निसर्गाच्या गप्पा (भाग-३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40

निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.

निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चातक,
दुबईतील फोटो पाहुन,झाडांबद्दलची घेतली जाणारी काळजी विशेष वाटली.

साधना,
छान सवांद, आणखी वाढवाच
अशा निसर्गाबद्दलच्या जुन्या गोष्टी,आठवणी,काही घटना,किंवा काही लोकांची विशेष माहिती,नविन पिढीला खरी वाटणार नाही अस वाटतं.
Happy

नमस्कार,

मी इथे नेहमी वाचनमात्र असते पण आता माझ्या बागेतच प्रॉब्लेम झाल्याने expert view घ्यायला आले. Happy

माझ्या एका कुंडीत मी जरबेरा लावलंय, त्याला अगदी २ सोनटक्क्यासारखी पाने आली आहेत. त्यात अगदी बारिक्-बारिक सफेद किड झालंय, ते पाणी टाकल्यावर तरंगतं आणि किटकनाशक मारूनही काही फरक नाही पडत आहे. काही उपाय असेल तर प्लीज सांगा.

दिपाली

साक्षी, कळ्या आल्यावर स्प्रे करायचे काही हार्मोन्स बाजारात आहेत. त्याने फूल मोठे होते पण ते सहसा जास्त दिवस टिकणार्‍या फूलांसाठी असतात. ब्रम्हकमळासारख्या अल्पजीवी फूलांवर त्याचा परिणाम काय होईल, ते सांगता येत नाही.

ठिक आहे दिनेशदा, मग मी आता काहीच करत नाही. Sad
उमलल्यावर आठ्वणीने फोटो काढला, तर इथे टाकेन
~साक्षी

दिपाली ते पुर्ण पांढरे व लेडीबग सारख्या आकाराचे आहेत का? माझ्याकडे जास्वंदावर व त्यामुळे बाजुच्या सदफुलीवर गेले आहेत. परवाच मी जास्त होते ती फांदी काप्ली व चक्का हाताने पाने चोळुन ते धुतले. किडे उचलुन फेकुन दिले. उद्या परत पाहते काहि प्रोग्रेस आहे का. व त्यांना हाकलताना मी हळद व हिंग मिश्रित पाणी वापरले स्प्रे मधुन.

ह्यूमन प्लॅनेटची दुसरी सिडी पण बघून झाली.या भागात जंगले, डोंगराळ प्रदेश आणि गवताळ
प्रदेश असे विभाग आहेत. या भागातील काही दृष्ये बघायला त्रास होतो, पण ते लोकांचे
वास्तव जीवन आहे, हे ध्यानात ठेवावेच लागते.
नेपाळ, कंबोडिया, मंगोलिया असे आजवर फ़ारसे चित्रीत न झालेले देश इथे दिसतात. त्या
कहाण्या इथे लिहून तूमची उत्सुकता कमी करत नाही. पण एका कहाणीचा उल्लेख केल्याशिवाय
रहावत नाही. मी केनयात रहात असूनही अशी काही प्रथा इथे अस्तित्वात असेल, याची मला
कल्पना नव्हती. ह्या प्रथेचे चित्रीकरण यापुर्वी झालेले नाही.
काय आहे ही प्रथा ? तीन निशस्त्र जिगरबाज तरुण चक्क सिंहाच्या जबड्यातून त्यानी केलेली
शिकार पळवतात. जे बघितले त्यावर विश्वास ठेवणे कठीण होते. पण तो भाग कसा चित्रित केला
हे पण पुढे बघायला मिळते.
तीन तरुण आणि तब्बल १५ सिंह (त्यापैकी एक नुसत्या दाताने चित्रीकरण करणा-या टिमच्या
गाडीचा टायर फ़ोडतो.) असा सामना, कधीही बघायला मिळाला तर सोडू नका.

जागू, आजच तुझी सकाळी आठवण काढली. असाच मस्त पावासाळी दिवस होता जेव्हा आम्ही तुझ्याकडे आलो होतो. बुलबुलाने घर शिफ्ट केलं काय? त्याला कळलं की तु त्याच्यावर लेख लिहून टाकतेस. प्रसिद्धी आवडत नसेल त्याला. Happy असो, त्यालाही चेंज.

ब्रह्मकमळाला २८ कळ्या? मस्तच की. ए जागू, डॅनीचा फोटो आपल्या वृत्तांतातही टाक ना.

साधना, मस्त संवाद आहे. Proud

चातक, कदाचित दिवसा खूप उन्हात काम करायला नको म्हणून रात्री करत असतील का?

दिनेशदा, ह्युमन प्लॅनेटचं वर्णन मस्त वाटतय. इथे कुठे मिळते का ते बघते.

दिनेशदा,
ह्यूमन प्लॅनेटची सीडी बरीच महाग दिसते.
मी ही गुगलवर टाकुन सर्च केलं, आणि बीबीसीच्या साईटवर ते तीन लोक (हातातल्या बाणाची भिती दाखवत) पुढे जाऊन चक्क सिंहांची शिकार कशी घेऊन गेले ते पाहिलं.
याबद्दल असे नेटवर इतर कुठे लिंक असेल तर नक्की द्या.
Happy

अनिल त्याची लिंक दे इथेच, म्हणजे सगळ्यांना बघता येईल.
मला दुबईला ती साधारण ४००० रुपयांना मिळाली. अजून भारतीय
व्हर्जन यायचे असेल. कालच त्याचा एक स्टेज शो झाला, लंडनमधे.
पण सगळ्यांनी अवश्य बघण्यासारखी आहे ती. एखादा भाग सोडला
तर प्रत्येक भागात लहान मुलेच आहेत.
पण इगलच्या घरट्यात उतरुन त्यातले एक पिल्लू उचलून आणून
त्याला शिकारीसाठी प्रशिक्षण देणा-या मूलाला लहान तरी कसे
म्हणायचे.

या अशा नागफ़ण्या बघितल्या कि मला भारतातल्या श्रावणाची आठवण येते. अशा
नागफ़ण्या भीमाशंकराच्या वाटेवर खुप दिसतात.
श्रावण महिन्याशीच माझ्या शाकाहाराकडे वळण्याच्या आठवणी आहेत.
सोमवारी गायीला पान देण्यासाठी शोधाव्या लागलेल्या गायी. नागोबा, तेरडा, आघाडा,
अळू, दहीहंडी, शुक्रवारचे चणे, जिवतीदेवी, कहाण्या, आंबाड्याचे रायते, केळीच्या
पानावरचे जेवण, वरण, पिठोरी......माझे सगळे बालपण.
आता वाळवंटात आहे, अशी गत नाही...पण आपला श्रावण आठवतोच.

हा फ़ोटो मात्र दुबईच्या विमानळावरचा.

मामी अग खुष खबर आहे बुलबुलने अंड घातल घरट करुन. माझा पुतण्या अभिषेक आता अजुन उत्साही झालाय लेख वाचल्या पासुन. त्याने त्या घरटे तयार झाल्यावर त्यात कापुस भरुन ठेवला. त्यात बुलबुलने अंडे घातले आहे. आता पुन्हा आमच्या घरात बुलबुलचे बाळंतपण होणार.

अय्या.. बुलबुल असे मस्त अंडे घालते माहितच नव्हते. त्या बुलबुलला सांग कोणि बेलापुरची बहिण असेल तर माझ्याकडे जागा आहे म्हणावे... Happy

दिनेश, ह्युमन सिडी बघायला मिळेल का माहित नाही. तुम्ही इथे लिहा त्याच्याबद्दल बिन्दास.. नशिबाने सिडी मिळाली तर आंखो पढा आंखो देखी करेंगे...

अय्या.. बुलबुल असे मस्त अंडे घालते माहितच नव्हते. त्या बुलबुलला सांग कोणि बेलापुरची बहिण असेल तर माझ्याकडे जागा आहे म्हणावे... Happy

दिनेश, ह्युमन सिडी बघायला मिळेल का माहित नाही. तुम्ही इथे लिहा त्याच्याबद्दल बिन्दास.. नशिबाने सिडी मिळाली तर आंखो पढा आंखो देखी करेंगे...

अरे वा जागू कितवी खेप?(बुलबुलाची गं!)
मी आता माझा बुलबुलांवरचा लेख टाकतेच. एप्रिल मे तला आहे. काही कारणास्तव इथे अप्लोड करणं झालंच नाही.

<<<<<अरे वा जागू कितवी खेप?(बुलबुलाची गं!)>>>>> Proud
जागू तुझा बुलबुलवरचा लेख वाचला. आज त्याचं घर पण पाहिल. छान.
आज ब्रम्हकमळाचे फोटो पाहिले . अप्रतिम.

झाडाच्या मुळांनी इमारतीला खरोखरच धोका निर्माण होतो काय? मी लावलेले अनंताचे झाड छान पुरुषभर उंच झाले होते भरपूर फुले येत होती. लोकांनी तोडून टाकले. मी तिथे नसल्याने कोणी फांद्या ही छाटून दुसरीकडे रोवल्या नाहीत पावसाळा सुरु आहेच काही फांद्यातरी नक्की जगल्या असत्या Sad

लोकांना साधी साधी झाडेही ओळखता येत नाहीत. पूर्वी लावलेले बेलाचे झाड ही असेच बोअर खणायच्या वेळी तोडून कुठेतरी फेकून दिले. Sad ते ही छान वाढले होते. इतके सुंदर त्रिदळ होते त्याचे , माझ्या तळहाताएवढे मोठे मधले पान व बाजुने छोटी छोटी दोन पाने!! ते झाडतर इमारतींपासून दूर ही होते एकदा च फक्त अलिबाग जवळ्च्या कनकेश्वराला बेल वाहू शकलो.

माझी मुलं सध्या भारतात , त्यांच्या आजोळी आहेत. तिथे ब्रह्मकमळाची कळी अगदी फुलायच्या बेतात आलेली रविवारी. संध्याकाळी आईने माझ्या मुलांना अन भाच्याला ती दाखवली, मध्यरात्री फुलेल, सुरेख वास असतो, पण सकाळ पर्यंत कोमेजून जाईल वगैरे सांगितलं. नंतर बाकी खेळ वगैरे झाले अन नेहमीसारखी मुलं आठ साडे आठपर्यंत झोपून गेली. रात्री बरोबर १२ ला लेक उठून खाली आजीच्या खोलीत गेली अन तिला म्हणे , आजी वेक अप, वी नीड टु सी दॅट स्पेशल फ्लावर. मग आजीने उठून दिवा लाऊन, कड्या दारं उघडून तिला बाहेर नेलं, फूल पाहिलं, त्याचे लाड केले. माझी आई येईल तेंव्हा पण कळी फुलेल तर आपण तिला पण दाखवूया वगैरे झालं. मग त्या फुलाला एक फ्लाइंग किस अन आजीला खरोखरचा किस देऊन झोपायला गेल्या बाईसाहेब .

ऐकल्यापासून माझं मन एकदम थुईथुई होतंय Happy

जागु, अग यावेळी बुलबुलाला सहज घरटं सोडून ते कठीण बांधकाम करावं लागलय. पण किती सही बनवलय. कापसाची आयडिया मस्तच की. अंडंही किती सुरेख आहे. त्याच्या प्रत्येक टप्प्याचा फोटो काढता येईल का?

Pages