नाद घुमु दे

Submitted by नितीनचंद्र on 8 June, 2011 - 06:15

नाद घुमु दे

तडतम तडतम नाद घुमु दे
उच्च रवाने जल बरसु दे

गंध मातीचा त्यात मिसळुदे
मातीला पाण्यात घुसळुदे

तरुणाईला जोश मिळुदे
प्रेमाचे नवअंकुर फुटुदे

केसात तिच्या मोती चमकुदे
बेभान होऊनी तो ते पकडुदे

भिजल्या धारा घोंगत वारा
नवप्रणया नवज्वार चढुदे

आठव सखये ते दिस रुपेरी
नवथर लज्जा तव गाली दिसुदे

गुलमोहर: 

केसात तिच्या मोती चमकुदे
बेभान होऊनी तो ते पकडुदे

भिजल्या धारा घोंगत वारा
नवप्रणया नवज्वार चढुदे
>>व्वा..वाह
अल्लड... सुरमय कविता.. Happy

मस्त वाटली

फ्क्त
तरुणाईला जोश मिळुदे
प्रेमाचे नवअंकुर फुटुदे

जोश मिळुदे एवजी
जोश चढुदे असे बरोबर वाटेल

तरुणाईला जोश मिळुदे
प्रेमाचे नवअंकुर फुटुदे

केसात तिच्या मोती चमकुदे
बेभान होऊनी तो ते पकडुदे

नि३ जी काय काय व्यक्त करायचंय ते किती मोजक्या शब्दात सांगितलंय तुम्ही.
मुख्य म्हणजे पाउस्,हळवा आणि निखळ प्रणय आणि तरुणाईचा जोश सगळं कसं पावसासारखंच जमून आलंय.
खरा खुरा प्रेमिकच हे लिहू शकतो खरंय ना?

यंदा पावसाने उशीर केलाय.
कवितेच्या मंचावर सुध्दा कवितांचा दुष्काळ पडलाय.
कवितेच राहुदे पण पावसा तेव्हड प्यायला पाणी मिळुदे.