Submitted by के अंजली on 12 June, 2011 - 22:50
पाऊस पडतो..
कुठेही,कसाही, कधीही पडतो..
गवताच्या पातीवर
डोंगराच्या छातीवर
वाट पाहून आसुसलेल्या
काळ्याभोर मातीवर..
ताडांवर माडांवर
हिरव्यागार झाडांवर
वठलेल्या खोडांवर
जुन्या जाणत्या वाड्यांवर..
फुलांवर मुलांवर
उंच उंच झुल्यांवर
लांब लांब शेपटीसारख्या
चमचमणार्या रुळांवर..
नदी नाले ओढे तळी
फेसाळत्या सागरावर
कमरेवरती हिंदकळणार्या
भल्यामोठ्या घागरीवर..
पाऊस पडतो
डोळ्यांतल्या पाण्यावर
मनातल्या गाण्यांवर
उगाचच लटक्या लटक्या
नाजूक नाजूक बहाण्यांवर..
तिच्या वेणीवर
त्याच्या बटांवर
प्रेमाच्या अगणितश्या
रम्य रंगीत छटांवर..
पाऊस आमच्यावरही पडतो
पाऊस तुमच्यावरही पडतो
पाऊस असा ज्याच्या त्याच्या
जगण्यावरही पडतो..
पाऊस पडतो...
पाऊस पडतो..
पाऊस पडतो..
गुलमोहर:
शेअर करा
सहज सुंदर पाऊस अन पाऊस कविता.
सहज सुंदर पाऊस अन पाऊस कविता.
मस्त. खूप आवडली.
मस्त. खूप आवडली.
आयशप्पथ ..! लाजवाब..!!
आयशप्पथ ..! लाजवाब..!!
खास कविता!
खास कविता!
व्वा .... छानच ..... कवितेचा
व्वा .... छानच .....
कवितेचा दुसरा भाग अधिक आवडला.
अरे वा ! छानच आहे कविता...
अरे वा !
छानच आहे कविता...
नाखु,भरतजी,अमित,क्रांती,उल्हा
नाखु,भरतजी,अमित,क्रांती,उल्हासजी, आणि किरण..
मनापासून आभार
खरंय, ज्याचा त्याचा पाऊस!
खरंय, ज्याचा त्याचा पाऊस!
खूप छान आहे कविता
खूप छान आहे कविता
खूप छान शब्द योजना. वाचताना
खूप छान शब्द योजना. वाचताना सगळं डोळ्यासमोर उभं राहतं.
मॄदुगंधा, वाह ! क्या बात है
मॄदुगंधा,
वाह ! क्या बात है !
शब्दच सुचत नव्हते.
केवळ अप्रतिम.
पावसावरची वेगळीच सहजसुंदर
पावसावरची वेगळीच सहजसुंदर कविता.
वाह!! किती सहज आणि किती
वाह!! किती सहज आणि किती प्रभावी!
आवडली..
छान
छान
'डोळ्यातल्या पाण्यावर' -
'डोळ्यातल्या पाण्यावर' - सुरेख ओळ!
मस्त कविता !!! अमोल
मस्त कविता !!!
अमोल केळकर
------------------------------------------------------------------------------------
मला इथे भेटा
सुरेख बरसलात!!!
सुरेख बरसलात!!!
व्वा!! मस्तचं.. "मृद् गंध"
व्वा!! मस्तचं.. "मृद् गंध" दरवळला अगदी..
मयुरेश,अनामिका,भ्रमर,अनिल,सहे
मयुरेश,अनामिका,भ्रमर,अनिल,सहेलि,निवडुंग,वर्षाराणी,बेफिकिर,अमोल,हबा आणि गिरीश..
खूप धन्यवाद...
यंदाचा पाऊस तुम्हां सर्वांना आनंदाचा जावो....!
हॅप्पी मान्सून
व्वा!
व्वा!
बहोत खूब....
बहोत खूब....
हंसा... धन्यवाद गं दाद खूप
हंसा... धन्यवाद गं
दाद खूप दिवसांनी माझ्या कवितेवर तुमचा प्रतिसाद पाहून आनंद वाटला