निसर्गाच्या गप्पा - २

Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21

निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया.... Happy

आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी घोळ घातला. घोस्ट ट्री बरोबर.

दुसर एक झाड त्याच्या बाजुलाच आहे हिरवी फळ की फुल असतात त्याला आणी ती उलटी उमलतात (फुटतात). म्हण़जे जमिनीकडे तोंड करुन.

जिप्सी तुझ्यासाठी एक प्रश्न. फॉरेस्ट रोड वर ती बॉल सारखी फळ/फुल येणारी झाड आहेत ती कुठली. सध्या एकदम सगळी फुलली आहेत.

आमच्याकडे एक झाड आहे त्याचे नाव कदंब आहे असे मध्यंतरी कुणीतरी मला सांगितले. खूप सडा पडतो फळा फुलांचा. त्या आधी मला ती फळं उंबरासारखी वाटायची पण झाड तर उंबराचे दिसत नव्हते.

जिप्स्या, त्या फूलाचा, खास करुन मधल्या भागाचा क्लोजप घे. खुप फूले असतील, तर फोटोसाठी एक फूल तोडण्याचा गुन्हा माफ !!

जागू, मुंबई मधे नरिमन पॉइंटजवळ कदंबाची झाडे आहेत. दादरला हिंदु कॉलनीत आहे. भाइंदरला रेल्वेलाईनजवळच आहेत.

नवी मुंबईत नाहीत का कुठे ? मुंबईला कधी जाणे होईल तेंव्हा बघेन. पण फुले मौसमातच येत असतील ना ?

एक विचारायचय बर्‍याच दिवसांपासुन रोज विसरते. हादग्याला झाड किती मोठे झाल्यावर फुले येतात ? मी आत्ताच लावलय.

अश्चिनी, कॅडबरी ते एसटी वर्कशोप हा रस्ता नुसता भरलाय कदंबाने. आता फुलायला लागली आहेत झाडे. या विकेंडला जमल्यास बघून ये. पुढच्या विकेंडला बहर ओसरेल. रच्याकने एक अठीळ लावली आहे. बघू झाड येतय का ते.

तिकडे पण सडेच सडे पडले असतील ना? त्या झाडाखालून मी नेहमी जायचे पण कधी वर बघितलंच नव्हतं (कर्मदरिद्री.. दुसरं काय? ) कारण ते झाड एका अर्धवट बांधकाम होऊन आता विद्रुप दिसणार्‍या बिल्डिंगला खेटून आहे. मला वाटतं अम्या (बागुलबुवा) की त्याची बायको म्हणाली होती की तो कदंब आहे.

आठिळ लावलीत? मस्तच. धन्यवाद Happy

अश्विनी के, सहज म्हणुन मी लिची ची बी लावली होती. १ विताचे झाड व ५-६ पाने आहेत. हवामानामुळे का काय माहित नाही पण आपल्या इथे दिसत नाही लिची ची झाडे, तु ट्राय करु शकतेस, अपेक्षेपेक्षा लवकर आले झाड, जरा वेगळे काहीतरी. पपई, देखील वाढते बी लावली की.

ह्या झाडांखाली खच नाही. Sad
बहुतेक साफ करतात..

पण कसला फुललाय.

अजुन एक्..पळस परत फुलतो का? मी माझ्या घरा जवळ हल्लीच पाहिलाय अस वाटतयं. माझं क्नॉलेज (मराठी शब्द येतो पण टाइप करता येत नाही अद्यान कसं लिहायच?) अगाध आहे

सहज म्हणुन मी लिची ची बी लावली होती. >>>>मला उत्तरांचल भटकंतीत भरपूर दिसली लीचीची झाडे Happy फोटो देतो इथे नर Happy

नवी मुंबईत नाहीत का कुठे ?

अगं इथे भरपुर आहेत, झाड एकदम त्रिकोणी दिसते. रविवारी पाने आणते तुझ्यासाठी, मग ओळखशील लगेच Happy

सहज म्हणुन मी लिची ची बी लावली होती

माझ्याकडेही एक उगवलेय. मी ७-८ बीया टाकलेल्या पण एकच आलेय.

जागू, कांडोळाचा शेवाळे आल्यासारखा पुंजका दिसतो तो त्याचा मोहोर (फूले) आणि लाल पिवळे पंचधारी दिसते ते फळ. पण त्या फळाला खुप कुसे असतात. त्यातल्या बिया भाजून खाता येतात.

दुसरी पांढरी फूले आहेत ती काळ्या कुड्याची.

आपल्याकडे, डहाणु / घोलवड भागात लिचीची झाडे आहेत. माझ्या माहितीत कर्जतला पण आहेत. त्यामुळे आपल्याकडे झाड वाढू शकेल.

हो होते आपल्याकडे हे झाड. मी लहान असताना माझ्या आईकडे होते. त्याला लिचीही यायच्या पण नंतर झाड जुनं झाल्यावर यायच्या बंद झाल्या.

इथे पुण्यात तावरे कॉलनीत पण कदंबाचे २ वृक्ष फुलले आहेत. फारच सुंदर आणि देखणे आहेत ते दोन्ही. अर्थात कदंब असतोच तसा! राजबिंडा!

जिप्सी, कित्ती सुंदर आलेत फोटो करमळाचे! मी आधी शेवटच्या पानावर गेले आणि नंतर अलिकडच्या पानावर आले.
फारच सुंदर फोटो आलेत.

शांकली तुम्हालाही धन्यवाद Happy तुमचे फोटो बघुनच समजले कि करमळ फुलली. आणि खास धन्यवाद दिनेशदांना राणीबाग भटकंतीत या झाडाची ओळख करून दिल्याबद्दल. Happy

हे अजुन काही क्लोज-अप फोटोज् दिनेशदांनी सांगितल्याप्रमाणे:-)
(दिनेशदा, एकही फुल न तोडता फोटो काढले. फुल तोडायला मनच करत नव्हते म्हणुनच खास झूम लेन्स घेऊन गेलो. :-))

टपोरी कळी Happy

एक पाकळी Happy

Pages