माझ्या शिक्षकांच्या लकबी

Submitted by गजानन on 13 March, 2011 - 10:56

आपल्या शिक्षकांच्या गमतीशीर लकबी, सवयी लिहिण्यासाठी हा धागा.

जुन्या मायबोलीवर तो इथे होता. http://www.maayboli.com/hitguj/messages/644/90465.html?1127323309

अ‍ॅडमिनटीम - कृपया या गप्पांच्या पानाचे धाग्यात रुपांतर करावे ही विनंती. या ग्रूपात धागा उघडण्याची सोय मला दिसत नाहीय.
( पण आधी काही धागे उघडलेले दिसताहेत.)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या बुलेटीनचे असे आहे. की एखादा शिक्षक रजेवर असेल तर त्याचे तास घेण्याकरिता सुपरवायझर शिक्षक एका वहीत लेखी नोटीस काढून त्यांचे त्या दिवशीचे तास अटेन्ड करण्यासाठी ते पिरिअड ऑफ अस्णार्‍या शिक्षकाना अटेन्ड करायची ऑर्डर करतात व सही घेतात. त्या आदेशाला बुलेटीन म्हणतात व तासाला बुलेटीन तास. ही वही आली की ऑफ तासाचा आराम जाणार म्हणून शिक्षक मंडळी त्रासिक मुद्रा करूनच सही करतात. काही शिक्षक या जादा तासाना त्या वर्गाचेच असतील शिकवून त्यांच्या विषयाचा अभ्यास क्रम पूर्ण करण्यासाठी उपयोग करतात. काही गोष्टी, खेळ घेतात . पण वर्गात घोरण्याचा प्रकार करण्याचे प्रथमच वाचले..

हा हा... मजा आहे..

आम्हाला "नंद" आडनांवाचे सर होते..८-९ वीत भुगोल शिकवायला... त्यांना "तर-मग " म्हणायची सवय होती. प्रत्येक १-२ वाक्यानंतर त्यांचे " तर-मग" ठरलेले असायचे..मग काय..भुगोला कडे लक्ष देण्यापेक्षा आम्ही "तर-मग" चा काऊंट करण्यात मग्न.. तास संपला की मोठ्याने तो आकडा सांगायचो एक्मेकांना.. :हा हा:

ए व्ही पाटील नावाचे सर आम्हाला आठविला मराठी शिकवायचे. त्याना कवितांना चाली लावायची भारी हौस. हिंदी गाण्याच्या चाली कवितांना लावायचे आणि स्वतःची चाल असल्याच्या आविर्भावात हायस्कूलभर ऐकवत बसायचे. मग कुणीतरी मॅडम खरं गाण कोणतं ते सांगायच्या आणि सर मान खाली घालून प्य्ड्।अची चाल सापडेपर्यंत शांतपणे वावरायचे. गॉगल घालण्याच्या सवयीमुळे त्याना सगळे विध्यार्थी बाजिगर म्हणायचे. कुणी चुकला की पुढे बोलाऊन बरोबर बेंबी चिमटीत धरून पिरगळायचे. बेंबीच्या देठापासून ओरडणे म्हणाजे काय ते तेव्हाच कळायचे.

कावळे गुरूजी, डॉन मास्तर असे बरेच शिक्षक आणि लकबी आहेत. पण थोडक्यात सांगण्यासारखे नाहीत. आमच्या जर्नालिझम डिपार्टमेंटला काही गेस्ट लेक्चरर यायचे त्यात निळू दामलेही आलेले. त्याना इलेक्ट्रॉनिक मिडीया विषयी बोलायला बोलावलेले. सुरवातीपासून शेवटपर्यंत घास तोंडापर्यंत आणायचा आणि जा की तिकडं म्हणायचं असा प्रकार चाललेला. उदा. 'जर तुम्हाला वृत्तनिवेदन करायचं असेल तर महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तिथवर जायला हवे.' 'तुम्ही संपादन विभागात जायचा विचार करत असाल तर तेही शक्य आ।ए पण त्यासाठी तुम्ही तिथवर जायला तर हवेच'
शेवटपर्यंत कुठे जायला हवे आणि कसे जायला हवे याबद्दल एक शब्दही बोलले नाहीत. कुठल्या वाहिनीचा किंवा कामाच्या स्वरूपाचा साधा उल्लेखही केला नाही. शेवटी आभाराला उठल्यावर मी सगळी वजावाट केली म्हणा. तिथेच आमचे एचोडीशी फाटले.

आमच्या बोरामणी सरांना वर्गातील मुला-मुलींची चित्रे काढण्याची भारी आवड. ते खरंतर इंग्रजीचे सर होते पण शिकवण्याचा / आम्हाला शिकण्याचा कंटाळाआला की चित्रकारीता चालू. एकदा एका मुलाचे चित्र काढून त्यांनी नंतर फक्त त्याला चष्मा काढला तर एका मुलीचे चित्र तयार झाले होते. त्यांची प्रत्येकाला बोलवायची नावे ही वेगळी होती.आमच्या वर्गातला एक मुलगा गोरा, गुबगुबीत , बुटका होता त्याला ते "गुळाचा गणपती" म्हणायचे. एकजण खूप धीरगंभीर चेहर्‍याचा होता त्याला गदिमा (नंतर ते गद्या झालं) म्ह/नायचे.
जर कोणी आजारी आहे म्हणून शाळेत गैरहजर असेल तर त्याला /तिला "काय पालथा/थी पडला/ली होता/तीस का?" असं म्हणून त्याचं/तीचं खरोखर पालथं पडल्यासारखं चित्र काढायचे.

माझे वडिलच माझे गणिताचे सर असल्यामुळे त्यांचं एक टीपिकल वाक्य असायचे लाईन, सेग्मेंट कशालाही नावे नाहि दिली की ते म्हणायचे अरे याचे मायबाप दाखवा की.!!

पुढे बोलाऊन बरोबर बेंबी चिमटीत धरून पिरगळायचे. >> माझ्या संस्कृतच्या बर्वे सरांना अशी सवय होती. उत्तर बरोबर दिले नाही किंवा होमवर्क केला नसेल तर मुलांना पुढे बोलावून पोटात चिमटे काढायचे. एखाद दिवशी त्यांचा मूड ठीक असेल तर चिमट्यांऐवजी गुदगुल्या करायचे. Uhoh

ईंजिनिअरिंगला असताना ग्राफिक्स शिकवायला एक सर होते, त्यांची सब्जेक्ट रिलेटेड काही खास वाक्ये,
१ - "धिस लाईन ईज नथिंग बट धिस लाईन" ("धिस लाईन" हे म्हणताना लाईनच्या एका पॉईंटकडुन दुसरीकडे खडु नेऊन समजवायचे आणि दुसरे वाक्य "ईज नथिंग बट धिस लाईन" दुसर्‍या पॉईंटकडुन परत पहिलीकडे खडु आणायचे)

२ - धिस प्लेन ईज नथिंग बट धिस प्लेन (प्लेन = भुमितीतले प्रतल) यात खडु खाली ठेऊन दोन्हि हात वापरायचे.
धिस प्लेन = डावा हात
ईज नथिंग बट धिस प्लेन = उजवा हात
*****
बेसिक सिव्हील शिकवायला एक होते त्यांचे आणि इंग्रजीचे वैर होते, त्यांनी इंट्रोमध्ये म्हणलेले वाक्य "माय नेम वॉज पटकुरे".
*****
तसच इलेक्ट्रॉनिक्स शिकवायला एक जण होते ते कायम तंबाखु मारुन लेक्चरला यायचे, त्या तासाला पुढचे १-२ बेंचवरच्या मुलांवर तंबाखुच्या कणांचा वर्षाव व्हायचा Happy

आम्हाला फिल्मच्या विषयाला प्रसिद्ध पटकथाकार सलिम खान शिकवायला होते. मस्त शिकवायचेच त्याचबरोबर खूप छान गप्पा मारायचे. एखादा पिक्चर बघून झाला की म्हणायचे "चलो, पॉप कॉर्न खायेंगे" आणि कॉलेजच्या कँटीनमधे घेऊन जायचे.

त्याना असाईनमेंटची प्रिंट आऊट अजिब्बात चालायची नाही. "तुम खुद लिखो, पता चलता है कितने पॅशनसे लिखा है" असं म्हणायचे. माझ्या शोलेच्या रिव्ह्युला त्यानी नऊपैकी सात मार्क दिले होते! (नऊपैकीच. एक मार्क सर्वाचाच कमी केला होता. Happy )

आम्हाला स्टॅटास्टिक्स ला दप्तरदार होते. इतके सुरेख शिकवायचे की दुसर्‍या कॉलेजची विद्यार्थी पण अटेण्ड करायचे.क्लास ओव्हरफुल्ल असायचा. शिकवताना फळ्याकडे तोड झाले की मधेच शेंगदाणे तोंडात टाकायची सवय. पुन्हा शिकवणे सुरू. रोज संध्याकाळी क्लब वर रमी आणि नंतर रात्री अड्डा. पण विषयावर जाम हुकमत. सर्वात म्हणजे अत्यंत विध्यार्थी प्रिय! त्यांच्या अड्डयावर एकदा आम्हाला पाहून एव्हढ्च म्हणाले कुठं बीर पिताय ? काय प्यायचं हे पण शिकवायचं का?

शाळेत मेश्राम म्हणून एक तरुण शिक्षक होते. हिंदी भाषा बरी शिकवायचे. पण एका वर्षी मराठी भाषेला आले. गद्य ला "गद्दे" आणि पद्य ला "पद्दे" म्हणत असत. कारंजातून उडणारे तुषारे (तुषारे = तुषार या शब्दाचे अनेकवचन) असे त्यांचे मराठीचे अगाध नॉलेज होते. Uhoh
१) ते उभे राहताना कायम एक पाय किंचित दुमडून कंबर वाकडी करून उभे राहत.
२) त्यांनी मराठीच्या तासाला येऊन सर्वात पहिला शिकविलेला धडा "बगळा" हा होता.
या २ कारणांमुळे आमच्या वर्गाने त्यांचे "बगळा" हे नामकरण केले होते. Wink

माझ्या दिराने (त्याचेही शिक्षण त्याच शाळेत झालेले आहे.) त्यांच्या बाबतीत सांगितलेले हे किस्से आहेत.
१) पाचवीत असताना दीराच्या वर्गातल्या एका मुलाने एकदा मेश्राम सर काहीतरी शिकवित असताना हात वर केला. सरांनी "काय?" म्हणून विचारल्यावर करंगळी दाखवली. तर सर त्याला ओरडले "ए, चूप शू कसली मागतो?? शू नही मागायची!" Uhoh

२) त्या सरांनी चाचणीच्या एका पेपरचे चेकिंग केले होते. वर्गात पेपर वाटून झाल्यावर एक मुलगा मार्क्स वाढवून घ्यायला पुढे आला. त्या मुलात आणि मेश्राम सरांत झालेले संभाषण पुढीलप्रमाणे:
"सर, मला या प्रश्नाच्या उत्तराला पूर्ण मार्क्स मिळायला हवे होते."
"ए, चल जागेवर जा. मार्क्स वाढवून वगैरे देणार नाही."
"सर, बघा हां. मी माझ्या आईला घेऊन येईन!"
"ए, बघू! तुझी उत्तरपत्रिका दे इकडे. किती मार्क्स वाढवायचेत??" Uhoh

विद्यार्थ्यांच्या पालकांना ते सर जाम टरकायचे. हा नवीन शोध लागल्यावर बरेच विद्यार्थी याच युक्तीचा अवलंब करून त्यांच्याकडून बिनदिक्कत मार्क्स वाढवून घ्यायचे आणि ते सर द्यायचे देखील!

आमच्या कॉलेजात एक लॉ शिकवणारे सर होते. त्यांना सगळे खुप घाबरायचे.कारण कोणत्याही क्षुल्लक कारणाला ते केस फाईल करायचे म्हणे. प्रत्यक्ष कॉलेजवर त्यांच्या दोन तीन केसी घातलेल्या अशी मुल म्हणत.

लेक्चरला बाहेर फिरणार्‍या मुलांना ते 'भटकती आत्मा' असे म्हणायचे.

एकदा एका नख खाणार्‍या मुलाला त्यांनी वर्गासमोर आपल्या खुर्ची वर बसवून त्याला नख खायला लावली होती. आणि लेक्चर संपेपर्यंत त्याला खुर्चीवरून उठू दिले नव्हते. तो मुलगाही आता माझी नख संपली म्हणून गपगार बसून राहीला.

त्यांच्या शेवटच्या तासाला ' अभी मेरा आखरी लेक्चर है. अब भगवानके सामने जाके दो नारीयल फोडना " असे म्हणाले होते

तर असे हे सर आम्हाला खुप खुप आवडतात (हे वाक्य निबंध पूर्ण करण्यासाठी )

शाळेत संस्कृतचे एक सोमण सर होते. जवळपास रीटायरमेंट ला आलेले. त्यांचे चळीष्ट किस्से तेव्हा शाळेत वर्ल्ड ( Proud ) फेमस होते.

ते रस्त्याने चालताना कुठलेही अगदी छोटेसे जरी मंदीर / देऊळ दिसले तरी पायातल्या चपला वगैरे काढून दोन्ही हात मनोभावे जोडून नमस्कार करायचे. पावसाळ्यात रस्त्यात चिखल असला तरीही! आणि पायातल्या चपला काढायचे म्हणजे काय तर सरळ सरळ थाड्-थाड भिरकावून द्यायचे.

केस कायम मिलिटरी कट केल्याप्रमाणे बारीक कापलेले. त्यातून तेलाच्या धारा कपाळावर ओघळताहेत. त्यातच घाम! असे दृश्य असायचे नेहेमी. त्यामुळे त्यांचे तेल्यामारूती (तेमा) हे नाव फेमस झाले होते.

स्वतःशीच बडबड्ण्याची त्यांना जाम सवय होती. त्यांच्या जांभयांचा उल्लेख वर केला आहेच! शाळेत केतकर म्हणून अजून एक त्यांच्याच वयाच्या संस्कृत शिक्षिका होता. सोमण सरांच्या नंतर त्या निवृत्त होणार होत्या. "मी गेलो की केतकर मॅडम येतील तुम्हाला!" असे ते मानभावीपणे म्हणायचे. पण मी जाणार व त्या जागी दुसरं कुणीतरी येणार याची खंत त्यांच्या स्वरांत जाणवायची. मग आम्हीही लब्बाड मुले "नक्को, सर! आम्हाला तुम्हीच हवे आहात" असे गळे काढायचो. मह स्वारी खुलायची. गाळातल्या गालात मिश्किल हसायचे.

तास चालू असताना अध्ये मध्ये उगीचच कुणालाही उभे करायची त्यांना फार खोड होती. बोट दाखवून "ए, तू उभी रहा गं!", "ए, तू उभा रहा रे!" असा आदेश सोडायचे. पण कशासाठी उभे केले ते सांगायचेच नाहीत. मग अचानक सगळ्या वर्गाला उभे करायचे आणि मग एकेक आवडीच्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला "ए, तू बस गं बाई!", "ए जोशी, तू शहाणा मुलगा आहेस. तू बस रे!" असं करून बसवायचे. ज्या विद्यार्थ्यावर राग आहे अशाला "ए पडीयार, तू जास्त आगाऊ आहेस. तो उभीच रहा!" असे म्हणायचे.

संस्कृत मध्ये प्रथमपुरुष एकवचन (प्र.पु.ए.व.), प्रथमपुरुष द्विवचन (प्र.पु.द्वि.व.), आणि प्रथमपुरुष बहुवचन (प्र.पु.ब.व.) असे असते. तसेच द्वितीयपुरुष व तृतीयपुरुष यांचीही एकवचनी, द्विवचनी व बहुवचनी रुपे होतात. म्हणजे अशी झाली ९ रुपे. त्याचप्रमाणे क्रियापदांचीही ९ रुपे होतात.

तर हे सर एखाद्या सर्वनामाची ९ रुपे म्हणून घ्यायचे जसे की "अहम् आवाम् वयम् - प्रथमा".....

मग क्रियापदांची ९ रुपे (फक्त प्रत्यय) म्हणून घ्यायचे जसे की .."मि वः मः...."
आणि मग म्हणायचे की "इकडे ९ तिकडे ९". थोडक्यात ९ रुपांसाठी corresponding क्रियापदांचीही ९ रुपे येतात. त्यांचे ते "इकडे ९ तिकडे ९" चे पालुपद जाम फेमस होते आमच्या शाळेत. Biggrin

अतिशय खडूस आणि मारकुट्या बाईंच्या वर्गातला एक किस्सा -

बाई : ए उठ रे तू. सांग, पर्यावरणात काय काय येतं?
तो : (अचानक आपल्यावरच बाँब फुटल्याने आणि उत्तर सुचत नसल्याने बावचळून) घरे!

बाई : छान छान. पर्यावरण म्हटल्यावर झरे आलेच पाहिजेत.
तो : ('छान छान' हे आपले उत्तर नक्की बरोबर आहे म्हणून की चुकल्यामुळे होऊ घातलेल्या धुलाईची नांदी हे नेमके कळलेले नाही. म्हणून थोडाफार अंदाज घेण्याचा प्रयत्नात) बाई, घरे घरे - हाऊस.

बाई : हो हो. पर्यावरण म्हटल्यावर पाऊस तर पहिल्यांदा सांगायला हवं.

मस्त आहेत सगळे किस्से Lol

इयत्ता ७ वीत असताना आम्हाला गणित शिकवायला एक बाई होत्या.. त्यांचा पदर कधीही पिनप केलेला नसे.. त्यामुळे तो सावरण्यात त्यांचा संपुर्ण वेळ जाई... शिवाय शिकवताना त्यांचा आवाज पहिल्या बेंचच्या पुढे ऐकू गेला तर मी उद्या पेढे वाटेन अशा रोज पैजा लागायच्या.. कुणिच कधी जिंकले नाही, किंवा हरले नाही... सगळ्यात जास्ती म्हणजे शिकवताना त्या लेमनची गोळी चघळायच्या.. आणि सारखी इकडून तिकडे घोळवायच्या.. मला गणितात कधीच इंटरेस्ट नव्हता त्यामुळे मी आपल्या बाईंच्या अदाकार्‍या पाहण्यात वेळ घालवी.. प्रसंगी तोंडाला पाणि सुटवुन घेई कारण लेमनची गोळी मला जीकीप्रा.. Proud

आम्हाला ८ वि ते १० वि ला बि.एम.काबंळे नावाचे सर होते.ते फार विनोद करत.सर जिवशास्त्र शिकवत.ते अमिबाला अमिनायबा म्हणत.त्यानि M.B.B.S चा longform असा केला होता."म्हातारि बोळातुन बोंबलत सुटलि".ते छान कवीता करत.सर ग्रामीण भागातील असल्यामुळे ते ग्रामीण कवीता े छान करत.

आम्ही तिनही भावंडं एकाच शाळेत शास्त्र शाखेत शिकून बाहेर पडलो. आम्हा तिघानांही ११वी-१२वीला शिकवणारे शिक्षक कॉमनच होते...

फिजीक्स शिकवणार्‍या शीक्षकांचा आवाज एकदम टिपीकल होता, कारण त्यांना मोठ्या प्रमाणात तंबाखू खायची सवय होती. शिकवतानाचे त्यांचे कायम लक्षात राहिलेले दोन वाक्प्रचार... पहीला: Due to Because of..., आणी दुसरा: Isn't it or is not...

केमिस्ट्री शिकवणार्‍या शीक्षकांना दर पाचव्या वाक्याला That is... म्हणायची सवय होती...

अमिनायबा >>>
M.B.B.S चा longform असा केला होता."म्हातारि बोळातुन बोंबलत सुटलि" >>> Lol

शिक्षकांच्या लकबींसारखा 'बॉसच्या गमती' असा पण धागा हवा, सुपरहीट होईल. Wink
माझ्या एक शाळेतल्या सायन्स च्या शिक्षिका काहीही शिकवून झाले की 'understood ? not understood ? anyway..' असे म्हणायच्या.

'बॉसच्या गमती' असा पण धागा हवा, सुपरहीट होईल. >>> Biggrin

M.B.B.S चा longform असा केला होता."म्हातारि बोळातुन बोंबलत सुटलि" >>
आमच्याकडे "म्हैस बांधता बांधता सुटली" हे फेमस होते.

११वीत असताना chemistry शिकवायला एक सर होते. वर्गातल्या एका मुलीवर त्यांचा क्रश होता हे सगळ्यांना माहीत होतं पण 'मांजर डोळे मिटून दूध पिते' चा प्रकार होता Wink असो.

इम्प्रेशन पडावं म्हणून काहीही झालं तरी इंग्लिश मध्येच बोलायचं अशी प्रतिज्ञा होती बहुदा त्यांची. हे एक, आणि 'प' या अक्षराशी काय वाकडं होतं कुणास ठाऊक! 'प' ऐवजी 'फ' म्हणायचे नेहमी.

So क्लास मधल्या एखाद्या मुलाला वर्गाबाहेर काढायचं असेल तर तावातावाने ओरडायचे - मिस्टर abc, stand अफ and get lost from my class! what you सफोझ yourself? (स्वतःला काय समजतोस?) Lol Lol

आमच्या शाळेत गणिताला भुरे सर होते... माझा मोठा भाऊ शाळेत खूप हुशार आणि मी तितकाच डह असल्यामुळे माझावर त्यांचा भलताच प्रेम होता. वर्गात आले कि लगेच मला उद्देशून..

सर: विद्वान काढा तुमचा ग्रंथ (वही), आणि सांगा ..(कुठलातरी फॉर्मुला)..

मी काल वहीत काल काही लिहिलेलाच नसे...ते त्यांना समजल्यावर तळ पायापासून डोक्यापर्यंत अशा पद्धतिने बघायचे कि असा वाटायचा.. मी किती तुच्छा..आणि कसा एक ओझा बनून त्यांचा डोक्यावर बसलेलो आहे.

मी शाळेत असताना भुमितीचे सर राग आला की ५ मिनिटे डोक्य पासुन पाया पर्यंत बघत राहायचे
मग झाले की पुढचे शिकवायचे.

आमच्या मराठीच्या बाई मुले दंगा करायला लागली की एक वाक्य नुसतं बोलायच्या, "ह्याचे गंभीर परिणाम होतील"

एकदा एका सरांनी ''इयत्ता १ली" चा उच्चार "इयत्ता एकली" असा केला होता!

Pages