न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. ७ फेब्रुवारी २००९

Submitted by अनिलभाई on 12 January, 2009 - 16:23

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.

पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : ७ फेब २००९, सकाळी ११.०० - ११.३०

जानेवारी २०१० च्या ए.वे.ए.ठी. खालील ठिकाणी..
http://www.maayboli.com/node/12363

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो हो. फोटो पाठवा!

टाकते वृत्तांत!

एकतर बायकोला दुसरा लॅपटॉप आणून द्या, जसा मी दिला तसा, किंवा जरा Priorities नक्की करून घ्या. हे मायबोलीच्या मधे येणारे काय एव्हढे महत्वाचे होते?>>>>>>>> Lol आता लक्षात ठेवीन आणी बायकोला ही सांगीन.... बाकी तुमचा "काम कमी, पगार लठ्ठ, एम बी ए बरा नको कष्ट" ही फिलॉसॉफी बायकोलाही आवडली... Proud
भ. मे. तल्या बायकांबद्दल एकही ओळ नाही? >>>>> अरे हमारी क्या मत मारी गयी है....? पुढच्या ए वे.... ल्या फटके पडतील.....
ड्रायव्हिंग तर दूरची गोष्ट!>>>>>> या बाबतीत मला फक्त झक्कींचीच काळजी होती... मी नाही, रस्ते चुकतात अस काहिसं ते म्हणत होते, बाकी जिंदगी ख्वाब है.... है कि नै झक्की..... Wink
कांचीपुरम इडल्यांचा प्रकार >>>>> Lol
बाकी मैत्रेयी..हॉल चा बंदोबस्त केल्या करता मनःपुर्वक आभार... मस्तच होता हॉल........
सायो.. तुझ्या पास्ता बद्दल लिहायच राहिल,बेष्ट झाला होता बर का..
बाकी रुनी तो ग्लु वाईन प्रकार पण ईंटरेस्टींग वाटला त्याचा सेट अप एकदम बिरबलाच्या खिचडी सारखा होता.... Happy
"मायबो-लिकर" ही पण भाईंचीच शक्कल... भन्नाट आयडीया.....
देसाई, परदेसाई ची प्रत बरोबर आणल्या बद्दल धन्यवाद...... वाचायला हळु हळु सुरवात केलीय..(झोपताना नाही... Wink )
सिंड्रेला मावशी... मी घेवुस्तर भेळ संपलेली होती म्हणुन काही लिहिल नाही... Sad बायकोनी खाल्ली , तिला आवडली..... Happy
बाकी मावशी ... पवारफूल >>>>> Lol Lol
रुनी, लालु.. आणी खासतर मृ च मायबोली बद्दल च प्रेम आणी डेडीकेशन मानलं.. लय लांब ट्रीप करुन आलात, धन्य हो तुम्ही मंडळी... Happy

आणि हो, एक राहीलं! दादच्या कथेतल्या कटाच्या भांड्यासारखं विनय पावभाजीच्या भाजीचं भांडं धरून बसले नाहीत. त्यामुळे गाडीनं घेतलेलं वळण भाजीला अंगवळणी पडलं नाही. ती सांडली. मग त्यांनी आयत्या वेळी मस्त व्हेज बिर्यानी आणली.

लाडू??? लाडवाक्कांचे लाडू खाणं तर दूर माझ्या नजरेलाही नाही पडले. पण असो, त्या आल्या ह्यातच सगळं आलं.

सिंडे, कुंकवाचा उल्लेख टाळलास ना?(तू लावायला विसरलीस म्हणून)
>>>ह्या ए वे ए ठि नंतर माझा नवरा मायबो लिकर नसतानाही मायबोलीत किती ट्युन्ड झाला आहे ह्याचा मला साक्षात्कार त्याने विचारलेले दोन प्रश्न ऐकुन झाला-
Lol आता लवकरच त्याला इथे लॉगिन करुन दे नी देवनागरीत कसं लिहायचं ह्याचे धडे घ्यायला सांग.

खाण्यापिणं: मी फक्त थोडी भेळ आणि मिसळ ट्राय केली. मिसळ छानच होती. बहुतेक नयनीशने आणलेली होती.
रुनीची ग्लुवाईन पण एकदम रॉकली.

कुणाची हरकत नसेल तर फोटो टाकेन.

टाक टाक, फोटो टाकच.
एकदम धमाल केलेली दिसते आहे.

आता पुढचे एवेएठी झक्कींकडे ना? मी आत्ताच तारीख मार्क करून ठेवली आहे. (म्हणजे महिना) Happy

सायो, मायबोलीकरांसाठी काढलेला खास फोटो टाक बरं का! मैत्रेयीला विचार कुठला. Happy

मंडळी, फोटो टाका लवकर...

कुठला गं तस्कर टोळीचा? की मायबो-लिकरचा?

ह्म्म... महा वॄत्तांत येतोच आहे धीर धरा...

एक विनंती: उभ्या उभ्या विनोदातले एक दोन आठवले तरी माबोवर टाकू नका (पापी पेट का सवाल है) Lol

विनय

एक विनंती: उभ्या उभ्या विनोदातले एक दोन आठवले तरी माबोवर टाकू नका (पापी पेट का सवाल है)
>>>> कोण म्हणतं महाराष्ट्रीयन लोकांना धंदा करता येत नाही.... Wink काळजी नसावी विनय....

महा वॄत्तांत येतोच आहे धीर धरा...>>>> भारी....... Happy

मंडळी, भलतच एन्जॉय केलेलं दिसतय!!
सायोकृपेने थोडे फोटो बघायला मिळाले. अजुन येऊ दे.

सायो, तोच तो, तस्कर टोळीचा!

choto.jpg

हाच तो चो अ नि क टो फो
हा मुद्दाम इथे टाकयला पेशल काढला बर का Happy बाकी ईमेल मधे पाठवा रे कुणी कुणी काढले असतील फोटो त्यांनी Proud

<<ड्रायव्हिंग तर दूरची गोष्ट!>>>>>> या बाबतीत मला फक्त झक्कींचीच काळजी होती... >>

धन्यवाद, माझी काळजी केल्याबद्दल. पण अहो, मला सवय आहे. खरे तर येतानाच मी जास्त सावध होतो, नि रस्ते चुकलो नाही.

बाकी, मैत्रेयि, फोटो झकास. मोठा नाही का करता येणार?

बाकी, मैत्रेयि, फोटो झकास. मोठा नाही का करता येणार?
>>>काय झक्की ! अहो thats the whole point !!:फिदी:
चो अ नि क टो फोटो असाच असतो Happy

MT, शोनाहो अगदी! Proud

<<चो अ नि क <<>
संदर्भासहित स्पष्टीकरण करा!

तिकडे दिलय उत्तर, वाचा. Happy

तो मायबो'लिकर' चा पण फोटो टाका इकडे!
अनिलभाई, मान गये!! Happy

भाई, प्रश्नपत्रिका टाका इथे. मी येणार नसल्याने काहीच अभ्यास केला नव्हता हो, फारच अवघड गेला पेपर!
रुनी वृत्तांत लिहिणार आहेस काय? "आय वॉज देअर टू!" Proud

"आय वॉज देअर टू!" Rofl

आम्ही अभ्यास करुनही काही फायदा झाला नाही. एरवीसारखंच ह्यावेळी देखिल मेमरीचं गाडं गडगडलं. Proud
प्राजा भाईंची टी ए. होती. पेपर तपासण्यात, बेरजा करण्यात तीचा हातभार लागला. स्वाती, तु तिला "मला सगळ्यात जास्त मार्क्स दिलेस तर आपण मिळालेलं बक्षिस वाटून घेऊ" असं काही सांगीतलं होतंस का? Proud

मला काही ssssss उपयोग नाही त्या बक्षिसाचा. आणि नवर्‍याला पण. तो फक्त झाकण उघडायचं काम करतो.
प्राजक्ता

"आय वॉज देअर टू!" >> Happy

मैत्रेयी, निदान नावं तरी लिहि फोटूखाली Happy

मी सांगितलेल्या कचर्‍याच्या पिशव्या उपयोगात पडल्यात की नाही Happy

<<तो फक्त झाकण उघडायचं काम >>
खरेच. त्यांच्या बलवान दातांमुळे बाटल्या उघडण्याचे काम सोपे झाले. आता कितीदा त्यांनी माझ्यासाठी बाटल्या उघडल्या ते सांगत नाही. पण प्राजा, त्यांना माझ्यातर्फे धन्यवाद सांग.

बी, तूच आता ओळखून दाखव!

आय वॉज देअर टू
लालू जबरी Lol

घेणार होतो पण तू न आल्यामूळे रद्द करावी लागली.

तो महा-वृत्तांत कधी येणारे ?

आय वॉज देअर टू >>> Lol

>>>आय वॉज देअर टू Lol

'फोटूतले चेहरे ओळखा' ही स्पर्धा फक्त बीकरताच. बरोब्बर ओळखलंस तर तुलाही मिळेल माबो लिकर.

स्वातीने नैवेद्य दाखवला का त्या लिकरचा.

Pages