कारणे (तरही गझल)

Submitted by आनंदयात्री on 27 July, 2011 - 00:25

काय होती वेदना आनंदण्याची कारणे?
प्रसवली होती जणू पस्तावण्याची कारणे

वेस आली आडवी अन् गाव तेथे थांबला
हेरली तेव्हाच मी ओलांडण्याची कारणे

वाचले सारे खुलासे लाजर्‍या डोळ्यात मी
गोड होती तू दिलेली बिलगण्याची कारणे

मी फुलांचा गंध होतो अन् ऋतूंचा लाडका
ही अशी स्वप्नेच होती झोपण्याची कारणे

एवढे झाले तरीही भेटतो आहोत ना?
सांग ना आतातरी नाकारण्याची कारणे!

वाट अंधारात होती, जायचे होते पुढे
देत गेलो चांदण्यांना चमकण्याची कारणे

स्फोट झाले, जीव गेले, क्षणभरातच संपली -
माणसांनी माणसांना जगवण्याची कारणे

कारणांमध्येच गेला जन्म सारा बापुडा
भाळण्याची कारणे, सांभाळण्याची कारणे

- नचिकेत जोशी

गुलमोहर: 

मी फुलांचा गंध होतो अन् ऋतूंचा लाडका
ही अशी स्वप्नेच होती झोपण्याची कारणे

कारणांमध्येच गेला जन्म सारा बापुडा
भाळण्याची कारणे, सांभाळण्याची कारणे

हे दोन शेर आवडले. एकंदर छान गझल.

धन्यवाद आनंदयात्री. Happy

वाचले सारे खुलासे लाजर्‍या डोळ्यात मी
गोड होती तू दिलेली बिलगण्याची कारणे

कारणांमध्येच गेला जन्म सारा बापुडा
भाळण्याची कारणे, सांभाळण्याची कारणे >> मस्त Happy

एवढे झाले तरीही भेटतो आहोत ना?
सांग ना आतातरी नाकारण्याची कारणे!>>> व्व्वा!

वाट अंधारात होती, जायचे होते पुढे
देत गेलो चांदण्यांना चमकण्याची कारणे>>> सुंदर शेर!

स्फोट झाले, जीव गेले, क्षणभरातच संपली -
माणसांनी माणसांना जगवण्याची कारणे >>> सुंदर!

कारणांमध्येच गेला जन्म सारा बापुडा>>> सुंदर मिसरा!

Happy

सांग ना आता तरी नाकारण्याची कारणे - हा शेर लक्षात राहणार! Happy

Your one of the bests... Happy

एकसे एक आहेत सगळे शेर.. कुठला एक सांगू शकत नाही.. Happy क्या बात है.. लगे रहो...!

नचिकेत, गझल वाचल्यावर एकच शब्द डोक्यात आला - Elegant!

Elegant - Displaying effortless beauty and simplicity in movement or execution (इति वर्डवेब)

EFFORTLESS beauty Happy

अप्रतिम गझल... Happy कसं सुचतं रे तुम्हाला इतकं सुंदर लिहायला?

>>वाचले सारे खुलासे लाजर्‍या डोळ्यात मी
गोड होती तू दिलेली बिलगण्याची कारणे >>

आणि

>> कारणांमध्येच गेला जन्म सारा बापुडा
भाळण्याची कारणे, सांभाळण्याची कारणे <<
हे दोन शेर भावले.

काय होती वेदना आनंदण्याची कारणे?
प्रसवली होती जणू पस्तावण्याची कारणे
>> मतल्यातच गारद!
सगळेच शेर सुंदर, अभिनंदन आनंदयात्री..! Happy

एवढे झाले तरीही भेटतो आहोत ना?
सांग ना आतातरी नाकारण्याची कारणे!.......खल्लास...!!!

कारणांमध्येच गेला जन्म सारा बापुडा
भाळण्याची कारणे, सांभाळण्याची कारणे...वाह ! क्या बात !!!

आवडली गझल.

नाखु, डॉक, वर्षा, गिरीश, सुप्रिया, नंद्या, कणखर, झाड, ज्ञानेशसाहेब - सर्वांना धन्यवाद!

मुक्ता, thanks a lot!! बर्‍याच दिवसांनी दिसलीस! नवीन लिहिलं नाहीस बरेच दिवसांत! बिझी असतेस वाट्टं! Happy

ललित thanks रे Happy

बेफिकीर, विशेष आभार!

दक्षिणा, कसं सुचतं रे तुम्हाला इतकं सुंदर लिहायला? >> the most difficult question to answer Happy
धन्स गं!

सही रे...
<<<स्फोट झाले, जीव गेले, क्षणभरातच संपली -
माणसांनी माणसांना जगवण्याची कारणे>>>

<<<कारणांमध्येच गेला जन्म सारा बापुडा
भाळण्याची कारणे, सांभाळण्याची कारणे>>>
एकसे बढकर एक...
हे नसे तुज सांगणे, तू असा लिहितोस रे,
जाणतो तू काय आहे 'बहरण्याची' कारणे...

एवढे झाले तरीही भेटतो आहोत ना?
सांग ना आतातरी नाकारण्याची कारणे!

वाट अंधारात होती, जायचे होते पुढे
देत गेलो चांदण्यांना चमकण्याची कारणे

स्फोट झाले, जीव गेले, क्षणभरातच संपली -
माणसांनी माणसांना जगवण्याची कारणे

कारणांमध्येच गेला जन्म सारा बापुडा
भाळण्याची कारणे, सांभाळण्याची कारणे...............

क्या बात है............. निवडक १०...............

छान, आवडली.

वाट अंधारात होती, जायचे होते पुढे
देत गेलो चांदण्यांना चमकण्याची कारणे
>>>
मस्तच

Pages