हे कितपत खरंय ?

Submitted by सख्या on 5 February, 2009 - 21:29

.

Group content visibility: 
Private - accessible only to group members

सक्षम,
तुझ्या मनातली हुरहुर कळू शकते, पण तु ती पाल मुद्दाम मारली नसून चुकुन मारली गेलीए हे लक्षात घे. शक्यतो पाली या मारल्या जात नाहीत कारण त्या खूप चपळ असतात, शेपटी शरीरापासून वेगळी करून त्या पळ काढतात, तसं काही झालं असेल तर ती अजून जिवंत सुद्धा असेल.

पाल हातून मारली गेली तर आपला वंश बुडतो यावर व्यक्तिश: माझा विश्वास नाही, कुणाचाच नसावा. प्राणिमात्रांवर दया करा त्यांना विनाकारण मारू नका असं सरळ सांगून लोक ते आचरणात आणत नाहीत त्यामूळे पुर्वीपासून प्रत्येक करू नये अशा गोष्टीसोबत कोणतीतरी पुस्ती जोडलेली आपल्याला दिसते. आणि अगदीच पडताळून पहायचं झालं तर मग म्युनिसिपाल्टीत पेस्ट कंट्रोल विभागात काम करणार्‍यांना मुलंच व्हायला नकोत. नाही का?

डावा डोळा फडफडणे हे निव्वळ वाताचं कारण आहे. पुर्वी कधीतरी योगायोगाने उजवा डोळा फडफडल्यावर वाईट गोष्ट घडली आणि डावा फडफडल्यावर चांगली घडली म्हणून तोंडातोंडी अशा प्रथा पडल्या.

माझ्यामते तरी अशा गोष्टींवर अंधविश्वास ठेवू नये, त्यात तथ्य नाही. हां एक मात्रं जरूर आहे की अस का करू नये या मागे काही शास्त्रिय कारण असेल तर ते समजून योग्य त्या गोष्टी पाळाव्यात आणि टाळाव्यात सुद्धा.

सक्षम, एकतर ती पाल चुकून मारली गेली. दुसरं म्हणजे एखादी पाल घरात शिरली व स्वयंपाकघरात तिचा मुक्त वावर सुरु झाला व काही केल्या ती बाहेर हाकलवली जात नसेल तर तिला मारण्याशिवाय गत्यंतर नसते. एखादा साप तुझ्या उशाशी निघाला तर तू काय त्याला गोंजारत बसशील?

पालीचा आणि वंशाचा काहीही संबंध नाही. पाल एक प्राणी आहे व तिला "मला मारलंस तर तुझा वंश बुडेल" असा शाप द्यायची बुद्धी असणं शक्य नाही. प्राण्यांमधे स्वसंरक्षणाची जाणिव जरूर असते पण असे हेवेदावे, मत्सर, बदले की आग वगैरे मनुष्य प्राण्यातच असतात. तू मांसाहारी असशील तर तुझ्यासाठी तू स्वतः बोकड, कोंबडी कापत नसलास तरी खाटीक कापतोच ना? जर पाल तळतळत असेल तर हे प्राणीही तळतळत असतीलच ना? अर्थात कुठलीही हत्या मग ती प्राणांतिक असो किंवा मानसिक असो, ही वाईटच.
तुला जर त्याबद्दल खंत असेल व आपल्या अकाउंटला ही गोष्ट जमा झाली आहे असे वाटत असेल तर जास्तीत जास्त सत्कृत्य कर. पुर्वीच्या काळी अशा नित्यकर्म करताना अपरिहार्यपणे घडणार्‍या पापांचे प्रायश्चित्त म्हणून भूतयज्ञ, अतिथियज्ञ, पितृयज्ञ वगैरे पाळले जात. यात यज्ञ नाव आले म्हणजे कुठलीही कर्मकांडं नसत पण प्राणी, अतिथी, माता/पिता/वृद्ध यांची सेवा याचा समावेश असे.

डावा / उजवा डोळा फडफडणं, मांजर आडवं जाणं याचा कुठल्याही घटनेशी संबंध नसतो पण अशा गोष्टी जर तू अपशकून मानतच असशील तर त्याने घाबरुन न जाता (तू धार्मिक असशील तर) जास्तीत जास्त नामस्मरण कर तुझं मन शांत होईल.

तेव्हा खरंच रिलॅक्स हो आणि त्या आजींशी तू मोकळेपणाने गप्पा मारु शकत असशील तर त्यांच्या मनातील हे समज सुद्धा दूर करायला बघ. त्यांच्या या वयाला हे कठीण आहे पण असं बघ असल्या भित्या मनात बाळगून प्रत्येक क्षण खराब करु नये.

************
"स्पाँटेनियस ब्रोकन सिमेट्री" रचनेच्या शोधाबद्दल - योशिरो नाम्बू (फिजिक्स नोबेल २००८)
यांना अल्बर्ट आईन्स्टाईन, एन्रिको फर्मी, रॉबर्ट ऑपनहायमर यांच्यासारख्यांचे मार्गदर्शन आयुष्यात लाभले.

सक्षम,
तुला परत दिसायला लागलं हे खूप चांगलं झालं. कदाचित तु वर्षभर केलेल्या ट्रीटमेंटला आजीच्या आशिर्वादाची जोड आणि शेळीच्या दुधातले औषधी गुणांच्या जोडीने योगायोगाने २/३ दिवसात तुला दिसायला लागलं असेल. अर्थात मी देवाला क्रेडीट देत नाही असं नाही. माझी ही श्रद्धा आहे देवावर पण खूप जास्ती नाही. देवावर गोष्टी सोडाव्यात पण ज्या गोष्टी व्हाव्या असं आपल्याला वाटतं त्यासाठी आपणही तितकेच प्रयत्न करावे लागतात.
देवावरच्या श्रद्धेचे अनुभव मलाही आलेत १/२ ते मी इथेच कुठल्यातरी बी बी वर पण टाकले होते.

रात्री केस विंचरू नयेत - (रात्री केस फक्त 'तसल्या' बायका विंचरतात), रात्री केर काढू नये, रात्री नखं कापू नये, मांजर मारू नये, साप मारू नये (मग मेंढे, बकरी, मासे चालतात, ते का म्हणून? ), उम्बर्‍यावर शिंकू नये, पदार्थ ३ वेळा वाढू नये, दिवसाचे जेवयला जाऊ नये, गरोदरपणी ग्रहण पाहू नये, या अशा एक ना अनेक गोष्टी करू नयेत म्हणून पुर्वी रूढ होत्या, पण त्या मागे काही ना काही सायंटिफिक रिझन होते. त्यामूळे त्यावर जास्ती विचार करायची गरज नाही. देवावर श्रद्धा असू दे पण प्रमाणातच.

पाल मेल्यावर वंश बुडायला काय त्या पालीपासून तो पूढे जाणार होता का ? काहीतरीच. पालीसारखे उपद्रवी आणि विद्रुप प्राणी कोणी मारत सुटु नये म्हणुन भीती घालण्यासाठी असे काही सांगितले असेल (कधी काळी).

आमच्या घरच्या मांजरी कायम पाली मारुन आणतात, त्यांची शिकार. पण तरी दर सहा महिन्यांनी आमच्या घरी मांजराची गोंडस पिल्ली खेळतात. तेव्हा निर्धास्त रहा.

.

दिपू, हे टिंब म्हणजे पालीचा फडफडणारा डोळा आहे का?
************
"स्पाँटेनियस ब्रोकन सिमेट्री" रचनेच्या शोधाबद्दल - योशिरो नाम्बू (फिजिक्स नोबेल २००८)
यांना अल्बर्ट आईन्स्टाईन, एन्रिको फर्मी, रॉबर्ट ऑपनहायमर यांच्यासारख्यांचे मार्गदर्शन आयुष्यात लाभले.

डावा डोळा फडफडणे हे शुभ असते असे म्हणतात, उजवा बाहू स्फुरण पावणे हे सुद्धा तसेच.

आता हे काय नवीन? काय पण नसत्या भिती पुर्वजांनी घातल्यात मनात. छ्या!

बघ, तिथे दिलय की the condition is not a sign of a medical problem म्हणजेच आपले शकुन/अपशकुन बरोबरच आहेत Proud

ते तिथलं जाऊ देत. तुझा विश्वास आहे की नाही ते सांग बरं. Proud

शकून अपशकून ही आपली संस्कृती आहे का नुसती रीत का दोन्ही आहे ते आधी कोणी क्लीयर केले तर बरे होइल. Happy
(त्यांच्या नंतर जो कोणी क्लीयर करेल त्याच्यावर तूटून पडायला बरे.)

फडफडणे ही संस्कृती आहे...
कसं ते ऐका..
आपल्या संस्कृतीतील आयुर्वेदाप्रमाणे फडफडणे इत्यादी वातदोष आहे.
म्हणजे वाताचे अधिक्य झाले अथवा वात बिघडला असता ह्या असल्या क्रिया होतात..
आता उपासाला वातूळ पदार्थ खाउन दुसरं काय होणार ना.. पण उपासाला वातूळ खाणं ही आपली संस्कृती आहे तेव्हा... फडफड होणे ह्याला पर्याय नाही...
वैद्य अश्विनी बरोबर आहे ना?
Happy
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

सक्षम, एक प्रश्नं विचारते.
इथे अनेक प्रतिक्रिया आल्यात. त्यापैकी तुमच्या उपयोगी दोनच प्रकारच्या-
"नाही, पाल मारणं आणि वंश्-छेद किंवा वृद्धी ह्याचा संबंध नाही" किंवा "होय, पाल मारणं आणि वंश्-छेद किंवा वृद्धी ह्याचा संबंध आहे".

ह्यापैकी कोणत्या प्रकारच्या किती प्रतिक्रिया वाचल्यावर तुमच्या स्वतःच्या मतात बदल (म्हणजे आहे ते मत अधिक दृढ होणं किंवा ते समूळ बदलणं) झाला असता?
माझा प्रश्नं टवाळकीचा नाही. तुम्हाला आलेला अनुभव तुमचा..
असे किती अजून अनुभव ऐकले की "तो बरोबरच" असं तुम्ही म्हणणार किंवा ह्याच्या अगदी विरुद्ध असे किती अनुभव तुम्ही ऐकले की "नव्हे, माझा अनुभव चूक" म्हणणार?

दाद अगदी योग्य प्रश्ण.
पाल शक्यतो झुरळे, डास माश्या व तत्सम किटक खाते, म्हणुन ती तशी उपयोगी आहे पण घरात जागोजाग तिची विष्ठा पडते, त्याची घाण साठत जाते. तशी ती मानवी अन्न खात नाही, पण ती जर अन्नात पडली तर त्याने विषबाधा होऊ शकते. पालीच्या त्वचेत विषारी पदार्थ असतात.
पालीला मारणे तसे कठीण कारण शेपटीचा त्याग करुन ती पलायन करू शकते.
तिला मारण्यासाठी झाडुचा एकच जोरदार फटका पुरेसा होतो.
शहरात नाही पण खेडेगावात पालीचे चुकचुकणे वगैरे पण ऐकु येते, आणि मग त्यावरून अनेक आडाखे वगैरे. पण या गोष्टीत आणि वरच्या प्रश्णात मला तरी काहि तथ्य वाटत नाही.
आपल्याला सगळ्या प्रश्णाला सोपी उत्तरे हवी असतात. आयूष्यात काहि वाईट घडले तर त्याला कारण म्हणून अशी एखादी नकळत घडलेली कृति पूढे केली जाते. तेवढेच समाधान !!
ज्यांचा वंश छेद झालाय, त्या सगळ्यानी पाली मारल्या होत्या का ?
आणि ज्या सगळ्यानी पाली मारल्या, त्या सगळ्यांचा वंश छेद झालाय का ?
हि माहीती गोळा केल्याशिवाय काही खरे नाही.
सक्षम, आपले नाव सक्षम आहे ना, मग स्वतःच्या क्षमतेवर विसंबून रहा हो.

माणसाच्या आयुष्यात असे प्रसंग येतात की, बाहेरील कोणताच उपाय कामी येत नाही. असं दु:ख, इतकं समूळ हादरवतं... की येनकेन प्रकाराने माणूस त्याचं कारण शोधायच्या मागे लागतो... त्याशिवाय शांतताच लाभत नाही.
पूर्वी काय केल्याने किंवा न केल्याने हे भोगावं लागतय आज?
मलाच का? माझ्याच बाबतीत हे का?
काय केलं म्हणजे ह्यातून सुटका?
असले प्रश्नं जेव्हा आयुष्याच्या असल्या नसल्याचे अर्थं निरर्थक करीत सुटतात.. तेव्हा....
तेव्हा.... सक्षम, हे असले कोणतेच शुभ अशुभाचे संकेत वगैरे असलं काहीही बाह्य उपचाराचं कामी येत नाही...
कामी येतं ते मनाचं स्थिर असणं. कामी येतो तो सर्वेश्वरावरचा अढळ विश्वास, स्वतःच्या कर्मांवरची श्रद्धा, होतय ते त्याच्याच इच्छेने ही खात्री....
ती असो द्या. ते एक असेल तर... पाल मारली गेली, डावा डोळा फडफडतोय, मांजर आडवं गेलं बगैरे बगैरे सगळं सगळं ह्या जगातल्या मोठ्ठ्या मोठ्ठ्या नाट्याचाच एक भाग वाटतील... स्थिरं मनाने तेही बघू शकाल... ते पान हललं, तो पांढरा कुत्रा शेपटी हलवतोय, ते काळं मांजर आडवं गेलं... इतकं सहज, नैसर्गिक.

मनाची ती स्थिरता मिळवण्यासाठी जे काही आवश्यक आहे, ते सगळं तुम्हाला मिळो, सक्षम. मनाने सशक्त व्हा!

mysticism असा प्रकार नक्कीच आहे पण त्यातली आणि अंधश्रध्देतली सीमारेषा फार पुसट आहे.
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

नमस्कार,

एकनाथ महाराजांचे एक वाक्य आहे..
"एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा"
"हरीकृपे त्याचा नाश आहे"

तुमच्या प्रारब्धात जे आहे ते व्हायचे असल्यास मांजर आडवे न जाताही काही वाईट होउ शकते. डावा(का उजवा??) डोळा फडफडुनही चांगले होउ शकते. हे सारे आपल्या मनाचे खेळ आहेत. यावर वर कोणी सुचवल्याप्रमाणे नामस्मरण हा एक रामबाण उपाय आहे.
एकदा तुमच्या मनात विश्वास दृढ झाला की माझ्या आयुष्यात माझ्या प्रारब्धाप्रमाणे बरे किंवा वाईट घडणार आहे पण जे होइल ते भोगण्याची माझी तयारी आहे कारण माझा देव माझा पाठीराखा आहे मग तुम्हाला कितिही अपशकुन झाले तरी त्याचे काहीच वाटणार नाही.

शुभेच्छा!

saksham,

एकदा तर माझ्या बुटा मधे पाल होती...मी बुट तसाच घालुन दिवसभर फिरलो...रात्रि जेव्हा बुट काढ्ले तेव्हा माझा पाय पुर्ण रक्तानी भरला होता....

ते रक्त काही माझे नव्हते...त्या पालीचे होते....

अनेक वर्श झाली या घटनेला....

बाबुनाना,
ऐकून काटा आला अंगावर.... बाप रे... Sad