रुमाली वड्या - सी के पी खासियत.. फोटोसहीत.

Submitted by दिनेश. on 12 June, 2011 - 04:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

x

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
१५ ते २० वड्या होतील.
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
क्ष
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

त्रिकोणी आकार परफेक्ट आलाय.
भारीच नाजूक काम दिसतंय.
शब्दखुणांमध्ये सुमाली वड्या झालंय.

आभार भरत. सुधारलं.
पन्ना त्या व्हीडीओच्या लिंक बद्दल आभार. प्रत्यक्ष बघितल्याशिवाय हि प्रोसेस कळणं जरा कठीणच होतं.

छान प्रकार. मृचा पूर्ण व्हिडिओ मी आजच पाहिला. तिच्या प्रमाणाच्या फक्त ७च वड्या झालेल्या दिसल्या. जर बर्‍याच लोकांकरता करायच्या असतील तर एकाच वेळेला एकदम उकड काढून चालेल की प्रत्येक घाण्याला वेगवेगळी उकड काढायची खटपट करावी लागेल?

सायो, प्रत्येकवेळी उकड काढावी लागेल, सारण मात्र एकाचवेळी करता येईल. सारण जरा मिक्सरमधून फिरवल्याने फरक पडतो, नाहीतर वळकटी वळत नाही, सारण बाहेर पडत राहते.

चांगलंच कौशल्याचं काम दिसतंय दिनेशदा. बघून तर तोंडाला पाणी सुटलंय.पण घरच्यांची मागच्या सारखीच प्रतिक्रिया ऐकायला मिळेल म्हणून मी एकटी असताना माझ्यासाठीच थोड्या प्रमाणावर करून बघीन.आणि तुम्हाला रिपोर्ट देईन.

दिनेशदा , आहाहा काय पाणी सुटलं तोंडाला Proud आता करायलाच पाहिजेत.... त्यातून तुम्ही "या पदार्थावर सी के पी. लोकांचा मालकी हक्क आहे" असं म्हटलय म्हणजे सिद्ध व्हायलाच पाहिजे आता Happy
अन हो अनेक सीकेपी दुवाच देतील तुम्हाला ही रेसिपी टाकली म्हणून Happy धन्स !
पना, खरच त्याव्हिडीओशिवाय प्रोसेस कळायला कठिणच. स्वाती Happy अगदी खरं, ठाण्याच्या सीकेप्यांना भारी अभिमान आहे शेवळाच्या रुमाली वड्यांचा Happy हाय , आता शेवळा-खिम्याचे सारण ... काय आठवणी काढता राव Happy

दिनेशदा मस्त......................................
तुमचे स्वःताचे होटेल टाकण्याबद्दल काय विचार आहे???????????????????????????
किती हटके रेसिपिज मिळतील...........

दिनेश दा मस्त रेसिपी आहे ! मला सी.के.पी लोकाचे जेवण खुप आवडते
आता खिमा पॅटीस आणि कोलंबी ची खिचडी खास सीकेपी पध्द्तीची लवकर येवु दे

अवल, Happy

साक्षी, हॉटेल नाही बॉ. सल्लागार म्हणून काम करायला आवडेल !!

थंड, मी शाकाहारी ना ! कुणी खवैया भेटला तर नक्किच करुन घालीन.

कुणी खवैया भेटला तर नक्किच करुन घालीन
लौकर या भारतात.. आम्ही सारे खवैय्येच आहोत Happy उगीच इकडेतिकडे शोधत बसु नका...

कसली जबरदस्त रेसिपी नी फोटो.. उचलुन तोंडात टाकाविशी वाटतेय Happy

दिनेशदा ही कृती मला थोडी आमच्या पिठल्याच्या वड्यासारखी वाटते. हिंग जीर्‍याची फोडणी
करून त्यात पाणी घालायचं. तिखट्मीठ चवीप्रमाणे टाकायचं. उकळी आली की त्यात बेसनाचे पीठ
थोडंथोडं घालून ढवळत रहायचं गुठळ्या न होउ देण्याची काळजी घ्यायची. त्याचा गोळा होत आला की
तो तेल लावलेल्या पालथ्या ताटावर ओतायचा आणि थापायचा. नंतर त्यावर सुके खोबरे (किसलेले)
कोथींबीर खसखस घालायची पुन्हा हाताने दाब देउन त्याच्या चौकोनी वड्या पाडायच्या. हे सगळ्यांना
बहुतेक माहीत असेल. अर्थात चवीत फरक रहाणारंच. वरील कृती मी करून पाहीन.

हो सुरेखा त्या आमच्या घरी पण करतात. त्याची आमटि करतात. त्यालाच चुबकवड्या पण म्हणतात. पण हा सी के पी लोकांचाच खास पदार्थ आहेत. खरे तर त्यांच्यापैकी एक्स्पर्ट बायकाच हा प्रकार करत असत.
कारण ह्या बिघडण्याचे प्रमाण जास्त असते.

दिनेशदा, मस्त रेसिपी. मी खरं तर आता जाऊन करणारच होते, पण तुम्ही ते "पण हा सी के पी लोकांचाच खास पदार्थ आहेत. खरे तर त्यांच्यापैकी एक्स्पर्ट बायकाच हा प्रकार करत असत.
कारण ह्या बिघडण्याचे प्रमाण जास्त असते" हे लिहिल्यामुळे ............... Happy

वा दिनेशदा. वड्या एकदम क्लासिक दिसतायत. आकारही मस्त आणि लेयर्स फारच छान दिसतायत. Happy

माझी आई करते अजुनही कारण तीही 'खास एक्सपर्ट सीकेपी स्त्री' या सदराखाली येते. रुमाली वड्या, वड्यांचं सांबारं हे असले प्रकार म्हणजे घरी कोणी खास व्हेजिटेरीयन जेवायला येणार असतील तर हमखास बनणारे.

मामी, तूझी प्रतिक्रिया म्हणजे, अगदी सार्थक झाल्यासारखे वाटले. (पण कधीकाळी आई भेटल्याच तर याला पण रुमाली वड्या जमतात, अशी नाही हं ओळख करुन द्यायची !)

सह्ही सह्ही!!

माझ्या साबा करतात अश्या वड्या. देशात गेलो की एकदातरी बनवतात माझ्यासाठी खास Happy
त्या स्वत: कोब्रा, पक्क्या शाकाहारी आहेत, पण सगळे सीकेपी पदार्थ अगदी कोलंबीची खिचडी वगैरे बनवतात.

Pages