प्रकाशन - "असेही-तसेही", "अग्निसखा"

Submitted by क्रांति on 28 July, 2011 - 02:36
ठिकाण/पत्ता: 
श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह, राष्ट्रभाषा संकुल, शंकरनगर, नागपूर

दि. ७-८-२०११ रोजी सायंकाळी ६ वाजता, श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह, राष्ट्रभाषा संकुल, शंकरनगर, नागपूर इथे मान्यवर श्री. भीमराव पांचाळे, गझलनवाज यांच्या शुभहस्ते, श्री. गिरीश गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि डॉ. सुलभा हेर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली माझा "असेही-तसेही" हा गझलसंग्रह आणि "अग्निसखा" हा काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे. काव्यसंग्रहाला गीतकार-संगीतकार यशवंत देव यांचे आणि गझलसंग्रहाला भीमराव पांचाळे यांचे आशीर्वाद लाभले आहेत. समस्त माबोकरांना आगहाचं निमंत्रण.

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
रविवार, August 7, 2011 - 21:00 to 23:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रांतिताई
तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणे हा खरं तर आमचाच सन्मान ठरला असता पण नाईलाजास्तव येऊ शकत नाही याची खंत आहे.

आपल्याला मनापासून शुभेच्छा आणि अभिनंदन !

क्रांतिताई, तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणे हा खरं तर आमचाच सन्मान ठरला असता पण नाईलाजास्तव येऊ शकत नाही याची खंत आहे. आपल्याला मनापासून शुभेच्छा आणि अभिनंदन ! >>>>>>

अनुमोदन.

"अग्निसखा" प्रकाशून दिप्तीमान होतसे
क्रांती गाते गीत मनीचे साक्ष तेही देतसे

कोणते ईप्सित फळाला येत ऐसे प्रत्यही
काव्य व्हावे सुरस ऐसे "असेही-तसेही"