आंतरजालावर लिखाण चोरीला न जाऊ देणे बहुदा अशक्यच...

Submitted by सेनापती... on 11 May, 2011 - 12:12

नमस्कार मित्रांनो...

काल सहजच एका इतिहासाच्या साईटवर गेलो असता तेथे माझे ४ लेख कोण्या दुसऱ्याच्या नावाने आढळून आले. शोध घेतला असता ते माझे लिखाण चोरून तिथे टाकल्याचे लक्ष्यात आले. साईटचा मालक माझ्या मित्राचा मित्र असल्याने हे प्रकरण २-३ तासात आटोपले गेले आणि तिथे लिखाणावर माझे नाव झळकू लागले. पण मनात आलेला संदेह दूर करण्यासाठी मी माझे इतर लिखाण गुगलवर शोधून पहिले असता धक्काच बसला..

इतिहासावरील माझे जवळ-जवळ सर्व लिखाण चोरीला गेलेले होते. ह्या-ना त्या अश्या असंख्य साईट्सवर ते विखुरलेले आहे. मराठीचा कैवार घेतलेल्या आणि कोपऱ्या-कोपऱ्यावर मराठी साईट्स उघडलेल्या ह्या लोकांनी सर्वत्र उच्छाद मांडला आहे... अनेकांना कमेंट्स लिहिल्या. अनेकांना मेल्स सुद्धा पाठवली आहेत...

आंतरजालावर लिखाण चोरीला न जाऊ देणे बहुदा अशक्यच आहे. मग ते ब्लॉग लिहा नाहीतर कुठल्याही साईटवर. इथूनही अनेक लोक लिखाण चोरून स्वतःच्या साईटवर, ब्लॉगवर टाकून पैसे कमावत असतील.. आपण हे कधी तपासून पहिले आहे का?

*************************************************************************************************************

ब्लॉगवर राईट क्लिक डिसेबल करण्यासाठी एक स्क्रिप्ट वापरली जाते तशी इथे वापरता येईल का? शिवाय ड्रॅग न सिलेक्ट होउ नये यासाठी देखील एक स्क्रिप्ट आहे. जे लोक हे वापरतात त्यांच्या ब्लॉगवरील लिखाण आता कॉपी होण्याच प्रमाण खुप कमी झालयं. असं काही इथे करता येईल का?
दोन्ही स्क्रिप्ट इथे दिलेल्या आहेत. ह्याने चोरी बंद होईल असा दावा नाहीये पण टक्केवारी नक्कीच कमी होईल की.

blog_script.txt (1.29 KB)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यापेक्षा अजून एक चांगला उपाय म्हणजे लिहायचेच नाही... कसे...>>>
भटक्या - हे म्हणजे रोगापेक्षा ईलाज जालिम .. Happy
ललिता-प्रीति - ताबडतोब कारवाई करा.

लले, लोकमतने हे प्रिंट मधे केलेले आहे तर तू त्यावर त्यांना एक रजि एडी पत्र पाठवून दे. निदान उत्तरात किती निर्लज्जपणा करतायत ते तरी कळेल. आणि उत्तरच दिले नाही तर तुझ्या ब्लॉगवर आणि शक्य तिथे दवंडी पिटून घे.

दवंडी मी पिटलीय ऑलरेडी २ दिवसांपूर्वी फेसबुकवर...
लोकमतचे कॉन्टॅक्ट डिल्टेल्स मिळत नाहीयेत मला की जिथून काही उत्तराची अपेक्षा करता येईल Sad

प्रीती,
फेसबुकावर श्री. विवेक गिरधारी आहेत. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडे तक्रार नोंदव. ते लोकमतचे संपादक आहेत, आणि ऑनलाइन आवृत्तीचं कामही सध्या तेच बघतात.

एखाद्या लेखाचे वेगळ्या भाषेत भाषांतर करून ते प्रसिद्ध केले तर चालते का ?
मी माझ्या ब्लॉगवर शंकराचार्यांचे चरित्र मराठीमधे भाषांतरीत केले आहे.
त्यामधे सुरूवातीलाच हे नमुद केले आहे की हे माझे नसुन इंग्रजी वेबसाईटवरून घेऊन
मराठीत भाषांतर केले आहे.
मी त्या वेबसाईटला संपर्कातुन विचारले होते की असे करू का ? पण काहीच उत्तर आले नाही.
मग भाषांतर करून टाकले. अर्थात मी माझ्या ब्लॉगवर कोणत्याही जाहिराती ठेवलेल्या नाहीत की
कोणत्याही प्रकारे आर्थिक उलाढाली करत नाही. तर असे करणे योग्य की अयोग्य ?
(मराठीमधे शंकराचार्य चरित्र जालावर उपलब्ध नव्हते म्हणून हा खटाटोप.)

मला वाटतंय आपण तिथे योग्य ते संदर्भ आणि मूळ लेखकाला श्रेय दिलेले असेल तर हरकत नसावी. ही चोरी म्हणता येणार नाही..

आत्ताच वर्षा_म कडून कळले म्हणून "http://nagarcity.com/pp7.asp"" इथे जाऊन बघितले. इथे माझ्या "छोट्यांच्या दुनियेत" ह्या ब्लॉगवरच्या आणि माबोवरही टाकलेल्या बालकवितांपैकी जवळ जवळ सगळ्याच कविता माझ्या नावाशिवाय दिसल्या Sad

त्याशिवाय स्मिता गद्रेची एक माबोवरची कविता, वर्षा_म च्या दोन कविता ह्या देखील त्यांच्या नावाशिवाय दिसल्या Sad

तिथे संपर्कातून इमेल करतेच आहे, अजून काही करता येऊ शकतं का?

scribd var asha settings dilelya aahet jyamule blog kunalahi copy kinwa download karata yet nahi. matr kunihi to blog itar sitesvar share karu shakato. share hotana blog aapalya mhanje lekhkachya navasah share hoto.

कविता,
http://nagarcity.com/registration.aspx
इथे रजिस्टर करुन
My comment या सेक्शन मधे कमेंटपण लिही.
मी पण तिथे कमेंट टाकली आहे रेजिस्टर करुन पण ती पब्लिश झाली नाहिये अजुन Sad

धन्स सावली, मी रजिस्टर करुन कमेंट पोस्ट केलेय पण अजून दिसत नाहीये. रजिस्टर करताना sachin@nagarcity.com हा आयडी कळलाय (रजिस्ट्रेशन कन्फर्मेशनच्या इमेल मुळे) तिथेही इमेल करतेय.

डॉ. सुनिल तुम्ही scribd बद्दल अधिक माहिती देऊ शकाल का जेणेकरुन त्याचा वापर करुन ह्या गोष्टीला आळा घालता येऊ शकेल थोड्याफार प्रमाणात.

महेश,
परवानगीशिवाय भाषांतर प्रसिद्ध करता येत नाही. पैसे मिळवत आहात किंवा नाही, याला महत्त्व नाही, कारण तुमचा ब्लॉग अभ्यासाशी संबंधित नाही. Happy

sureshinde said: June 16, 2011 at 11:08 00 iRate This
हे सगळे लिखाण आणि चित्रे मला विद्युत-पत्रकाद्वारे प्राप्त झाली होती. मला हि कोठे उपलब्ध आहेत हेही माहित न्हवते मी फक्त जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहोचवण्याच्या उद्देशाने हे लिखाण येथे प्रसिद्ध केले होते माझा यामध्ये काहीही वैयक्तिक स्वार्थ नाही.

तरीही आपल्या विनंतीनुसार हे लिखाण येथून काढून टाकत आहे.https://sureshinde.wordpress.com/wp-admin/edit-comments.php?comment_stat...

धन्यवाद !!!

कळावे आपला,
सुरेश शिंदे.

अगं ह्या लोकांना सरळ शब्दांत प्रतिसाद देऊन काहीच उपयोग नाही, शिव्या घालूनही त्यांना फरक पडणार नाहीच म्हणा. पहले तो चोरी.....असंच खाक्या असतो त्यांचा.

बाकी तिसर्‍याही ब्लॉगरला शिव्या घालून आलेच आहे.

मला एक प्रश्न आहे, योगेश तुझे लिखाण/फोटो या ब्लॉगवर प्रसिद्ध झाले आहे हे तुला कसं कळलं?

सावली, तुझी आणि माझी कोणाचीच कमेंट त्या नगर्.कॉम साईट वर प्रसिद्ध झाली नाहीये अजून.

माझ्या इमेलला पण रि नाही आलाय, फोन नंबर जे मिळालेत ते स्विच्ड ऑफ आहेत.

धन्स सावली, आडो Happy
पण, माझा प्रतिसाद का नाही जात आहे. Sad

योगेश तुझे लिखाण/फोटो या ब्लॉगवर प्रसिद्ध झाले आहे हे तुला कसं कळलं?>>>>आडो, माझ्या मित्राने मला सांगितले कि एकाने सदर साहित्य ब्लॉगवर टाकले आहेत, पण तुझ्या नावासहित. त्याने त्याची लिंकही मला पाठवली.
नंतर मी माझ्याच लिखाणातले काहि शब्द/वाक्ये "गुगल इमेज"वर सर्च (उदा. दुर्गपुष्प, आयुष्यावर बोलु काही इ. ) केले असता हे सगळं मिळालं. Happy

कवे, इतक्यात रि येणार नाही... कमीतकमी ८-१० दिवस तरी धरून चाल. त्यातही तुला २-३दा त्यांना आठवण करून द्यावी लागेलच!

Pages