद्या जर एखादा मास्टर बेड फेकून द्यायचा झाला तर घरापासून कचरापेटी पर्यंत (अगदी कोपर्‍यावरच्या कचरापेटीपर्यंत) तो न्यायला पैसे देऊन माणसांची मदत घ्यावी लागली तर मला नवल वाटणार नाही. उदा आमच्या गावात अगदी काही महिन्यांपर्यत मोठे फर्निचर नेहमीच्या कचर्‍यात टाकायला बंदी होती आणि लांबवर एका Special ठिकाणी ते नेऊन द्यावे लागायचे. नवीन गाद्या घेतल्या तर आम्ही जुन्या फुकट घेऊन जाऊ अशी जाहिरात असते पण ते फक्त गाद्याच नेतात, बेड नाही.
माणसे जुळवायला मिळणे अवघड नाही पण त्यांना जे पैसे द्यावे लागतील त्यात इथे नवीन बेड येऊ शकेल. त्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्हीच करण्याची तयारी ठेवा.

जुन्या गोष्टी जितक्या पटकन टाकून द्यायची तुमच्या मनाची तयारी होईल तितकी लवकर अमेरिका तुम्हाला सुखाची होईल.

अजय शी सहमत. अमेरिकेत साईज मधले standardization प्रचंड आहे.
फेकून देण्याबद्दलही - जुन्या जड गोष्टी टाकणे अतिशय अवघड/खर्चिक आहे. काही काउंटी वर्षातून एक दोन दिवस 'पिक अप' देतात पण सगळ्या नाही. सनीवेल मधे डंपिंग सेन्टर आहे तेथे आपण नेऊन द्यावे लागते. तेथेही तो फुकट घेणार नाहीत.

मवा - तुमच्या बेडकडे एकदा बघ आणि हा आपण एक ट्रक स्वतः (चालवत) आणून त्यात तो लोड करून डंपिंग सेंटर ला तो घेउन जायचा आणि तेथे स्वतः उतरवून द्यायचा असे करावे लागले तर किती सोपे/अवघड आहे याची कल्पना कर Happy

मवा, बेड वगैरे जोडायला मिळेल पण तो खर्च जास्त वाटेल.
आयकीया मध्ये गेलीस तर ५,००० डॉलर्स मध्ये अख्खे घर सेट होउन जाइल.
माझ्या कडे रेको या ब्रँडचा भारतामधून नेलेला मिक्सर होता. तो ११० व्होल्ट्चा होता. त्यामुळे कव्हर्टर लावावा लागला नाही. मिक्सर ने जमले तर.
टीव्ही व बाकीचे इलेक्टॉनीक आइटम्स काही नेउ नये असे माझे मत आहे.
शिपींग आहे तर शक्य असेल आणि तुम्हाला लागत असेल तर कापसाची गादी घेउन जा. बेड तीथून घेणार असशील तर क्वीन साइझ किंवा किंग साइझ या मापानूसार बनवून घेउन जा. आयकीयाच्या साइटवर मापे मिळतील.
तुझ्या आवडत्या रंगाच्या कॉटनच्या बेडशिट्स पण नेउ शकतेस. मला त्या तीकडे महाग वाटल्या.
तसेच काही सँडर्ड साइझचे पडदेही नेउ शकतेस. खरतर घर घेतल्याशिवय माप कळणे अवघड आहे.

अजय, फारएण्ड, स्वाती, मोलाची माहीती दिलीत. धन्यवाद. Happy

इथे राहिल्यावर थोड्या इथल्या फॅशन, नवीन गोष्टि वापराव्या असे वाटणे नैसर्गिक आहे तेंव्हा तुम्ही इथे कष्टाने आणलेल्या गोष्टी जुनाट वाटू लागतील. मुलांना तर नक्कीच वाटतील. >>> हम्म महत्त्वाचा मुद्दा आहे. इथल्या घरातल्या सगळ्या नव्या वस्तू सध्या आम्हाला इथल्याप्रमाणे फॅशनेबलच वाटत आहेत (;)), पण तिथे नक्कीच त्या तश्या वाटणार नाहीत. मुलांना तर नक्कीच फरक पडेल. आधीच अ‍ॅक्सेंट, वर्ण, ह्या सगळ्याचा त्यांच्या मनावर थोडाफार का होईना परीणाम होईल, त्यात वस्तूंमध्येही फार वेगळेपणा नको. इथेच कुठेतरी ठेवणे किंवा विकणे याचा विचार करायला हवा.
मुळात इथून वस्तू आणायचा विचार करायचं मुख्य कारण होतं की नवर्‍याला लगेच ट्रॅवल सुरु करायचंय, त्यामुळे सगळं घ्यायला किती वेळ मिळेल माहीत नाही इतर कामांत. पण बरे झाले माहीती कळली आधीच.

सगळे घर सेट करणे (वस्तू), कार, घराचे डीपॉझिट, ड्रायविंग क्लासेस, आणि इतर गोष्टी यांसाठी अंदाजे किती खर्च येईल सुरुवातीला ?

स्वातीचे कॉटन बेडशीट बद्दलचे अगदी १००% मान्य मला तरी!! तेच पुढे वाढवून किचन टॉवेल, टर्किश टॉवेल पण आणा Happy सोलापुरी चादर देखील एखादी आणू शकाल.

इथे बे एरियामधे येणाअर असाल तर कापसाची गादी आणण्याची गरज नाही. इथे एक किंग्ज फुटॉन म्हणून दुकान आहे तिथे भारतातल्यासारखी गादी आणि भारतातल्यासारखाच बेड अगदी वाजवी किंमतीत मिळातो.
क्वीन साईझ बेड तुम्हाला साधारण ३००डॉ.-४००डॉ. पर्यंत मिळेल. अर्थात थोडे कमी जास्त होईल.

डीपॉझिट - ५०० ते घराचे एका महिन्याचे भाडे यापैकी काहीही असू शकते.
ड्रायविंग क्लासेस - ७५-१०० डॉ एक सेशन (१/५ ते २ तास) असे तुम्हाला किती सेशन लागू शकतील ते आत्ता सांगू शकत नाही.
घरातल्या वस्तूंसाठी वगैरे कसे खर्च कराल तसे Happy सोफा १००० पासून ४००० पर्यंत कितीलाही मिळू शकतो Happy पण मिडीअम दराने घेतले तर साधारण ३-५ हजार लागावेत असे वाटतेय.
गाडी जुनी घेतली तर साधारण ५ ते १० हजार नवीन घेतली तर २५ + . नविन गाडी घेताना किंवा जुनी घेताना देखील इथे बरेच लोक कर्ज काढून घेतात. पण तुमचे इथे क्रेडिट नसल्याने क्रेडिट स्कोअर नसेल तेव्हा हे कितपत शक्य आहे कल्पना नाही.

अजुन एक काल सांगू की नको यात सांगायचे टाळले. इथे पहिला संसार थाटताना बरेच लोक सोफा, ड्रॉवर चेस्ट, बेडसाईडा टेबल, डायनिंग टेबल, कॉफिटेबल, बुक केसेस अशा गोष्टी जुन्या घेतात, एखादे दुसरे वर्ष वापरून मग नविन घेतात. तीच गोष्ट मायक्रोवेव्हची वगैरे. पैसे वाचतात. आपल्याला नक्की कुठे काय सेटअप करायचे आहे याचा अंदाज येतो. इथे येऊन सेटल झालेले असल्याने कुठे काय चांगले मिळाते याचा पण अंदाज आलेला असतो.
भारतातून आल्यावर हे पचनी पडणे थोडे अवघड असते हे देखील मान्य. आणि महिन्याला इतके कमवतो तर नविनच घेतले तर असे देखील वाटू शकते. पण हा सर्व पर्सनल चॉईस आहे.

मुलांच्या शाळांमधे अ‍ॅडमिशन घेण्यासाठी 'प्रूफ ऑफ रेसिडेंन्स' म्हणून अपार्टमेंट लीजाची कॉपी लागते. ती तर ताबडतोब मिळेलच. पण त्या त्या राज्याचं ड्रायव्हिंग लायसन्स पण लागतं. (आई-वडलांची फोटो आयडी म्हणून लागत असेल असं वाटून पासपोर्टाची कॉपी पुढे केली तर चालत नाही.) Happy कॅलिफोर्नियासाठी हा नियम आहे का? असल्यास इकडे आल्यावर आधी डी एम व्ही गाठावं लागेल. कारण पोस्टाने लायसन्स यायला कधी कधी (मुख्यतः पहिल्या वेळी) ३-४ आठवडे लागू शकतात.

Pages