संधीसाधू पाऊस

Submitted by सत्यजित on 3 June, 2011 - 17:39

एक ओली छत्री,
बस मध्ये चढली
तशीच ओली निथळती
सीट वरती दुमडली

खिडकी बाहेर, दारावर
काचांवरल्या धारांवर
धावत्या तरुंच्या पारांवर
खाबांवरल्या तारांवर...
इथे तिथे रेंगाळल्या नजरा
आल्या होत्या भानावर

सारे पारधी साव़ज झाले...
निवांत बसले सावध झाले
इतके सावध ...
कुणी सांगुन खिसा कापावा इतके (बे) सा­वध..

पुढच्या माना अचानक
करु लागतात व्यायाम
किमान दोनशे अंशात फिरली नाही
तर मानेच काय काम?

मागचे पुढे, पुढचे मागे
एक ओझरती झलक... आणि उगाच त्रागे..

हा पाऊस काही पहीला नव्हता
तरी इतका मोहक पाहीला नव्हता
बावर्‍या सावळ्या नभांवर
ओघळताना पाहिला नव्हता

ओढणी इतकी सावधान
बिलगून बसली होती छान
हात तिला दाटवती ,
"अगं किती बिलगशील, आहे का भान?"

कुठून येतोय हा मृदगंध?
जो, तो पहात होता
तिच्या ओढणीला बिलगुन
वारा नकळत वहात होता

एक छत्री तकलादू
पाऊसही संधी साधू
ढगांत ध्यानस्त बसलेला
विरघळुन जातो ढोंगीसाधू

मी तर एक साधा माणुस
पण नभांनी तरी सावरायच?
मा़झ्याकडे जर असता पाऊस
तर कठीणच होतं आवरायच...

आता मेलो तरी चालेल
पण एकदा मला वर जायचय
तेवढ्या एका छत्रीसाठी
एकदा तरी पाऊस व्हायचय....

तेवढ्या एका छत्रीसाठी
एकदा तरी पाऊस व्हायचय....

- सत्यजित

शब्दखुणा: 

सत्या, छान आहे. आवडली. चातकाने म्हणल्याप्रमाणे इतकी कैकै नाहीय्ये Happy

कंपनीच्या बसनेच प्रवास करतोस वाटते Proud

छान.

मी तर एक साधा माणुस
पण नभांनी तरी सावरायच?
मा़झ्याकडे जर असता पाऊस
तर कठीणच होतं आवरायच...

आता मेलो तरी चालेल
पण एकदा मला वर जायचय
तेवढ्या एका छत्रीसाठी
एकदा तरी पाऊस व्हायचय....

तेवढ्या एका छत्रीसाठी
एकदा तरी पाऊस व्हायचय....

>>>> व्हेरी स्पेशल.. सत्यजित किती वेळा साधलीस रे संधी?

हा पाऊस काही पहीला नव्हता
तरी इतका मोहक पाहीला नव्हता........... मस्त

तेवढ्या एका छत्रीसाठी
एकदा तरी पाऊस व्हायचय.... अप्रतिम

काही तरी लिहीत जातो, मध्येच भरकटतो, विचार कुठेच्या कुठे घेउन जातात आणि शेवटी पुन्हा समेवर, कविता काहीच्या काही म्हणुन नाही, फक्त विचार काहीच्या काही आणि कुठेच्या कुठे भरकटुन आले.
"फा॑र" जुन्या मायबोलीवर काहीच्या काही सारखा अजून एक बीबी होता. "प्राची ते गच्ची" त्याची आठवण झाली..

श्यामलीची ही चारोळी कीती सार्थ आहे..

का पुन्हा पुन्हा हा जीव तिथे घुटमळतो?
जणू प्राण पुन्हा हा शब्दातुन दरवळतो
या शब्दांचे हे अजब लाघवी नाते
हातास धरूनी मज समेस घेऊन येते