रामदेवबाबांचे आंदोलन चिरडून सरकारने काय साधले?

Submitted by dr.sunil_ahirrao on 6 June, 2011 - 00:17

काल रात्री १ वाजता अचानक पोलिसांनी बळाचा वापर करून रामदेवबाबांना अटक करून आंदोलन चिरडून काढले.यावेळी अश्रधुराचा आणि लाठीमाराचा वापर केला गेला.इतकेच नव्हे तर काही 'पोलिसांनी' आंदोलकांवर दगडफेक सुध्दा केल्याचे प्रसारमाध्यमांनी दाखवले.किरकोळ तांत्रिक कारणाचा आधार घेऊन पोलिसांनी हे आंदोलन मोडून काढले,हे कितपत समर्थनीय आहे? असे करून सरकारने काय साधले?

१)सरकारला हे आंदोलन महागात पडणार होते,म्हणून येनकेनप्रकारेण त्यांना बाबांना तेथून हटवायचे होते? असे करून सरकारने स्वतःची चिंता मिटवली?

२)अण्णा हजारे रामदेवबाबांना पाठींबा देण्यासाठी आंदोलनस्थळी हजेरी लावणार होते,त्यामुळे आंदोलनाची ताकद वाढली असती-जे सरकारला होऊ द्यायचे नव्हते?

३)बाबा आंदोलनस्थळावरून सरकारचे एखादे मोठे बिंग फोडण्याची शक्यता होती?

ती आता नाहीशी झाली?

४)भविष्यात अशी आंदोलने होऊ नयेत यासाठी दहशत बसावी म्हणून? की

५)सरकार हुकुमशाही प्रवृत्तीचे बनत चालले आहे? असे असेल,तर मग सरकारचे आणि भारताचे भविष्य अंधारमय आहे ,असे नाही वाटत?

Group content visibility: 
Private - accessible only to group members

हे आपण म्हणतो.स्वीस बँक उगाच का झळ सोसेल?
त्यांनी काय आमच्या बँकेत खातं खोला म्हणून आवतण नाही दिलं.त्यामुळे ते त्यांच्या कायद्यानेच चालणार.
आपला वाणी तरी आपण त्याच्याकडून अमुक वर्ष वाणसामान घेतलं,म्हवर्ष्काही काळ फुकट सामान देईल का?

स्वीस बँकेच्या दृष्टीने पैसा अकाउम्ट होल्डरचा असतो, देशाचा नाही, त्याना पैसा आम्तररष्ट्रीय चलनात दिला गेलेला असतो.

सरकार चा विरोध नक्की करावा पण अशा घटनेला च आव्हान देण्याच्या पध्दती ने नव्हे तर...स्वता यंत्रणेचा एक भाग होउन >>>

मत देताना तुम्हि ? म्हणजे तुम्हि यंत्रणेचा भागच आहात आणी आंदोलन करणे हा देखील सामान्य माणसाचा हक्कच आहे. कोणी तुम्हाला सांगीतले की घटनेला आव्हान देणे म्हणजे चुकिचे आहे ?

असे जर आपले पुर्वज वागले असते तर आज अजुनही ब्रिटिश असते भारतात आपल्या डोक्यावर राज्य करत.

मग असेच काही करावे लागेल,कारण दुसरा पर्याय नाही! (श्रीकांत यांनी दिलेली लिंक)

आलोक पुराणिक ने अमरीका की मिसाल देते हुए कहा, "पहले तो यह जानकारी ज़रूरी है कि किन लोगों का पैसा जमा है, और दूसरा यह कि किस एकाउंट में कितना पैसा है, हाल ही में अमरीका ने स्विटज़रलैंड के बैंकों को धमकी देकर उन खाताधारकों के नाम निकलवा लिए जिनके वहां एकाउंट थे. भारत सरकार अगर प्रतिबद्ध हो तो विदेशों में ग़ैरक़ानूनी तौर पर जमा काला धन वापस लाने में मुश्किल नहीं होनी चाहिए."
जी गोष्ट अमेरिकेला जमते,ती भारताला करणे अवघड का वाटावे?

अमेरिकेचं वेगळंच आहे.
एबोटाबाद मधे केली तशी कारवाई भारत करु शकेल काय?
तसंच हे आहे. मुळात स्विट्झर्लंडची इकॉनॉमी या काळ्या पैशावर आधारित असेल तर ते आपल्याला भीक काय घालतील ( काळ्या पैशाबाबतच्या आपल्या मागणीला )

तर चर्चा होती रामदेव बाबा यांच्या आंदोलना बाबत.

रामदेव बाबा किंवा त्यांचे समर्थक यांच्याकडे स्विस बँकांतील काळा पैसा परत आणणेबाबत काही कृती आराखडा उपलब्ध आहे का? की हे काम सरकारचं असं त्यांचं म्हणणं आहे. जर हो असेल तर करु दे सरकारलाच हे काम.

काळ्या पैशाबाबत भाजप गळे काढत असताना मला उगीच ती जैन डायरी आठवली ज्यात हवालामार्फत पैशाचा व्यवहार झाला होता आणि ज्यात ''एल.के.'' असं आद्याक्षर असलेलं एक नाव होतं.

एल .के. म्हणजे अडवाणी की काय?
तर ते असो.आतापर्यंतच्या प्रतिसादांवरून असा निष्कर्ष निघतो की-
१)सरकारची कृती चुकीचीच होती. लोकशाहीत आणीबाणीचा अपवाद वगळता अशी घटना पूर्वी कधीही घडली नव्हती,म्हणूनच निषेधार्थ आहे.
२)रामदेवबाबांचे उपोषण शांततापूर्ण मार्गाने सुरु होते.किरकोळ तांत्रिक कारण दाखवून ते दडपण्यात आले.कारण सरकारला अनेक कारणांनी भिती वाटत होती.
३)रामदेवबाबा यांनी स्वतःला अटक करवून घेणे त्यांच्यासाठी जास्त श्रेयस्कर ठरले असते.त्यांनी स्त्रियांच्या आश्रयाला जायला नको होते.
४)गनिमी कावा,इत्यादी शब्दांतून बाबांचा शब्दच्छल दिसून येतो.
५)या सर्व प्रकारचा फायदा भाजपला झाला.आणि येत्या लोकसभा निवडणूकीत भाजपला निवडून येण्याची शक्यता निर्माण झाली.
६)सरकार 'पूर्वग्रहदूषित' पद्धतीने रामदेवबाबा यांचे पितळ उघडे पाडण्याचा प्रयत्न करीत आहे.इतकी वर्षे सरकार झोपले होते काय?
७)आता लवकरच सरकार अण्णांच्याही पाठीमागे हात धुवून लागण्याची शक्यता आहे.
८)सरकार भ्रष्टाचाराविरोधातील कारवाईचे फक्त आश्वासन देते.कृतीची अपेक्षा करू नये.कारण सरकारमधील भरपूर लोक विविध घोटाळ्यांत अडकले आहेत.
९)स्वीस बँकेतील पैसा फक्त जनतेबद्दल खरी कळकळ असलेले सरकारच परत आणू शकते.असे सरकार लाभण्याची शक्यता फारच कमी आहे.
१०)जनतेने अधिक प्रगल्भ होण्याची आवश्यकता आहे.

पतंजली योगा साठी परदेशातून सरकारला माहीती न देता आलेल्या पैशाची तसच परदेशात स्वामी रामदेव ट्रस्टच्या असलेल्या शाखांची सरकारकडून चौकशी होणार आहे असं सध्या सगळ्या वाहिन्यांवर सांगताहेत.

बाबांचा होमवर्क कच्चा होता असं दिसतंय. कारवाई होईल अथवा नाही हे अलाहिदा पण आंदोलनकर्त्यांच्या नैतिक बाजूला आव्हान देण्याचा सरकारचा धूर्त डाव यामागे असल्याचं जाणवतंय.

राहूल गांधी कुठे दिसले नाहीत ते ? आंदोलनकर्त्यांवर जुलूम झाल्यास त्यांच्या मनाला वेदना होतात, पोलिसांना चुकवून मोटारसायकलवर घटनास्थळी पोहोचतात म्हणून आईने चावी लपवून ठेवलेली दिसतेय ..

स्विस बँकांवर दबाव आणणे हि अशक्यकोटीतील गोष्ट नाही. हा पैसा भारत सरकारची कर्जे फेडण्यासाही, क्रुड ऑईल विकत घेण्यासाठी, सरकारच्या नावे परदेशी गुंतवणूक करण्यासाठी, मशिनरी आयात करण्यासाठी वापरता येईल.
पैसे ब्लॉक करुन काय साधणार आहे ?

लोकसत्ता मधे मध्यंतरी गोदावरी खो-यात सापडलेल्या नैसर्गिक वायूच्या करारापोटी सरकारला देण्यात येत असलेल्या रॉयल्टीमधे फसवणूक होत आहे असं अनिल अंबानींचा हवाला देऊन सांगण्यात आलं होतं.. लिंक मिळाल्यास टाकतो..

हा पैसा जरी सरकारला मिळाला तर स्विस बँकेचा द्राविडी प्राणायाम टाळता येईल.

स्विस बँक दबावाखाली माहिती उघड करेल कां?? ईतर देशातील ग्राहकांची 'विश्वासार्हता' गमवुन बसु असा विचार करुन त्यांनी माहिती देणं नाकारलं तर???

अनिल, सरकारने रामदेव बाबांना कचाट्यात पकडलं आहेच. अण्णांच्या बाबतीत ते होऊ शकलं नसतंच कारण त्यांचे सगळे हिशेब स्वच्छ आहेत (एक तांत्रिक चूक सोडली तर). पण रामदेव बाबांच्या विश्वासार्हतेबद्दल मात्र प्रश्न उपस्थित होऊ शकतात.

आणि येत्या लोकसभा निवडणूकीत भाजपला निवडून येण्याची शक्यता निर्माण झाली. >>> म्हणजे भा़जपाला आता पासून 'स्विस बॅकेतून काळा पैसा कसां आणायचा' याची शिकवणी घ्यायला नागपूरला जावं लागेल तर. ;-). आणि xxजी-शेटंजींचा पक्ष म्हणुन ओळखल्या जाणार्‍या पक्षाला अशा शेटजींचा काळा पैसा बाहेर काढणं जमेल कां ??

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=331...

सहज जाता जाता : खूप वर्षांपूर्वी पाचव्या सहाव्या पानावर एक छोटी बातमी वाचली होती. बॉम्बे हाय पासून काही अंतरावर रिलायन्सला समुद्रात गॅस सापडला. ओनजीसी कंपनीने सोळा वर्षे या भागात सर्व्हे करूनही त्यांना गॅस मिळाला नाही म्हणून सहा महिन्यांपूर्वी रिलायन्सला या भागाचे कंत्राट देण्यात आल्याचे बातमीत म्हटले होते.

योगायोग म्हणजे काही वर्षानंतर पुन्हा अशाच पद्धतीने ऑनजीसीला गोदावरी बेसिनमधला सर्व्हे थांबवावा लागला आणि काही महिन्यातच रिलायन्सला घबाड सापडले.

सरळ सर्व मंत्र्याच्या/अधिकार्‍यांच्या पासपोर्ट वरिल मागिल ५० वर्षाचा ईतिहास तपासल्यास कोणी किती वेळेला स्विझर्लंड वारी केली हे समजेल. आणि किमान अंदाज तरी बांधता येईल.

एक मात्र वाटते कोणी कितीही उपोषण, आंदोलन केले तरी हे सरकार त्याला भिक घालणार नाही.
बाकी सर्वांचे हात बरबटले असल्याने, तो पैसा काही भारतात येणार नाही, फक्त निवडणुकीसाठी एक नविन अजेंडा मात्र तयार झाला आहे.

'गरीबी हटाओ'
'मंदिर वही बनायेंगे'
'इंडिया शायनिंग'
आता
'काला धन वापस लाओ'

अहो टिल्लू,

स्विस बँकेत पैसे ठेवायला तिकडे जाव लागत नाही. मोठ रॅकेट आहे. अनेक इंपोर्ट्/एक्स्पोर्ट करणार्‍या कंपन्या बोगस आहेत. प्रत्यक्षात ते या पैशांची ने आण करतात तेही खात्रीने. कमीशन बेसेसवर.

रामदेव बाबांना सर्व स्तरावर विरोध यासाठीच झाला की स्वीस बॅकेच्या व्यवहारात नुसतेच राजकारणी नाहीत तर उद्योगपती, व्यापारी सुध्दा या रॅकेटमध्ये आहेत. सर्व स्तरावरचा काळा पैसा या पैशाचा स्त्रोत आहे.

पुर्वी अस समजल जायच की नोकरदारांकडे काळा पैसा नसतो. आता नोकरदारांनाही पॅकेजमधे काही पैसे असेच दिले जातात.

रामदेवबाबांच्या ५०० आणि 1000 नोटा रद्द करण्याच्या मागणीने सगळेच हवालदिल झाले आणि पध्दतशीर पणे बाबांचे आंदोलन दडपण्यात आले.

एकंदरीत मुद्दा रास्त असुन आंदोलन फसले खरे. अण्णांनाही या दिव्यातुन जावे लागले होते. आंदोलनाची दिशा किंवा वेळ चुकली की आंदोलन फसत हे अण्णांना येरवडा जेल मध्ये उमगले असेल. रामदेवबाबांनाही उमगेल. पण याच अर्थ त्यांचे नेतृत्व कमी दर्जाचे आहे हे बरोबर नाही.

अण्णांच्या मागे जशी हुशार लोकांची टीम आहे तशी टीम असेल तर ते नक्की भारी पडतील अर्थातच जनहितासाठी.

रामदेव बाबांच्या आंदोलनाला कुणी पैसा पुरवला हे देखील समोर यायला हवंय

बाबा ५००० रु पर हेड घेऊन योगा शिकवतात असं ठमाबाईनी साम्गिलं आहे ना? Happy

काल रात्री एन डी टी व्ही वर विनोद दुआ चा कार्यक्रम पाहिला. बर्‍याचवेळा हा माणूस काहीसा सिनिकलीच बोलतो. ( या लेखा वरील अनेक प्रतिक्रियां सारखा- पण परिस्थितीच अशी आहे त्याला काय करणार?) कालच्या कार्यक्रमात तो शेवटी एक बाब फार चांगली बोलला. आन्दोलन अण्णा करतात की रामदेव बाबा, त्यांना संघ/बीजेपी सपोर्ट करतय की आणखी कोणी, तो सपोर्ट करणारे स्वतः कसे आहेत, सुषमा स्वराजने राजघाटावर जे काय केले ते योग्य की अयोग्य, रामदेवबाबाचे आन्दोलन सरकारने ज्या प्रकारे दडपले ते किती चूक/बरोबर दिग्विजयसिंगची मुक्ताफळे या सार्‍या गोष्टी भ्रष्ट लोकांना वेसण घालायसाठी जे लोकपाल विधेयक आणायचे आहे त्या पासून आपले लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करतायत. टीम अण्णा/रामदेव यांनी काहीही झाले तरी सरकारला आता हे विधेयक आणणे टाळण्याचा कोणताही बहाणा मिळू देउ नये.

मायावतींविरुद्ध नाट्यमयरित्या आंदोलनात उतरणारे राहुल गांधी कुठे आहेत? असा सवाल काही मित्रांनी विचारला आहे,आणि आपापल्यापरिने त्याचे उत्तरही दिलेले आहे. देशाचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी इडापिडा टळो म्हणून चिस्ती दर्ग्यावर चादर चढवल्याचे वृत्त आहे.मनमोहनसिंग मागच्या ४-५ दिवसात कधी नव्हे ते अतिशय निराश हताश वाटले. 'पोलिसांची कारवाई योग्य होती' असे बरेच कष्टाने बोलले.(एखादा टीवी बिघडल्यावर रिमोटचे बटन दाबल्यास चुकूनमाकून एखादे च्यानेल सुरु होऊन बंद पडावे तसे!)भावी पंतप्रधान! राहूल गांधी यांनी तर ब्र सुध्दा काढला नाही;हा दुटप्पीपणा नव्हे काय?

काल रात्री आस्था चॅनेल पाहिलं. बाबा राम्देव यांच्या समर्थनार्थ उपोषण करणारे एकेक साधूबाबा तसं सांगत होते. त्यातल्या एकाने म्हटलं की बाबा रामदेव हे रामाच्ये, कृष्णाचे अवतार आहेत. देश वाचवायचा तर बाबांना वाचवले पाहिजे.

अर्थात बाबा हे सगळं बघत बसले होते तिथे.

>>> सरळ सर्व मंत्र्याच्या/अधिकार्‍यांच्या पासपोर्ट वरिल मागिल ५० वर्षाचा ईतिहास तपासल्यास कोणी किती वेळेला स्विझर्लंड वारी केली हे समजेल. आणि किमान अंदाज तरी बांधता येईल.

मंत्री, खासदार यांना राजनैतिक पासपोर्ट दिलेला असतो. त्यावर ते ज्या देशाला भेट देतात त्या देशाच्या व्हिसाची वा भेट दिल्याची नोंद नसते. त्यामुळे भारतातून एकदा पाउल बाहेर ठेवल्यावर कोण कोठे गेले हे समजणे अशक्य आहे.

>>बाबा ५००० रु पर हेड घेऊन योगा शिकवतात असं ठमाबाईनी साम्गिलं आहे ना?

पैसे घेऊन योगा (किंवा काहीही) शिकवू नये असा कायदा आहे का? कैच्याकै. याहून अधिक पैसे घेऊन योगा वगैरे शिकवणारे लोक आहेत कित्येक. मग यांनीच (म्हणजे बाबांनी) काय घोडं मारलंय?

>>देशाचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी इडापिडा टळो म्हणून चिस्ती दर्ग्यावर चादर चढवल्याचे वृत्त आहे

Rofl

आता काही लिहायचं आहे का बाकी कुणाचं ? या बीबीचं दार लावून घ्यावं म्हणून सुचवायला आल्तो. कुणाला उबळ आली असेल तर सांगा तसं...

पैसे घेऊन योगा (किंवा काहीही) शिकवू नये असा कायदा आहे का

तसे नाही हो. बाबाच्या आंदोलनाला पैसा कुठून येतो याची विचारणा झाली आहे, म्हणून हा मुद्दा लिहिला.. आंदोलनं स्वतःच्झ्या पैशाने करायला बाबा समर्थ आहेत. बाबाची सभा म्हनजे काही निवडणूक प्रचार नव्हे दुसर्‍याच्या पैशाने करायला..

Pages