एका ज्येष्ठनागरीकाची व्यथा

Submitted by विनीता देशपांडे on 30 June, 2011 - 05:32

( एका देवळाबाहेर बाकावर नुकतेच सेवानिवृत्त झालेले काका आणि त्यांचे मित्र बसले होते. त्यां दोघांमधला संवाद ऐकून मला ही कविता सुचली.)

ज्येष्ठत्वाची जाणीव निवॄत्तीने करुन देताच
मनगटावरचा वेळ माझ्या मागे घुटमळला
माझे मला कळलेच नाही,"हरवलेले" केव्हा लागलो शोधायला?
कसा?केव्हा?लागलो स्मॄतींची पाने चाळायला?
वेळेचे गणित जुळवत,सकाळी उठून लागलो खोट खोट हसायला
पाय मोकळे व्हावे म्हणून लागलो ध्येयशून्य फिरायला
समवयस्कात लागलो आपले दु:ख मिरवायला
आपला कोणाला त्रास नाहीना उगाच लागलो न्याहाळायला
पुरे हे मनाचे खेळ आता हरकत नाही सांगायला
इतरांना वृध्दाश्रमाच्या पायर्‍या चढतांना बघुन
मी ही नकळत लागलो रोजचे भविष्य वाचायला.

गुलमोहर: 

पाय मोकळे व्हावे म्हणून लागलो ध्येयशून्य फिरायला>>> ही ओळ

आणि

इतरांना वृध्दाश्रमाच्या पायर्‍या चढतांना बघुन
मी ही नकळत लागलो रोजचे भविष्य वाचायला.>>

अत्तिशय सुंदर वाटल्या. धन्यवाद व अभिनंदन!

-'बेफिकीर'!